बेंदूर

बेंदूरचा सण

  • शिवश्री लक्ष्मण काटेकर

नाचती गोजिरी गाई,
झुलते सोनं पाटीलाच्या दारी,
बेंदूर आला गोंधळात,
आनंद भरला गाव साऱ्या भारी।

गुगवा वाजे अंगणात,
पखालीत दुधाचा सडा,
ओवाळणीला आई धावते,
गाईला मुठीत गूळ साखर गदा।

हळदीच्या हातांची माया,
माठांत पाणी भरून आले,
सजवलेल्या गाई-बैलांचे रूप,
जणू देवांचेच वास झाले।

बैलजोडीच्या गळ्यात घंटा,
रंगीबेरंगी फुलांची माळ,
मालकाच्या प्रेमानं ओथंबले,
त्यांचं नातं अढळ भाल।

गावभर वाजंते ताशा-ढोल,
गजरे गंध दिव्यांची आरती,
शेतकरी मनात गर्वाने म्हणे,
“हीच खरी आमची दिवाळी!”

बेंदूर म्हणजे नात्याचं सोनं,
गाईबैलांचं कौतुक जपणं,
ही परंपरा, ही आपुलकी,
पुन्हा पुन्हा मनाला भावणं।

-शिवश्री लक्ष्मण काटेकर
सोलापूर
7588020886
🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂

Leave a comment