शांत झाल आकाश

शांत झालं आकाश…

घन निळ्या नभात होती एक कहाणी,
जिथं स्वप्नं उंच उडत होती, बेभान काही…
पंखांना होता विश्वास – आपण पोहोचू,
पण नियतीने सांगितलं – “थांब, इथेच थांबू…”

शब्दही हरवले त्या ओरडांमध्ये,
श्वास विरले धुरांच्या लाटांमध्ये,
क्षणभराचं ते थांबलेलं आभाळ,
किती जीवांचं घेत गेलं चाल…

माय बघत राहिली रिकामी दारं,
पित्याच्या मनात उठली धगधगती वारं,
फोन वाजला, पण आवाज नव्हता,
फक्त अश्रूंचा नि शांततेचा सहवास होता…

कोणी गेला नवरा, कोणी गेली बहीण,
कोणाचं स्वप्न, कोणाचा प्रिय सहचर लुप्त झाला एक क्षणात…
विमान कोसळलं म्हणणं सोपं असेल,
पण त्यामागं संपलं एक जग, एक जीवघेणं सत्य जळलं…

Leave a comment