प्रत्येकाला माहिती असले पाहिजेत असे काही अलिखित सामाजिक नियम कोणते आहेत? 1.मित्राच्या बहिणीशी लग्न करणार नसाल तर प्रेम करू नये. दवाखाना, विमान प्रवास, आणि मुलाखत या तीन ठिकाणी शक्यतो परफ्युम वापरू नये. लग्न समारंभ ,शोक समारंभ, व कामाचे ठिकाण येथे शक्यतो सर्वात मिसळून जातील असेच कपडे घालावेत.4.कोणी पैसे दिले तर त्याने मागायचा आधी परत द्यावेत.5.जर … Continue reading अलिखित सामाजिक नियम
Category: Uncategorized
बॅग कशी भरायची
बॅग कशी भरायची ? आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठीबॅग कशी भरायची तेआता मला कळले आहे !फापट पसारा आवरून सारा , आता सुटसुटीत व्हायचं आहे ! याच्या साठी त्याच्या साठी ,हे हवं , ते हवंइथे तिथे - जाईन जिथे ,तिथलं काही नवं नवं हव्या हव्या चा हव्यास आताप्रयत्नपूर्वक सोडायचा आहे,बॅग हलकी स्वतः पुरतीआता फक्त ठेवायची आहे ! बॅग … Continue reading बॅग कशी भरायची
मुली म्हणजे काळजाचा तुकडा असतो.
असं म्हणतात मुलीच्या लग्नात आईने मंगलाष्टक ऐकू नये. कारण ते सुर मन हळवं करतात. जी मुलगी लहानाची मोठी होते, खेळते, बागडते तिच जेंव्हा सासुरवाशीण व्हायला निघते तेंव्हा त्या मुलीला देखील माहेरचे पाश सोडणं अवघड असतं. एक उंबरठा ओलांडून दुसऱ्या घरात प्रवेश करताना ती देखील कावरीबावरी होते. पण जेंव्हा झालं हा विधी करण्याची वेळ येते तेंव्हा … Continue reading मुली म्हणजे काळजाचा तुकडा असतो.
विभाज्यातेच्या कसोट्या
2 ची कसोटी - #ज्या_संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या संख्याना 2 ने नि:शेष भाग जातो . उदाहरणार्थ - 4456 , 982302वरील दोन्ही संख्या च्या एकक स्थानी अनुक्रमे 6 व 2 हे अंक आहेत म्हणून 4456 व 982302 ही संख्या 2 ने विभाज्य आहे. 3 ची कसोटी -जर … Continue reading विभाज्यातेच्या कसोट्या
जुनं ते सोनं
मोट गेली, नाडा गेला,गेला सौंदर कणासहा बैल, नांगर आता,दिसेल का हो पुन्हा…? हेल गेला, कासरा गेला,गेली शर्यत बैल गाडीची.मोगरी गेली, हातणी गेली,गेली मळणी धान्याची. वावडी गेली, उफननी गेली,गेली धार धान्याची.भुसारा गेला, कलवड गेला,गेली इर्जिक नांगराची वाडगं गेलं, खळं गेलं,गेली शान झोपाट्याची.सावड गेली, बलुतं गेलं,गेली राखुळी गुरांची. हौद गेला, सारन गेली,गेली बारव जुनीवढवान गेलं, रहाट गेलंशेंदू … Continue reading जुनं ते सोनं
सांकव
साकव "साकव" हाच शब्द आमच्या विभागातून हद्दपार झालाय .आम्ही ज्या वेळी शाळेत जायचो त्या वेळी आमच्यासाठी महत्त्वाचे साधन होते साकव. पावसाचे ४ महिने ज्याच्या भोवती आमचे दैनंदिन जीवन फिरायचे तो म्हणजे आमचा "साकव " याच साकवाची अनुभूती सांगणारी ही अनुभव कथा "साकव". सांकव मे महिन्याची सुरुवात झाली की साकव बांधायचे वेध लागायचे.मग वाडीतले करते सवरते … Continue reading सांकव
विज्ञान गड
"इंजीनियरिंग मधला एक अद्भुत नमुना"आशिया खंडामधला पहिला प्रकल्प"विज्ञान गड"आकाराला येतोय महाबळेश्वर तालुक्यामध्ये "कोट्रोशी" या ठिकाणी. नमस्कार अभियंता मित्रांनो , आपणा सर्वांना अभियंता दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. अभियंता दिनाच्या निमित्ताने आपणाला एका नवीन प्रकल्पाची ओळख करून द्यावी अशा उद्देशाने या प्रकल्पाची थोडक्यात माहिती आपणाला पाठवत आहे. "विज्ञान गड" गेली १८ वर्ष या प्रकल्पाचे काम सुरू आहे. … Continue reading विज्ञान गड
ईद ए मिलाद आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर
https://www.youtube.com/embed/7WXEli9hJvI समस्त जगाने ज्यांचा आदर्श घेतला, ज्यांच्या संवेदनशीलतेचे गोडवे गायले अशा मानवतेच्या पुरस्कर्त्यांचा आज जन्मदिवस. 'मोहम्मद पैगंबर म्हणजे अमन अन् शांतीचा वैचारिक सुगंध' असा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. त्या वैचारिक सुगंधाने कित्येकांचे आयुष्य सुवासिक झाले त्याची गणतीच करता येणार नाही. इस्लाम … Continue reading ईद ए मिलाद आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर
1990 चा काळ होता तो…
१९९०-९१ चा काळ होता तो… त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी सायकल घेत होतो… बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कँरीअर नसायचे, ज्यामुळे तुम्ही कुणाला डबल सिट नेऊ नये हा उद्देश असायचा. 😀 भाडे जेमतेम ५० पैसे ते १ रू तास च्या आसपास होतं. दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा. 📝 … Continue reading 1990 चा काळ होता तो…
गरिबीची भूक
रात्रीचे साडेदहा वाजल्या असतील.घरात लाईट नसल्यामुळें गावातली पोरं गावकुसाबाहेर असणा-या झेड.पी.शाळंत मुक्कामी अभ्यासाला जात व्हती, त्यातलाच बबल्या एक व्हता.आज काही केल्या त्याचं मन अभ्यासात लागत नव्हतं,ना डोळ्यात झोप येत व्हती. काय करावं काही कळंत नव्हतं.घराकडं जावं तर खायला काय मिळंल याची खात्री नव्हती कारण आईनं सकाळीच पीठ मागून भाकरी केली व्हती.वर्गाच्या पत्र्याकडं बघत पडला.आता काय … Continue reading गरिबीची भूक




