भाड्याची सायकल

🚲 भाड्याची सायकल*🚲
.

१९७५-८५ चा काळ होता तो…

त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी मोठी सायकल घेत होतो…

बहुधा भाडे जेमतेम ५० पैसे ते १ रू तास च्या आसपास होतं.

दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा आणि टाईमिंग नेण्याचा आणि परत रिटर्न करतानाचा टाईमिंग बहुधा काही सायकल वर नाव आणि नंबर हि असे.

ग्रामीण भागात सुद्धा असे काही सायकल दुकानदार होते. या दुकानदारांना कोणाची तरी ओळख मात्र सांगावी लागे.

भाड्याचे नियम कडक असायचे.

जसे पंचर झाली तर त्याचे वेगळे पैसे, तुटफुट आपली जबाबदारी…
मग त्या सायकल वर गावातले मुलं सवार व्हायचो.

पुर्ण ताकदीने पायडल मारत , कधी हात सोडत बँलेंस करत , कधी खाली पडुन पुन्हा उठून चालवायचो.

आपल्या गावात येऊन सर्व मित्र आळीपाळीने सायकल चालवायला मागायचे.

भाड्याच्या टाईमाचा लिमिट निघुन न जावा म्हणून तीन चार वेळेस त्या दुकानापासुन चक्कर व्हायची…

तेव्हा भाड्याने सायकल घेणं , हे आमच्या श्रीमंतीचे लक्षण होतं…

आमचा लहानपणी तरी ….!

एव्हाना आमच्या घरी तेव्हा मोठी काळी अँटलस सायकल आणली ,

पण तिला स्टँडवरुन काढणं आणि लावणं

यातचं अर्धी एनर्जी वाया जायची..

आणि वरुन वडिलधाऱ्याचा धाक…

खबरदार हात लाऊ नको सायकलला , गुडगे फुटुन घेशील…

तरी पण न जुमानता रडुन रडुन का होइन तसेच घरचे बाहेर गेले की , ती मोठी सायकल सुध्दा हातात घेऊन धुम ठोकायचो…

पायडल वर पाय ठेऊन बँलेंस करायचं .गावातील ते लालमातीचे अरूंद रस्ते जास्त मजा तर घसरणीवर यायची पेन्डल मारायची गरजच भासत नव्हती

असं करत करत आम्ही कैची ( हाफींग ) शिकलो.

नंतर नळी पार (फुल पायडल ) करुन नविन विक्रम घडवला..

त्यानतर ट्रिपल सिट …

यानंतर सिट पर्यंत चा प्रवास एक नवीन अध्याय होता ,

नंतर सिंगल, डबल, हात सोडुन, कँरीअर वर बसुन चालवण्याचे सर्व स्टंट आम्ही तेव्हाच करुन चुकलो आणि पडता पडता शिकलो ही खरं तर जीवनाची सायकल अजुनही चालु आहे …

पण आता ते दिवस नाही…

तो आनंद नाही….

आज सहज घराचा कंपाउंड मध्ये धुळ खात पडलेल्या मुलांच्या सायकल वर नजर गेली तेव्हा वाटलं एक काळ गाजवलेल्या सायकलची किंमत अन् मजा यांची सर आता असलेल्या चार चाकी वा दुचाकी ला पण येणार नाही…

गेले ते दिवस…

राहिल्या त्या आठवणी……

असा काळ आपल्यापैकी बऱ्याच जणांनी उपभोगला असेल .

आपल्या आठवणीतील सायकल आणि गंमतीशीर अनुभव त्याकाळातील जे आठवले कि मन भरुन येतं. ☺️☺️☺️

Leave a comment