- आपला महाराष्ट्र –आपली संस्कृती –
“कीर्तन ”
भाग 2 रा दि. 14 मे, 2025
=========================================================
संकलन आणि मांडणी :- श्री.लक्ष्मण काटेकर, सोलापूर (महाराष्ट्र).
Contact @ 7588020886.
=======================================================
कीर्तन
वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात, आणि हे करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार. भारतातल्या सर्व प्रदेशांत, सर्व भाषांत आणि सर्व संप्रदायांत किर्तन हा प्रकार आढळतो.नवविधा भक्तीपैकी कीर्तन हा दुसरा प्रकार आहे.[१]
महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. येथे होणाऱ्या कीर्तनांत नारदीय कीर्तन आणि वारकरी किर्तन असे दोन मुख्य प्रकार आहेत. नारद हा भारतातील आद्य कीर्तनकार आहे, असे मानले जाते.
शब्द व्युत्पत्ती आणि व्याख्या, आरंभ
कीर्तन हा शब्द संस्कृतात ‘कॄत्’ या दहाव्या गणातल्या धातूपासून झाला आहे. या धातूचा अर्थ उच्चारणे, सांगणे असा होतो. कीर्तन ज्या स्थानावर उभे राहून करतात ते स्थान म्हणजे देवर्षी नारदांची (कीर्तनाची) गादी. या कीर्तनाच्या पद्धतींच्या अनेक व्याख्या आणि संकल्पना भरत महामुनींच्या नाट्यशास्त्रापासून केल्या गेल्या.
कीर्तनाचा इतिहास
भारतवर्षात नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते महर्षी व्यासांस शिकवले, व्यास महर्षींनी शुकास शिकवले आणि पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला, अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते.
वस्तुतः ‘श्रीहरिकीर्तन’ खेड्यापाड्यात पोहोचले आहे. सर्व लोकांना ईशभक्तीमध्ये रममाण करणे हा कीर्तनाचा उद्देश आहे.
अनेक कीर्तनकारांनी त्यांच्या कीर्तनांनी शिवाजी महाराजांच्या काळात व ब्रिटिशांच्या काळात लोकजागृतीचे काम केले.
महाराष्ट्रात प्रचलित विविध भक्तिप्रधान गायनशैलींमध्ये कीर्तन परंपरेला अत्यंत मानाचे स्थान आहे. महाराष्ट्राला कीर्तनाची अत्यंत समृध्द परंपरा लाभली आहे. ही परंपरा पूर्णपणे सांगितिक आहे. ज्यावेळी ईश्वराचा नामघोष, जयजयकार आणि आराधना संगीताच्या माध्यमातून केली जाते. त्यावेळी त्याला नामसंकीर्तन असे म्हणतात आणि ज्यावेळी ही भक्ति केवळ गद्यरूपात शब्दांद्वारे व्यक्त केली जाते, त्यावेळी त्याला कथा असे संबोधिले जाते. अर्थात, साहित्य, वक्तृत्व, अभिनय, भाषा, आणि संगीताचा समावेश ज्यात आहे ते कीर्तन होय. कीर्तनात कीर्तनकार आपल्या इष्टदेवतेच्या सगुण रूपाचे वर्णन संगीताच्या माध्यमातून करतो‐नवविधभक्तीतीलकीर्तनहादुसराभक्तिप्रकारआहे.
कीर्तनाचे अंतिम ध्येय परमार्थ असले तरी कीर्तनकार आपल्या कीर्तनात माणसाला दैनंदिन जीवनात येणारया प्रापंचिक समस्यांवरही भाष्य करतो. कीर्तनाच्या माध्यमातून तो वेगवेगळया सामाजिक प्रश्नांना वाचा फोडतो आणि व्यवहारचातुर्य आणि नैतिक आचरणावर प्रबोधनही करतो. पुराण आणि इतिहासातील आदर्शांचे उदात्तीकरण करून मानवी जीवनातील त्यांचे महत्व विषद करतो. अशाप्रकारे कीर्तनकार आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सतत समाजप्रबोधन करीत असतो.
प्रस्तुत लेख महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेचा उगम आणि विकास यावर भाष्य करणारा अभ्यासपूर्ण लेख आहे.
काही महत्वाच्या व्याख्या
1) कीर्तन:- ज्यावेळी ईश्वराचा नामघोष, जयजयकार आणि आराधना संगीताच्या माध्यमातून केली जाते, त्यावेळी त्याला नामसंकीर्तन असे म्हणतात.
2) उपास्य दैवत:- कीर्तनाच्या निरनिराळया संप्रदायांमध्ये ज्या प्रमुख दैवतांची उपासना केली जाते, त्या देवता म्हणजे उपास्य दैवत होय.
3) स्ंप्रदाय:- एक असा जनसमूह, जो एका विशिष्ट तत्वज्ञानाच्या आधारे आपली जीवनचर्या निश्चित करतो, आणि त्याआधारेच आपले दैनंदिन जीवनातील खान पान आणि राहणीमान कशाप्रकारे असावे हे निश्चित करतो, ज्यायोगे त्यातील प्रत्येक सदस्य आपले पारमार्थिक कल्याण साधू शकेल.
4) नारदीय संप्रदाय:- कीर्तनाची सुरूवात महर्षी नारदांपासून झाली असे मानतात‐हीचपरंपरापुढेचालूराहिलीआणियापरंपरंचेपालनकरणारयासंप्रदायालानारदीयसंप्रदायम्हणूनओळखलेगेले.
5) वारकरी संप्रदाय:-पंढरपूरात विठ्ठलाच्या वारीला नियमितपणे जाणारया आणि विविध संतांच्या अभंगांवर मनापासून प्रेम करणारया संप्रदायाला वारकरी संप्रदाय असे म्हणतात.
विषयप्रवेश
संगीत आणि समाज या दोहोंमध्ये असलेल्या आंतरिक संबंधामुळे संगीत मानवाच्या सहज प्रवृत्तींच्या रूपाने भारतीय संस्कृतिचे अभिन्न अंग बनले आहे. प्रत्येक समाजाची आणि राष्ट्राची यशस्विता ही त्या त्या समाजाच्या सांस्कृतिक सभ्यतेवर अवलंबून असते. संगीताच्या अभ्यासाबरोबरच व्यक्ती स्वतःचा विकासही साधतो आणि कलेच्या माध्यमातून आपले जीवन आधिक सृजनशील आणि सुसंस्कारित बनवितो| संगीत हे भावनांच्या अभिव्यक्तिचे सशक्त माध्यम आहे. प्राचीन वेद आणि पुराणांमध्ये आपल्याला संगीताचे संदर्भ प्राप्त हेातात. प्रचलित चार वेदांमध्ये सामवेद हा संपूर्णतः संगीतमय वेद आहे. मुळात संगीताची उत्पत्तीच धार्मिक प्रेरणेतून झाली आहे. ईश्वरपूजा, ध्यान, जप, तप या सर्वांपेक्षाही गानसेवा आहे. भारताच्या सर्वच प्रांतांमध्ये कीर्तन परंपरेचे अस्तित्व दिसून येत. मात्र प्रत्येक प्रांताची कीर्तनाच्या प्रस्तुतीकरणाची पध्दत निराळी आहे. कर्नाटक, उत्तर भारत आदि ठिकाणच्या भक्तिसंप्रदायांची कीर्तने ही संगीत प्रधान असतात तर महाराष्ट्र आणि बंगाल च्या कीर्तनांमध्ये कथा, उपदेश, आणि संगीताचे महत्तव अधिक असते. गुजरात, उत्तर प्रदेश, बंगाल इ. प्रदेशांत फक्त रामलीला, कृष्णलीला गातात. पूर्वरंग नसतो. कर्नाटक आणि आंध्रात महाराष्ट्राप्रमाणेच हरिदासी कीर्तन केले जाते. या प्रत्येक प्रांतांमध्ये अनेक थोर कीर्तनकार होवून गेले, जसे कर्नाटकात पुरंदरदास, उत्तर भारतात कबीर, तुलसीदास, गुजरातमध्ये नरसी मेहता, बंगालमध्ये श्री चैतन्य महाप्रभु इ.
वेदांत शास्त्रामध्ये प्रत्येक कार्याची दोन फळे सांगितली आहेत| अतिरिक्त फळ आणि मुख्य फळ. कीर्तनाचीही अशीच दोन प्रयोजने मानली गेली आहेत. मूळ पारमार्थिक बैठक असलेल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजात धर्मभावना, भक्तिभाव जागृत करणे आणि संस्कृतीचे रक्षण करणे हा सर्वच प्रांतांमधील कीर्तनाचा प्रमुख उद्देश्श आहे. त्याचबरोबर समाजप्रबोधन आणि मनोरंजन ही देखील कीर्तनाची अतिरिक्त प्रयोजने आहेत.
महाराष्ट्र ही भागवतधर्माची ध्वजा फडकविणारया संतांची भूमि आहे. कीर्तन महाराष्ट्रीय संस्कृतिचा अमूल्य ठेवा आहे. तेराव्या शतकात महानुभाव आणि वारकरी संप्रदायांमध्ये मराठीमध्ये साहित्यनिर्मिती झाली| संतवाङ्मयामध्येही कीर्तनाचा उल्लेख प्राप्त होतो. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायाच्या श्लोकांवर केलेल्या भाष्याने कीर्तनाचे महत्व सिध्द होते. नारद आणि शुक हे दोघेही प्राचीन काळापासून कीर्तनकार म्हणून प्रसिध्द आहेत. महाराष्ट्रातील आद्य कीर्तनकार म्हणून प्रसिध्दी पावलेल्या संत नामदेवांनी परमेश्वराचे नाम, चिंतन आणि स्मरण या त्रिपुटीच्या माध्यमातून कीर्तनास लोकप्रिय केले. कीर्तनात नामस्मरण, श्रवण, गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन इ. चा सुरेख समन्वय आढळतो. अशाप्रकारे कीर्तनभक्तिद्वारे महापापांच्या राशींचेही निर्मूलन होते असे पुराणांमध्ये वर्णन आढळते. भक्ति म्हणजे भक्ताला त्याच्या आराध्यापर्यंत पोहचविणारी उत्कट प्रेममय अवस्था, आणि कीर्तन म्हणजे संगीत आणि हरिकथेच्या माध्यमातून त्याला मिळणारी अनुभती होय.
कीर्तनाचा उगम आणि स्वरूप
कीर्तन या शब्दाची उत्पत्ती कीर्त धातूपासून झाली. याचा अर्थ, उल्लेख करणे, सांगणे, आवाहन करणे, पठन करणे, पुनरावृत्ति करणे अथवा प्रशंसा करणे असा होतो. ऋग्वेदातील सूक्तांमध्ये देवतांची स्तुति, आवाहन, त्यांना आपल्या विविध कामनांच्या पूर्तीसाठी याचना करणे आदि प्रयोजने संगितली आहेत. पौराणिक काळात भक्तिला मोक्षमार्गाच्या रूपात महत्व होते. भगवत्गीतेमध्ये श्रीकृष्णाने कीर्तन आणि भक्ति ला ईश्वर आणि मोक्षप्राप्तीचा सर्वाधिक सोपा उपाय म्हणून वर्णिले आहे. नारद मुनींनी महर्षी व्यासांना, आणि व्यासांनी शुकमुनींना ही कला शिकविली आणि पुढे तिचा सर्वदूर प्रचार झाला असेही उल्लेख आपल्याला प्राप्त होतात. गुरूपुराणात आत्मज्ञानाद्वारे परमपद प्राप्त करण्यासाठी कीर्तनाचा मार्ग सांगितला आहे| कोणताही भेदभाव न ठेवता सर्व स्तरांमधील लोकांना अंतिम पुरूषार्थाप्रत नेणारा मार्ग म्हणजे कीर्तन असे म्हटले गेले आहे. असे म्हणतात की वैदिक परंपरेत सांगितलेल्या मोक्षमार्गांना भक्ति आंदोलनाच्या काळात सोप्या पध्दतीने कीर्तनाच्या रूपात प्रस्तुत केले गेले. विविध धर्मग्रथांमध्ये कीर्तनाचे उल्लेख पुढीलप्रकारे सांगितले आहेत.
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं, पादसेवनम्।
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्।।
भागवत् पुराण एकादश स्कंध ।
कलेर्दोषनिधे राजन्नस्ती हयोको महान्गुणः।
कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसंगःपरं व्रजेत।।
भागवत पुराण (12‐3‐51)
लोकेऽपि भगवद्गुणश्रवणकीर्तनात्।
नारद भक्तिसूत्र (3‐37)
कीर्तन म्हणजे कला की अनुष्ठान यावर अनेक मत मतांतरे आढळतात‐कीर्तनभारतीयसंस्कृतीचाअविभाज्यघटकअसल्यामुळेधर्म, तत्वज्ञान, नीती आणि कला या संस्कृतीच्या चारही अंगांचे दर्शन कीर्तनात होते‐कीर्तनहीएकअष्टपैलूकलाआहे. यात सादरीकरणाला विशेष महत्व आहे. संपूर्ण कीर्तनात संगीताचा भाग केवळ तीस टक्के असतो‐याचबरोबरअभ्यास, नाटय, अभिनय, आत्मविश्वास आणि वक्तृत्व यांचेही महत्वाचे स्थान कीर्तनात मानल्या गेले आहे. असे असले तरी कीर्तनास पूर्णपणे कला समजणे अयोग्यच मानले जाईल कारण एकदा का कीर्तनाला कलेच्या कक्षेत बसविले की मग केवळ मनोरंजन आणि अर्थार्जन या दोन उट्ठेश्शप्राप्तीसाठीच कीर्तनाचे प्रयोजन राहील आणि केवळ त्याच दृष्टीकोणातून इतरही अनेक बाबींचा यात समावेश केला जाईल. कलेमध्ये अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणारया नवरसांचा परिपोष कीर्तनात करताना शांत अथवा भक्तिरसाखेरीज अन्य सर्वच रस महत्वाचे ठरतील| आणि कीर्तनाच्या मूळ हेतूकडे दुर्लक्ष होईल. कीर्तनाला अशाप्रकारे करमणुकीचा विषय समजण्याचे कारण म्हणजे हा विषय सगळयांना इतका सोपा वाटतो की आजकाल जो उठतो तो कीर्तन करायला लागला आहे| एखादया अभ्यासू आणि विद्वान कीर्तनकाराप्रमाणे कीर्तनाचा पूर्वरंग आणि उत्तररंग सर्वांगसुंदर करण्यासाठी आवश्यक असणारया वैचारिक साधनसामुग्रीच्या संकलनाकडे सामान्य कीर्तनकारांचे दुर्लक्ष होत चालले आहे. केवळ उदरभरणासाठी कीर्तन करणारा कीर्तनकार हा आपल्या कीर्तनात सामान्य आख्यानांच्या जोरावर श्रोत्यांना खुष करण्याचा प्रयत्न करतो असे स्पष्ट मत ह‐भ‐प‐नानाबुवाबडोदकरयांनी1963 मध्ये मुंबई येथे झालेल्या नारदीय हरिकीर्तन संमेलनाच्या अध्यक्षपदाचे भाषण करताना व्यक्त केले आहे.
कीर्तनाची विषयवस्तु
कीर्तनात संतपुरूषांची चरित्रे, पद, अभंग, ओवी, श्लोक, पंतकवींच्या आर्या, कटाव, फटके इत्यादि आणि लोकसंगीतातील भारूड, अंजनीगीते, गवळण, आदि पद्य प्रकारांचा उचित प्रयोग केलेला असतो. ज्या संप्रदायाचे कीर्तन असेल त्या संप्रदायातील परिपाठापमाणे संत महंतांनी निर्मिलेले साहित्य आणि वाङमय कीर्तनाचे वेळी उपयोगात आणले जाते. मुळात कीर्तन हे समाजप्रबोधनाचे माध्यम असल्याने त्या विषयांना साजेशा साहित्याचा भरणा कीर्तनात असतो. याशिवाय रामायण, महाभारत, अष्टादश पुराणे, फुटश्लोक, आरत्या, लळित, गांधळ, पद, सुभाषिते, भूपाळया, नकला, गप्पा, चुटके, विविध सामाजिक प्रसंगानुरूप भाष्य यांचाही कीर्तनात सुयोग्य प्रयोग केलेला असतो‐वरीलसर्वसाहित्याच्यामदतीनेकीर्तनकारआपल्याओघवत्यावक्तृत्वशैलीमध्येकीर्तनकरतोत्यावेळीश्रोत्यांचेदेहभानहरपते.
कीर्तनकाराचे गुण
विद्यावाचस्पति पं‐ शंकर अभ्यंकरजींच्या मते कीर्तनात काव्य, वाद्यवादन, नर्तन, नाटय, गायन, तत्वज्ञान, पाठांतर, वक्तृत्व, विविध भाषांचे ज्ञान, विनय आणि शिष्ठाचाराचे ज्ञान या दशकलांचा समावेशहोतो या गुणांनी युक्त स्वानुभवसंपन्न व्यक्तिलाच कीर्तनकार म्हटले गेले पाहिजे. कीर्तन हा एकपात्री प्रयोगआहे असे जरी मानले तरी श्रोत्यांच्या सहभागाशिवाय हे प्रस्तुतीकरण अपूर्णच आहे. कीर्तनाची व्याख्याकरतानाच आपण सांगतो की ज्यावळे भगवंताची भक्ति ही साहित्य आणि संगीत या दोनही माध्यमांच्याएकत्रित प्रयोगाने केली जाते त्यावेळी त्याला कीर्तन असे म्हणतात. म्हणजेच एक चांगला कीर्तनकार हा एकउत्तम अभिनेता आणि गायक असणे आवश्यक आहे. सुमारे दोन ते तीन तास श्रोत्यांना आपल्या अभिनयआणि वक्तृत्व कलेद्वारे खिळवून ठेवण्यासाठी ताकद त्याच्यामध्ये असावी‐ त्याचे पाठांतर चांगले हवे. त्यालाविनोदाचेही अंग हवे नाहीतर कीर्तनाला उगाचच गंभीर स्वरूप प्राप्त होईल. योग्य ठिकाणी खुमासदारशैलीतून विनोद पेरल्याने कीर्तनातील साचेबंदपणा नाहीसा होतो. कीर्तन हे हरिभक्तीचे माध्यम असल्यानेकीर्तनातील विविध पदांना लावलेल्या चाली सात्विक असाव्यात. कीर्तनकाराला एकच पद वेगवेगळया वेळीवेगवेगळया चालीत बांधता आले पाहिजे. कीर्तनकाराजवळ आधारवचने, किस्से, आणि कोटयंाचा भरपूरसंचय असावा. स्वतः कीर्तनकार सदाचारसंपन्न, विद्वान, स्वधर्माविषयी अभिमान बाळगणारा असावाजेणेकरून तो आपल्या कीर्तनातून समाजाला प्रबोधित करू शकेल. कीर्तनामध्ये अनेक प्रसंगी संस्कृत श्लोकसांगावे लागत असल्याकारणाने कीर्तनकाराचा संस्कृतचा अभ्यास दांडगा हवा‐ उच्चारण स्पष्ट हवे‐ आधुनिकयुगातील घडामोडींविषयी वक्तव्य करताना आजच्याच प्रचलित भाषेतील अर्थातच इंग्रजी भाषेतील विविधघडामोडींची माहिती पण कीर्तनकाराने ठेवणे आवश्यक आहे आणि यासाठी त्याचे इंग्रजी भाषेवरही मराठीइतकेच प्रभुत्व असावे. एकूणच काय ज्याप्रमाणे एखादी नोकरी मिळविण्यासाठी उमेदवार आधी त्यासंबंधीचीसंपूर्ण माहिती मिळवून पूर्वतयारी करतो त्याचप्रमाणे कीर्तनालाही फावल्या वेळेतील उद्योग न समजता एकपूर्णवेळ व्यवसाय म्हणूनच स्विकारावे आणि त्यासाठी आवश्यक असणारया गोष्टींचा पूर्वाभ्यास करावा.
मराठी कीर्तन किंवा “कीर्तन” ही कथा सांगण्याद्वारे आध्यात्मिक शिक्षण देण्याची कला आहे . ती सामान्यतः एक किंवा दोन मुख्य कलाकार, कीर्तनकार , हार्मोनियम , कास्टनेट/चिपल्या/कर्ताल/खरताल , मंजिरा/ताल/झांज/झांज , तंबोरी , मृदंग/पखवाज आणि तबला वादकांसह सादर करतात . यात गायन, अभिनय, नृत्य आणि कथाकथन यांचा समावेश आहे. तथापि, ती इतर कोणत्याही सादरीकरण कलेपेक्षा वेगळी आहे कारण ती मुळात देव आणि ईश्वरीय कृतींचे शुद्ध गौरव आहे.
भारतीय पौराणिक कथांमध्ये, भक्त प्रल्हादची कथा त्याच्या स्वतःच्या वडिलांनी, राक्षस हिरण्यकश्यपूने निर्माण केलेल्या अडथळ्यांना न जुमानता, एका लहान मुलाच्या सर्वशक्तिमान देवाप्रती अखंड भक्तीसाठी प्रसिद्ध आहे . त्याच “अवतार कथा” (अवताराची कथा) मध्ये, स्वर्गीय राजपुत्र बालक प्रल्हाद ९ प्रकारच्या “भक्ती” भक्तीची व्याख्या करतो. संबंधित श्लोक [ 4 ] म्हणतो,
श्रवणम् कीर्तनम् विष्णोह स्मरणम् पादसेवनम् |
अर्चनम् वंदनम् दास्यम् सख्यम् आत्मनिवेदनम् ||
अर्थ – “भक्ती” किंवा भक्तीचे ९ प्रकार (टप्पे) आहेत.
- श्रवणम- देवाच्या किंवा स्वर्गीय गुणांच्या कथा ऐकणे.
- कीर्तनम – देव आणि चांगुलपणाची गाणी गा आणि त्यांचे कौतुक करा.
- स्मरणम् – देव आणि चांगुलपणाचे स्मरण करणे.
- पाद सेवानम् – ईश्वरीय स्थळांना आणि ईश्वरीय कार्यांना सेवा अर्पण करणे.
- अर्चन – देव आणि चांगल्या लोकांना पूजा करणे किंवा सजावट आणि सुखसोयी अर्पण करणे.
- वंदनम् – सर्वशक्तिमान देवाच्या चरणांचा आदर करतो.
- दास्यम् – देवाची निःस्वार्थ आणि अखंड सेवा.
- सख्यम – भौतिक अपेक्षांशिवाय देवाशी मैत्री करणे.
- आत्मनिवेदनम् – काहीही मागे न ठेवता आपले सर्वस्व देवाला अर्पण करणे.
दुसरा प्रकार म्हणजे, “कीर्तन किंवा कीर्तन” म्हणजे जुन्या चांगल्या पुस्तकांमधील आणि पौराणिक साहित्यातील म्हणी सादर करण्याची कला, तसेच संगीत, नृत्य, विनोद इत्यादींचा समावेश आहे. वाहतुकीच्या आणि दळणवळणाच्या साधनांच्या अभावामुळे, कीर्तनकार नावाचे कलाकार बराच प्रवास करतात. दीर्घकाळ ते शहर आणि ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात आणि लोकांना प्रबोधन करण्यासाठी सादरीकरणे सादर करतात. संपूर्ण भारतात भक्तीचा हा प्रकार अजूनही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जिवंत आणि प्रचलित आहे. सर्व राज्यांमध्ये मंदिरे, गुरुद्वारा, मंदिरे आणि पवित्र उत्सव स्थळांमध्ये देखील कीर्तने आहेत.
कीर्तनाला हरी कीर्तन, कथा किंवा हरिकथा, संकीर्तन, नाम संकीर्तन, इ. असेही म्हणतात. कीर्तनात भगवान विष्णूचे सर्वोत्तम भक्त मुनी नारदांच्या काळाइतकी जुनी परंपरा आहे . नारदीय कीर्तन हे ब्रह्मदेव किंवा भगवान ब्रह्मदेव यांचे पवित्र पुत्र नारद यांच्या नावावर असलेल्या स्वरूपाचे अनुसरण करते .
नारदीय कीर्तनासाठी ड्रेस कोड
सज्जनांनो
कोणतेही कठोर आणि लिखित नियम नाहीत आणि वेगवेगळ्या भौगोलिक आणि सामाजिक वातावरणात वेगवेगळे ड्रेस कोड प्रचलित आहेत. तथापि, परंपरेनुसार आणि एक जुनी प्रथा आणि परंपरा म्हणून, पुरुष परिधान करतात
- पांढरे ९ यार्ड सुती कपडे धोतर . (रामदासी कीर्तनकारांचे कलाकार भगव्या रंगाचे कपडे पसंत करतात.)
- पूर्ण बाह्यांचा गुडघ्यापर्यंतचा कुर्ता , ज्याला “बारबंदी” म्हणतात (त्या कपड्याला बटणे नसतात पण बांधण्यासाठी १२ टॅग असतात किंवा सणासुदीच्या वेळी वापरला जाणारा झब्बा नावाचा टॉप).
- डोक्यावर पांढरी किंवा रंगीत पगडी किंवा ” पुणेरी पगडी ” (एक विशेष मुकुटासारखी सजावटीची पारंपारिक टोपी जी सहसा भगव्या रंगाची असते).
- खांद्यावर लटकलेला २ यार्ड लांबीचा रंगीत “उत्तरेया किंवा उपरणे”.
- हा कलाकार एका खास गादीवर अनवाणी उभा आहे. डाव्या बाजूला हार्मोनियम आणि उजव्या बाजूला तबला वाजवणारा एक संगीतकार.
- ताज्या फुलांचा हार.
- कपाळावर लाल किंवा केशर कुंकू किंवा चंदनाचा टिळक . (कधीकधी काळ्या रंगाचा “बुक्का” देखील विशेषतः “वारकरी कीर्तन” करणाऱ्यांना आवडतो.)
स्त्रिया
- सहसा पारंपारिक मराठी ९ यार्ड साडी घालतात .
- पारंपारिक दागिने ज्यात सामान्यतः गोल “कुड्या”, बांगड्या किंवा बांगड्या, हार आणि वेगवेगळ्या सजावटीच्या ” नथ ” या आकाराचे कानातले असतात.
- कपाळावर लाल कुंकू टिळक किंवा बिंदी .
या कलाकाराने हार्मोनियम, ढोलकी आणि विविध प्रकारची तंतुवाद्ये, ज्यात प्रामुख्याने “झांज”, “चिपली”, “ताल” किंवा “चिमाता” यांचा समावेश आहे, अशी वाद्ये सादर केली आहेत. कलाकाराला साहित्य, संगीत, नृत्य, विनोद आणि अभिनय या विषयांचा भरपूर अभ्यास करावा लागतो. त्याला एक चांगला वक्ता आणि एक कुशल वादविवाद करणारा कलाकार असावा लागतो. सहसा, विषय भक्ती, त्याग, दयाळूपणा, शौर्य, जीवनमूल्ये, जीवनातील दुःखे दूर करणारे आणि प्रत्येक व्यक्तीचा शारीरिक आणि आध्यात्मिक विकास यांनी भरलेले असतात.
भरपूर वाचन, वादविवादाचा सराव, संगीत प्रशिक्षण, सुदृढ स्मरणशक्ती आणि सर्वांगीण ज्ञान यामुळेच कीर्तनात चांगला कलाकार बनू शकतो. पण शेवटी, कीर्तनाचे मुख्य कारण आणि उद्देश म्हणजे “देवाचे आणि धार्मिक कर्मांचे गौरव”.
प्रशिक्षण
प्रशिक्षणासाठी मुख्य संस्था “कीर्तन कुल” आहे, ज्याचे कार्यालय सांगली येथे आहे आणि “करवीर पीठाचे शंकराचार्य” हे अध्यक्ष आहेत. संपूर्ण भारतातील लहान शहरांमध्ये वैयक्तिक शाळा आणि कोचिंग क्लासेस व्यतिरिक्त कीर्तनमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्था आहेत.
मराठी नारदीय कीर्तन खालील ठिकाणी औपचारिक पारंपारिक पद्धतीने शिकवले जाते:
- दादर, मुंबई येथे अखिल भारतीय कीर्तन संस्था [ 8 ]
- सदाशिव पेठ, पुणे येथील नारद मंदिर
- रामटेक, नागपूर येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ [ ९ ]
गोवा, बीड आणि उज्जैन येथे काही लहान शाळा देखील आहेत.
या स्वतंत्र स्वायत्त संस्था म्हणून काम करत आहेत. वेगवेगळ्या संस्था विद्यार्थी आणि प्रेक्षकांसाठी योग्य असलेल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये शिक्षण देतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील संस्था मराठी माध्यमाला प्राधान्य देतात तर कर्नाटकातील संस्था कन्नड, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात हिंदी माध्यम आणि पंजाबमध्ये पंजाबी इत्यादी भाषा वापरतात. काहींनी स्थानिक भाषेसह हिंदी आणि इंग्रजीसह विविध माध्यमांमध्ये प्रशिक्षण सुरू केले आहे.
नारदीय कीर्तनाला सीमा नसतात. जगभरातील महान लेखकांचे म्हणणे ते स्वीकारतात, जर ते त्यांच्या विषयाला अनुकूल असतील आणि तत्त्व किंवा आध्यात्मिक धडे सिद्ध करतील. हे प्रशिक्षण पोस्टल कोर्सद्वारे देखील उपलब्ध आहे, तसेच जर एखाद्याला घरी स्वतःचे शिक्षण घ्यायचे असेल तर साहित्य आणि संगीताचे बाह्य मार्गदर्शन मिळेल. सर्वोत्तम कलाकारासाठी भारताची प्राचीन भाषा “संस्कृत” चे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. ते बहुतेकदा जुन्या पौराणिक कथा आणि देव आणि धार्मिक पुरुषांसह महान जीवनांच्या धार्मिक कृत्यांच्या कथा सांगते.
नारदीय मराठी कीर्तनाचे प्रकार
नारदीय कीर्तन करण्याचे अनेक प्रकार आहेत. वर्णन केलेल्या गोष्टी वगळता, स्वरूप, क्रम आणि ड्रेस कोड सारखाच आहे.
अ. राष्ट्रीय कीर्तन
राष्ट्रीय म्हणजे राष्ट्रवादी. हे नारदीय कीर्तनाचे एक उपरूप आहे. राष्ट्रवादी विचार असलेले कोणतेही नारदीय कीर्तन राष्ट्रीय कीर्तन मानले जाते. वाई जिल्ह्यातील सातारा येथील एका छोट्या शहरातील वैद्यकीय व्यावसायिक भारतीय स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांच्याकडून प्रेरणा घेऊन , त्यांनी आपला व्यवसाय सोडला आणि नारदीय कीर्तनाच्या या स्वरूपाचे प्रणेते बनले. त्यांनी राष्ट्रीय कीर्तनाच्या या नवीन युगाची सुरुवात केली. त्यांनी ब्रिटीश राजवटीविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल जनतेला शिकवण्यासाठी आणि त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी नारदीय कीर्तनाच्या स्वरूपाचा वापर केला. त्यांनी महान महाकाव्यांमधील अनेक पौराणिक कथांचा वापर केला ज्याने जनतेला संदेश दिला आणि स्वातंत्र्य चळवळीला प्रोत्साहन दिले. आधुनिक काळात, महान शास्त्रज्ञ, योद्धे, स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारकांच्या कथा, लढलेल्या लढाया इत्यादींची निवड जनतेचे मनोरंजन आणि शिक्षित करण्यासाठी सोयीस्करपणे केली जाते. म्हणून, नारदीय कीर्तन अजूनही जनशिक्षणाचे एक लोकप्रिय साधन आहे. ते आजही मनोरंजनाद्वारे आध्यात्मिक प्रशिक्षणाची कला म्हणून काम करते. राष्ट्रवाद आणि कलेच्या अतिरिक्त प्रवाहासह ही भक्ती आहे.
बी. रामदासी कीर्तन
या स्वरूपाचे नाव समर्थ रामदासांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे . येथे स्वरूप नारदीय कीर्तनासारखे आहे, फरक एवढाच आहे की ते समर्थ रामदासांच्या कवितेवर आधारित आहे आणि निवडलेल्या बहुतेक कथा “रामायण” मधील आहेत. दरम्यान, नामजप देखील भगवान रामांना समर्पित केला जातो, त्यांच्या कृत्यांचा आणि शौर्याचा गौरव केला जातो. समर्थ रामदासांनी त्यांच्या जगप्रसिद्ध पुस्तक ” दासबोध ” मध्ये कीर्तन प्रभावीपणे कसे करावे हे तपशीलवार सांगितले आहे. सामान्यतः, या प्रकारच्या नारदीय कीर्तनासाठी भगव्या रंगाच्या गियर असलेल्या रामदासी पंथाचा ड्रेस कोड वापरला जातो.
क. जुगलबंदी कीर्तन
हे स्वरूप अगदी नारदीय कीर्तनासारखे आहे. हे सर्वात विकसित स्वरूप होते जे दोन व्यक्ती एकत्र सादर करतात. तत्वज्ञान सर्व कोनातून सादर केले जाते, कधीकधी एकमेकांच्या विरोधात असते. हे सादरीकरण प्रश्न-उत्तर स्वरूपात असल्याने अधिक मनोरंजक आहे, कधीकधी प्रेक्षकांशी संवाद देखील निर्माण करते. शेवटी दोन्ही कलाकार एका निष्कर्षावर येतात जो श्रोत्यांना काही आध्यात्मिक धडा देतो.
कीर्तनाचे प्रकार
महाराष्ट्रात प्रामुख्याने कीर्तनाच्या दोन पध्दती अस्तित्वात आहेत.
1) वारकरी कीर्तन:-
अनेक शतकांपासून आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनाला जाण्याचा प्रघात आहे. पुढे हा प्रघात वाढत गेला आणि अखेरीस त्यास वारी करणारे ते वारकरी अशाप्रकारे वारकरी संप्रदाय असे नाव प्राप्त झाले. हा भक्तिमार्गप्रधान वैष्णव संप्रदाय आहे. या संप्रदायात मराठी समाजातील सर्वच थरातील लोकांचा समावेश आहे. अगदी वैदिक संप्रदायामध्ये ज्यांना यज्ञयाग करणे निशिध्द मानले जाई त्या स्त्री आणि शूद्रांचाही या संप्रदायात समावेश होतो. अशाप्रकारे अत्यंत लोकप्रिय असा हा संप्रदाय आहे‐ज्ञानेश्वरमाऊलीहेयासंप्रदायाचेजणूकाहीदैवतआहे. विठ्ठलभक्ति, ज्ञानेश्व,र, एकनाथ, नामदेव, गोरा कुंभार, सेना न्हावी, रोहिदास, चोखामेळा, सावतामाळी तुकाराम, निळोबा आणि इतर संतांच्या अभंगांचा वारकरी कीर्तनात समावेश होतो‐याकीर्तनाचेप्रवर्तकसंतनामदेवआहेत‐वारकरीकीर्तनकोणत्याहीजातीच्यापुरूषांद्वारेकेलेजाते. वारकरीकीर्तनातश्रोतेहीकीर्तनकारालाअधुनमधूनगायनसंगतकरतात. एकूणचहयाकीर्तनाचेस्वरूपसामूहिकआहे‐प्रत्येकसंप्रदायहाईश्वरभक्तीआणिसमाजप्रबोधनाच्याउद्देशानेप्रेरितअसतो. संप्रदाय एखादया विशिष्ट तत्वज्ञानाचे पालन करीत असतो, ज्याआधारे कीर्तनकार ऐहिक आणि पारमार्थिक ध्येयपूर्तीसाठी मार्गदर्शन करतो. या प्रत्येक संप्रदायांची संतपरंपरा, मंत्र, उपास्य दैवत, कीर्तनाचे स्वरूप, आणि कीर्तनकारांची वेशभूषा वेगळी असते. पंढरी-आळंदीची वारी, नित्य हरिपाठ पठण, तुळसीमाळ धारण करणे, गोपीचंदनाची मुद्रा आणि संप्रदायाचा एकसू़त्रीपणा या नियमांचे पालन वारकरी संप्रदायात करावेच लागते‐वारकरीकीर्तनातआपल्यालामौखिकपरंपराप्रचलितअसलेलीदिसूनयेते. ज्ञानोबांपासून निळोबांपर्यंत झालेल्या संतांचेच अभंग वारकरी कीर्तनात निरूपणासाठी घेतले जातात. वारकरी कीर्तनातही नमन, पूर्वरंग आणि उत्तररंग असे भाग असतात, मात्र याच्या उत्तररंगात आख्यानाचा समावेश होत नसून संतांच्या अभंगांवरच निरूपण केले जाते. वारकरी कीर्तन हे मंदिरातच केले जावे असे बंधन नसल्याने जिथे जिथे श्रोते जमू शकतील अशा कोठेही वारकरी कीर्तन रंगू शकते. पूर्वी नदीच्या वाळवंटात वारकरी कीर्तने होत असत‐याकीर्तनातवीणेलाअत्यंतमहत्वआहेआणिसंपूर्णकीर्तनहेवीणेच्यासाथीनेआणिसाक्षीनेहोते.
2) नारदीय अथवा हरिदासी कीर्तन
देवर्षी नारदांना या कीर्तनाचे प्रवर्तक मानले आहे. त्यांच्यापासूनच ही परंपरा आजतागायत पुढे चालू आहे. नारदीय कीर्तन हे मंदिरांतच केले जावे असा नियम आहे. मात्र आता बदलत्या काळानुसार हे कीर्तन मोठया मैदानात अथवा बंदिस्त सभागृहातही केले जाते. नारदीय कीर्तनकार आपल्या कीर्तनात विठ्ठलाच्या गुणगानाबरोबरच अन्य पौराणिक देवी देवतांच्या आख्यानाचाही समावेश करतात. याच्या प्रस्तुतीकारणाचा क्रमही नमन, पूर्वरंग आणि उत्तररंग असाच आहे. पूर्वी नारदीय कीर्तन केवळ ब्राह्मण स्त्री अथवा पुरूषांद्वारे केले जात असे‐आतामात्रअसेकाहीबंधनदिसूनयेतनाही. पूर्वरंगात कीर्तनकार एखादया प्रसिध्द पदाने कीर्तनाची सुरूवात करतात आणि उत्तररंगात एखादया पौराणिक अथवा अन्य कथेवर निरूपण करतात. यात वारकरी कीर्तनाप्रमाणे गायनसंगतिसाठी श्रोत्यांचा सहभाग नसतो कारण नारदीय कीर्तनकार आपल्या कीर्तनात विविध सांगितिक अलंकरणांचा उपयोग आपल्या गानकौशल्याद्वारे करीत असतो.
ढोबळ मानाने कीर्तनाचे वारकरी आणि नारदीय असे जरी दोनच प्रकार असले तरी नारदीय कीर्तन पध्दतीत आणखी काही उपप्रकार पहावयास मिळतात. यात साधारणपणे कीर्तन करण्याची पध्दत सारखी असली, तरी कीर्तनात समाविष्ट केलेल्या विषयांवरून हे प्रकार वेगळे होतात. हे विविध प्रकार म्हणजे रामदासी कीर्तन, दत्त संप्रदायिक कीतन, राष्ट्रीय कीर्तन, गाडगेबाबांचे सामाजिक कीर्तन, सरकारी कीर्तन, काॅर्पोरेट कीर्तन इ. वरील सर्व कीर्तनप्रकार आज महाराष्ट्रात प्रचलित आहेत.
3) राष्ट्रीय कीर्तन:-
या कीर्तनप्रकाराचा प्रचार आणि प्रसार लोकमान्य टिळकांनी केला. राष्ट्रीय कीर्तनात पौराणिक कथांच्या माध्यमातून देशभक्ति चा विचार मांडला जातो. याच्या उत्तररंगात निरनिराळया देशभक्तांची, राष्ट्रपुरूष, स्वातंत्र्यवीर, समाजसुधारक आणि क्र्रातीकारकांची चरित्रे आणि कथा, पोवाडे आदींच्या माध्यमातून प्रस्तुत केली जातात. लोकमान्य टिळकांनी स्वतंत्रता आंदोलनाचे वेळी जनजागृतीचे साधन म्हणून कीर्तनाचा उपयोग केला. ब्रिटिश सत्ताधारयांचे दोष लोकांसमोर आणण्यासाठी त्यांनी रामायण आणि महाभारतातील कथांचा उपयोग मोठया खुबीने केला. या कीर्तनात रामायण महाभारतातील उदाहरणांचा उपयोग करून आधुनिक समाजातील राजकीय महत्व असलेल्या ज्वलंत विषयांवर भाष्य केले जाते.
4) सामाजिक कीर्तन:-
सामाजिक कीर्तनामध्ये समाजात प्रचलित अनिष्ट रूढींचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न केले जातात. कीर्तनाच्या या प्रकाराचा पुरस्कार विदर्भातील संत गाडगेबाबा आणि त्यांच्या अनुयायांद्वारे केला गेला. गाडगेबाबा हे एक थोर संत आणि कर्मयोगी होवून गेले‐स्वतःच्याकृतीतूनतेसमाजालाजनताजनार्दनाच्यासेवेचाधडाघालूनदेत‐गाडगेमहाराजांनीसुरूकेलल्यायानामसंकीर्तनाचामुख्यहेतूसमाजप्रबोधनहाचअसूनरस्त्यावरकोठेहीउभेराहूनत्यांचेकीर्तनहोतअसे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, गोापाला गोपाला, रामकृष्ण गोविंद नारायण, विठ्ठल विठ्ठल गाऊं मै धूम मचाऊँ इ. त्यांची आवडती पदे होती. परोपकाराचे पुण्य पदरी घ्या. परपीडा देऊ नका, यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे, देव तीर्थात किंवा मूर्तीत नाही, तो तुमच्या समोर दरिद्री नारायणाच्या रूपान उभा आहे, त्याचीच प्रेमाने सेवा करा हाच संदेश त्यांनी आपल्या कीर्तनातून दिला.
आज जरी हा कीर्तनप्रकार नामशेष झाला असला, तरी सामाजिक कीर्तनाअंतर्गत विविध सामाजिक प्रश्नंवर नारदीय कीर्तनकार आज उत्तम प्रकारे कीर्तन करताना आढळतात.
5) दत्त सांप्रदायिक कीर्तन:-
श्री दत्तांची उपासना महाराष्ट्रात महानुभाव पंथाद्वारे प्रवर्तित झाली आणि याचे प्रवर्तक श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंहसरस्वती, ज्यांना दत्ताचे अवतार मानले गेले, त्यांच्या संप्रदायाद्वारे हा संप्रदाय समाजात लोकप्रिय झाला. महाराष्ट्र आणि कर्नाटकात हा संप्रदाय विशेष लोकप्रिय आहे‐याचेउपास्यदैवतश्रीदत्तात्रेयआहे. हा संप्रदाय प्रवृत्तिपर, सगुणोपासना, औदुंबरोपासना, दत्तभक्ति यांवर भर देणारा आहे. या संप्रदायातील कीर्तनाचे विशेष म्हणजे यातील बहुतांश कीर्तनकार आपल्या कीर्तनात गुरूचरित्र, दत्तप्रबोध, गुरूलीलामृत, दत्तमहात्म्य आदि दत्तभक्तिविषयक साहित्याचाच समावेश करतात‐कीर्तनाचेप्रारूपमात्रनमन, पूर्वरंग आणि उत्तररंग असेच असते.
6) रामदासी कीर्तन:-
समर्थ संप्रदायाच्या कीर्तनकारांद्वारे केल्या जाणारया कीर्तनाला रामदासी कीर्तन असे म्हणतात. समर्थ संप्रदाय हा देखील परमार्थिक संप्रदाय आहे‐राम, मारूती ही या संप्रदायाची प्रमुख दैवते असून बलोपासना आणि संघटना यांवर विशेष भर दिला जातो. समर्थ रामदासांद्वारे लिहिलेल्या वाङमयाचा या संप्रदायात अभ्यास केला जातो. रामदासी कीर्तन याच साहित्यावर आधारित असते. त्यांचे विषय राजकरण, दासबोध, मनाचे श्लोक, रामायणातील कथा, श्री मनाचे श्लोक, करूणाष्टके, रामोपासना, रामभक्ति, पूजा आणि समाजातील परिस्थितीची जाणीव श्रोत्यांना करून देणे हेच आहेत. रामदासी कीर्तन हे तामिळनाडूतील तंजावर येथे अधिक प्रचलित आणि लेाकप्रिय आहे. आजही या परंपरेचे तेथील रामदासी मठांद्वारे जाणीवपूर्वक जतन केले जात आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे समर्थ संप्रदायाचे सर्वच कीर्तनकार आपल्या नावापुढे रामदासी हे बिरूद लावतात.
7) जुगलबंदी कीर्तन:-
आधुनिक युगात लोकप्रिय झालेला हा नारदीय कीर्तनाचाच एक प्रकार आहे. यात विषयही नारदीय कीर्तनाप्रमाणेच असतात मात्र एका कीर्तनकाराऐवजी दोन कीर्तनकार मंचावर अथवा कीर्तनाच्या गादीवर उभ् असतात, आणि ते एकाच विषयाच्या दोन बाजू विविध दाखले देत श्रोत्यांना सांगतात. यात दुसरयाचे मत खेाडून काढतानाच आपले मत कसे योग्य आहे असे पटवून द्यायचा प्रयत्न असत. यासाठी सवाल जवाब किंवा प्रश्नोत्तरांचा उपयोग केला जातो. कीर्तनाचे शेवटी त्या विषयाचे तात्पर्य श्रोत्यांसमोर मांडतात. जुगलबंदी स्वरूपात असल्याने समाजप्रबोधनाबरोबरच मनोरंजनाची बाजूही यात उत्तम रीतीने सांभाळली जाते.
8) सरकारी कीर्तन:-
सरकारी कीर्तनात शासनाच्या विविध योजनांचा प्रचार केला जातो. कोणतीही गोष्ट जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी संगीत हे उत्तम माध्यम आहे. कीर्तनाचे वेळी समाजातील सर्वच स्तरांतील लोक एकत्र येतात आणि म्हणूनच शासनाच्या विविध योजना लोकप्रिय करण्यासाठीच सरकारी कीर्तनाचे आयोजन असते. एका अशाप्रकारे कीर्तन हे लोकजागृति आणि समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम आहे.
9) कॉर्पोरेट कीर्तन:-
पारंपारिक कीर्तन प्रकारांबरोबरच आधुनिक काळात लोकप्रिय झालेला हा एक अत्यंत मनोरंजक कीर्तनप्रकार आहे. खरे पाहता सरकारी कीर्तन अथवा सामाजिक कीर्तन हे देखील अशाच प्रकारचे कीर्तन प्रकार आहेत. समर्थ रामदासांनी त्यांच्या वाङमयात राजकरणासंबंधी केलेले भाष्यही साधारण याच स्वरूपाचे होते त्यामुळे ही कल्पना याच प्रेरणेतून घेतली असावी असे वाटते. या कीर्तनात काॅर्पोरेट जगात अथवा व्यावहारिक जगामध्ये काम करताना येणारया अडचणीेंवर आणि ताणतणावावर मात कशी करायची, यश अपयश आणि आलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यातून कसा मार्ग काढायचा याची शिकवण आधुनिक युवा पीढीला त्यांच्याच भाषेत करून दिली जाते. कीर्तन या भक्तिजन्यकलाप्रकाराकडे आधुनिक पीढीला आकर्षित करण्याचे काम काॅर्पोरेट कीर्तनाद्वारे चांगल्या प्रकारे साधल्या जात आहे. युवा पीढीला येणारया अडचणींतून त्यांना बाहेर काढण्यासाठी ही एक अध्यात्मिक प्रशिक्षण पध्दती आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
कीर्तनाची अंगे
हरिदासी कीर्तनाच्या सर्वच प्रकारांमध्ये ढोबळमानाने नमन, पूर्वरंग आणि उत्तररंग असा क्रम आढळतो. मात्र सांप्रदायिक विशेषांनुसार नमनाचे श्लोक आणि पदे बदलतात. नमन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कार्यसिध्दीस नेण्यास देवी देवतांना आवाहन करणे होय. आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्याची सुरूवात ही ईशस्तवनाने अथवा पूजनाने करतो. कीर्तनात ते नमनाद्वारे केले जाते. कोणत्याही कीर्तनात नमनाचा भाग हा अपरिहार्यच असतो. त्यामुळे प्रत्येक संप्रदायात नमनाची पदेही ठरलेली असतात‐इतकेचकायपणत्यापदांचेरागआणितालहीनिश्चितअसतात. यातून सांप्रदायिक शिस्त दिसून येते. यात सांप्रदायिक श्लोकही गायले जातात‐याश्लोकांचाक्रमगणपती, सरस्वती, कुलदेवता, विष्णू, कृष्ण किंवा पांडुरंग स्तवन, ज्या देवतेपुढे कीर्तन आहे त्या देवतेचे स्तवन आणि गुरूस्तवन अशाप्रकारे घेतात. हरिदासी कीर्तनाअंतर्गत येणारया एकनाथी, रामदासी आणि राष्ट्रीय कीर्तनामध्ये थोडयाफार फरकाने हीच शिस्त पाळलेली दिसते. नमन हे साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटे करावे अशी परंपरा आहे. कीर्तनकार बुवा जर संगीत कलेत प्रशिक्षित असतील, तर नमनाचा कालावधी अध्र्या तासंचाही होतो. मात्र एकूणच कीर्तनाच्या रूपबंधाचा विचार करता अध्र्या तासापेक्षा जास्त नमनाचा कालावधी असू नये हे नक्की. कीर्तनकाराचे नमन कसे होते यावर पुढील कीर्तन रंगणार की नाही याचा श्रोत्यांना अंदाज येतो.
नमनानंतरचा भाग पूर्वरंगाचा असतो‐हाकीर्तनाचामुख्यभागआहे‐साधारणपणेयाचाकालावधीएकतासएवढाअसतो. पूर्वरंगातच कीर्तनकाराचे गानकौशल्य पणाला लागते‐कीर्तनाच्यामूळविषयाचेप्रतिपादनकीर्तनकारपूर्वरंगातकरतो. अशावेळी निरूपणासाठी कोणता विषय घ्यावा हे कीर्तनकारच ठरवितो‐हेठरवितांनात्यालास्वतःच्यामर्यादा, श्रोत्यांची आवड, कीर्तनाचा प्रसंग इ. चे भान ठेवणे आवश्यक असते. निरूपणासाठी निवडलेल्या विषयाची उकल करताना कीर्तनकार विविध सिध्दांत आणि संतवचन तसेच शास्त्रवचनांचे आधार देतो. यातच काही दृष्टांतांचाही समावेश करतो आणि गोष्टीच्या अनुषंगाने विनोद, कोटया आणि संगीताची पेरणी करून पूर्वरंग रंगवितो. अधून मधून नामघोष करून श्रोत्यांनाही कीर्तनात सामिल करून घेतो‐यानिरूपणाचेरूपमनोरंजनाबरोबरचउपदेशात्मकहीअसते‐पूर्वरंगातनिरूपणासाठीघेतलेल्याविषयाचाकीर्तनकाराचाअभ्यासआणिपाठांतरपक्केअसावे. निरूपणाचा विषय, त्यात येणारे मुट्ठे, त्यांचा क्र्रम, पद्ये इ. सह पूर्वरंग बसविलेला असावा जेणेकरून पूर्वरंग आकर्षक होईल.
पूर्वरंगानंतर काही वेळ भगवंताचा नामजप केला जातो आणि श्रोत्यांमधील एखादया भक्ताद्वारे भक्तिगीत अथवा पदगायन केले जाते. नामजप आणि संगीताने कीर्तनाच्या पूर्वरंगात कीर्तनकाराने निर्माण केलेले भक्तिमय वातावरण आणखी प्रभावी होते त्याचबरोबर कीर्तनकाराला पण थोडा वेळ विश्रांती मिळते. यानंतर कीर्तनकार उत्तररंगाची सुरूवात एखादया आख्यानाने करतात. प्राचीन कवी आणि संतांच्या साहित्याचा आख्यानात उपयोग केला जातो. त्याच बरोबर साकी, दींडी आर्या, लावणी, कटाव इ. चा मुक्त उपयोग उत्तररंग रंगविण्यासाठी केला जातो. पूर्वरंगात घेतलेल्या विषयाच्या अनुषंगाने काही मुट्ठे प्रसंगवर्णन आणि आख्यानांच्या रूपात उत्तररंगात सांगितले जातात. आख्यान रंगविण्यासाठी कथानकाची निवड ही अत्यंत योजनापूर्वक करणे आवश्यक असते. त्यामुळे एखादे मोठे कथानक घेण्यापेक्षा लहान पण रोचक प्रसंग घेऊन त्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक योग्य ठरते. विविध रसांची निर्मिती करण्यासाठी त्यात वेगळी स्थळे, वर्णनप्रसंगे, वेगवेगळया स्वभावाची पात्रे असावीत‐त्यामुळेरसविर्भावहोण्याससोपेहोतेवरंगभरतायेतो. आख्यानातील संगीत, वक्तृत्व आणि अभिनयामुळे आख्यान रंगते. आख्यानातील विविध प्रसंगांना उचित अशा काव्याचाही उपयोग त्या ठिकाणी कीर्तनकारास करता येतेा. बरयाच वेळेला कीर्तनकार आख्यान कोणते लावणार यावर कीर्तनातील श्रोत्यांची उपस्थिती अवलंबून असते. अधूनमधून देवतांची भजने आणि नंतर त्यांचा जयजयकार केला जातो. उत्तररंगानंतर आरतीने कीर्तनाची समाप्ती होते.
साथसंगत
वारकरी कीर्तनात संगतीसाठी एक मृदुंग आणि दहा ते पंधरा टाळ वादक असतात, तर नारदीय कीर्तनात झांज, तबला आणि हार्मोनियम ची संगत असते. पेटीवादक बुवांच्या डाव्या बाजूला तर तबला अथवा पखावज वादक उजव्या बाजूला बसतो. नारदीय कीर्तन परंपरेप्रमाणे नमनापर्यंत कीर्तनकार स्वतः तंबोरी किंवा छोटा तंबोरा घेऊन उभे राहतो आणि नमनानंतर ती तंबोरी दुसरया व्यक्तिस दिली जाते, जो पुढे संपूर्ण कीर्तन संपेपर्यंत तिचे अखंड वादन करतो. मात्र आधुनिक काळात ही पध्दत बंद होत चालली आहे‐त्याऐवजीकीर्तनकारइलेक्ªटाॅनिक तंबोरयाचा उपयोग करताना दिसतात. मात्र वारकरी कीर्तनात कीर्तनाबरोबर वीणेची अखंड साथ असते‐साधारणपणेकीर्तनकारालासंगतकरणारीमंडळीहीत्यांच्याघरातीलचअसतआणिपरंपरेनेसंगतकरण्याचीकलात्यांनाअवगतहोती. त्यामुळे कीर्तन सादर होताना कुठे कशाप्रकारे संगत करायची याचा योग्य अंदाज त्यांना होता ‐आधुनिककाळातसंगतकारहेव्यावसायिकअसल्यामुळेतेजास्तीतजास्तउठावदारकसेहेाईलयाचीपूर्णकाळजीकीर्तनकारघेतात. तबला संगतकाराबरोबरच पेटी अथवा आॅर्गन संगतकाराचा कीर्तनाच्या प्रस्तुतीकरणात महत्वाचा वाटा आहे. कीर्तनकाराला आवाजाला भरणा देणारे वाद्य असल्यामुळे पेटी वादकाला अनेकवेळा एकल वादनाची संधी प्राप्त होते. म्हणून पेटीवादक हा चांगला तयार असणे आवश्यक आहे‐शक्यतोबुवांच्यासरावातीलसंगतकारअसलेतरत्यांनाकीर्तनातीलसर्वसामान्यआणिमूळपद्येपाठअसतातआणित्याबरहुकूमतेवादनकरूनकीर्तनातरंगभरूशकतात.
सामाजिक परिवर्तनांबरोबरच कीर्तनांच्या विषयांमध्येही परिवर्तन झालेले आढळून येते. विशेषतः खेडेगावांमध्ये जिथे मनोरंजनाची अन्य साधने उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी कीर्तन लहानांपासून ते अगदी म्हातारया लोकांपर्यंत सगळयांचेच मनोरंजनाचे साधन ठरते. कीर्तनकार आपल्या कीर्तनातून विविध सामाजिक विषयांवरील परिस्थिती आणि प्रश्नांना हात घालतो. अशाप्रकारे एका संवेदनशील नागरिकाच्या निर्मितीमध्ये कीर्तन आणि कीर्तनकारांचे मोठे योगदान आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपरयांतील खेडेगावांमध्ये उत्सव, धार्मिक पूजापाठ, सण समारंभ आदि विविध प्रसंगी कीर्तनाचे आयोजन केले जाते. कीर्तनाला धार्मिक अनुष्ठानाच्या रूपात मान्यता प्राप्त झाली आहे.
बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार कीर्तनाच्या पारंपारिक रूपातही आवश्यक असणारया बदलांविषयीचे मनोगत नागपूर येथा झालेल्या पहिल्या कीर्तन संमेलतील अध्यक्षीय भाषणात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी अशाप्रकारे व्यक्त केले. “बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार शिक्षणाच्या पध्दतींप्रमाणे लोकही बदलले. जिथे समाजच परिवर्तित झाला आहे, तिथे अशा समाजाच्या पुढे कीर्तनही पारंपािरक रूपात प्रस्तुत करणे योग्य नाही. आधुनिक समाजातील श्रोत्यांना पाश्चात्य राहणीमानाची सवय झाल्यामुळे या नवीन संस्कृतिच्या आधारेच कीर्तनकाराने श्रोत्यांवर आपली छाप पाडली पाहिजे. समाजप्रबोधन हा कीर्तनकाराचा मुख्य हेतु असल्याकारणाने कीर्तनकाराने बदलत्या काळाप्रमाणे आपल्या कर्तव्याची पूर्ती करणे आवश्यक आहे.”
निष्कर्ष
कीर्तन महाराष्ट्रीय संस्कृतिचे अविभाज्य अंग आहे. महाराष्ट्रातील संतमंडळींनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजमनात भक्तिभावाची पेरणी केली. कीर्तनातील पुराणकथांद्वारे जीवनमूल्यांच्या प्रचार केला. संतपरंपरेमुळेच कीर्तनाच्या माध्यमातून हिंदू धर्मातील विचारधारेला जिवंत ठेवणे शक्य झाले. वर्तमान परिस्थितीत वाढत जाणारया दुराचारापासून समाजाला परावृत्त करण्यासाठी कीर्तन परंपरेचे जतन होणे आवश्यक आहे. कीर्तनाद्वारेच समाजात धर्मनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा जागृत करणे साध्य होईल. समाजात वेगाने होणारया पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाच्या पाश्र्वभूमीवर पाश्चात्य विज्ञान आणि अध्यात्मिक ज्ञान यांचा सुरेख संगम साधून समाजाला कीर्तनाची गोडी लावणे हे आजच्या कीर्तनकारासमोर असलेले मोठे आव्हान आहे.
कीर्तनाला केवळ धार्मिक संस्कारांचा एक भाग न मानता सामाजिक संदर्भातून याचे महत्त्व वाढविण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. कीर्तनाचा संगीताशी जवळचा संबंध असल्याकारणाने संगीताची आवड असणारया होतकरू विद्याथ्र्यांना या भक्तिविधेकडे वळविणे आवश्यक आहे. कीर्तनातूनही रोजगार प्राप्तीच्या आकर्षक संधी उपलब्ध झाल्या तर कीर्तनाचे जतन आणि संवर्धन योग्य रीतीने होणे सहज शक्य होईल आणि या क्षेत्रात गुणात्मक बदलही होतील.
कीर्तनाचे प्रकार
नारदीय कीर्तन अणि वैयासिक कीर्तन (महर्षी व्यासानी सुरू केलेले) असे २ कीर्तन प्रकार होते. एक संगीत/नाट्यमय अणि दुसरा गद्यात सांगितला जाणारा असे यातील फरक आहेत.
गीतेत नवविधा भक्तीत कीर्तन ही एक भक्ती असल्याचे वर्णन आहे.नऊ प्रकारांपैकी कीर्तन ही एक भक्ती आहे.कीर्तनाचे गुण संकीर्तन,नामसंकीर्तन,कथा संकीर्तन असे विविध प्रकार आहेत.’कीर्त’या संस्कृृत शद्बावरून कीर्तन हा शब्द आला आहे.(भगवतगीता) भगवंताचे अणि थोर विभूतींचे गुणगायन करणारा व पराक्रमाचे वर्णन करणारा हा प्राचीन कला प्रकार आहे. नंतरच्या काळात नारदीय कीर्तनातून वारकरी, रामदासी, राष्ट्रीय कीर्तन असे वेगळे संप्रदाय निर्माण झाले. पण सर्व भारतात कीर्तन, थोडा फार बाह्यरूपात बदल झाला तरी, त्याचा मूळ गाभा कायम राखून आहे. स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा कीर्तनकारांनी समाजाच्या जागृतीचे उल्लेखनीय कार्य केलेले आहे. महाराजांनी मानधन घेवू नये.
कीर्तन ही खरेतर मूलतः एक भक्ती आहे. श्रीमद् भागवतात सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तींपैकी ही दुसरी भक्ती आहे. “श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्! अर्चनं वन्दनं दास्यं, सख्यं आत्मनिवेदनम!” अशा ९ भक्तींपैकी एक. कीर्तन हे पूर्वी प्रसार, प्रचार, लोकशिक्षण, आणि समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम होते. काळाच्या ओघात अणि प्रसार माध्यमांच्या प्रगतीमुळे आज कीर्तनाचे महत्त्व कमी झाले असेल तरी आजही धार्मिक उत्सव अणि नित्य उपक्रमांत अणि काही मंदिरांत नियम म्हणून १२ महिने कीर्तन होत असण्याचा प्रघात आहे. कीर्तनकार कथा सांगत असल्याने त्यांस कथेकरीबुवा असेही म्हणतात.
कीर्तनाची अंगे
कीर्तनाची मुख्य दोन अंगे असतात.१. पूर्वरंग आणि २. उत्तररंग नारदीय कीर्तनात मुख्य ५ भाग असतात.
सुरुवातीस नमन, पूर्वरंग (तत्त्वज्ञान व आध्यात्मिक चर्चा) नंतर मध्यंतरात नामजप आणि भक्तिगीत. नंतर पूर्वरंगाला साजेसे एखादे कथानक, म्हणजे उत्तररंग किंवा आख्यान आणि शेवटी भैरवी गायन, देवाकडे मागणे आणि आरती असते. हे सर्व कीर्तनकार एकट्याने करीत असतो. त्याला तबला-पेटी वाजविणाऱ्यांची साथ असते.
संत साहित्य , संस्कृत-मराठी सुभाषिते, नामवंत कवींच्या अर्थपूर्ण कविता, आध्यात्मिक विषयावर निरूपण, थोडाफार पण दर्जेदार विनोद आणि भारतीय शास्त्रीय-सुगम संगीत गायन, काही वेळा नर्तन आणि विषयविवरण यांनी सजविलेला एकपात्री भक्तीचा अविष्कार म्हणजे नारदीय कीर्तन. इंग्रजी, हिंदी आणि उर्दू काव्यातील उद्धृते, या गोष्टीसुद्धा विषयाचे विवरण करण्यासाठी योग्य संदर्भात वापरात येतात. असे नारदीय कीर्तन हे बहुरंगी आणि सर्व-समावेशक आहे. विविध चालीची पदे, श्लोक, आर्या, दिंडी, साकी, ओवी, याशिवाय पोवाडा, फटका, कटाव, आणि मराठी काव्य प्रकारातील इतर अनेक दुर्मिळ वृत्ते कीर्तनात गायली जातात . इतकेच नव्हे तर या कीर्तनातूनच मराठी संगीत नाटक मंडळीनी आणि जुन्या चित्रपटांनी अनेक सुमधुर लोकप्रिय चाली मिळवल्या.इष्ट देवतेची प्रार्थना किंवा तिचे गुणवर्णन हा कीर्तनांचा विषय असून भक्तिरसाचा परिपोष करणे, हे त्यांचे उद्दिष्ट असते. स्वररचनेपेक्षा येथे गीतरचना महत्त्वाची असते. साहजिकच कीर्तनातील स्वररचना आणि तालयोजना बहुधा साधीच असून सामान्य गायकांनाही ती पेलता येते. पंधराव्या आणि सोळाव्या शतकांत होऊन गेलेल्या ताळ्ळपाक्कम् संगीतकारांनी रचिलेली सु. वीस हजार कीर्तने सु. तीन हजार ताम्रपटांद्वारे उपलब्ध झालेली आहेत. प्रत्येक गीताबरोबर ते कोणत्या रागात गायिले जावे, हेही सूचित केले आहे. त्यांतील अनेक राग आज फक्त नावांनीच परिचित आहेत. उदा., आबाली व कोंडा मलहाहरी, शंकराभरण, श्रीराग, ललित इ. आज प्रचलित असलेल्या रागांतही ताळ्ळपाक्कम् संगीतकारांनी कीर्तनरचना केलेली दिसते. ⇨ पल्लवी , ⇨ अनुपल्लवी आणि ⇨ चरण असे एका गीताचे तीन भाग ह्या कीर्तनांतून प्रथमच प्रचारात आले. ‘दिव्यनाम कीर्तन’ हा कीर्तनांचा एक विशेष प्रकार. त्यांत फक्त पल्लवी आणि चरण हे दोन गीतभाग आढळतात. चरणसंख्या बरीच असून सर्व चरण एकाच चालीत गायिले जातात, किंबहुना कधीकधी पल्लवी आणि चरण ह्यांचीही चाल एकच असते. ⇨ त्यागराज, विजय गोपाळ आणि भद्राचलम् रामदास ह्यांनी अशा प्रकारची कीर्तने रचिली
आहेत. ‘उत्सव संप्रदाय कीर्तन’, ‘मानसपूजा कीर्तन’ आणि ‘संक्षेप रामायण कीर्तन’ हे कीर्तनाचे आणखी काही प्रकार होत. अनेक कीर्तने संस्कृतमध्ये रचिली गेली असली, तरी तेलगू भाषेतील कीर्तनांचे प्रमाण अधिक आहे.
वारकरी कीर्तन
वारकरी कीर्तनात पूर्वरंग आणि आख्यान असे दोन वेगळे विभाग नसतात. संतांच्या अभंगाचे गायन आणि त्यावर निरूपण अश्या पद्धतीचे आणि टाळ मृदुंगाच्या घोषात २०-२५ साथीदारांसोबत वारकरी कीर्तन सादर केले जाते. [४]वारकरी कीर्तनाची परंपरा खूप पुरातन आहे. मंदिरात सादर होणारे हे कीर्तन संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी चंद्रभागेच्या काठावर आणून जनसामान्यांना खुले करून एक नवी परंपरा सुरू केली. वारकरी कीर्तन हे आळंदी येथे वारकरी महाविद्यालयात शिकविले जाते.या माधमातून संतानी भक्तीमार्ग शिकविला. संत नामदेवांनी वारकरी कीर्तन संस्थेचा पाया घातला.वारकरी कीर्तन ही सांस्कृृतिक लोकशाहीची पायाभरणी ठरली. “नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग।जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग ॥” (सकलसंतगाथा)
रामदासी कीर्तन
रामदासी कीर्तन परंपरा ही समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केली. रामदासी कीर्तन हे समर्थांच्या रचनांवर मुख्यतः आधारीत असते. आख्याने सुद्धा रामकथा आणि रामभक्ती यावरच मुख्यतः आधारीत असतात.[५] श्रीधरस्वामी, केशवस्वामी , रंगनाथ स्वामी अश्या रामदासी परंपरेतील संतांच्या रचना आणि पदे यांचाही समावेश केला जातो. रामदासी कीर्तन हे आजही परंपरागत गुरुकुल पद्धतीनेच शिकविले जाते.
कीर्तनांचे आधुनिक प्रकार
1: संयुक्त कीर्तन
2: जुगलबंदी कीर्तन
3: राष्ट्रीय कीर्तन
4: वैज्ञानिक कीर्तन
कीर्तन आणि पदे
- पदांबद्दल इतर सर्वसाधारण विश्वकोशीय माहिती या विभागात लिहावी. ज्या कीर्तनकारांच्या मृत्यूस ६१ पेक्षा अधिक वर्षे झाली असतील अशा कीर्तनकारांची पदे जशीच्या तशी विकिस्रोत या बंधुप्रकल्पात जतन करता येतील. निरूपण/कीर्तन कसे करावे याबद्दल माहिती विकिबुक्स या बंधुप्रकल्पात लिहावी.
कीर्तन आणि संगीत
पुढे कीर्तनाला संगीताची साथ लाभली. टाळ, मृदंग, एकतारी ही वाद्ये साथीला घेत. हल्ली पेटी तबला तर कधी बासरी अशी वाद्ये वापरली जातात.
कीर्तनात वापरली जाणारी वाद्ये
- तबला
- पेटी / ऑर्गन (ही पारंपरिक वाद्ये).
- मृदंग
- हल्ली काही कीर्तनकार व्हायोलिनची साथ घेतात
- चिपळ्या
- झांज
- करताल – हे एक वैशिष्टपूर्ण पारंपरिक वाद्य चार लाकडी पट्ट्यांच्या आधारे वाजवले जाते. महाराष्ट्रात काणे बुवा हे बुजुर्ग कीर्तनकार हे वाद्य वाजवितात
हरिकथा
सर्व भारतीय भाषात होणारे कीर्तन हे हरिकीर्तन, हरिकथा या नावानेही ओळखले जाते.
कीर्तनकारांची परंपरा आणि संतांचे योगदान
मध्यंतरीच्या काळात मंदिरात होणारे कीर्तन वाळवंटात प्रथमच आणले ते संत नामदेवांनी. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास संत तुकाविप्र हेही कीर्तन करीत. संत साहित्यामुळे कीर्तन समृद्ध झाले. आजही कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार असतो.
पेशवेकालीन संत – संत तुकाविप्र यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून ते वयाच्या ६४ पर्यंत (ज्यावेळी त्यांनी समाधी घेतली) रोज कीर्तन केले. आपला जन्म हा कीर्तनाद्वारे लोकजागृती करण्यासाठी आहे असे ते म्हणत असत. आपल्या अभंगात ते म्हणतात
अवचट नोहे नेमे आलो जन्मा | कीर्तन महिमा कली माजी म्हणोनि
आर्व आहे आम्हा शंभर कोटीचे | खर्व या नामाचे संकीर्तन आमूचे
कलयूगांसाठी जन्माची आवडी | पहा शतकोडी आर्व आम्हा कीर्तन
देव नाम याची सर्व कथा वार्ता | श्रोता गुरू वक्ता संकीर्तन अभंग
तुकाविप्र कली आर्व तेची भागा | कीर्तन गंगा सतगुरू संगती
कीर्तनातून संत देवाचे रूप साकार करत असतात. देव म्हणजे मूर्तीमधला देव नाही तर जन हेच देव या न्यायाने समाजाचे खरे स्वरूप मांडण्याचे काम संत करीत असतात.
संत देवाचे वडील आहेती | रूपासी आणिती देवा संत ||
तुकाविप्र म्हणे भक्ती | देव ऋणी होणे युक्ति ||
नामवंत कीर्तनकार
महाराष्ट्रामध्ये अनेक प्रसिद्ध कीर्तनकार आहेत, ज्यात काही प्रमुख नावे खालीलप्रमाणे: इंदुरीकर महाराज, चैतन्य महाराज देगलूरकर, योगिराज महाराज गोसावी, महादेव महाराज बोराडे, ओतूरकर बुवा, काणे बुवा, गोविंद आफळे, चारुदत्त आफळे, जगन्नाथ महाराज, नामदेवशास्त्री सानप, आणि अनेक छोटे कीर्तनकार आहेत जे आपल्या भागांमध्ये प्रसिद्ध आहेत.
प्रसिद्ध कीर्तनकार:
- ह.भ.प. इंदुरीकर महाराज: हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. त्यांचे कीर्तन आणि प्रवचन खूप प्रसिद्ध आहेत.
- श्री चैतन्य महाराज देगलूरकर: हे एक लोकप्रिय कीर्तनकार आहेत आणि त्यांच्या कीर्तनासाठी अनेक श्रोते आकर्षित होतात.
- ह.भ.प. योगिराज महाराज गोसावी: हे पैठण येथे प्रसिद्ध आहेत.
- ह.भ.प. महादेव महाराज बोराडे: हे देखील एक प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि त्यांच्या कीर्तनामध्ये अनेक श्रोते सहभागी होतात.
- ह.भ.प. ओतूरकर बुवा (प्र.दा.राजर्षी):
- ह.भ.प. काणे बुवा:
- ह.भ.प. गोविंद आफळे:
- ह.भ.प. चारुदत्त आफळे:
- ह.भ.प. जगन्नाथ महाराज:
- ह.भ.प. नामदेवशास्त्री सानप:
या व्यतिरिक्त, महाराष्ट्रात अनेक छोटे कीर्तनकार आहेत जे आपल्या भागांमध्ये प्रसिद्ध आहेत आणि अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये आणि धार्मिक ठिकाणी कीर्तन करतात.
ह.भ.प.रामदास जाधव कैकाडी महाराज पंढरपूर. ह भ प बद्रीनाथ तनपुरे महाराज पंढरपूर. ह भ प माधवशास्त्री महाराज अंबाजोगाई.
बंडातात्या कराडकर (कराडचे), श्री गुरू ज्ञानेश्वर माउली महाराज चातुर्मास्ये, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, मामासाहेब दांडेकर, निजामपूरकर, संत भगवानबाबा, संत वामनभाऊ,संत भिमसिंह महाराज, भिमराव राख, बाबामहाराज सातारकर, विठ्ठल दादा वास्कर, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर हरिहर महाराज दिवेगावकर, नारायणबुवा काणे, वै.सद्गुरू आनंद स्वामी उर्फ शंकर महाराज धोटे, श्री विठ्ठल महाराज फुरसुंगीकर (हरपळे) असे नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रात होऊन गेले आहेत, किंवा अजूनही कार्यरत आहेत.
अन्नमाचार्य, पेद्द तिरूमलयंगार, चिन्मय (हे सर्व ताळ्ळपाक्कम रचनाकार), पुरंदरदास, भद्राचलम् रामदास, नारायण तीर्थ, गिरिराज कवी, विजय गोपाळ स्वामी, त्यागराज, गोपाळकृष्ण भारती, अरुणाचल कविरायर, रामलिंगस्वामी हे काही श्रेष्ठ कीर्तनकार होत. ज्येष्ठ रामदासी कीर्तनकार ह.भ.प. कौस्तुभ बुवा रामदासी श्री संत वेणास्वामी मठ समर्थ वेणास्वामी मठ, मिरज
कीर्तनाविषयक ग्रंथ
- इ.स. १९२६ साली “कीर्तनचार्याकम्” नावाचे छोटे पुस्तक काशी येथून ह.भ.प.(हरिभक्तिपरायण विनायक गणेश भागवत यांनी प्रसिद्ध केले.
- “कीर्तन सुधा धारा” नावाचे ३ खंडांत केलेले लेखन
- “कीर्तन सुमनहार”
- इ.स. १९८२ मध्ये ह.भ.प. गंगाधरबुवा कोपरकर यांनी लिहिलेले “कीर्तनाची प्रयोग प्रक्रिया’ नावाचे उत्तम पुस्तक लिहिले. आज तरी त्याच्या इतके परिपूर्ण पुस्तक उपलब्ध नाही. आता अनेक लेखकांनी आणि संस्थांनी अनेक पाठ्यपुस्तके तयार केली आहेत.
- अलीकडच्या काळात कीर्तनभूषण श्री प्रकाशबुवा मुळे गोंदीकर यांनी ‘कीर्तन रहस्य ‘नावाचा सर्व कीर्तन परंपरांचा अभ्यास करून संशोधनात्मक ग्रंथ लिहून प्रकाशित केला आहे
- कीर्तनतरंगिणी (किमान तीन भाग, पहिल्या तीन भागांचे लेखक अनुक्रमे – पांडुरंग मोघे, भालचंद्र शंकरशास्त्री देवस्थळी, एम. पुराणिक)
- कीर्तनमालिका (ज्ञानेश्वर म. इंगळे).
कीर्तन प्रशिक्षण आणि इतर संस्था
महाराष्ट्रात प्रथम वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना आळंदी येथे झाली.वै.मारुतीबोवा ठोंबरेंनी या संस्थेची मुहुर्तमेढ रोवली.त्यानंतर सुमारे दोन वर्षांनी त्यांनी ही जबाबदारी वै.जोग महाराजांकडे सोपविली.जोग महाराजांनी अथक परिश्रम करून ही संस्था ऊभी केली.
- महाराष्ट्रात दादर, मुंबई येथे सन १९४० मधे ’अखिल भारतीय कीर्तन संस्था’ या संस्थेची स्थापना झाली [१] Archived 2013-09-28 at the Wayback Machine.. आजही ही संस्था कार्यरत आहे, अणि कीर्तन प्रवचन या जुन्या भक्तियुक्त कलाप्रकारांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. संस्थेचे कार्यालय द.ल. वैद्य मार्ग, दादर (प), मुंबई २८ येथे आहे.
- पुणे येथे “नारद मंदिर” नावाची संस्था सदाशिव पेठेत हेच काम करते.
- नागपूर येथेही कीर्तन महाविद्यालय आहे.
- सांगलीला १९९२साली स्थापन झालेली अखिल भारतीय कीर्तनकुल नावाची संस्था आहे. तिच्या २०-२५ शाखा आहेत. संस्थेची पिंपरी-चिंचवड येथेही शाखा आहे.
- श्री संत वेणास्वामी मठ पू. कौस्तुभबुवा रामदासी समर्थ वेणास्वामी मठ, मिरज[६]
- चिंचवड येथील श्रीहरी कीर्तनोत्तेजक सभा कीर्तनाचे वर्ग घेते आणि परीक्षाही. (संस्थाप्रमुख दीपक रास्ते).
- याशिवाय पंढरपूर, धरणगाव, धुळे, निकुंभे येथे कीर्तनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत.
वारकरी पद्धतीचे कीर्तन शिकविणारी व विष्णूबुवा जोग यांनी स्थापन केलेली संस्था –वारकरी शिक्षण संस्था महाविद्यालय- आळंदीला आहे.
खानदेशातील कीर्तनसंस्था
खानदेशात कीर्तनकारांची एक फळीच निर्माण झाली आहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार करताना, प्रसारासोबत व्यसनमुक्तीचे ते धडे देतात. टीव्ही चॅनेल, मोबाईलच्या जमान्यात अनेकजण कीर्तनापासून दूर जात असतानाही खानदेशात कीर्तनकारांची संख्या वाढत आहे. खानदेशात धरणगाव, धुळे, निकुंभे येथे कीर्तनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत.[ संदर्भ हवा ]
चित्रदालन
संदर्भ
- ^ JOSHI, DINKAR; YOGESH, PATEL (2022-06-01). BHARTIY SANSKRITICHE SARJAK. Mehta Publishing House Pvt Ltd. ISBN978-93-94258-18-1.
- ^ भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा
- ^ Jawane, Deepak Hanumantrao (2021-12-22). Maharashtra Ki Lokkathayen: Maharashtra Ki Lokkathayen: Exploring Folktales with Deepak Hanumantrao Jawane (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-5521-040-1.
- ^ चेंडके, डॉ अमोगसिद्ध शिवाजी (2024-01-16). वारकरी संप्रदाय : साहित्य आणि तत्त्वज्ञान. Laxmi Book Publication. ISBN 978-1-304-71099-4.
- ^ Rajasvi, M. I. (2016-01-01). Samarth Guru Ramdas: Samarth Guru Ramdas: M.I. Rajasvi’s Tribute to a Spiritual Legend (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-84344-40-5.
- संदर्भसूची
1) गर्ग पं‐ लक्ष्मीनारायण, संगीत निबंधावली, संगीत कार्यालय हाथरस, 1964
2) उपाध्ये सुरेश, संपादक, कीर्तन सुगंध, अमृत महोत्सवी वर्ष विशेषांक, 2015
3) साठे, विनायक वासुदेव, साभिनय कीर्तने, साठे ग्रंथ प्रकाशन मंडळी, रत्नागिरी, प्रथमावृत्ती
2000
4) अपामार्जने, प्रा‐ नरहरी चिंतामणि, नारदीय संकीर्तन, अमेय आर्टस्, नागपूर, 1980
5) कोपरकर, ग‐ना‐, कीर्तनाची प्रयोगप्रक्रिया, कीर्तन महाविद्यालय प्रकाशन, पुणे, 1982
6) होनमाने, डाॅ‐ धनंजय, तंजावरची मराठी कीर्तन परंपरा, स्नेहवर्धन प्रकाशन, 2018
7) जोशी, प्रा‐ सु‐ का‐, कीर्तनरंग, कीर्तन संमेलने, अध्यक्षीय भाषणे, कीर्तन महाविद्यालय, पुणे, 1979, आ‐
पहिली
8) संत, प्रा‐ वि‐द‐, श्री समर्थ रामदास व्यक्ति आणि वाङ्मय, प्र्रकाशक श्री‐ वि‐ रा‐पानसे, अखिल देशस्थ
ऋग्वेदी ब्राह्नण मध्यवर्ती मंडळ, माहिम मुंबई
9) सरदार, गं‐बा‐ मराठी संतसाहित्याची सामाजिक फलश्रुती, पुणे, 1952
- 10) देशमुख अच्युतराव गुलाबराव, सामुदायिक प्रार्थना, श्री गाडगे प्रकाशन सामिती, मुंबई 14
आपला महाराष्ट्र आपली संस्कृती अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील विविध संस्कृतीचा सविस्तर इतिहास माहिती ह्या स्वरुपात आपणासमोर देत आहोत, तरी आपण त्या संदर्भाचा अभ्यासासाठी नक्कीच उपयोग करून घ्याल अशी प्रांजळ अपेक्षा काही सूचना अथवा दुरूस्ती अथवा मार्गदर्शन असल्यास नक्कीच मोबाइल नंबर व्हीआर whatsappसंदेश पाठवून कळवावे ही विनंती असे !!!…..
अधिक माहितीसाठी सहज संपर्क –७५८८०२०८८६
संकलन आणि मांडणी :-
श्री.लक्ष्मण काटेकर, सोलापूर (महाराष्ट्र).
shivnitee@gmail.com
Contact @ 7588020886.