आकाशाच्या कुशीत हरवले प्राण…

आकाशाच्या कुशीत हरवले प्राण…

वाटेवरती स्वप्न घेऊन,
निघाले होते पंख पसरून,
नभाच्या त्या विशाल कुशीत,
गेलं काहीतरी चुकून…

एक क्षणात गेला जीवनाचा झरा,
कोसळलं आकाशात दु:खाचं मळभ घरा,
आईच्या डोळ्यांत पाणी,
वडिलांच्या मूक वेदना,
वाट पाहणाऱ्या लेकरांना
सापडली फक्त आठवणींची माया…

कोण म्हणेल की पंख देतो आकाश?
कधी कधी तोच घेतो श्वास…
विमानाच्या त्या काळोख्या तुकड्यांत
हरवले कितीतरी हास्यांचे प्रकाश…

शब्द थिजलेत, आसवांनी चिंब झालेत,
नात्यांचे धागे गोंधळलेत,
मृत्यूच्या या अनाहूत क्षणांनी
शांत आभाळही रडलेलेत…


Leave a comment