बीड जिल्हा

  • माझा महाराष्ट्र – माहिती जिल्ह्यांची –

बीड जिल्हा

भाग 5 वा                                                      दि. 05 मे, 2025

=========================================================

संकलन आणि मांडणी :-

श्री.लक्ष्मण काटेकर, सोलापूर (महाराष्ट्र).

shivnitee@gmail.com 

Contact @ 7588020886.

=========================================================

  • माहिती जिल्ह्यांची –

“बीड  जिल्हा”

बीड (किंवा भीर) (Bhir) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे, आणि ३६ जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी असून तो महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो.बीड जिल्ह्यातील माजलगाव हा एक सधन तालुका म्हणून ओळखला जातो.

बीड जिल्हा पूर्वीच्या हैद्राबाद राज्यातील मराठी भाषिकापैकी एक जिल्हा आहे. सन 1956 साली द्विभाषिक राज्याच्या स्थापनेच्या वेळी हा जिल्हा द्विभाषिक राज्याच्या मराठवाड्यात होता. सन 1960 ला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर हा जिल्हा मराठी भाषिक राज्यात म्हणजे महाराष्ट्रात समाविष्ट  करण्यात आला. त्यानंतर ऑगस्ट  1982 ला मराठवाडा प्रादेशिक विभागाचे व बीड जिल्हयाचे विभाजन करण्यात आले. त्यावेळी या जिल्हयातील अंबाजोगाई तहसीलमधील रेणापूर मंडळातील 43 गावे व 11 वाड्यांचा लातूर जिल्ह्यात समावेश करण्यात आला. बीड जिल्हा औरंगाबाद विभागाच्या पश्चिमेश मध्यभागी वसलेला आहे. बीड जिल्हा दख्खनच्या काळया थरांच्या दगडांच्या प्रदेशात वसलेला आहे. बालाघाटची पर्वतरांग ही जिल्हयातील प्रमुख पर्वतरांग असून ती पश्चिमेकडे अहमदनगर जिल्हयाच्या सीमेपासून पूर्वेला जिल्ह्याच्या सीमेपर्यंत पसरली आहे. या पर्वत रांगांमळे जिल्हयाचे दोन भाग पडले आहेत. उत्तरेकडील सखल प्रदेश गंगथडी म्हणून ओळखला जातो आणि दुसरा उंचावरील प्रदेश घाट बालाघाट म्हणून ओळखला जातो. 

बीड जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी आहे. जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड हे आहे. बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड़ कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे. बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात हिंदी व्यतिरिक्त मराठी, उर्दू, तेलुगू या भाषादेखील बोलल्या जातात.बीड जिल्ह्यातील माजलगाव हा एक सधन तालुका आहे.

बीड जिल्ह्याचा प्राचीन इतिहास रामायण काळाशी जोडलेला आहे असे मानले जाते. सुसंगत व लिखित इतिहास साधारण इ.स.चौथ्या शतकापासूनचा उपलब्ध आहे. सातवाहन, चालुक्य, कलचुरी, वाकाटक, कदंब आदी घराण्यांनी या प्रदेशावर राज्य केले. रामायण काळात सीतमाईस पळवून नेणार्‍या रावणाला जटायूने याच भागात अडवले अशी आख्यायिका आहे. रावणाबरोबरच्या लढाईत जटायू जखमी झाला. त्याच स्थितीत सीताहरणाची हकिकत श्रीरामास सांगून तो इथेच गतप्राण झाला. अशी एक आख्यायिका ‘बीड’ शहराशी जोडलेली आहे. चालुक्य घराण्याचे या प्रदेशावर राज्य असताना विक्रमादित्य राजाच्या चंपावती नावाच्या बहिणीने बीड शहराचे नामाकरण ‘चंपावतीनगर’ असे केले होते असा उल्लेख ही इतिहासात सापडतो. हे चंपावतीनगर व त्या सभोवतालचा परिसर पुढे यादवांच्या व त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीच्या अमलाखाली होता.

बालाघाटच्या डोंगररांगेच्या जवळ व बिंदुसरा नदीच्या खोर्‍यात खळग्यासारख्या खोल भागात किंवा बिळासारख्या ठिकाणी बीड हे शहर वसलेले आहे. त्यावरूनच ‘बीळ’ या शब्दावरून शहराचे प्रचलित नाव ‘बीड’ हे पडले असावे, अशीही एक शक्यता सांगितली जाते. एका यवन राजाने या भागात खोलवरील पाणी अनुभवले आणि पर्शियन भाषेत पाण्याला ‘भिर’ म्हणतात, म्हणून त्या राजाने या भागालाही ‘भिर’ असे नाव दिले. त्याचा अपभ्रंश होत या भागाला ‘बीड’ असे (काळाच्या ओघात) म्हटले जाऊ लागले. बहामनी व निजामशाही राजवटीखालीदेखील काही काळ हा जिल्हा होता. पेशव्यांच्या कालखंडात निजाम व मराठे यांच्यामध्ये राक्षसभुवन व खर्डा येथे झालेल्या लढाया इतिहासात प्रसिद्ध आहेत. मराठेशाहीच्या अस्तानंतर बीड जिल्हा हा पुन्हा निजामाच्या अमलाखाली होता, त्यानंतर १९५६ पर्यंत हैद्राबादचा भाग होता. १९५६ ते १९६० या कालावधीत बीड मुंबई प्रांताचा भाग होता. शेवटी १९६० साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून बीड हा महाराष्ट्राचा भाग बनला.

निजाम व ब्रिटीश यांच्या विरोधात बीडमध्ये १८१८ सालीच (मराठवाड्यात सर्वप्रथम) आंदोलन छेडले गेले होते. जिल्ह्यातील धर्माजी प्रताप राव हे या लढ्याचे मार्गदर्शक होते. पुढील काळात स्वामी रामानंदतीर्थ व गोविंदभाई श्रॉफ यांनी मराठवाडा मुक्तीसाठी प्रयत्न केले

वैशिष्ट्ये

बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा सहकारी चळवळींसाठीही ओळखला जातो. महाराष्ट्र राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे.बीड हा दुष्काळी भाग म्हणून ओळख आहे. तसा बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील बोलल्या जातात. बीड हे मराठवाड्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. मराठीतील आद्य कवी मुकुंदराज आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यातीलच. बीड शहरातून बिंदुसरा नदी वाहते. मुर्तुजा शाह निजामच्या काळात बांधली गेलेली बीडची खजाना विहीर (खजाना बावड़ी) प्रसिद्ध आहे . जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे.माजलगाव येथें सिद्फना नदी असून त्यावर धरण बांधलेले आहे. गंगामासला येथें मोरेश्वर गणपती मंदिर आहे. तेलगावं येथें सुदेर्रावजी सोळके साखर कारखना आहे. माजलगाव येथें महादेव मंदिर सर्वात जुने आहे बीड हे सितफलासाठी प्रसीद्ध आहे. सर्वात जास्त आत्महत्या येथें शेतकरी वर्गच्या दिसतात. छोटेवाडी नावचे छोटे गावं आहे.

इतिहास

बालाघाट डोंगरांच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोर्‍यात खळग्यासारख्या किंवा बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसले असल्याने ‘बीळ’ या शब्दाच्या अपभ्रंशातून ‘बीड’ हे नाव पडले असावे, अशी ‘बीड’ नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. बीड़ या शब्दातल्या ’ड़’ला नुक्ता असल्याने इंग्रजांनी बीडचे स्पेलिंग Bhir असे केले, त्यामुळे ’बीड’चा खरा उच्चार माहीत नसलेले लोक भीर असा उच्चार करतात. बीड जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासाविषयी पुराणांमधून उल्लेख येतो असे सांगतात. बीड शहरातील जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडणार्‍या दंतकथा प्रचलित आहेत. रामायणानुसार, रावण हा सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्‍न जटायू नावाच्या गिधाडाने केला, पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले. मृत्यूला कवटाळताना त्याने रामाला ही हकीकत सांगितली. जटायूची आठवण म्हणून या जागी देवगिरीच्या यादवांच्या काळात जटाशंकर मंदिर बांधले आहे, असे म्हणतात.

बीडला पांडवकाळात ‘दुर्गावतीनगर’ म्हणत असत. पुढे चालुक्यकालीन चंपावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले ‘चंपावतीनगर’ हे या शहराचे दुसरे नाव आहे. पूर्वी राणी चंपावतीने या भागावर राज्य केल्याचा उल्लेख काही पुराणांमध्ये आहे. शहरात पूर्वी चंपावतीचा किल्ला असल्याच्या खुणाही आहेत. शहराच्या आजूबाजूला तटबंदी आहे.

किल्ले मैदान, लक्ष्मीबाग== बीडचा तुरुंग इ.स. १९३४ सालापर्यंत किल्ले मैदानावर होता. आज तिथे बलभीम महाविद्यालय आहे. प्लेगची साथ आली की नागरिक लक्ष्मीबाग शेतात राहायला जात. जेलजवळील लक्ष्मीबाग कॉलनी ती हीच. नगर रोडवरील इंग्रज व निझामाच्या अधिकार्‍यांच्या सरकारी क्लबवर उमरीच्या मारुती काकडे या क्रांतिकारकाने बॉम्ब टाकला होता. हा क्लब आज चंपावती क्लब या नावाने ओळखला जातो.

शंभर वर्षापूर्वीची वाहतुकीची साधने

इसवी सनाच्या विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत बीडमध्ये कोणाकडेही खासगी मोटार नव्हती. बीडकरांनी पहिली मोटार पाहिली ती इ.स. १९१० मध्ये, हैदराबादचे दिवाण सर अली इमाम भीषण दुष्काळाची पाहणी करण्यासाठी बीडला आले होते. तेव्हा अवघे बीड मोटार पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. या काळात जिल्हाधिकारी सायकलवर कचेरीला जात. तेव्हा लोक सायकलकडेही कुतूहलाने पाहत, कारण बीडकरांपैकी कोणाकडेही सायकल नव्हती. संपूर्ण बीडमध्ये भाड्याने मिळण्यासाठी एकच टांगा होता. देशमुख, देशपांडे कुटुंबाकडे दोन छकडे (बैलांचा टांगा) होते. प्रवासासाठी केवळ एकच खासगी बस बीड – जालना अशी धावायची.

विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळातील प्रेक्षणीय स्थळे

विसाव्या शतकात केवळ भौतिकच नव्हे बीडकरांचे सांस्कृतिक जीवनदेखील विलक्षण बदलून गेले. बीड शहरातील शंभर वर्षांपूर्वीची अनेक महत्त्वाची स्थळे कालौघात नष्ट झाली. काही स्थळे मात्र अद्यापही अवशेषांच्या रूपात शहराच्या शतकापूर्वीच्या कथा सांगत आहेत. फरशीचा वाडा, खिडकी, कान्होबाची हवेली, सटवाई मैदान, लक्ष्मीबाग, खासबाग, नेताजी मैदान, लाईन गल्ली, महेबूबगंज, धोंडीपुरा ही शंभर वर्षांपूर्वीची बीड शहरातील महत्त्वाची स्थळे. यात धोंडीपुरा नावापुरता उरलाय, तर अन्य स्थळे विस्मृतीत गेली आहेत. फरशीवरचा वाडा हे बीडच्या सामाजिक जीवनातील महत्त्वाचे स्थळ होते. इथे अवघ्या बीडकरांचा न्याय व्हायचा. बांधकामात सर्वप्रथम फरशी वापरली गेल्याने बीडकर त्याला फरशीवरचा वाडा म्हणत.

धोंडीपुरा

बीडच्या सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक जीवनाचे नेतृत्व ‘धोंडीपुरा’ करायचा. आज या भागाचं नाव धोंडीपुरा का आहे, हे बहुतेकांना माहीत नाही, पण या भागात राहणार्‍या धोंडाजी किसन या दानशूर व प्रतिष्ठित व्यक्तीच्या राहण्याचे हे स्थळ होते. याच धोंडोजींनी बिंदुसरा काठच्या सराफा लाईन रोडवरील वेस बांधली. त्यांनीच धोंडीपुर्‍यातील मशिदीलाही जागा दिली होती, असे मानले जाते. या धोंडोजींच्या नावाने हा भाग धोंडीपुरा म्हणून शंभर वर्षांपूर्वी ओळखला जाऊ लागला, तो आजही त्याच नावाने ओळखला जातो. धोंडीपुरा भागातील शंभर वर्षांपूर्वीच्या बीडची अनेक स्मृतिस्थळे कशीबशी उभी आहे. त्यात सात चौकाचा वाडा, सौंदत्तीकर, थिगळे, देशमुख यांचे वाडे व कान्होबाची हवेली महत्त्वाचे आहेत. देवगिरीवर मुस्लिम राजे आल्यावर बीडमध्ये जुना बाजार, पेठभागात महेबूबगंज, भालदारपुरा या भागात प्रतिष्ठित मुस्लिम सिद्धोजी नारोजी देशमुख हे दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीचे बीडचे मुख्य देशमुख राहात. देशमुख गल्लीत त्यांची मोठी हवेली होती. ती आज नाही, तिच्या बाह्य भिंती मात्र तशाच आहेत. धोंडीपुरा भागातील कान्होबाची हवेली ही कान्होबा देशपांडे यांची हवेली. ही अशीच भव्य होती.

हिरालाल चौक

पेठ भागात हिरालाल चौक म्हणून ओळखला जाणार्‍या भागाचे पूर्वीचे नाव महेबूबगंज होते. तसा शिलालेखही या वेशीवर आहे. शेख दाऊद महेबूबद्दौल्ला (इ.स. १८८२) या सरदाराने ही वस्ती वसवली होती. त्याचेच नाव या वस्तीस दिले. पुढे पेठ भागातील क्रांतिकारी व महात्मा गांधींच्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिल्या सहा सत्याग्रहींसाठी महात्मा गांधींनी ज्यांना निवडले ते कट्टर गांधीवादी हिरालाल सुखलालजी कोटेचा यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील अतुलनीय कामगिरीप्रीत्यर्थ या भागाचे नाव हिरालाल कोटेचा चौक (हिरालाल चौक) असे ठेवले. हा भाग आज याच नावाने ओळखला जातो. ‘बलभीम चौक’ या नावाने ओळखला जाणारा भाग पूर्वी केवळ ‘चौक’ या नावानेच ओळखला जात, पण कालांतराने या भागात राहणार्‍या कदम घराण्यातील कर्तृत्ववान व्यक्ती बलभीमराव कदम यांचे नाव या चौकास दिले गेले. या शिवाय याच भागातील महाविद्यालयालाही त्यांचेच नाव दिले आहे.

नेताजी मैदान

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा बीडच्या तरुणांवर मोठा पगडा होता. अंबाजोगाईच्या श्रीनिवास खोत यांना तर लोकांनी ‘छोटा सुभाष’ ही पदवीच दिली होती. सुभाषबाबू बीडला येणार होते. ज्या रस्त्यावरून त्यांची मिरवणूक निघणार होती त्या रस्त्याला हळूहळू लोक ‘सुभाष रोड’ संबोधू लागले तर ज्या मैदानावर त्यांची सभा होणार होती त्या मैदानालाही ‘नेताजी मैदान’ संबोधले गेले. मात्र, काही कारणांमुळे नेताजी सुभाषचंद्र बीडला येऊ शकले नाहीत, पण त्यांचे नाव कायमपणे बीडच्या जनजीवनाचा भाग झाले.

सटवाई

’सटवाई’ ही शंभर वर्षापूर्वी बीडकरांची ग्रामदेवता होती. मूल जन्मल्यावर पाचव्या दिवशी लोक सटवाईचे दर्शन घेऊन त्याचे भविष्य लिहून घ्यायचे. माळीवेस परिसरात उत्तरेस शिंदेंच्या मळ्यात आजही हे सटवाईचे मंदिर आहे. याच मंदिरामुळे हा सर्व भाग ‘सटवाई मैदान’ म्हणून ओळखला जात असे. नंतर ‘बारादरी’ व आज ‘माळीवेस’ या नावाने हा भाग ओळखला जातो. आज माळीवेस नाही. ती साधारणत: दीडशे वर्षापूर्वी पाडण्यात आली. इतिहास संशोधक डॉ. सतीश साळुंके यांच्या ‘बीड जिल्ह्याचा प्राचीन व मध्ययुगीन इतिहास’ या ग्रंथात या वेशीवरील शिलालेख आला आहे.

शंभर वर्षांपूर्वीच्या बीडच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनात महत्त्वाची सामूहिक स्थळे असणारे सटवाई मैदान, नेताजी मैदान, किल्ले मैदान आज वाढत्या लोकसंख्येने आपल्या उदरात घेतली. नेताजी मैदानाचे रूपांतर आज नव्या भाजी मंडईत, तर सटवाई मैदानाचे प्रशस्त वस्तीत रूपांतर झाले. याच भागात बारादरी नावाची वास्तू होती. ही बारादरी म्हणजे सु्लतानजी निंबाळकरांचे निवासस्थान होते. या वास्तूत काही काळ न्यायालय चालले. याच न्यायालयाने इ.स. १८९० मध्ये बीडला झालेल्या उठावातील सात क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. शहरातील विविध चौक, प्रमुख रस्ते व महत्त्वाच्या स्थळांना आज ज्या नावाने संबोधले जाते, ही नावे कशी पडली याची ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी अभ्यासताना बीडच्या इतिहासातील अनेक दुव्यांवर प्रकाश पडतो.

बशीरगंज

बशीरगंज हे नाव या ठिकाणी इ.स. १९०५ मध्ये झालेल्या एका सत्कार समारंभामुळे पडले. दक्षिणेचा बादशहा महेबूबउद्दौला याच्या प्रशासन काळात बीडचा अव्वल तालुकेदार रिजाऊल हसन हा होता. बीडची पाहणी करण्यासाठी बादशहा महेबूबउद्दौला याच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री नवाब बशिरोद्दीनसाहब बीडला आले. त्या वेळी बीडच्या प्रमुख वेशीवर (राजुरी वेस) रिजाऊल हसन यांनी बशिरोद्दीन यांचे स्वागत केले. तेव्हापासून या चौकाला बशीरगंज या नावाने ओळखले जाऊ लागले. आजही हा भाग याच नावाने ओळखला जातो.

गाजीपुरा

गाजीपुरा म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागाचे नाव याच रिजाऊल हसनच्या काळात बीडच्या नायब सुभेदार हाजी सदहरशाहाने त्याच्या गुरूच्या (गाजीउद्दीन) नावावरून सन इ.स. १६८५ मध्ये ठेवले.

[१]

रावण जटायूचे पंख कापताना – राजा रविवर्म्याने चितारलेले चित्र (चित्रनिर्मिती: इ.स. १८९५)

कंकालेश्वर हे बीड मधील ऐतिहासिक पुरातन भगवान शंकराचे मंदिर आहे. हे चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे . मंदिराचे दगडी बांधकाम आहे .

बीड जिल्ह्याचा प्राचीन इतिहास

आधुनिक बीड जिल्हयाचा इतिहास मात्र इसवी सनाच्या चौथ्या शतकापासूनच उपलब्ध आहे. सातवाहन, चालुक्य, कलचूरी, वाकाटक, कदंब इत्यादी घराण्यांचे बीडवर राज्य होते. उपरोक्त परिसर पुढे यादवांच्या अंमलाखाली होता. अल्लाउद्दीन खिलजीने हा प्रदेश यादवांकडून जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो (१२९६-१३१६). हा भाग मुहम्मद बिन तुघलकाने जिंकून घेतला. (१३२५-५१). बहामनी साम्राज्याच्या उदयानंतर या प्रदेशावर बहामनी सत्ता प्रस्थापित झाली. त्या राजवटीच्या विघटनानंतर हा प्रदेश निजामशाहीचा एक भाग बनला. पेशवाईच्या कालखंडात निजाम व मराठे यांच्यामध्ये राक्षसभुवन व खर्डा येथे झालेल्या लढाया इतिहासात प्रसिद्ध आहेत. मराठ्यांनी निजामाकडून हा प्रदेश जिंकून घेतला होता. तथापि, मराठेशाहीच्या अस्तानंतर या प्रदेशावर पुन्हा निजामाची राजवट प्रस्थापित झाली, ती थेट १८ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने हैदराबाद संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणास मान्यता देईपर्यत. बहामनी व निजामशाही राजवटीखालीदेखील काही काळ हा जिल्हा होता. त्यानंतर १९५६ पर्यंत हैद्राबादचा भाग होता. १ नोव्हेंबर १९५६ राजी राज्य पुनर्रचनेदरम्यान बीड जिल्ह्यासहित मराठवाडातील सर्व जिल्हे तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले. शेवटी १ मे १९६० रोजी मध्ये महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये वेगळी झाल्यावर बीड जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला. निजाम व ब्रिटिश यांच्या विरोधात बीडमध्ये १८१८ सालीच (मराठवाड्यात सर्वप्रथम) आंदोलन छेडले गेले होते. जिल्ह्यातील धर्माजी प्रताप राव हे या लढ्याचे मार्गदर्शक होते. पुढील काळात स्वामी रामानंदतीर्थ व गोविंदभाई श्रॉफ यांनी मराठवाडा मुक्तीसाठी प्रयत्न केले. [१]

आधुनिक बीड जिल्हा

१९०५ मध्ये केज तालुका रद्द होऊन शेजारच्या अंबा तालुक्याला जोडण्यात आला. अंबाचे पुढे मोमिनाबाद असे नामांतर झाले. नंतर १९४८ पर्यत सरहद्दींमध्ये फेरफार झाले नाहीत. सुमारे एकचतुर्थांश जिल्हा खाजगी जहागिरीत होता. सर्फ-इ-खास ही निजामाची जहागिरी जवळजवळ सध्याच्या पाटोदा तालुक्याएवढी होती. जहागिरी रद्द झाल्यानंतर १९५० मध्ये तालुक्यांची फेरआखणी करण्यात आली. तीत मुख्यत: पाटोदा हा वेगळा महाल वा नंतर तालुका झाला. अहमदनगर जिल्ह्यातील २८ खेडी बीड जिल्ह्यात आली तर पाटोदा-आष्टी तालुक्यातील २१ खेडी अहमदनगर जिल्ह्यात गेली. केज हा पुन्हा वेगळा तालुका झाला. पुढे १९६२ मध्ये मोमिनाबादचे अंबेजोगाई असे नामांतर करण्यात आले.

क्रांतिकारकांचा उठाव

१८९०मध्ये बीडला झालेल्या उठावातील सात क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. या उठावाचा केंद्रबिंदू थिगळे गल्लीतील शिवराम सौंदत्तीकर यांचा वाडा होता. या वाड्यात शस्त्र तयार करण्याचा कारखाना पुढे लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने बीडच्या क्रांतिकारकांनी सुरू केला. या कारखान्यात गोळ्या तयार करण्याचे एक यंत्रही अलीकडेच सापडले आहे. हे यंत्र उठावाचे नेतृत्व करणार्‍या घोडेखुरच्या लढाईचे प्रमुख क्रांतिकारी धोंडाजी विठ्ठल मुंडे व शहाजी विठ्ठल मुंडे या भावंडांच्या घरात सापडले. हे दोघेही १४ एप्रिल १८९० रोजी या लढाईत शहीद झाले.

बीड जिल्हा🚩
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा
MaharashtraBeed.png महाराष्ट्रच्या नकाशावरील स्थान
देश भारत
राज्यमहाराष्ट्र
विभागाचे नावऔरंगाबाद विभाग
मुख्यालयबीड
तालुकेबीड
किल्ले धारूर
अंबाजोगाई 
परळी-वैद्यनाथ 
केज 
आष्टी 
गेवराई 
माजलगाव 
पाटोदा
शिरूर
वडवणी
क्षेत्रफळ१०,६९३ चौरस किमी (४,१२९ चौ. मैल)
लोकसंख्या२५,८५,९६२ (२०११)
लोकसंख्या घनता२४१ प्रति चौरस किमी (६२० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या४,५८,२२०
साक्षरता दर७३.५३%
लिंग गुणोत्तर१.०९ /
प्रमुख शहरेबीड
लोकसभा मतदारसंघबीड (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघबीड विधानसभा मतदारसंघ
केज विधानसभा मतदारसंघ
आष्टी विधानसभा मतदारसंघ
गेवराई विधानसभा मतदारसंघ
परळी विधानसभा मतदारसंघ
माजलगाव विधानसभा मतदारसंघ
  

बीड जिल्ह्याच्या चतुःसीमा

पूर्वेला : परभणी जिल्हा
पश्चिमेला : अहमदनगर जिल्हा
उत्तरेला : जालना जिल्हा आणि औरंगाबाद जिल्हा
दक्षिणेला : लातूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा

प्रशासकीय विभाग

बीड जिल्ह्याचे विभाजन २ उपविभागांमध्ये करण्यात आले आहे. त्यांचे विभाग पुढीलप्रमाणे आहेत.

  • बीड उपविभाग
  • अंबेजोगाई उपविभाग

या उपविभागांचे विभाजन ११ तालुकामध्ये पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.

शिरूर व वडवणी या तालुक्यांची निर्मिती २६ जून १९९९ ला करण्यात आली. 
जिल्ह्यात ६० जिल्हा परिषद मतदारसंघ असून ११ पंचायत समित्या आहेत. एकूण गावे १३४६ तर १०१९ ग्रामपंचायती आहेत. विद्युतीकरण झालेली ग्रामीण गावे : १३७

राजकीय संरचना

लोकसभा मतदारसंघ (१) :बीड (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ (६) :
बीड विधानसभा मतदारसंघ
केज विधानसभा मतदारसंघ
आष्टी विधानसभा मतदारसंघ
गेवराई विधानसभा मतदारसंघ
परळी विधानसभा मतदारसंघ
माजलगाव विधानसभा मतदारसंघ

भौगोलिक माहिती

बीड जिल्हा समुद्रापासून दूर आहे. बीड जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे. जिल्ह्यातील उत्तर भाग सपाट मैदानी आहे. जिल्ह्याच्या मध्य-दक्षिण भागात बालाघाटचे डोंगर आहेत. येथे चिंचोली, नेकनूर हे भाग येतात. या भागास मांजरथडी असेही म्हणतात. मांजरसुभ्याहून बीडकडे जाताना पालीघाट लागतो. गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. या भागास गंगथडी असेही म्हणतात. हा सुपीक भाग गाळापासून बनला आहे. यात गेवराई, माजलगाव व परळी या तालुक्यांचा समावेश होतो.

हवामान

जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणत: उष्ण व कोरडे आहे. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. मे महिन्यात तापमान महत्तम असते. डिसेंबर महिन्यात तापमान कमीतकमी असते. उन्हाळ्यात दिवसा तापमान बरेच वाढत असले तरी रात्री ते कमी होते. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील उंचावरील बालाघाट डोंगराळ प्रदेशातील हवामान काहीसे थंड आहे तर सखल भागात ते उबदार व थोडेसे दमट आहे. अंबेजोगाई तालुक्यातील हवामान अधिकच आल्हाददायक असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधील पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण अतिशय कमी असून पाऊस अनियमित स्वरूपाचा आहे. त्यामुळे जिल्ह्याचा बराचसा भाग अवर्षणग्रस्त आहे. जो पाऊस पडतो त्याचे जिल्ह्यातील वितरणही असमान आहे. पावसाचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत गेलेले आढळून येते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील अंबेजोगाई, केज, माजलगाव, परळी, धारूर आदी तालुक्यात तो तुलनात्मकदृष्टया अधिक पडतो तर गेवराई, आष्टी, पाटोदा, शिरूर यांसारख्या तालुक्यात तो खूपच कमी पडतो. जिल्ह्यातील गेवराई, पाटोदा, बीड, माजलगाव, केज, आष्टी या तालुक्यांचा केंद्र शासनाने निश्चित केलेल्या अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश होतो. येथील लोक दुष्काळाचा सामना करतात .

भौगोलिक महत्त्व

बीड जिल्हा समुद्रापासून दूर आहे. बीड जिल्ह्याचा बराच भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे, मात्र जिल्ह्याचा उत्तर भाग सपाट मैदानी आहे. जिल्ह्याच्या दक्षिण-मध्य भाग हा बालाघाटच्या डोंगररांगांमुळे खडकाळ आहे. येथे चिंचोली, नेकनूर वगैरे भाग येतात. या भागास मांजरथडी असेही म्हणतात. मांजरसुभ्याहून बीडकडे जाताना पालीघाट लागतो. गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. या भागास गंगथडी असेही म्हणतात. हा सुपीक भाग गाळापासून बनला आहे. यात गेवराई, माजलगाव व परळी या तालुक्यांचा समावेश होतो. हा जिल्हा म्हणजे गोदावरी -मांजराचे खोरे होय.

भूरचनेच्या दृष्टीने या जिल्ह्याचे दक्षिणेकडील ‘बालाघाट’ पठाराचा उंच प्रदेश, उत्तरेकडील गोदावरी खोर्‍याचा सखल प्रदेश व नैर्ऋत्य आणि पश्चिमेकडील चढ-उताराचा प्रदेश असे तीन भाग पडतात. जिल्ह्याच्या मध्यभागतून पश्चिम सरहद्दीपासून पूर्व सहद्दीपर्यत पसरलेली बालाघाट ही प्रमुख डोंगररांग होय.तिच्यामुळे जिल्ह्याचे उत्तरेकडील सखल प्रदेश व दक्षिणेकडील उंचवट्यांचा प्रदेश असे दोन भाग झाले आहेत. हे अनुक्रमे ‘गंगाथडी’ व ‘घाट’ किंवा ’ बालाघाट’ या स्थानिक नावांनी ओळखले जातात. हा पठारी प्रदेश दक्षिणेस मांजरा नदीपर्यत पसरलेला असून त्याची सस. पासून उंची ६०० ते ६५० मी. पर्यत आढळते. प्रदेशाचा उतार दक्षिणेकडे कमी होत जातो.बालाघाट डोंगररांगेची उंची पश्चिम भागात सर्वात जास्त असून ती पूर्वेस क्रमाक्रमाने कमी होत जाते. जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर (८८९ मी.) पश्चिमेस चिंचोलीजवळ असून या रांगेत ६०० ते ८५० मी. उंचीचीही काही शिखरे आहेत. बालाघाट डोंगराचा एक फाटा चिंचोलीजवळ सुरु होऊन नंतर आग्नेय दिशेने जातो. या फाट्यामुळे आष्टी व पाटोदा तालुक्यांदरम्यान नैसर्गिक सरहद्द निर्माण झाली आहे.

उत्तरेकडील गोदावरी नदीखोर्‍याचा पश्चिम भाग सस. पासून साधारण ५५५ मी. उंचीचा असून पूर्वेकडे त्याची उंची ४०० मी. पर्यंत उतरत जाते. या सखल प्रदेशात मधूनमधून ६०० मी उंचीच्या काही टेकड्याही आढळतात. याच्या पश्चिम भागात गणोबा, चितोरा व सिंदफणा नदीच्या दक्षिण भागात नारायणगड इ. टेकड्या आहेत. जिल्ह्याचा तिसरा भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडील सीना नदीखोर्‍याचा असून या प्रदेशात संपूर्ण आष्टी तालुक्याचा समावेश होतो.याचा दक्षिण भाग सु. ६०० मी.उंचीचा असून उत्तरेस ७५० मी. पर्यत उंची वाढत जाते. या प्रदेशात अनेक तुटकतुटक टेकडया आहेत. सीना नदीमुळे याच्या दक्षिण भागाची झीज होऊन मूळचे स्वरुप बदलले आहे.

हा जिल्हा दख्खनच्या पठारी प्रदेशात असून गोदावरी नदीखोर्‍याचा प्रदेश अत्यंत सुपीक आहे. या प्रदेशात गडद करड्या व काळ्या रंगाची मृदा आढळते. या जमिनीत भेगा पडतात. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील जमीन थोडी क्षारयुक्त असून क्षारांचे प्रमाण ५% आहे. नद्यांच्या काठी जमीन सुपीक, तर इतरत्र पातळ थराची व खडकाळ आढळते. माजलगाव तालुक्याच्या दक्षिणेकडील व केज तालुक्याच्या उत्तरेकडील जमीनही निकृष्ट प्रतीची आहे. आंबेजोगाई तालुक्यातील जमीन काळी कपाशीची व सुपीक आहे. हा जिल्हा खनिज संपत्तीच्या दृष्टीने अविकसितच आहे.

हवामान

जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणत: उष्ण व कोरडे आहे. स्थळपरत्वे जिल्ह्यातील हवामानात थोडाफार फरक आढळतो. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. मे महिन्यात तापमान महत्तम असते. डिसेंबर महिन्यात तापमान कमीतकमी असते. उन्हाळ्यात दिवसा तापमान बरेच वाढत असले तरी रात्री ते कमी होते. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील उंचावरील बालाघाट डोंगराळ प्रदेशातील हवामान काहीसे थंड आहे तर सखल भागात ते उबदार व थोडेसे दमट आहे. अंबेजोगाई तालुक्यातील हवामान अधिकच आल्हाददायक असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधील पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण अतिशय कमी असून पाऊस अनियमित स्वरूपाचा आहे. त्यामुळे जिल्ह्याचा बराचसा भाग अवर्षणग्रस्त आहे. जो पाऊस पडतो त्याचे जिल्ह्यातील वितरणही असमान आहे. पावसाचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत गेलेले आढळून येते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील अंबेजोगाई, केज, माजलगाव,परळी, धारूर आदी तालुक्यात तो तुलनात्मकदृष्टया अधिक पडतो तर गेवराई, आष्टी, पाटोदा, शिरूर यांसारख्या तालुक्यात तो खूपच कमी पडतो. जिल्ह्यातील गेवराई, पाटोदा, बीड, माजलगाव, केज, आष्टी या तालुक्यांचा केंद्र शासनाने निश्चित केलेल्या अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश होतो. [२]

१९७७ मध्ये जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३९.४o सेल्शियस व सरासरी किमान तापमान २९.९o सेल्शियस होते. वार्षिक पावसाचे प्रमाण कमी असून तो सरासरी ६५ ते ८० सेमी. आहे. जिल्ह्याच्या मध्यभागात पर्जन्याचे प्रमाण जास्त असून तो जून ते सप्टेंबर या काळात जास्त पडतो. पावसाची अनिश्चितता व कमी प्रमाण यांमुळे या जिल्ह्याचा काही भाग सतत दुष्काळी म्हणून ओळखला जातो.

निकृष्ट जमीन व कमी पर्जन्य यांमुळे जिल्ह्यात जंगलाखालील क्षेत्र बरेच अल्प (२%) आहे. १९७८-७९ साली जिल्ह्यात २१,६०० हे. क्षेत्र जंगलांखाली होते. बहुतेक जंगले पाटोदा,आंबेजोगाई, आष्टी, केज, बीड, इ. तालुक्यांतच आढळतात. जंगले विस्तीर्ण प्रदेशात नसून लहानलहान टांपूमध्ये विखुरलेली आढळतात. धावडा, आपटा, आवळा, सलाई, तेंदू, चंदन, टेमरू, कांदोळ, लोखंडी, खैर, महुवा, पळस, हेन इ. येथील प्रमुख वनस्पतिप्रकार होत. जंगलांत बराचसा गवताळ प्रदेश असून कुसळी व शेडा हे गवताचे प्रमुख प्रकार तेथे आढळतात. यांशिवाय रोशा, मारवेल. सोफिआ, बोनी, कुंदा जातींचे गवतही आढळते. दुसर्‍या योजनेच्या काळात १६३ हेक्टर क्षेत्रात झाडे लावण्याचे काम करण्यात आले. १९७८-७९ मध्ये २४० हेक्टर क्षेत्रात जंगले निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जंगलांतून फक्त लाकूड, सरपण, व गवत मिळते. १९७८-७९ मध्ये जंगलापासून फक्त १,६५,५०० रु. उत्पन्न मिळाले. लाकडाचा वापर इमारती, लाकडी सामान व सरपणासाठी केला जातो.

पूर्वी येथे वन्य प्राण्यांची संख्या खूप होती. परंतु जंगलांचे प्रमाण जसजसे कमी होत गेले, तसतशी या प्राण्यांची संख्याही कमी होत गेली. दाट जंगलमय प्रदेशांत क्वचित बिबळ्या आढळतो. यांशिवाय चितळ,रानडुक्कर, कोल्हा, माकड इत्यादी प्राणी जिल्ह्यात आढळतात.

जलसिंचन

जिल्ह्यात विहिरी, कूपनलिका व नद्या ही पाणीपुरवठ्याची मुख्य साधने आहेत. जिल्ह्यात बीड व आष्टी या भागात तुलनात्मकदृष्टया अधिक विहिरी आहेत. बीड शहरात माजलगाव तलाव व बिंदुसरा तलावातून पाणी पुरवठा होतो. ऐतिहासिक काळात बीड शहराला करमारी खजाना विहीरीद्वारे पाणीपुरवठा होत असे. येथील निजामकालीन खजाना विहीर आहे. ही विहीर साडेचारशे वर्षांपूर्वी बांधलेली आहे. शेतकर्‍यांना कधीच पाण्याचा तुटवडा होऊ नये, यासाठी १५७२ साली निजामाचा सरदार सलाबत खान यानं ही विहीर बांधून घेतली होती. बिंदुसरा नदीच्या पायथ्याशी ही विहीर बांधल्यामुळे यातलं पाणी आजपर्यंत कधीच आटले नव्हते. पण २०१२च्या दुष्काळात विहीर पूर्णपणे आटली.

बीड जिल्ह्यात विहिरी, कूपनलिका व नद्या ही पाणीपुरवठ्याची मुख्य साधने आहेत. जिल्ह्यात बीड व आष्टी या भागात विहिरी तुलनात्मकदृष्टया अधिक आहेत. बीड शहरात माजलगाव तलाव व बिंदुसरा तलावातून पाणी पुरवठा होतो. बीड शहराला ऐतिहासिक पाणीपुरवठा करमारी खजाना विहिरीद्वारे होत असे.

नद्या

                गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने औरंगाबाद-बीड, जालना-बीड व परभणी-बीड अशा जिल्हा सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. ती जिल्ह्याच्या गेवराई, माजलगाव व परळी तालुक्यांतून वाहत जाते.

        जिल्ह्यातील सिंधफणा, वाण, सरस्वती या गोदावरीच्या उपनद्या आहेत. रेना नदी, वाण नदी व सरस्वती नदी या बीड      

        जिल्ह्यातील मध्य डोंगराळ भागात उगम पावतात व दक्षिणकडे वाहत जाऊन पुढे गोदावरीस मिळतात.

                     मांजरा ही बीड जिल्ह्यातील दुसरी महत्त्वाची नदी आहे. ही नदी पाटोदा तालुक्यातील हरिश्चंद्र बालाघाटच्या पर्वतरांगामध्ये उगम पावते. ही नदी सुरुवातीस उत्तर – दक्षिण असा प्रवास करून नंतर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समांतर असा होतो. बर्‍याच ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, उस्मानाबाद-बीड व लातूर-बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे काम केले आहे. मांजरा नदी सुमारे ७२५ कि.मी. अंतराचा प्रवास करत आंध्र प्रदेशात जाऊन गोदावरी नदीस मिळते. बीड जिल्ह्यातील केज, रेना, लिंबा व चौसाळा या मांजरा नदीच्या उपनद्या असून त्या बालाघाटच्या डोंगराळ प्रदेशात उगम पावून जिल्ह्यातच मांजरा नदीस मिळतात.

  • सिधंफणा नदी पाटोदा तालुक्यात चिंचोली टेकड्यांत उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नंतर पूर्वेकडे व तदनंदर पुन्हा उत्तरेकडे, किंबहुना ईशान्येकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण सिधंफणा नदीवर आहे.
  • बिंदुसरा नदी बीड तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावते. ही सिधंफणाची एक उपनदी आहे. बिंदुसरा नदीवर बीडजवळ जिल्ह्यातील मोठा धरणप्रकल्प आहे. ही नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिंधफणेस मिळते. पुढे सिंदफणा गोदावरीला मिळते.
  • कुंडलिका ही सिंधफणेची एक उपनदी बीड जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच सिंधफणेस मिळते.
  • सीना नदी जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैर्ऋत्य सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने अहमदनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम केले. आहे. त्याच वेळी तिने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे.
  • पाटोदा तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी विंचरणा नदी वाहत जाते. पुढे सौताडा येथे विंचरणेचा प्रवाह सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत कोसळतो. येथील धबधबा प्रसिद्ध आहे.

धरण प्रकल्प

बीड जिल्ह्यात २ मोठे, १६ मध्यम व १२२ लघु प्रकल्प आहेत. माजलगाव व मांजरा हे मोठे प्रकल्प आहेत. बीड शहराला माजलगाव व बिंदूसरा प्रकल्पामधून पाणी पुरवठा होतो. इतर धरण प्रकल्प :- सिंदफणा (शिरूर), बेलपारा (शिरूर), महासांगवी (पाटोदा), वाण (परळी) ,बोरणा (परळी) ,बोधेगाव (परळी), सरस्वती (वडवणी), कुंडलिका (वडवणी), वाघेबाभूळगाव (केज), शिवनी (बीड), मणकर्णिका (बीड), सौताडा (पाटोदा), मेहकरी (आष्टी), कडा (आष्टी), कांबळी (आष्टी), रूटी (आष्टी), तलवार( आष्टी), हिंगेवाडी (शिरूर), नागतळवाडी, वेलतुरी, लोणी, पारगाव, कोयाळ, खुंटेफळ, पिंपळा, गोलंग्री, सुलतानपूर, कटवट, जरुड, जुजगव्हाण, ईट, मैंदा, अंबा, मन्यारवाडी, शिंदेवाडी, मादळमोही, दासखेड, इंचरणा, मस्साजोग, कारंजा, होळ, मुळेगाव, जनेगाव, तांदुळवाडी, पहाडीपारगाव, साळींबा, नित्रुड, शिंदेवाडी, वांगी, चिंचोटी, तिगाव, लोणी, सांगवी, ढालेगाव, मांजरा (धनेगाव), वगैरे..

माजलगाव धरण

माजलगाव धरण हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील सिंधफणा नदीवर सिंचन व जलविद्युतनिर्मितीसाठी बांधलेले धरण आहे. मातीचा भराव व दगडी बांधकाम असलेल्या या धरणाची लांबी ६४८८ मीटर असून कमाल उंची ३५.६० मीटर आहे

माजलगाव धरण
Majalgaon1.jpg
धरणाचा उद्देशसिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
सिंधफणा नदी
स्थानमाजलगावबीड जिल्हामहाराष्ट्र
सरासरी वार्षिक पाऊस७५५ मि.मी.
लांबी६४८८ मी
उंची३५.६० मी.
बांधकाम सुरूइ.स. १९७६
उद्‍घाटन दिनांकइ.स. १९८६
ओलिताखालील क्षेत्रफळ७८१३ हेक्टर
जलाशयाची माहिती
क्षमता४५३.६४ दशलक्ष घनमीटर
क्षेत्रफळ७६ वर्ग कि.मी.
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती
स्थापित उत्पादनक्षमता३११.३४ दशलक्ष घनमीटर
भौगोलिक माहिती
निर्देशांकhttps://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/55/WMA_button2b.png/17px-WMA_button2b.png19.139187°N 76.163616°E

दरवाजे

प्रकार : S – आकार                                                                        लांबी : २३९ मी.
सर्वोच्च विसर्ग : १४५०० घनमीटर / सेकंद                                    संख्या व आकार : १६, (१२ X ८ मी)

पाणीसाठा

ओलिताखालील क्षेत्र

क्षेत्रफळ : ७६ चौरस कि.मी.
क्षमता : ४५३.६४ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ३११.३४ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ७८१३ हेक्टर
ओलिताखालील गावे : २०

कालवा

उजवा कालवा

लांबी : १६५ कि.मी.
क्षमता : ८३.६० घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : १३१५२० हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ११९४०० हेक्टर

मांजरा धरण

मांजरा धरण मांजरा नदीवरील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धरण आहे.                      मांजरा ही  महाराष्ट्रकर्नाटक व तेलगंनातून वाहणारी एक नदी आहे. वांजरा या नावानेही ती ओळखली जाते. ही नदी महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात, बालाघाट डोंगररांगेत उगम पावते. गोदावरी नदीची ती एक प्रमुख उपनदी आहे. सुमारे ७२५ किमी. लांबीची ही नदी, सुरुवातीला पूर्ववाहिनी असून बीडउस्मानाबाद तसेच बीडलातूर या जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे.

कासारखेडजवळ ही नदी लातूर जिल्ह्यात प्रवेश करते व जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहताना आग्नेयेस जाऊन निलंगा गावाजवळ कर्नाटक राज्यात व पुढे बिदरच्या पूर्वेस आंध्र प्रदेश राज्यात प्रवेश करते. आंध्र प्रदेशातील संगरेड्डीपेटजवळ मांजरा नदी एकदम वळण घेऊन वायव्य दिशेने वाहू लागते. निझामाबाद जिल्ह्यात या नदीवर धरण बांधण्यात आले आहे. धरणाच्या तलावाला निझामसागर तलाव म्हणतात. पुढे ही नदी पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सरहद्दीपर्यंत येऊन नांदेड जिल्ह्यातील शेळगावपासून ईशान्येस, राज्याच्या सरहद्दीवरून वाहत जाते व याच जिल्ह्यातील कुंडलवाडी गावाजवळ गोदावरी नदीस उजवीकडे मिळते. तेरणा, कारंजा, तावरजा, लेंडी व मन्याड या मांजरा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. या नदीस तेरणा नदी लातूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर निलंग्याच्या पूर्वेस, तर कारंजा नदी आंध्र प्रदेश राज्यात मिळते, लेंडी व मन्याड या नद्या नांदेड जिल्ह्याच्या सरहद्दीवर या नदीला डावीकडून मिळतात.

मांजरा नदीचा उपयोग प्रामुख्याने जलसिंचनासाठी केला जातो. नदीखोरे सुपीक असल्याने येथील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या नदीच्या वरच्या खोर्‍यात मुख्यत्वे कापसाचे पीक घेतले जाते, तर खालच्या खोर्‍यात ज्वारी, कडधान्ये, तेलबिया यांचे उत्पादन होते. बहुतेक ठिकाणी नदीकाठ मंद उताराचे असल्याने या नदीचा फेरी वाहतुकीसाठीही थोड्याफार प्रमाणात उपयोग होतो.

मांजरा धरण
Manjara.jpg
अधिकृत नावमांजरा
धरणाचा उद्देशसिंचन
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
मांजरा
स्थानगाव: धाणेगाव, तालुका: केज , जिल्हा: बीड
सरासरी वार्षिक पाऊस७०० मी.मी.
बांधकाम सुरूआ. केशवराव सोनवणे (१९६६)
उद्‍घाटन दिनांक१९८०-१९८४
जलाशयाची माहिती
क्षमता३७१.२७ दशलक्ष घनमीटर

धरणाची माहिती

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ३२.६० मी (सर्वोच्च)                                                 लांबी : ४२०३ मी

दरवाजे

प्रकार : S – आकार
लांबी : २६० मी.
सर्वोच्च विसर्ग : ६००० घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : १८, (१२ X ५ मी)

पाणीसाठा

ओलिताखालील क्षेत्र

क्षेत्रफळ : ४३.९२३ वर्ग कि.मी.
क्षमता : २५०.७० दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : १७३.३२ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ४३४९.३० हेक्टर

कालवा

डावा कालवा

लांबी : ९० कि.मी.
क्षमता : ८ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : २३६९० हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : २१३२१ हेक्टर

उजवा कालवा

लांबी : ७८ कि.मी.
क्षमता : ८ घनमीटर / सेकंद

धरणाचे वैशिष्ट्

लातूर शहर, अंबाजोगाई, धारूर, केजसह, ७२ गावांना पाणीपुरवठा मांजरा धरणातून होतो. या धरणाची ओळख त्याच्या स्थानिक गावावरून “धनेगाव धरण” अशीही होते. हे धरण मुख्यतः दुष्काळी ओळखल्या जाणार्या भागात असल्यामुळे ते जास्त रिकामेच असते. १४ सप्टेंबर २०१६ रोजी धनेगाव धरणात थेंबरही पाणी नव्हते. केवळ १० दिवसांत हे धरण ७७ टक्के भरले. २००७ सालानंतर पहिल्यांच या धरणात एवढा मोठा पाणीसाठा झाला

कांबळी नदी ची निर्मिती सुरू आहे

पिके

  • एकूण पिकाखालील क्षेत्र : ६६२ हजार हेक्टर
  • एकूण ओलीत क्षेत्र : २३६ हजार हेक्टर
  • एकूण वनक्षेत्र : २६ हजार हेक्टर
  • एकूण पडीत क्षेत्र : १२३ हजार हेक्टर
  • एकूण दुसोटा क्षेत्र : हजार हेक्टर

जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतात. ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे खूप उत्पन्न असलेले प्रमुख पीक असून ते दोन्ही खरीप व रब्बी अशा हंगामांत घेतले जाते. शिवाय कापूस हे महत्त्वाचे खरीप नगदी पीक आहे. बाजरीगहूतूरमूगउडीद, तीळ, जवस, मसूर, सोयाबीन, मिरचीऊसकांदा, वगैरे अन्य पिकेही जिल्ह्यात घेतली जातात.. बीड जिल्हा हा तेलबिया व भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. जिल्ह्यातील पाटोदा, बीड, माजलगाव, अंबेजोगाई, केज, शिरूर, आष्टी या तालुक्यात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. बाजरीची शेती प्रामुख्याने पाटोदा, शिरूर, आष्टी, माजलगाव, केज या तालुक्यात केली जाते. भुईमुगाचे उत्पादन प्रामुख्याने आष्टी, अंबेजोगाई, केज येथे होते. कापूस उत्पादनात आष्टी, माजलगाव, बीड व गेवराई तालुके अग्रेसर आहेत.

आष्टी, केज, माजलगाव, बीड, गेवराई व वडवणी या तालुक्यात ऱब्बी ज्वारी होते. आष्टी, केज, माजलगाव, बीड, गेवराई या तालुक्यात गहू पिकतो. आष्टी, पाटोदा, बीड व केज येथे हरभऱ्याचे उत्पादन निघते. करडईची लागवड आष्टी, माजलगाव, गेवराई इत्यादी तालुक्यामध्ये केली जाते.

जिल्ह्यात बागायती शेतीसुद्धा थोड्या प्रमाणात होते. उसाची लागवड आष्टी, बीड, माजलगाव, गेवराई, अंबेजोगाई इत्यादी तालुक्यामध्ये केली जाते. बीड, अंबेजोगाई या तालुक्यांत द्राक्षाचे उत्पादन होते. गोदावरी व मांजरा या नदयाकाठी कलिंगडाचे उत्पन्‍न घेतले जाते. आंबे उत्पादनात आष्टी, बीड, अंबेजोगाई, नेकनूर आघाडीवर आहेत. नेकनूर येथे काला पहाड व अंबेजोगाई येथे पेवंदी हे आंबे प्रसिद्ध आहेत. याशिवाय पेरू, मोसंबी, केळी यांचेही उत्पन्‍न घेतले जाते. [७] या जिल्हय़ात २००८ झालेल्या पशुगणनेनुसार जवळपास साडेदहा लाख जनावरे आहेत. यात साडेसहा लाखांपर्यंत दुधाळ जनावरे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दूधउत्पादन हा शेतकर्‍यांचा मोठय़ा प्रमाणावर जोडधंदा मानला जातो. आठ सरकारी व चार खासगी दूध संघाच्या माध्यमातून दूधसंकलन केले जाते. 

पिके

  • एकूण पिकाखालील क्षेत्र : ६६२ हजार हेक्टर
  • एकूण ओलीतक्षेत्र : २३६ हजार हेक्टर
  • एकूण वनक्षेत्र : २६ हजार हेक्टर
  • एकूण पडीतक्षेत्र : १२३ हजार हेक्टर
  • एकूण दुसोटाक्षेत्र : हजार हेक्टर

जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतात. ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते. जिल्ह्यात ज्वारी हे महत्त्वाचे खरीप पीक आहे तर कापूस हे महत्त्वाचे खरीप नगदी पीक आहे. बाजरीगहूतूरमूगउडीद, तीळ,जवळ,मसुर,सोयाबीन,मिरचीऊसकांदा, तेलबीया व इतर भाजीपाला पिकांचा उत्पादनात अग्रेसर ही आहेत. खरीप ज्वारीच्या उत्पादनात जिल्हा अग्रेसर आहे. जिल्ह्यातील पाटोदा, बीड, माजलगाव, अंबेजोगाई, केज, शिरूर, आष्टी या तालुक्यात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. बाजरीची शेती प्रामुख्याने पाटोदा, शिरूर, आष्टी, माजलगाव, केज या तालुक्यात केली जाते. भुईमुगाचे उत्पादन आष्टी, अंबेजोगाई, केज प्रामुख्याने येथे होते. कापूस उत्पादनात आष्टी, माजलगाव, बीड व गेवराई तालुके अग्रेसर आहेत.

ऱबी ज्वारीचे उत्पादन आष्टी, केज, माजलगाव, बीड, गेवराई व वडवणी या तालुक्यात उत्पादन घेतले जाते. आष्टी, केज, माजलगाव, बीड, गेवराई या तालुक्यात गव्हाचे उत्पादन होते. आष्टी, पाटोदा, बीड व केज येथे हरभर्‍याचे उत्पादन निघते. करडईची लागवड आष्टी, माजलगाव, गेवराई इत्यादी तालुक्यामध्ये केली जाते.

जिल्ह्यात बागायती शेतीसुद्धा थोड्या प्रमाणात होते. ऊसची लागवड आष्टी, बीड, माजलगाव, गेवराई, अंबेजोगाई इत्यादी तालुक्यांमध्ये केली जाते. बीड, अंबेजोगाई या तालुक्यांत द्राक्षाचे उत्पादन होते. गोदावरी व मांजरा या नद्यांकाठी कलिंगडाचे उत्पन्‍न घेतले जाते. आष्टी, बीड, अंबेजोगाई, नेकनूर येथे आंब्याची खूप झाडे आहेत.. नेकनूर येथील काला पहाड व अंबेजोगाई ये्थील पेवंदी हे आंबे प्रसिद्ध आहेत. याशिवाय पेरु, मोसंबी, केळी यांचेही उत्पन्‍ना घेतले जाते. [९] या जिल्हय़ात २००८ झालेल्या पशुगणनेनुसार जवळपास साडेदहा लाख जनावरे आहेत. यात साडेसहा लाखांपर्यंत दुधाळ जनावरे आहेत. त्यामुळे जिल्हय़ात दूधउत्पादन हा शेतकर्‍यांचा मोठा जोडधंदा मानला जातो. आठ सरकारी व चार खासगी दूध संघाच्या माध्यमातून दूधसंकलन केले जाते. [१०]

बीड जिल्हा कृषिप्रधान असून ८०% लोक शेतीवर अवलंबून आहेत. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते वर्षातून दोन वेळा घेतले जाते. ‘ज्वारीचा जिल्हा’ म्हणूनच याची प्रसिद्धी आहे. खरीप हंगमात ज्वारी, बाजरी, मूग, तूर, भात, भुईमूग इ. मुख्य पिके घेतली जातात. रब्बी हंगामात जिल्ह्यात ज्वारी, गहू, हरभरा, यांचे प्रमाण जास्त असते. एकूण लागवडीखालील जमिनीपैकी ९५% जमीन कोरडवाहू आहे. १९७७-७८ साली जिल्ह्यात भात, गहू, ज्वारी, बाजरी या पिकांखाली ५,१३,५७० हे. व हरभरा, तूर, व इतर कडधान्यांखाली १,१७,९५२ हे. क्षेत्र होते. या पिकांबरोबरच जलसिंचनाची सोय असलेल्या भागांत ऊस, फळे व भाजीपाला केला जातो. १९७७-७८साली ७,७१९ हे, क्षेत्र उसाखाली व ७,७६५ हे. क्षेत्र फळे व भाजीपाला यांखाली होते. जिल्ह्यात ज्वारीच्या खालोखाल कापसाचे पीक महत्त्वाचे आहे, एकूण २९,५४५ हे. क्षेत्रात कापसाची लागावड करण्यात आली होती. तंबाखूही थोड्याफार प्रमाणात पिकवली जाते. १९७७-७८ साली जिल्ह्यात ज्वारी ३,०३,३००; बाजरी ५४,६००; गहू ३७,२००; तांदूळ १२,१००; बार्ली २००; मका ९,८००; मे.टन तर सर्व कडधान्यांचे ४०,९०० मे.टन उत्पादन घेण्यात आले. ऊस व कापूस यांचे अनुक्रमे ३५,१०० व १,५०० मे.टन उत्पादन घेण्यात आले. जिल्ह्यात विशेषत: डोंगराळ प्रदेशात, बाजरीचे पीक घेतले जाते. आष्टी, पाटोदा, बीड, केज, अंबेजोगाई, गेवराई हे तालुके बाजरीसाठी प्रसिद्ध आहेत. यांशिवाय बीड, केज, अंबेजोगाई तालुक्यांत भुईमूगही चांगला येतो.रब्बी हंगामात ज्वारी हे सर्वात महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यात सर्वत्र, विशेषत: गंगाथडीच्या भागात, हे पीक चांगले येते. ही ‘टाकळी ज्वारी’ या नावाने प्रसिद्ध आहे.

दळणवळण

बीड जिल्ह्यातील वाहतूक प्रामुख्याने रस्तेमार्गाने चालते. बीड शहर महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून साधारणपणे ४५० कि.मी. अंतरावर वसले आहे.

  • एकूण लोहमार्गाची लांबी : ४७.८६ कि.मी.
  • एकूण राष्ट्रीय महामार्गाची लांबी : २२४ कि.मी.
  • एकूण राज्य महामार्गाची लांबी : १००३ कि.मी.
  • एकूण जिल्ह्या मार्गाची लांबी : १६३८ कि.मी.
  • एकूण ग्रामीण मार्गाची लांबी : ४८१२ कि.मी.

लोहमार्ग

जिल्ह्यात परळी हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. अहमदनगरबीडपरळी रेल्वे मार्गाचे (२६१ कि.मी.) काम आगामी काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. [९] जिल्ह्यात लोहमार्ग अंबेजोगाई व परळीत आहे. येथे एक लोहमार्ग परभणी (गंगाखेड) तर एक लोहमार्ग लातूर (उदगीर) येथून येतो. घाटनांदूर हे रेल्वे स्थानक आहे.

रस्ते

राष्ट्रीय महामार्ग

  • कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ बीड जिल्ह्यातून जातो. या महामार्गावरून हा जिल्हा गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील शहरांशी जोडला गेला आहे.
  • सोलापूर-औरंगाबाद-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ बीड जिल्ह्यातून जातो. हा महामार्ग औरंगाबाद, धुळे, उस्मानाबाद आणि सोलापूर ह्या शहरांना जोडतो.

प्रमुख रस्ते

बीडपासून उत्तरेकडे जाणारा मार्ग गेवराईमार्गे जालना व शेवगावकडे जातो. बीडपासून पूर्वेकडे जाणारा मार्ग माजलगावमार्गे पाथरीकडे जातो. दक्षिणेकडे जाणारा मार्ग केजमार्गे कळंबकडे जातो तर दुसरा दक्षिणेकडे मांजरसुभामार्गे उस्मानाबाद व सोलापूरस जातो. बीडपासून पश्चिमेकडे जाणारा मार्ग आष्टीमार्गे अहमदनगरकडे जातो.

 

महत्त्वाचे उद्योग

बीड जिल्ह्यात साखर व उद्योग असे अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. जिल्ह्यात १२६ कारखाने आहेत. जिल्ह्यात ७ साखर कारखाने आहेत. जिल्ह्यात ६ सुतगिरण्या आहेत. महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्र परळी येथे आहे.

जिल्ह्यातील साखर कारखाने

  • परळी वैजनाथ सहकारी साखर कारखाना, परळी
  • कडा सहकारी साखर कारखाना, आष्टी
  • जय भवानी सहकारी साखर कारखाना, गेवराई
  • माजलगाव सहकारी साखर कारखाना, माजलगाव
  • गजानन सहकारी साखर कारखाना, बीड
  • विखे पाटील सहकारी साखर कारखाना, केज
  • अंबा सहकारी साखर कारखाना, अंबेजोगाई

शिक्षण

  • अभियांत्रिकी महाविद्यालये: (३)
    • सोमनाथ नागनाथअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालय संस्था, परळी जिल्हा बीड
    • आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालय संस्था, बीड
    • बसवेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालय संस्था, आंबेजोगाई जिल्हा बीड
  • वैद्यकीय महाविद्यालये: (२)
    • स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, आंबेजोगाई जिल्हा बीड
  • तंत्रनिकेतन:
    • शासकीय अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालय, बीड 
  • कृषी महाविद्यालय:
    • आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड 
    • छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी जिल्हा बीड
    • केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कृषी अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, जिल्हा बीड
    • आदित्य कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, जिल्हा बीड
    • आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, जिल्हा बीड
  • अध्यापक विद्यालये:
    • औद्योगिक प्रशिक्षण संस्था: १४
  • महाविद्यालये : ६५
  • माध्यमिक शाळा: ५५२
  • प्राथमिक शाळा: २०००
  • आदिवासी आश्रमशाळा: २

 

आरोग्य

  • जिल्हा सामान्य रुग्णालय: २
  • जिल्हा स्त्री रुग्णालय : १
  • जिल्हा क्षय रुग्णालय : १
  • खासगी रुग्णालये : १४
  • खासगी दवाखाने : २७
  • प्राथमिक आरोग्य केंद्रे : ५०
  • प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे : २७८
  • प्राथमिक आरोग्य पथके : २
  • ग्रामीण कुटुंब केंद्र :

पर्यटन

कपिलधार वीरशैव पंथाचे पुनर्जिवन करणारे महात्मा बसवेश्वर तसेच शिवयोगी मन्मथ स्वामी यांनी कपिलधार याठिकाणी अनेक वर्षे तपश्चर्या केली. नयनरम्य डोंगरदऱ्यांचा हा प्रदेश असून याच ठिकाणी संख्या शास्त्रकार कपिल महामुनींनी तपश्चर्या केली होती. म्हणून या भागास कपिलधार असे म्हणतात. येथील धबधबा मनमोहक आहे. कपिलधार हे तीर्थक्षेत्र बीड शहरापासून साधारण 20 कि.मी.अंतरावर आहे. कनकालेश्वर मंदीर
बीड शहराच्या पूर्वेस असलेलं कनकालेश्वर हे शिवशंकराचे मंदिर आहे. शिल्पकलेचा आणि वास्तूकलेचा हा एक सुंदर नमुना. या मंदिराचे बांधकाम यादवकालीन आहे. शिल्पाचे वैशिष्यं.य आणि पोत हे आजही या शिल्पावर स्पष्टपणे दिसतात. सर्व बाजूंनी पाणी आणि आत शिवालय आहे. ‘पाण्यात देऊळ’ पण मजबूत आणि भव्यदिव्य असून मंदिरातील आणि बाहेरचे कोरीव देवदेवतांचे विविध प्रकारचे शिल्प अगदी प्रेक्षणीय आणि डोळ्यांचं पारणं फेडणारे आहे. बीडचं ग्रामदैवत असल्यानं इथं दरवर्षी महाशिवरात्रीला फार मोठी यात्रा भरते. याच मंदिराच्या पूर्वेस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं खंडेश्वरी देवीच मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे शहराचं भूषणच. आदिशक्ती माहूरवासिनी रेणूकादेवी सूर्यसुरी या भक्ताच्या विनंतीवरुन ही देवी इथं आली, अशी आख्यायिका आहे. दरवर्षी नवरात्रात येथे फार मोठी यात्रा भरते.

खजाना विहीर बीड शहरापासून पाच कि.मी. अंतरावर खजाना बावडी ही विहीर आहे. ही विहीर हिजरी 991 मध्ये निजाम बादशहाच्या सलाबत खान नावाच्या सरदारानं बांधली. या विहिरीत सतत ठराविक पातळीवर पाच ते सहा फूट इतकंच पाणी असतं. या अद्भूत विहिरीद्वारे परिसरातील सुमारे 600 एकर जमिनीला पाणी दिलं जाते.

नायगाव मयूर अभयारण्य बीड शहरापासून 25 कि.मी. अंतरावर पश्चिमेला असलेल्या नायगाव या गावाच्या परिसरात हे अभयारण्य आहे. 1994 साली शासनाने या अभयारण्यास मान्यता दिली. त्यामुळं महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील पहिलं मयूर अभयारण्य म्हणून नायगावला महत्त्व प्राप्त झाले आहे. या मयूर अभयारण्यात 10 ते 12 हजारांच्या दरम्यान मोरांची संख्या आहे. त्याचबरोबर तरस, लांडगे, कोल्हे, सायाळ, खोकड, रानससे, रानमांजर, काळवीट, हरिण, मुंगूस इत्यादी प्राणी देखील आहेत. या अभयारण्यापासून साधारण 40 कि.मी. अंतरावर निसर्गरम्य असा सौताडा धबधबा आहे. समाधानकारक पाऊस झालेला असेल तर जुलै ते सप्टेंबर या कालावधीत मनमोहक धबधबा या ठिकाणी पहावयास मिळतो.

असा हा बीड जिल्हा ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रसिद्ध व पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. संत-महात्म्यांच्या परंपरेचा वारसा सांगणाऱ्या, धार्मिक, ऐतिहासिक व मनोहारी पर्यटनस्थळांना हौशी पर्यटकांनीच नव्हे तर प्रत्येकाने भेट देऊन या परंपरेचा अनुभव घ्यायलाच हवा.- अनिल आलुरकर जिल्हा माहिती अधिकारी, बीड.

राक्षसभुवन

राक्षसभुवन हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेले गाव आहे. येथील शनिमंदिर शनिदेवांच्या साडेतीन पीठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरातील शनिदेवांच्या मूर्तीची स्थापना रामायणकाळात प्रभू रामचंद्रांच्या हस्ते झाल्याचे सांगण्यात येते. या ठिकाणी […]

बीड जिल्ह्यातील माजलगाव

माजलगाव हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे शहर असून ते बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. या शहरापासून जवळच मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ या शहरातून जातो हे औद्योगिक शहर म्हणूनही प्रसिध्द आहे […]

ऐतिहासिक शहर बीड

बीड हे मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर आहे. या शहरातून बिंदुसरा नदी वाहते. या नदीच्या पूर्व काठावर असलेले कंकालेश्वर मंदिर प्रेक्षणीय असून, मुर्तूजाशाह निजामाच्या काळात बांधलेली खजाना बावडीही प्रसिध्द आहे. हे बहुभाषिक सहर असून येथे मराठीव्यतिरिक्त उर्दू, […]

बीड जिल्हा

            भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेलं परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात आहे. तसेच या परिसराशी जोडले गेलेले रामायणातील संदर्भ, अंबेजोगाई येथील श्री योगेश्र्वरी देवीचे स्थान यामुळे बीड जिल्हा संपूर्ण भारतात धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. […]

बीड जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतात. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख खरीप पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते.तर कापूस हे महत्त्वाचे खरीप नगदी पीक आहे.बाजरी,गहू,तूर,मूग, उडीद,तीळ,जवळ,मसुर,सोयाबीन,मिरची, ऊस, कांदा, तेलबीया व इतर भाजीपाला पिकांचा […]

बीड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

प्राचीन भारतातील प्रसिद्ध गणिततज्ज्ञ भास्कराचार्य हे बीडच्याच परिसरातील होते असे म्हटले जाते.त्याचप्रमाणे गोपिनाथ मुंडे यांचं जन्मगाव आणि मतदारसंघ म्हणून बीड जिल्हा हा देशात प्रसिद्ध आहे. Everything else changes click over there contextually depending upon the […]

बीड जिल्ह्यातील लोकजीवन

बीड जिल्ह्यातील बालाघाटच्या रांगांत लमाण या जमातीचे लोक आढळतात. मराठी व्यतिरीक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील जिल्ह्यात बोलल्या जातात. what are 3 tips that help right a essay

बीड जिल्ह्याची भौगोलिक माहिती

बीड जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी स्थित आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड हे आहे. महाराष्ट्रातील ऊसतोड़ […]

बीड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

१२ ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग परळी येथे आहे. ते जवळजवळ सातशे वर्ष जुने असून अहिल्याबाई होळकरांनी त्याचा इ.स. १७०६ मध्ये जिर्णोध्दार केला. बीड जिल्ह्यात अनेक प्रसिध्द मंदिरे आहेत.अंबेजोगाई हे श्री योगेश्र्वरी मातेच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे,आणि येथे […]

बीड जिल्ह्यातील दळणवळण सोयी

जालना, अहमदनगर, उस्मानाबाद, परभणी हे बीडच्या भोवतालचे सर्व जिल्हे राज्य महामार्गाद्वारे बीडशी जोडले गेले आहेत. जिल्ह्यातील एकमेव लोहमार्ग (मीटरगेज) परभणी- परळी-वैजनाथ असून तो १९२९ मध्ये वाहतुकीस खुला करण्यात आला होता.

कंकालेश्‍वर मंदिर, बीड

बीड येथील कंकालेश्वर मंदिर

कंकालेश्वर मंदिर हे भारतात महाराष्ट्र राज्यातील बीड येथे असून ते एका ८४ मीटर चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आलेले शिव मंदिर आहे एक मोठ्या आकाराचा कट्टा आहे. या कट्ट्यावर १.५२ मीटर उंचीच्या जगतीवर बिंदुसरा नदीच्या तीरावर हे मंदिर उभे आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मंदिर परीसर प्रदूषित होत आहे या कडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे

मंदिराची रचना

कंकालेश्वर मंदिर हे पश्चिमाभिमुख असून मुखपंडप, त्याच्यामागे अर्धमंडप आणि या मंडपाला जोडून तीन बाजूंना अंतराळयुक्त गर्भगृहे असा तलविन्यास या मंदिराचा आहे. ही तीनही गर्भगृहे सारख्याच आकाराची असून त्यांचा तलविन्यास तारकाकृती आहे. या मंदिराचा मंडप अष्टकोनी आकाराचा आहे. मंडपाच्या चार मुख्य दिशांना आणि चार उपदिशांना दोन स्तंभ किंवा एक स्तंभजोडी आहे. या सोळा स्तंभांवर घुमटाकार छत पेललेले आहे. हे छत उत्तरोत्तर लहान होत गेलेल्या वर्तुळाकृती वलयांनी बनलेले आहे. छतावर फुलांची नक्षी आणि अलंकरण आहे. छताच्या मध्यभागी सर्वात वर कमळ आहे.

मंडप आणि गर्भगृहामधील स्तंभांची रचना चौरस तलविन्यासाची असून चौरस तळखड्याच्या वर काही अंतरावर अनुक्रमे अष्टकोनी, चौरस आणि वर्तुळाकार बनणारा चौरस खांब आणि खांबाच्या वर्तुळाकृती भागावर किचकहस्त असा या स्तंभांचा घटकक्रम आहे.

मंदिराच्या बाहेरील भागात विविध थर असून सगळ्यात खालचा थर चौकटच्या नक्षीने तर सगळ्यात वरचा थर कीर्तिमुखांनी अलंकृत केलेला आहे. मंदिराच्या बाहेरील अंगाच्या भद्रावरील देवकोष्ठांमध्ये शक्ती, ब्रह्मदेव आणि शिव संप्रदायातील देवदेवता आहेत. वर मंडोवरावरील जंघाभागात विष्णुचे दहा अवतार आणि अष्टदिक्पाल दाखविले आहेत.

कंकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहांची द्वारे पंचशाखा प्रकारची असून त्यावर कमळदल, पुष्प आणि व्याल यांचे अलंकरण आहे. या द्वरशाखांच्या खालच्या भागात कुंभ आणि चौरी धारण करणार्या दासी आणि निधी दाखविले आहेत. मुख्य गर्भगृहाच्या ललाटावर गणेशमूर्ती आहे.

मंदिराविषयी

दहाव्या ते 11 व्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य (सहावा) याने हे मंदिर बांधले. हे दशावतारी मंदिर आहे. चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत प्रत्यक्ष भाग घेत असत. मंदिरावर लढणार्‍या स्त्रियांचे शिल्प आहे. त्यावर ग्रीक शिल्पकलेची छाप आढळते. जैन धर्मियातील आर्यनाथ, नेमिनाथ या दोन तीर्थंकरांचे शिल्पही मंदिरावर आहे. मंदिराचा आकार स्टार फिशप्रमाणे असून मंदिराच्या मंडपाखाली आणखी एक गर्भगृह आहे. ते पाचशे वर्षांपासून बंद आहे. कंकालेश्वर मंदिर अनेक वष्रे बंद होते. तिथे खनकाह होते. पुढे महाशिवरात्रीच्या जत्रेलाही बंदी घालण्याचा निर्णय निझामाच्या मंत्रिमंडळाने घेतला. निझामाने सरकारी हुकूम काढून शामबुवा पाठक या पुजार्‍यास मंदिरात पूजेसाठी नियुक्त केले. ही कोंडी फुटायला 1915 उगवावे लागले. क्रांतिकारी तरुण पुरुषोत्तम गोडसे याने निझामाला भीक न घालता पोलिसांचे कडे तोडून कंकालेश्वर मंदिरातील पिंडीला अभिषेक केला. 17 सप्टेंबर 1948 अर्थात हैदराबाद स्वातंत्र्यदिनी दिवशी हे मंदिर खर्‍या अर्थाने मुक्त झाले.[१] या पुरातन मंदिराचा उल्लेख पुरण ग्रंथात ही आहे .अत्री ऋषी व अनुसया यांनी या ठिकाणी शिधेश्वराचा अभिषेक केला. ब्रम्ह-विष्णू -महेशाला प्रसन्न करून घेतल्याची दंतकथा सांगितली जाते .

कपिलधार

श्रीक्षेत्र कपिलधार हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील एक निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे. गर्द वनश्रीच्या सान्निध्यात येथे मन्मथ स्वामी या लिंगायत सत्पुरुषाची टुमदार समाधी आहे. तुलसीविवाहाच्या वेळी येथे पाच दिवस यात्रा भरते. बीड शहराच्या दक्षिणेस १९ किमीवर मांजरसुंभा, व तेथून दीड किलोमीटरवर छोट्या टेकड्यांच्या दरीत दहा मीटर उंचीवरून पडणार्‍या जलप्रपाताच्या पायथ्याशी हे स्थान आहे. येथे मन्मथ स्वामींचे मंदिर आहे. लिंगायतपंथीयांचे ते एक श्रद्धास्थान आहे. जवळच कपिलधार नावाचा धबधबा आहे. मांजरसुभा हे गाव बीड तालुक्यात आहे. बीड, अहमदनगर उस्मानाबाद व अंबेजोगाईस जाणारे रस्ते या ठिकाणी एकत्र येतात.

कानिफनाथ गड खडकवाडी हे २५०० लोकसंख्येचे गाव बीड जिल्ह्यतील पाटोदा तालुक्यात, बीडपासून २३ किमीवर, बीड -नगर हायवेला डोमरी नदीच्या काठी वसलेले आहे. या गावात नाथ पंथातील कानिफनाथाचे आकर्षक आणि विलोभनीय मंदिर आहे.

केदारेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन शिवमंदिर आहे. याचे स्थापत्य चालुक्य शैलीत केले आहे. मराठवाडा परिसर प्राचीन शिल्प स्थापत्य अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत. सातवाहनांपासून यादव काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या.
मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले.प्रतिष्ठाननगरी ही त्यांची राजधानी होती. वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष वाकाटकांनी राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे वर्ष म्हणजे इ.स. ५५० ते ७५० अशी टिकली. ह्युएन-त्सांग याच काळात मराठवाड्यात आला होता. त्यानंतर इथे राष्ट्रकुटांची सत्ता निर्माण झाली. राष्ट्रकुटांच्या प्रभावी राजवटीनंतर इथे आले कल्याणीचे चालुक्य कल्याणी. हे सरधारणत: १० वे ११ वे शतक नंतर इथे अल्पकाळ सत्ता टिकली ती कलचुरींची.
सर्व राजवंशात सातवाहनांपासून ते यादवांपर्यंत मराठवाड्यात धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक असंख्य घडामोडी घडल्या. प्राचीन कलावैभवाची साक्ष देणारी अनेक देवालये व गुहाशिल्पे निर्माण झाली. या सर्व देवालयात धर्मापुरीचे केदारेश्वर देवालय वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे.काळाच्या ओघात मूळ मंदिराचा जवळजवळ निम्माच भाग आज कसाबसा तग धरुन उभा आहे.
चालुक्य राजवटीतील विक्रमादित्य सहावा याचा पुत्र सोमेश्वर तृतीय याने धर्मापुरी नगरी निर्माण केली. या राजाला साहित्याची आवड होती. त्याने ‘अभिलषितार्थ चिंतामणी’ (राजमानसोल्लास) या ग्रंथाची निर्मिती केली होती. या धर्मापुरीत सर्व सोयी होत्या. भव्य राजप्रासाद,नृत्यशाळा,तलाव,मनोहारी उद्याने,सुंदर वनराइ,उत्तुंग देवालये आणि भव्य बाजारपेठ यांनी ही नगरी सजलेली व गजबजलेली होती.

धर्मापुरीतील शिलालेख

धर्मापुरीत आजपावेतो तीन कानडी आणि एक नागरी शिलालेख उपलब्ध आहे. नागरी शिलालेखाचे वाचन पुरातत्व खात्याच्या वतीने डॉ.वि.भी. कोलते यांनी केले.हा शिलालेख संस्कृत भाषेत कोरलेला असून लेखनाचा काळ ‘शके संवत १०५६ आनंदसंवत्सांतर्गत आषाढ वदी १५ सोमे’ हा दिलेला आहे. इसवीसनाप्रमाणे त्यादिवशी तारीख होती २३ जुलै ११३४ वार सोमवार.[१] या शिलालेखात श्रीपती नामक इसमाने धर्मापुरीत मुरारीचा मठ बांधल्याचा उल्लेख येतो.
प्रशासनाच्या सोयीसाठी त्यावेळी राज्याचे विभाग आणि उपविभाग पाडले जात होते. विभागलेल्या भागांचा बेळगोळ ३००, बनवासी १२०००अशाप्रकारे गावाच्या किंवा प्रदेशाच्या समोर आकडे देऊन उल्लेख करणे ही पद्धत होती. हे आकडे त्या त्या विभागातील खेड्यांची संख्या सुचवत असल्याचे आता सिद्ध झाले आहे. धर्मापुरीतीलच दुसऱ्या शिलालेखात लोक्कीगुंडी ५०० असा उल्लेख येतो. हे लोक्कीगुंडी म्हणजे आजचे लोखंडे होय.[२] याच शिलालेखात धर्मापुरीत काळेश्वर देवालय व बंकीसेट्टी बस्ती असल्याच्या नोदी आढळतात.

मंदिर

हे मंदीर गावापासून सुमारे १ कि.मी. अंतरावर असून ही पूर्ण वास्तू ५७×४८ फूट लांबी रुंदीची असून महीमंडप अत्यंत विस्तीर्ण आणि भव्य आहे. या मंडपातील १६ खांब अत्यंत कल्पकतेने उभारलेले आहेत. महामंडपातील ९×९×६ च्या चौथर्यावरील एक रंगशिळा मन वेधून घेते. त्याच्या चारही कोपर्यांवर चार प्रचंड शिल्पांकीत खांब आहेत. रंगशिळेच्या छतावरही कीर्तीमुख,सप्तमातृका,वराह इत्यादिंची मोहक शिल्पकारीता आहे. रंगशिळेवरील छताच्या मध्यभागी पूर्ण विकसित कमळ आहे. या छताचा इंचन इंच भाग भौमितिक आकृत्या व लतापल्लवींच्या गुंफणीने शिल्पित केलेला आहे. 
मुखमंडप,महामंडप,अंतराळ व गर्भगृह हे या देवालयाचे प्रमुख भाग आहेत. देवालयाच्या अर्धभिंतीवर गजथर व नरथराची रचना आढळते. गर्भगृहाच्या द्वारपट्टीकेवर पाच शिल्पपट्टीका वेगवेगळ्या भौमितिक आकारांनी शिल्पित केलेल्या आहेत. उंबरठ्यावर विशाल किर्तीमुख आहे. गर्भगृह १०×१० चे असून विशिष्ट पद्धतीच्या भौमितीक आकृतीच्या आधारे गर्भगृहाचे सपाट छत उभारलेले आहे.

मंदिरावरील शिल्पे

पत्रलेखिका,धर्मापुरी

देवादिकांची शिल्पे

केदारेश्वर देवालयाचे खरे कलावैभव बाह्यभिंतीवरील शिल्पकारीतेत दिसते. या बाह्यभिंती तारकाकृती आकार देऊन मोठ्या आकर्षक बनवलेल्या आहेत. या बाह्भिंतीचे जोते खूपच उंच आहे. या जोत्यावर नरथराचीही रचना शिल्पकाराने केली आहे. या भिंतीच्या कटीप्रदेशावर असंख्य मूर्ती कमालीच्या तालबध्दतेने कोरलेल्या आहेत. एक समर्थ कलाविष्कार या ठिकाणी जाणवतो. प्रत्येक शिल्पात जिवंतपणा,गतिमानता आहे. नृसिंह व वामन अवताराच्या शिल्पांच्या रुपाने अवतार शिल्पांचा मोहक अविष्कार याठिकाणी झालेला आहे. वामन अवताराचे शिल्प असलेली प्रचंड शिळा या देवालयाच्या भिंतीमधून कोसळून बाजूला जमिनीवरच दुर्लक्षित व दुरावस्थेत शांतपणे पडलेली दिसते. देवालयाच्या उत्तरेकडिल देवकोष्टात केशव,पश्चिमेकडिल देवकोष्टात वासुदेव व दक्षिणेकडिल देवकोष्टात नृसिंह यांच्या प्रतिमा आहेत. शिवाय देवळाच्या मंडोवरावरील शिल्पावळीत भगवान विष्णुच्या केशवादी २४ मूर्तीप्रकारातील सुरेख प्रतिमा आढळतात. वामन अवताराच्या शिल्पातील वामन द्विभूजी असून त्याचा उजवा हात मनगटापासून पूढे भग्न झालाय. वामनाच्या डोक्यावर अधोमुष्क आहे. समोरचा स्थानक बळीराजा हातातील कलशातून वामनाला जलदान करीत आहे. शेजारी उभे असलेले दाढीधारी शुक्र बळीराजाला मार्गदर्शन करीत आहेत. संहार श्रीगणेशाची एक मूर्ती या केदारेश्वराच्या मंदिरावर सुस्थितीत आहे. दुर्दैवाने त्याचे सर्व हात आयुधांसह भग्न झाले आहेत. गणपती सूर्यकर्णी असून त्याची सोंडही अर्धवट तुटलेली आहे. याशिवाय मंदिरावर लक्ष्मी-विष्णुची आलिंगन अवस्थेतील मूर्ती,संहाररुपातील विष्णु,ब्रम्हदेव,चामुंडा व भैरवाच्या मूर्तीही आहेत.[३]

सौंदर्यशिल्पे

           महाराष्ट्राच्या शिल्पवैभवात भर टाकणाऱ्या अनेकविध सौंदर्यशिल्पांचा अविष्कार याठिकाणी झालेला आहे. येथील एका पत्रलेखिकेचे शिल्प विलक्षण सुंदर आहे. हे चिरतारुण्ययाने मुसमुसलेले मोहक सौंदर्य पाठमोरे उभे आहे. या शिल्परचनेची कल्पना मोठी काव्यमय आहे. एक सौंदर्यसंपन्न अप्सरा पाठमोरी उभी राहून शिलालेख लिहीत आहे. अशा या मोहक शिल्परचनेच्या चार ओळी पूर्ण झाल्या असून पाचव्या ओळीवर हात थबकला आहे. हा क्षण येथील शिल्पीने आपल्या कलासामर्थ्याने गोठवून ठेवला आहे.[४] एका शिल्पात मुलायम देहकांतीची अप्सरा आपल्या देहावरील विस्कळीत झालेले पातळ वस्त्र व्यवस्थित करण्यात मग्न दिसते. स्वतःच्या मोहक कृश कटीवरुन खाली घसरत असलेले स्वतःचे वस्त्र दोन्ही हाताने स्वतःच्या पिळदार मांड्यांमध्ये पकडण्याचा ती प्रयत्न करीत आहे. तर एक मर्कट तिचे ते वस्त्र ओढण्याचा वात्रटपणा करीत असल्याचे शिल्पकाराने विलक्षण गतिमानतेने शिल्पित केले आहे. अन्य एका शिल्पातील सौंदर्यवतीच्या एका हातात आम्रडहाळी आहे, तर दुसऱ्या हातावरील एका खट्याळ पोपटाने आपली चोच त्या फळाऐवजी या सौंदर्यवतीच्या उरोजावरच मारलेली आहे. याठिकाणी दर्पणात आपला चेहरा न्याहाळीत कुंकुमतिलक लावणारी लावण्यवती आहे. एका सौंदर्यवतीच्या कमरेस नागाने विळखा घातलेला आहे आणि सौंदर्याचे केंद्रस्थान असलेल्या नाभीजवळ विंचू दाखवलेला आहे.[५]

श्रीक्षेत्र गहिनीनाथगड हे महाराष्ट्र राज्यातल्या बीड जिल्ह्यातील हिंदू वंजारी समाजाचे एक तीर्थक्षेत्र आहे.

चिंचवण (महिकावती नगर), बीड

                हनुमंत पूत्र मक्रध्वज भारतात केवळ दोनच मंदिरे आहेत. एक काशित तर दुसरे चिंचवण महिकावतीनगरी येथील आहे. या चिंचवण गावचे पहिले नाव महिकावती नगर असे होते.येथे मंकावती देवीचे मंदिर शुद्धा येथे पहावयास मिळते. या मक्रध्वजा बद्दल सर्व ग्रंथामध्ये ओवी बद्ध ओव्या उपलब्ध आहेत. विशेष करून राम विजय ग्रंथामध्ये अध्याय २१ वा व अध्याय ३१,३२,३३ या अध्यायामध्ये विशेष मक्रध्वजा बद्दल उल्लेख आहे. त्यांचे वर्णन महर्षी वाल्मीकऋषींनी कृतयुगात रामयनात केलेला आहे. म्हणुनच वै. गुरूवर्य भगवानबाबा यांनी मक्रध्वज जन्म सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह ई.स.१९५२ पासुन सध्या हा सप्ताह चालु असून चिंचवण आणि परिसरातील भावीक भक्त या जन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने भक्तीमय वातावरणाध्ये तलीन झालेले आहेत. या गावामध्ये सर्वजाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा सोहळा साजरा करतात. गावामध्ये आठरापगड जातीचे लोक आहेत. गावाची लोकसंख्या ५००० ते ५५०० हजार आहे. तसेच मक्रध्वजाचे मंदिर हे केवळ एकमेव मंदिर महाराष्ट्रामध्ये चिंचवण येथे आहे. परंतु विकासामध्ये हे मंदिर खुप मागे राहिलेले आहे. ज्या जन्म सोहळा निमित्ताने अनेक भावीक भक्त आपल्या मनोकामना पुर्ण व्हाव्यात म्हणुन या मक्रध्वजास नवस करत व त्या पुर्णही होतात अशी श्रद्धा येथील भावीक भक्तांची आहे. येथे भजन,पुजन, कार्यक्रम सतत चालतात. या सर्व निमित्तानेच येथे शेवटी पौष शुद्धा पोर्णीमेला सकाळी सुर्यउदया बरोबर हा सोहळा साजरा करून शेवटी महाप्रसादाचा लाभ सर्व भावीक भक्तांना दिला जातो. सतत सात दिवस गावातल लोक या निमित्ताने अन्नदान करतात.

                           जालिंदरनाथ देवस्थान नवनाथ ग्रंथांमध्ये र्शी कानिफनाथांचे गुरू जालिंदरनाथ असल्याचा उल्लेख आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रायमोह गावापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर येवलवाडी येथे जालिंदरनाथांचे पुरातन मंदिर आहे. तीन वेशींपैकी मुख्य वेशीतून 50 पायऱ्या चढून गेल्यानंतर मुख्य मंदिरास तीन प्रवेशद्वार आहेत. प्रवेशद्वारावर पशु-पक्षी, गणपतीचे शिल्प साऱ्यांचे लक्ष वेधून घेते. मंदिर गाभाऱ्यातील दगडी खांबावर नऊ कमानी आहेत. परिसरात विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर, हनुमान मंदिर आहे. या शेजारीच अग्निकुंड आहे. माघ पौर्णिमा, गुढीपाडवा, हरिनाम सप्ताह, महाशिवरात्री, रंगपंचमी, ऋषिपंचमी आदी सण-उत्सवांना मंदिरात भाविकांची गर्दी असते. औरंगाबाद येथून बीडमार्गे रायमोह 165 किलोमीटरवर, तर पुण्यावरून येणाऱ्या पर्यटकांसाठी पाथर्डीमार्गे रायमोह 220 किलोमीटर अंतरावर आहे.

                          धर्मापुरी हे महाराष्ट्र राज्यातील गाव आहे. ते बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात आहे. हे ठिकाण अंबेजोगाई – अहमदपूर मार्गावरील मोठे गाव आहे. परळी, अंबाजोगाई, अहमदपूर, गंगाखेड आणि पानगाव शहरांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. इथे एक प्राचीन किल्ला असून एक तळे आहे. गावापासून जवळच मरळशीद मंदिर आहे. गावामधेच एक जुने राम मंदिर आहे. येथे बस स्थानक असून सर्वच बस इथे थांबतात. जवळील रेल्वे स्थानक परळी आहे.

भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांसाठी प्रसिद्ध असलेले नायगाव अभयारण्य बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात आहे.

  • नारायणगड (बीड जिल्हा)
  • नारायणगड हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ता. पाटोदा, पौंडुळ गावाजवळ असलेले विठ्ठलमंदिर आहे. याचे स्थापत्य नारायणबाबा यांनी केले आहे. भाविकांमध्ये हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे.
  • अवडंबरच्या घराण्यात नारायण नामक मुलाचा जन्म झाला. नारायणाने गावाजवळील डोंगरमाथ्यावर जागा स्वच्छ करून हरिनामात दंग झाले. हे सन्त एकनाथ महाराजान्च्या शिष्य परम्परेतील महान असे सत्पुरुष होते. नंतर त्यांना नगद नारायणबाबा हे नाव पडले. त्यांची ख्याती सर्वदूर पसरली. त्या ठिकाणी छोटेसे देऊळ बांधले. विठ्ठलाची मूर्ती स्थापन केली. याठिकाणी श्रीक्षेत्र नारायणगड उभा राहिला.
  • पुरूषोत्तम मंदिर, पुरूषोत्तमपुरी

                माजलगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथील गोदावरीच्या पात्रात उध्वस्त मंदिराचे पुरातन अवशेष सापडले. माजलगांव पासून २२ कि.मी.अंतरावर असणा-यागोदावरीच्या काठावर असलेल्या पुरुषोत्तमपुरीला पुरुषोत्तमाचे भारतातील एकमेव मंदिर आहे. भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर गोदावरी नदीच्या पोटावर वसलेलं आहे. तीव्र दुष्काळामुळे गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. कोरड्या पडलेल्या या पात्रात काही पूरातन अवशेष सापडले. त्यात स्तंभशीर्ष, स्तंभस्थळ, जांघा भागेवरील कोरीव दगडे व मंदिराच्या तळाशी विविध घडीव शिळांच्या समावेश आहे याच अवशेषात एक सतीची शिळा असून, ती साडेतीन फूट उंच व दोन फूट रुंद आहे. या शिळेवर एक हात दंडापासून कोरला असून तो आशिवंचनावस्थेत आहे. याच शिळेवर एकूण तीन शिल्पे कोरलेली आहेत. माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी मंदिराचे स्थापत्य कलेतील वेगळेपण असे की मंदिराच्या बांधकामात वापरलेल्या विटा चक्क पाण्यावर तरंगतात. हे मंदिर इसवी सन १३१0 मध्ये रामचंद्र देव यादवांचा मंत्री पुरुषोत्तम याने उभारले. यामुळेच या गावाला पुरुषोत्तमपुरी हे नाव पडले. मंदिरातील मुख्य देवतेलाही याच नावाने ओळखले जाते. इतिहासाच्या दृष्टीने पुरुषोत्तमपुरीस मोठे महत्त्व असून रामचंद्र देव यादवांचा शेवटचा ज्ञात ताम्रपट इथेच सापडला आहे. आजपर्यंत उपलब्ध सर्व ताम्रपटात हा ताम्रपट वजनाने व आकारानेही मोठा मानला जातो. यात रामचंद्र देव यादवाने मंदिर उभारणीसाठी व मंदिराच्या देखरेखीसाठी पंचक्रोशीतील वृंदाना आजूबाजूची गावे दान दिल्याचा उल्लेख आहे. पुरुषोत्तमपुरी महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनात र्शावण महिन्यात माजलगाव तालुक्यातील पुरूषोत्तमपुरीत पुरूषोत्तमाच्या दर्शनास जातात. अधिक मासात या ठिकाणाला अनन्य साधारण महत्व आहे. गोदाकाठी राक्षसभूवन, पुरूषोत्तमपुरी, मंजरथ, गंगामसला येथे प्राचीन मंदिरे आहेत. त्यात पुरूषोत्तमपुरीचे मंदीर उल्लेखनीय ठरते. गोदावरीच्या पात्रात पूर्व पश्चिम प्रवाहात जवळपास हजार फूट अंतरापर्यंत हे अवयव अस्ताव्यस्त पसरले आहेत. यात स्तंभशीर्ष, स्तंभतळ, मंदिरावरील कोरीव दगडे व मंदिराच्या तळाच्या विविध भागातील घडीव शिळांचा समावेश आहे. या अवशेषात एक सतीची शिळा सापडली असून ती साडेतीन फूट उंच व दीड फूट रंद आहे. या शिळेवर एक हात दंडापासून कोरला असून तो घोट्यापासून 90 अंशात सरळ वर आशिर्वचनावस्थेत आहे. हाताखालची धावत्या घोड्यावर स्वार व्यक्तिचे शिल्प असून घोड्याचा लगाम धरलेली व्यक्ति पुढे धावते आहे. या शिल्पाखाली पुन्हा तिसरे शिल्प असून त्यात स्त्री पुरुषास निद्रावस्थेत दाखविण्यासाठी आडवे कोरले आहे. विशेष म्हणजे नदीपात्रात एका प्राचीन घाट उघडा सापडला असून हा घाट यादवांच्याही अगोदरच्या काळातील असावा.अंदाज जिल्ह्यातील इतिहास संशोधक डॉ. सतीश साळूंके यांनी पुरूषोत्तमपुरी येथे भेट देऊन पाहणी केल्यानंतर केला.

                 बिंदुसरा गोदावरीची एक उपनदी आहे. बीड जिल्ह्यातील ही नदी सिंदफणी नदीला मिळते जी पुढे सिंदफणी गोदावरीला मिळते.

                                  श्रीक्षेत्र “भगवानगड” (अक्षांश १९°१२’उत्तर, रेखांश ७५°२४’ पूर्व) हे महाराष्ट्र राज्यातील बीडअहमदनगर जिल्ह्यांतील सीमेवर असलेल्या, खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या निसर्गरम्य देवस्थानलगतच राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापटणम हा जातो. महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड हे ओळखले जाते. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे मंदिर आहे. तसेच जनार्दनस्वामीभगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या समाध्या येथे आहेत. सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून श्री क्षेत्र भगवानगडाकडे बघितले जाते.हा गड वंजारी संत भगवानबाबा यांनी बांधला आहे. भगवानबाबा हे थोर वारकरी संप्रदायाचे संत होते. भगवानबाबांच्या निधनानंतर राजपूत समाजाचे संत भीमसिंह महाराज गादीवर बसविले. आता वंजारी समाजाचे महंत श्री डाॅ नामदेव महाराज शास्त्री गादीवर बसविले आहेत. हे भगवागडचे वैशिष्ट्य आहे की येथे योग्यता असेल तर जातपात पाहिली जात नाही. 

इतिहास

                                  धौम्य ऋषीच्या मंदिर सदगुरू जनार्दनस्वामी समाधी  या ठिकाणाच्या प्राचीन इतिहासाविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की येथे सप्तर्षींनी तपश्चर्या केली होती. पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे या भागात वास्तव्य असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. धौम्य ऋषींच्या पादुका असलेले हे ठिकाण ‘धौम्यगड’ किंवा ‘धुम्यागड’ म्हणून ओळखले जात होते. येथील धौम्यऋषीच्या मंदिराचे अस्तित्व काही हजार वर्षांपूर्वीपासून असल्याची नोंद आहे. या प्राचीन मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. याचबरोबर रंग ऋषीभारद्वाज ऋषीशृंगी ऋषी, पराशर ऋषीचे यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण. हे ठिकाण सदगुरू जनार्दनस्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. यानंतर दुर्दैवाने अनेक वर्षे धौम्यगड दुर्लक्षित असल्याने जुने अवशेष तसे फार कमी आहेत. या जवळच काशी केदारेश्वराचे मंदिर, हरिहरेश्वराचे भव्य मंदिरे आहे.

                          काशी केदारेश्वराचे मंदिर नागलवाडी परिसरात आहे. हे ठिकाण राम लक्ष्मण आणि सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. येथे सीतेचा संसार असल्याचे सांगितले जाते. येथे अनेक मोठे जाते, रांजण आहे. सीतेला तहान लागली म्हणून रामाने येथे रामबाण चालवले असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. येथे मुख्य उत्सव श्रावण सोमवारला सुरु होतो.

धौम्यगडाचा जीर्णोद्धार

                              यानंतर ह्या धौम्यगडाचे ऐतिहासिक महत्त्व जाणून श्री संत शिरोमणी ह.भ.प. भगवानबाबा येथे वास्तव्यास आले आणि भक्तांच्या प्रेमाग्रहाखातर तेथेच विसावले. येथे भगवानबाबांनी धौम्य ऋषीच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांच्या अथक धाडसीवृत्ती आणि लोकसहभाग यातून भक्तीचा गड उभारणीचे काम सुरू झाले आणि गडाचे भाग्य उजळले. भागवत धर्मच्या भगवा फडकला. बाबा स्वत: वास्तुशास्त्रात निपुण होते. विशेष म्हणजे गडाचे संपूर्ण बांधणी पाषाणात असून लाकडाचा वापर न करता केलेले आहे. ओवऱ्यासाठी नवगण राजुरी येथील राजूबाईच्या डोंगरावर हजारो वर्षापासून पडलेल्या पाषाणखांडे आणले होते. सर्व पाषाणखांडे बैलगाडीने आणले गेले आणि त्यांनी चौकोनी चीर्यांचे रूप दिले गेले. त्यामुळे बांधकाम भक्कम झालेले आहे. स्वतः भगवानबाबा आजूबाजूच्या परिसरात फिरून गडाच्या बांधकामासाठी आवाहन करत होते. भगवानबाबाला तन-मन-धनाने काम करणारे भक्तगण भेटले. त्यांना तसा प्रतिसादही मिळत होता. गड उभारणीच्या कामाला आजूबाजूच्या परिसरातील भक्तगणांनी भरभरून मदत केली. स्त्रियांनी स्वत:चे दागदागिने, अलंकार, आभूषणे दिली आणि बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. प्रत्येक भक्तगण या कार्याला हातभार लावत होते. भक्तगणांनी घरून स्वत:च्या भाकरी-भाजी आणून, रात्रंदिवस गडाचे बांधकाम पार पाडले. पाहता पाहता भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड ही अत्यंत विस्तीर्ण प्रचंड भव्य वास्तू नावारूपास आली. उत्कृष्ट वास्तुशिल्पकलेचा हा एक अलौकिक आविष्कार आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच धौम्यगडाचा जीर्णोद्धाराची खर्‍या अर्थाने मुहूर्तमेढ ही रोवली गेली व भक्तीचा गडाची स्थापना झाली. त्यानंतर खर्‍या अर्थाने धौम्यगडाचा कायापालट झाल्याचे पहावयास मिळाले. त्यांनी रस्त्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकत रस्ता विकास करण्यावर भर दिला. भक्तांना एकत्र करून श्रमदानाने भगवानगड ते पायथ्याच्या खरवंडी गाव रस्ता करण्याचे काम पूर्ण झाले. पुढे इ.स. १९५८ मध्ये स्वामी सहजानंद सरस्वतीह.भ.प. मामासाहेब दांडेकर आणि बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची देवळात प्रतिष्ठापना केली. गडाचे उद्‌घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी झाले. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बोलताना म्हणाले की, ‘‘धर्मरक्षणासाठी भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचे काम केले आहे. आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा.’’ तेव्हापासून धौम्यगडाचे नाव भगवानगड असे पडले. याचवेळेस बाबांच्या संकल्पनेतून भगवान विद्यालयाने आकार घेतला. शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गडावर भगवान विद्यालयाची कोनशिला बसविली आहे. वाड्या, पाड्या, तांड्यांवरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत.

मंदिराची रचना

श्रीक्षेत्र भगवानगड

                                   श्रीक्षेत्र भगवानगड येथील मंदिर चार मुख्य मंदिरांचा समूह आहे. यांतील विठ्ठलाचे मुख्य मंदिर मध्यावर असून सभोवतीची असणारी मंदिरे धौम्य ऋषी आणि महारुद्र हनुमान यांची आहेत. विठ्ठल व भगवानबाबा यांच्या मंदिरांची उंच शिखरे व त्यांवरील कळस हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. विठ्ठलाचे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. आत दगडी कासव आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या द्वारातून आत गेल्यानंतर मंदिरासमोर भव्य उंच सभामंडप लागतो. या सभामंडपात प्रत्येक कोपऱ्यात पूर्ण अखंड स्तंभ आहेत. या मंडपातील शिल्पांकित स्तंभ अत्यंत कल्पकतेने उभारलेले आहेत. या स्तंभावर मजबूत घुमटाकार छत आहे. सभामंडप ते गाभाराप्रवेश दरम्यान दोन्ही बाजूंना ओटे आहेत. मंदिरात सभामंडपजवळच गाभाराप्रवेश आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी गणपतीची मूर्ती आहे. सभामंडपात सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पाषाण घडवून एकावर एक बसवून मंदिराच्या भिंती उभारल्यामुळे कोरीव काम स्पष्ट व टिकून राहिले आहे. या जवळच धौम्य ऋषीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये पाचही पांडव, पांडवांची पत्नी द्रौपदी व धौम्य ऋषी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिरातील प्रत्येक मूर्ती अतिशय देखणी सुंदर कोरीव काम असलेल्या असून त्या प्राचीन कलावैभवाची साक्ष देणारा एक अद्वितीय नमुना म्हणावा अशीच आहेत. या मूर्ती पांढरे शुभ्र संगमरवरी वस्त्र नेसलेल्या आहेत. धौम्य ऋषींच्या मंदिराच्या बाजूला जनार्दनस्वामी यांची एक छोटेशी समाधी भग्नावस्थेत अजूनही उभी आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजासमोरच एका बाजूला महारुद्र हनुमानाचे पुरातन मंदिर आहे.

येथे ह.भ.प. ऎश्वर्यसंपन्न, परमविठ्ठलभक्त श्री संत भगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या संगमरवरी पाषाणबांधणीच्या समाध्या आहेत. समाध्यांचा प्रदक्षिणामार्ग अरुंद आहे. समाधीसाठी येथील केलेली खास योजना लक्षही वेधुन घेते. सूर्योदयासमयी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून समाधीगाभाऱ्यापर्यंत पोहचतात. ज्ञानेश्वरींचे भाष्यकार भगवानबाबांनी आयुष्यभर आध्यात्मिक विचार कीर्तनाच्या माध्यमातून भक्तगणांपर्यन्त पोहचविला. बाबांचे प्रेमळ व्यक्तिमत्व यामुळे त्यांचा भक्तगण परिवार फार मोठा आहे. भक्तगणांनी भगवानबाबाचे वास्तव्य केले ते निवासस्थान श्रद्धापूर्वक जतन केले आहे. 

उत्सव

ह.भ.प. भगवानबाबा यांची समाधी

                                सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. भगवानगडावर उत्सव विजयादशमीला, पौष वि प्रतिपदाला, प्रत्येक शुद्ध एकादशी याशिवाय कार्तिक पौर्णिमाला सुरु होतो.

विजयादशमी सीमोल्लंघन उत्सव

                              भगवानगडावर मुख्य उत्सव विजयादशमीला सुरु होतो. भगवानबाबांनी विजयादशमी साजरी करण्यामागे खेडय़ापाडय़ातील भाविकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदु:खाची विचारांची देवाणघेवाण करावी हा उद्देश होता. आजही मोठय़ा उत्साहात व एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने विजयादशमी उत्सव साजरा केला जातो. येथील विजयादशमीला वैभवशाली इतिहासाची ७५ वर्षांपेक्षा जास्त परंपरा लाभलेली आहे. गडावर विजयादशमीला गुरूपदेश घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मोठय़ा प्रमाणात अनेक जाती-धर्माचे व पंथाचे भाविक येथे दर्शनाला येतात. येथे विजयादशमीला ‘सीमोल्लंघन उत्सव’ साठी भाविकांची रीघ लागते. या दिवशी दोन लाखावर भाविक सहभागी होतात. येथील वैशिष्ट्य म्हणजे येथे अनोळखी माणसे एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा देताना दिसतात. या भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली असते. बाजरीच्या पिठापासून बनवलेली व चुलीच्या विस्तवावर भाजलेल्या भाकरी आणि शिजवलेल्या भरड्या डाळीच्या पीठ्ठले यांची चव वेगळीच असते. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेंमधून अनेक भाविक व वारकऱ्यांची सोय होते. या भाविकांसाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

भगवानबाबांची पुण्यतिथी

                          श्रीक्षेत्र भगवानगड येथे भगवानबाबांची पुण्यतिथीनिमित्त पौष वि प्रतिपदाला हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन जानेवारीत करण्यात येते. यावेळी गडावर भगवानबाबांचा सप्ताह सुरु होतो व पुढे आठ दिवस चालतो. यावेळी भगवानबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दोन-तीन लाखो भाविकांची गर्दी उसळते.

शुद्ध एकादशी उत्सव

                               प्रत्येक शुद्ध एकादशी उत्सव गडावर साजरा होतो. या उत्सवात येथे नियमित पूजाअर्चा, महाअभिषेक प्रवचने, गायन, भजन, कीर्तन व भोजन असे कार्यक्रम होत असतात. गडावर ग्रंथपारायण, शैक्षणिक, वैद्यकीय मदत, भाविकांना भोजन व महाप्रसाद असे उपक्रम राबविले जातात. उत्सवाची सांगता काल्याकीर्तनाने होते. या दिवशी भगवानगडाच्या गादीवरील महंत कीर्तन करत नाहीत. या दिवशी एक लाखावर भाविक येतात. या सर्वासाठी चहा-फराळाची उत्तम सोय केलेली असते. गडावर १२ महिने २४ तास अन्नदानाचा कार्यक्रम सुरूच असतो.

याशिवाय कार्तिक पौर्णिमाला गुरूपदेश घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मोठय़ा प्रमाणात अनेक भाविक दर्शनाला येतात. या दिवशी दोन लाखावर भाविक सहभागी होतात.

भगवानगडावर १८ एप्रिल ते २५ एप्रिल २००८ दरम्यान अमृत महोत्सवनिमित्ते राष्ट्रीय पातळीवरचा अखंड हरिनाम सप्ताह झाला. भगवानबाबांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहास २००८ या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्या दिवशी ७५ हजारांपेक्षा जास्त भक्त ज्ञानेश्वरी पारायणास बसले होते. सप्ताहादरम्यान ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे रामायण, काकडा आरती, गाथाभजन, कीर्तन, प्रवचन, चक्री प्रवचन, भारूड, रात्रजागर आयोजित केला आहे. शेवटच्या पंगतीत भक्तांना पुरणपोळी व दूध दिले गेले.

पालखी

                                     भगवानबाबा आपल्या कार्यातील बराच काळ त्यांनी संपूर्णपणे नारायणगडावर व भगवानगडावर व्यतीत केला असला तरीही कीर्तनकारणे भगवानबाबांची भ्रमंती पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. भगवानबाबांनी पंढरपूर, आळंदी, पैठणवारीच्या पालखीची प्रथा पाडली. भगवानबाबा आपल्या भाविक भक्तांसोबत दरवर्षी नित्यनेमाने आषाढीवारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जात असत. भगवानबाबांची पालखी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी पालखी आहे. ही पालखी पंढरपूरला भगवानबाबांच्या पादुका घेऊन भारजवाडी, खरवंडी, करंजवण, पाटोदा, भूम, कुर्डूवाडी, परंडा मार्गे जाते. पादुकास्थान पंढरपूर येथे संत एकनाथांच्या पालखीला आडवी जाण्याचा मान या पालखीला आहे. भगवानबाबा भगवानगडावर असताना पालखीकरिता हत्ती, घोडे, अंबारीसह वगैरे सर्व लवाजमा असे. भगवानगडाची पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालखीसोबत मराठवाड्याचे असंख्य वारकरी वारीला निघतात. दरवर्षी वारकरी परंपरेनुसार नामस्मरण करत भगव्या पताका खांद्यावर घेऊन वारीमध्ये सहभागी होतात.

                                       संत श्री एकनाथ संस्थान पैठण येथे पालखी व नाथषष्ठी दिंडीचा मान भगवानगड पालखीला आहे. नाथषष्ठीनिमित्त ‘भानुदास एकनाथ’चा नामस्मरण करत भगव्या पताका घेऊन पालखी श्रीक्षेत्र पैठण येथे एकनाथ मंदिरात जातात. दक्षिण गंगा असलेल्या गोदावरी पात्रात पवित्र स्नान करून वारकरी संत श्री एकनाथ दर्शन घेतात. पालखीत एकनाथ वारीसाठी भाविकांचा ओघ सुरूच आहे. भगवानगडाची पालखीत दर्शनासाठी गर्दी करत व या निमित्ताने पालखी भाविक भक्तांनी फुलून जात आहे. 

जाण्याचा मार्ग

महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये खरवंडीहून दर तासाला खासगी वाहनांची सोय आहे. खरवंडीगावामध्ये राहण्याची व्यवस्थाही आहे.

  • श्रीक्षेत्र भगवानगड हे टेकडीच्या माथ्यावर असून पक्क्या रस्त्याने पायथ्याच्या खरवंडी गावापासून सुमारे ४-५ कि.मी. अंतरावर आहे.
  • भगवानगडाच्या सर्वात जवळचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बस स्थानक खरवंडी येथे आहे.
  • मुंबई-पुणे-अहमदनगरवरून पाथर्डीमार्गे भगवानगडावर पोहोचता येते. राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापटणमवर पाथर्डीपासून साधारणपणे ३० कि.मी. अंतरावर भगवानगड वसले आहे.
  • औरंगाबादपैठणवरून शेवगावमार्गे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्र. १४८ वर पैठणपासून ७० कि.मी. अंतरावर भगवानगड आहे.
  • बीडगेवराईवरून पाडळसिंगीमार्गे ७० कि.मी. अंतर पार करुन भगवानगडावर जाता येते. 
  • भगवानगडाच्या सर्वात जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर येथे आणि विमानतळ औरंगाबाद येथे असून आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे येथे आहे.
  • भगवानगड हे राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापटणम आणि राज्य महामार्ग क्र. १४८ (अहमदनगर-अमरापूर-शेवगाव-पैठण) या महामार्गांनी महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशमधील शहरांशी जोडले गेले आहे. 
  • औरंगाबाद-पैठण मार्गे किंवा बीड-गेवराईवरून पाडळसिंगीमार्गे जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक खासगी वाहतूक कंपन्यांच्या बसगाड्याही उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातून येथे अनेक बस येतात. श्रीक्षेत्र भगवानगड येथे जाणा-या भाविकांसाठी शेवगाव, गेवराई, पैठण, पाथर्डी परिवहन महामंडळ बसस्थानकमधुन बसची ये-जा चालू असते.

विकास आराखडा

                  श्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री सानप यांचे गडाच्या विकासासाठी अंदाजे तीन कोटीचे ६० फूट उंच महाद्वार, साडेचार कोटीचा सभामंडप, दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तके सामावतील असे भव्य वाचनालय, गडाच्या पायथ्याशी वातानुकूलित अतिथी निवास, उद्यान, दवाखाना, योग निसर्गोपचार केंद्र , जॉगिंग ट्रॅक, ध्यानधारणा केंद्र, भगवानबाबांनी उपयोगात आणलेल्या वस्तूंचे भव्य संग्रहालय, रेसिडेन्शियल इंग्लिश शाळा, गडाच्या पायथ्याशी देवस्थानच्या १६ एकर जागेत हेलिपॅडची सुविधा वगैरे बांधण्याचा प्रयत्न सुरू आहेत. सद्यपरिस्थितीत महाद्वाराचे काम प्रगतिपथावर आहे. या ठिकाणी सौरदिवे आहेत व पवनऊर्जेतून विद्युतनिर्मिती केली जाते. भगवानगडावर अध्यात्मासोबत विज्ञानाची सांगड घातलेली दिसते. [१] श्रीक्षेत्र भगवानगडाचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ात व्हावा, भगवानगडाजवळील वनविभागाची जमीन गडाच्या विकासासाठी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. [६] भगवानगडाचे मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री सानप यांनी गडाच्या विकासासाठी कार्यभार घेताना २६ कोटींची विकासकामे केली आहेत. तीन कोटी रुपयांचे स्वयंपाकगृह, महिलांसाठी दोन कोटींची धर्मशाळा, महाप्रसादगृह, महिला अतिथिगृह, पारायण हॉल, किर्तन हॉल, संत विद्यापीठ, किर्तन-प्रवचन-टाळ-मृदुंग प्रशिक्षण वर्ग, अंतर्गत रस्ते बांधण्याचा प्रस्ताव यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

  •  
सर्व जातीधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भगवान बाबांनी भगवानगड उभा केला. हा प्रेरणादायी भगवानगड येथील विकासकामामुळे जागतिक नकाशावर झळकू पाहतोय. ११ जानेवारी रोजी येथे आयोजित केलेल्या सप्ताहासाठी लाखो भाविकांची रीघ लागली आहे.
http://www.lokprabha.com/20090116/lp48.jpg             मराठवाडा ही संतांची भूमी. याच पावनभूमीत ज्ञानदेवाचे आपेगाव, एकनाथाचे पैठण याच संत मालिकेत संत भगवानबाबांचे स्थान महत्त्वाचे आहे. भगवानबाबांनी धौम्य ऋषीच्या समाधीस्थानी श्रीक्षेत्र भगवानगड ही प्रचंड वास्तू नावारूपास आणली.
श्रीक्षेत्र भगवानगड, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर कल्याण- विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गालगत निसर्गरम्य श्रीक्षेत्र भगवानगड क्षेत्र आहे. येथे सुरू असलेल्या नियोजनपूर्वक विकासामुळे हे ठिकाण प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून निश्चितच जागतिक नकाशावर झळकेल.
सुपे सावरगाव, ता. पाटोदा, जि. बीड या ठिकाणी कौतिकाबाई तुबाजी सानप पाटील यांच्या पोटी श्रावण वद्य ५ (पाच) शके १८१८ (सोमवार, दि. २९ जुलै १८९६ साली) भगवानबाबा (आबाजीचा) जन्म झाला. आईवडिलांचे आबाजी पाचवे अपत्य होते. लहानपणी आबाजी खूपच हुशार, चाणाक्ष होता. गावात चौथीपर्यंत शाळा होती. पुढील शिक्षणासाठी आईवडिलांनी मामाच्या गावी लोणी, ता. शिरूर, जि. बीड या ठिकाणी पाठवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आबाजी पुन्हा गावाकडे परत आले. घरात धार्मिक वातावरण असल्यामुळे लहानपणापासून आबाजीला देवाची आवड होती. गावातून दरवर्षी पंढरपूरला पायी यात्रा जात असे. या बालवयातच त्यांनी पंढरपूरला दिंडीत पायी यात्रा केली. पौंडुळ, ता. पाटोदा, जि. बीड या ठिकाणी अवडंबरच्या घराण्यात नारायण नामक मुलाचा जन्म झाला. नारायणाने गावाजवळील डोंगरमाथ्यावर जागा स्वच्छ करून हरिनाम चिंतनात दंग झाले. नंतर त्यांना नगद नारायणबाबा हे नाव पडले. त्यांची ख्याती सर्वदूर पसरली. त्या ठिकाणी छोटेसे देऊळ बांधले. विठ्ठलाची मूर्ती स्थापन केली. नंतर त्या जागेस नारायणगड हे नाम प्राप्त झाले.   नारायणगडाच्या गादीवर माणिकबाबा कार्यरत होते. आबाजीचे आईवडील विजयादशमी  (दसरा) या दिवशी या ठिकाणी आले आणि आबाजीने माणिकबाबास गुरुपदेश द्या, असे म्हणाले. त्यावर कमी वयात गुरुपदेश देता येत नाही असे माणिकबाबा म्हणाले. आबाजीने बराच वेळा आग्रह केल्यानंतर रागावून माणिकबाबांनी तू नारायणगडाच्या शिखरावरून उडी मार असे म्हणाले. काही क्षणातच आबाजीने शिखरावरून उडी मारली, त्यांना थोडेसे खरचटले. नंतर माणिकबाबांनी आबाजीचे नाव भगवान ठेवले व त्यांना गुरुपदेश दिला.
भगवानबाबांनी आळंदीत बंकटस्वामीच्या सान्निध्यात १२ वर्षे अभ्यास केला. यात पदे, ऋचा, धन, वेद, व्याकरण, न्याय, मीमांसा, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, पुराणे, उपनिषदे, सिद्धांतकौमुदी, पंचदेशी, ब्रह्मासूत्र, गीता, रामायण, महाभारत या ग्रंथांचा अभ्यास केला. मृदंग, टाळ, वाचन, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा मुखपाठ केले.
भगवानबाबा आळंदीवरून परत आल्यानंतर गडावर त्यांच्या भेटीसाठी पंचक्रोशीतील नागरिक येत असत. कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची प्रभावी दिशा दाखविली. १९१८ साली त्यांनी नारायणगड पंढरपूर पायी दिंडी चालू केली. म्हणून नारायणगडाला धाकटी पंढरी म्हणतात. १९२७ साली नाथषष्ठीनिमित्त पैठणपर्यंत दिंडी चालू केली. सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून भजन, कीर्तन, प्रवचन, गाथा, पारायणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व्हावे यासाठी १९३४ साली पखालडोह या ठिकाणी सप्ताह सुरू केला.
भगवानबाबांची सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक विचारांची बैठक राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांशी नाते सांगते, तेच ध्येय भगवानबाबांचे होते. ते साध्य करताना बाबांची भूमिका ही एका चिंतकाची नव्हती तर एका श्रेष्ठ कृतिशील समाजसुधारकाची होती.
माजलगाव, पाथर्डी, धारूर, केज, शेगाव यासह अनेक गावांतील पशुहत्या बंद केली. भगवानबाबांचे गुरू नारायणगडाचे सर्वेसर्वा माणिकबाबा यांचे निधन ज्येष्ठ शु. १३ शके १८५९, इ.स. १९३७ रोजी झाले. मरतेवेळेस भगवान तुझ्यावर गडाची आता सर्व जबाबदारी राहील असे सांगितले. भगवानबाबांच्या प्रेरणेने थेरला, वडझरी, बेलसूर, चिंचपूर, पिंपळनेर, कारंजवण, खोकरमोह या गावांनी हैद्राबाद मुक्तिसंग्रामात सहभाग नोंदविला होता.
भगवानबाबांची कीर्ती जशी जशी वाढू लागली तशी त्यांना समाजातील वाईट लोकांकडून त्रास द्यायला सुरुवात झाली. त्यांना मारण्यासाठी वेळोवेळी मारेकरी पाठविले. भगवानबाबांस पत्र्या ठोकण्यासाठी काही विघ्नसंतोषी लोकांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांना सांगितले. ते तसे करण्यासाठी गडावर गेले असता बाबांच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा, करारीबाणा, सत्यवचन, विश्वास नाना पाटलांना दिसला लगेचच नाना पाटील खाली मान घालून परत निघाले. हा डाव फसल्यानंतर समाजकंटकांनी भगवानबाबांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यासाठी प्रयत्न केले. 
खरवंडीच्या बाजूलाच धौम्य ऋषीचा धौम्यगड होता. याठिकाणी बाबांनी धौम्य ऋषीच्या पादुकांचे दर्शन घेतले. नानाविध औषधी वनस्पतीयुक्त ठिकाणी आपण समाजकार्य करावे असे त्यांना वाटले. याच ठिकाणी आपण भक्तीचा गड उभा करायचा नव्या उमेदीने कामाला लागायचे. पंढरपूर, आळंदी, पैठण वारी सुरू करायची असे ठरविले.
बाबांची वृत्ती धाडसी होती त्यांनी रात्रंदिवस गडाचे काम पूर्ण केले. गडाचे पूर्ण बांधकाम लाकडाचा वापर न करता दगडांनी केलेले आहे. बांधकामाला आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी भरभरून मदत केली. स्त्रियांनी स्वत:चे दागिने बांधकामासाठी दिले. लोकांनी घरून स्वत:च्या भाकरी आणून अहोरात्र गडाचे बांधकाम पूर्ण केले.
पाहता पाहता गडाचे काम पूर्ण झाले, अत्यंत भव्य वस्तू उभी राहिली. अध्यात्माबरोबरच शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून स्वतंत्र इमारतीचा आराखडा तयार केला. पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी स्वामी सहजानंद सरस्वती, ह. भ. प. मामासाहेब दांडेकर, बाळासाहेब भारदे यांना तर गडाच्या उद्घाटनासाठी मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मा. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बोलताना म्हणाले की, ‘‘मला जेव्हा येथे येण्याचे निमंत्रण मिळाले तेव्हा वाटले होते की, सिंहगड, प्रतापगड, रायगड, तसा हा धौम्यगड असावा. धर्म रक्षणासाठी शिवाजी महाराजांनी मावळ्यांना एकत्र करून शस्त्राच्या साह्याने धर्म रक्षण केले. परंतु भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड भगवानगड उभारण्याचे काम केले आहे. आजपासून हा भगवानगड म्हणून ओळखला जावा.’’ तेव्हापासून धौम्य गडाचे नाव भगवानगड असे पडले.
कीर्तनात भगवानबाबा नेहमी सांगत, लिहिता-वाचता येणे हा मानवाचा तिसरा डोळा आहे. माणूस असल्याची ओळख आहे. तुमची ऐपत नसेल तर एकाच वेळी जेवा, परंतु मुलांना चांगले शिक्षण द्या. शिक्षण नसेल तर घराच्याबाहेर पडल्यावर कोणीही तुमची फसवणूक करेल. विद्या वाघिणीचे दूध कष्टकरी कामकरी यांच्या मुलांना मिळाले पाहिजे. याच उद्दात हेतूने गडावर भगवान विद्यालयाची कोनशिला बसविली. वाडय़ा, पाडय़ा, तांडय़ावरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी येत असत. खोल्यांच्या व पाण्याच्या अडचणीमुळे बाबांनी विद्यालय खरवंडी याठिकाणी हलविले. औरंगाबादला वसतिगृहाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते केले. औरंगाबादलाच भगवान होमिओपॅथी कॉलेजची स्थापना केली.
सोमवार, दि. १८ जानेवारी १९६५ रोजी रात्री एक वाजता वयाच्या ६९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
समाजाला ज्ञानरूपी प्रकाश देणारे.. समाजाचे चंद्रसूर्य समजले जाणारे.. प्रबोधनाचा महामेरु.. भक्तिरसाचा सागर.. मायेचा पाझर.. पंढरीचा अखंड वारकरी.. तुळशीच्या माळेने क्रांतीची ज्योत पेटविणारे.. परोपकारी.. भक्तीचा गड उभारणारे.. भजन-कीर्तन, प्रवचनाची गंगा.. शुद्ध आचरणाचा पितामह.. स्नेहप्रेमाचे सम्राट.. अशा भगवानबाबांना शेवटचा निरोप देण्यासाठी गावोगावची भजनी मंडळी, दिंडय़ा, टाळ, पखवाज घेऊन आली होती. जनसागर जणू शोकसागर वाटत होता. बाबांचे कार्ये अलौकिक होते. समाजात झालेले वैचारिक प्रदूषणे बाबांनी कमी केले होते. 
भगवानबाबांनी १९३४ साली पखालडोह येथे वार्षिक हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली होती. प्रत्येक वर्षी नवीन गावाला सप्ताहाचे नारळ दिले जाते. दरम्यान भगवान गडावर १८ एप्रिल ते २५ एप्रिल २००८ दरम्यान अमृत महोत्सव राष्ट्रीय पातळीवरचा अखंड हरिनाम सप्ताह झाला. भगवानबाबांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहास यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होणार असल्यामुळे या ठिकाणी ७५ हजारांपेक्षा जास्त भक्त ज्ञानेश्वरी पारायणास बसले होते. शेवटच्या पंगतीत भक्तांना पुरणपोळी व दूध दिले गेले. सप्ताहादरम्यान ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे रामायण, काकडा आरती, गाथाभजन, कीर्तन, प्रवचन, चक्री प्रवचन, भारूड, रात्रजागर आयोजित केला आहे. 
डॉ. नामदेवशास्त्री गडाच्या विकासासाठी अंदाजे तीन कोटीचे महाद्वार, साडेचार कोटीचा सभामंडप, दोन कोटीचे स्वयंपाकघर बांधणार आहेत. सद्यपरिस्थितीत महाद्वाराचे काम प्रगतिपथावर आहे. महाद्वाराची उंची ६० फूट राहील. दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तके समावतील असे भव्य वाचनालय, गडाच्या पायथ्याशी वातानुकूलित अतिथी निवास, भक्तनिवास, भगवानबाबांनी उपयोगात आणलेल्या वस्तूंचे भव्य म्युझिअम (संग्रहालय), रेसिडेंशियल इंग्लिश शाळा, गडाच्या पायथ्याशी देवस्थानच्या १६ एकर जागेत हेलिपॅडची सुविधा अनेक नवनवीन योजना राबवून भगवानगड म्हणजे चांगले निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून देशाच्या नकाशावर झळकेल. भगवानगडावर अध्यात्मासोबत विज्ञानाची सांगड घातलेली दिसेल. या ठिकाणी सौरदिवे न पवनउर्जेतून विद्युतनिर्मिती केली जाते.
यावर्षी श्री क्षेत्र भगवानगड येथे महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यांतून एक लाखाहून अधिक भक्तगण दसऱ्याच्या दिवशी आले होते. येथे अनोळखी माणसे एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना दिसतात. येथील दसऱ्यास ७५ वर्षांपेक्षा जास्त परंपरा लाभलेली आहे. येथील वैशिष्टय़ म्हणजे राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली असते. मोठय़ा प्रमाणावर लोक एकत्र आल्यामुळे एकमेकांविषयी आपुलकी स्नेहभावना जोपासली जाते.
भगवानबाबांनी दसरा साजरा करण्यामागे खेडय़ापाडय़ातील नागरिकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदु:खाची विचारणा करावी हा उद्देश होता. आजही मोठय़ा उत्साहात व एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने दसरा उत्सव साजरा केला जातो.
दसऱ्याला या ठिकाणी गुरुपदेश घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मोठय़ा प्रमाणात भक्तगण येतात. भगवानबाबांची दिंडी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी दींडी आहे. ही दिंडी बाबांच्या पादुकांसमवेत घेऊन भारजवाडी, खरवंडी, पाटोदा, भुम, कुर्दुवाडी मार्गे जाते. वाखरी येथे संत ज्ञानेश्वरांच्या दींडीला आडवी जाण्याचा मान आहे.
शुद्ध एकादशीला गडावर भजन, कीर्तनाचा कार्यक्रम होतो. भगवानगडाच्या गादीवरील महंत कीर्तन करत नाहीत. या दिवशी एक लाखावर भाविक येतात. या सर्वासाठी चहा-फराळाची उत्तम सोय केलेली असते. गडावर १२ महिने २४ तास अन्नदानाचा कार्यक्रम सुरू असतो.
जाण्याचा मार्ग : मुंबई-पुणे नगरवरून पाथर्डीमार्गे भगवानगड, औरंगाबाद, पैठण मार्गे किंवा गेवराई पाडळ सिंगी मार्गे गडावर पोहोचता येते.
  • मंजरथ
  • मंजरथ हे गाव, माजलगाव तालुक्यात मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात आहे.

·         मंजरथ माहात्म्य (आख्यायिका)

  • केसरी नावाच्या गंधर्वाला अंजना आणि आद्रिका नावाच्या दोन भार्या होत्या. शापामुळे अंजना वानरी तर आद्रिका मार्जार (मांजर) झाली. काही काळानंतर आद्रिकेने अब्जक तीर्थात (गोदावरी-सिंदफणा संगम ) स्नान केले असता तिचे मूळ रूप तिला प्राप्त झाले, म्हणून हे क्षेत्र मार्जार क्षेत्र झाले. तेच पुढे मंजरथ म्हणून ओळखले जाऊ लागले.संदर्भ हवा ]

·         हनुमंतेश्वर मंदिर, मंजरथ

  • गोदावरी नदीचे सिंधुफेना(सिंदफणा) नदीशी संगम स्थान ते हनुमंतेश्वर मंदिर या मधल्या भागाला अब्जक तीर्थ म्हणतात. गोदावरी नदीला गौतम ऋषींनी आणली म्हणून तिला गौतमी हे पण एक नाव आहे. या नदीमध्ये महापातकाला नष्ट करणारी अनेक तीर्थे असल्याची समजूत आहे. त्यांमध्ये मुख्य ३ तीर्थे आहेत, पहिले त्रिंबके(गंगेचे उगमस्थान), दुसरे अब्जके (गंगेचे हृदयस्थान ) आणि तिसरे गोदासागर संगमे( गोदावरीचे सागर संगम स्थान), या तिन्ही तीर्थांत ’अब्जके’ चे स्थान विशेष महत्त्वाचे आहे. हे अब्जक तीर्थ किंवा मार्जार क्षेत्र म्हणजेच श्रीक्षेत्र मंजरथ.
  • माजलगाव शहरापासून दहा किलोमीटरवर मंजरथ हे गाव आहे. धाकटी काशी म्हणून त्याची दुसरी ओळख आहे. या गावाला गोदावरीचा वसा लाभला आहे. अंत्यविधीनंतरचे विधी करण्यासाठी मराठवाड्यातील लोक मंजरथ येथे येतात व गोदावरीच्या नदीपात्रात अस्थी, रक्षा विसर्जन करतात.
  • राक्षसभुवन

                                राक्षसभुवन महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात गोदावरीकाठी गेवराई तालुक्यात वसलेले गाव आहे. येथील शनिमंदिर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. या तीर्थक्षेत्री शनिदेवाचे प्रथम पीठ प्रसिद्ध आहेच,१७६३ मध्ये येथे झालेल्या लढाईत थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला ही लढाई राक्षसभुवनची लढाई म्हणून इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे. राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठे व हैदराबादचा निझाम यांच्यात झाली. यात निझामाचा सडकून पराभव झाला. [१] [२] गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन हे गाव शनीबरोबरच दत्त प्रभूंच्या जन्म स्थानामुळे प्रसिद्ध असून याठिकाणी सहा दिवस पारंपरिक पद्धतीने दत्त जन्म सोहळा शेकडो वर्षांपासून साजरा होत आहे. दत्त संस्थानामुळेही ते तितकेच प्रसिद्ध आहे. आत्मानुभूती प्राप्त करून देणारे आत्मतीर्थ, अगस्तीतीर्थ, नृसिंहतीर्थ, भारतातील प्रख्यात 21 गणपतींपैकी एक विज्ञान गणेशतीर्थ, सोमेश्वरतीर्थ, कालिकातीर्थ अशी आठ तीर्थेदेखील प्रसिद्ध आहेत.अशा या पवित्र क्षेत्री गोदावरी तीरावर अतिशय प्राचीन असे ‘दत्तस्थान’ आहे. या स्थानी प्राचीन काळी दंडकारण्य होते, असा उल्लेख पुराणात आढळतो. दत्त प्रभूंना दत्त अत्रे, असे नाव याठिकाणी प्राप्त झालेले आहे. अत्री अनुसया यांचा आर्शम याठिकाणी असल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. या स्थानावर त्यांना पुत्रसुख अनुभवता आले, असे भाविक सांगतात. पूर्वी हा दंडाकारणाचा भाग असल्यामुळे अत्री, अगस्ती, दाक्षीची, पिपल्लाद, दक्षप्रजापती महर्षी गोतम आदी मान्यवर ऋषी याठिकाणी वास्तव्यास होते. याचस्थानी वनवासात असतांना प्रभू रामचंद्रांनी सीतामातेसह दत्त दर्शन झाल्याचा उल्लेख रामविजय ग्रंथात आढळतो. संपूर्ण वनवासात प्रभू रामचंद्र एकाच स्थानावर दोन वेळा येऊन गेले असे एकच ठिकाण येथे आहे. सती हरणापुर्वी व सिता हरणानंतर शनी देवता स्थापनेवेळी अन्य कोणत्याही स्थानावर प्रभू रामचंद्र दोन वेळा गेलेले नाहीत. ज्या दत्त मूर्तीचे व अवतरणाचे वर्णन सुंदरतेने करण्यात आलेले आहे. याक्षेत्रावर दत्तभक्त वासुदेवानंद सरस्वती(टेंभे स्वामी) यांनी गोदा दक्षिणेच्या वेळी वास्तव्य केल्याचे आढळते. अशा या प्राचिन दत्त संस्थानाची माहिती कमी दत्त भक्तांना आहे. या स्थानावर शिखर नसलेले आर्शमाप्रमाणे रचना असलेले एकमुखी षडभूज दत्ताची मूर्ती खोल गाभार्‍यात आहे. कारण माता अनुसयेस सत्त्वहरणेच्या वेळी आपली ओळख पटू नये म्हणून भगवान शिव आपल्या वाहनाशिवाय येथे आले त्याची खूण म्हणून येथील महादेव मंदिरासमोर नंदी नाही. या संस्थानाचा दत्त जयंती उत्सव सहा दिवसांचा असतो. प्रतीवर्षी मार्गशिर्ष शुद्ध 14 रोजी सायंकाळी सूर्यास्तापूर्वी संपन्न होतो. दुसर्‍या दिवशी भाविकांनी महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. छबीना, पाच सोंग, तीर्थप्रसाद हे कार्यक्रम होतात. महापुरुषांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गावात भिक्षाही मागितली जाते. भिक्षान्न गृहण केले जाते. [३] याच स्थानावर दत्तभक्त दासोपंतांना प्रत्यक्ष दत्तदर्शन झाले. त्यांना स्वत:च्या चरण पादुका दत्तमहाराजांनी दिल्या तेच हे पवित्र स्थान असल्याचा उल्लेख आहे. येथील मंदिरातील वरद दत्तमूर्ती एकमुखी असून, अतिशय दुर्मिळ आहे. ही मूर्ती वालुकामय, षड्भुजा आहे. मूर्ती अत्यंत खोल गाभार्‍यात असून हे भारतातील असे एकमेव स्थान आहे, ज्या ठिकाणी ‘दत्त यंत्र’ आहे. बीडच्या राष्ट्रीय महामार्ग 211 पासून हे स्थान फक्त 11 किलोमीटर अंतरावर आहे.

                      राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठे व हैदराबादचा निझाम यांच्यात झाली. यात निझामाचा सडकून पराभव झाला

·         मठ, तेथील परंपरा व हस्तलिखित ग्रंथ यांचा परिचय

  • बस स्टँड किंवा त्या जवळच असलेल्या रेल्वे स्टेशनपासून दीड किमी अंतरावर एका टाॅवरच्या नंतर गणेश पार नावाचे गणपती मंदिर आहे. त्याच्या जवळच गोराराम मंदिर नावाने ओळखला जाणारा हा परळी वैजनाथ येथील मठ आहे. विद्यमान मठपती रामदास बुवा रामदासी हे आहेत..
  • या मठाची परंपरा पुढील प्रमाणे आहे. :-
    आप्पास्वामी–> जयरामबुवा–> गंगारामबुवा–> नागोबुवा–> लक्ष्मणबुवा–> माणकेश्वरबुवा–> त्यांचे बंधु परशुरामबुवा–> कल्याणबुवा (निधन – मार्गशीर्ष शुद्ध २, शके १८९१)–> नागनाथबुवा (निधन – आषाढ शुद्ध ५, शके १८८६)–> विद्यमान मठपती रामदास बुवा रामदासी.
  • मठाचे मूळ पुरुष आप्पास्वामी हे परभणी जिल्ह्य़ातील गंगाखेड तालुक्यातील गोदावरी काठच्या सुपे या गावचे राहणारे होते. आप्पास्वामी व त्यांचे सात भाऊ या गावात राहात जहागीरदारी व वतनदारी सांभाळत होते. एक साधू त्या गावी आले. त्यांना आपली आध्यात्मिक विद्या या आठ मुलांना द्यायची होती. पण ती घेण्यास ज्यानी नकार दिला ते त्या साधूच्या शापाने निर्वंश झाले. एकट्या आप्पास्वामी यांनी ती विद्या स्वीकारली. त्या सुपे गावी एका रामाच्या मूर्तीची स्थापना केली व तेथेच असलेल्या लिंबाच्या झाडाला रोज रामाच्या पूजेचे तीर्थ घातले तर तुझा वंश वाढेल हा आशीर्वाद दिला. दरम्यान वासुदेवानंदस्वामी तेथे आले. त्यांनी त्या लिंबाला एक लोखंडी कांब ठोकली. तेंव्हापासून त्या झाडाला अर्ध्या भागात गोड पाने येऊ लागली.. पुरामुळे आज ते झाड नाही पण तेथे एक ब्रम्हराक्षसाची शिळा आहे. त्या राम मंदिराची पूजा आजही तेथे वंशपरंपरेने सदाशिवराव जोशी हे करीत आहेत.
  • या आप्पास्‍वामींना समर्थ रामदास स्वामींचा अनुग्रह प्राप्त झाला होता. त्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी जयरामबुवा हे गाव सोडून परळी वैजनाथ येथे स्थायिक झाले. रामदासांनी परळी वैजनाथ येथील मठात शके १५९४ मध्ये शाडूची हनुमानाची तळहाताएवढी मूर्ती स्थापन केली होती. आजही मठात गेल्यावर डावीकडे ही मूर्ती दृष्टीस पडते.
  • स्वरूपसांप्रदाय अयोध्या मठ | जानकी देवी श्री रघुनाथ दैवत |  मारूती उपासना नेमस्त | वाढविला परमार्थ रामदासी ||
  • जयरामबुवा हे रामदासी पद्धतीने राहून भिक्षामिसे लहान थोर परिक्षून सोडत होते. त्यांची रामाची उपासना वाढत गेली व शिष्य संप्रदाय मठाशी जोडला जाऊ लागला. समर्थ रामदास स्वामींच्या भेटीसाठी जयरामबुवा यांची तळमळ व तीव्रता वाढत गेली. व शेवटी त्यांनी सज्जनगडावर जाऊन रामदासांची भेट घेतली.
  • आमची प्रतीक्षा ऐसी | कांही न मागावे शिष्यासी |  आपणामागे भगवंतासी | भजत जावे ||
  • जयरामबुवा यांनी समर्थ रामदास स्वामींकडे “आपण परळी वैजनाथ येथील मठात हनुमंताची स्थापना केली, आता रामरायाची स्थापना आपल्या हस्तेच व्हावी ” अशी मनीषा व्यक्त केली. समर्थांनी श्री जयराम बुवांना एक तलवार भेट दिली. आज्ञा केली की अयोध्येला जाऊन एक रामाची मूर्ती घेऊन या. मुसलमानी अत्याचार सुरूच आहेत. कुठे दगा फटका झाला च तर ही तलवार तुझ्या रक्षणासाठी बरोबर ठेव. रामरायाच्या मूर्ती स्थापनेचे पुढे पाहू. समर्थांची आज्ञा घेऊन जयरामबुवा परळी वैजनाथ येथे आले. शुभ दिवस व मुहूर्त पाहून अयोध्येला जाण्यास रवाना झाले. व अयोध्येहून राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या सुंदर मूर्ती घेऊन परतले..
  • जयरामबुवा हे अयोध्येला जाऊन मूर्ती घेऊन परळी वैजनाथला परतही आले. इकडे रामदास स्वामींचे माघ वद्य ९ शके १६०३ या दिवशी निर्वाण झाले. सर्व मठांतून ही बातमी वार्‍यासारखी पसरली. इकडे परळी वैजनाथ मठात जयरामबुवा राम मूर्तींच्या प्रतिष्ठापनेसाठी वाट पहात होते. अचानक समर्थांच्या आज्ञेने कल्याणस्वामी यांचे परळी वैजनाथ येथील मठात आगमन झाले. समर्थांनी जयराम बुवांना सांगितले होते की मूर्ती स्थापनेसाठी मी कल्याणास पाठवितो. या वचनाप्रमाणें समर्थांच्या निर्वाणानंतर मठात आलेल्या कल्याण स्वामींच्या हस्ते शके १६०४मधील एका शुभदिनी परळी वैजनाथ येथील रामदासी मठात समर्थांनी स्थापन केलेल्या मारुतीरायापुढे मंत्रघोषात अयोध्येहून आणलेल्या राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली.

                     समर्थ रामदासस्वामींनी स्थापन केलेल्या मंदिरात, गेवराई तालुक्यातील रुईधानोरा येथे चारशे वर्षांपासून रामजन्मसोहळा साजरा होतो. मंदिरात राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या संगमरवरी चार फुटी मूर्ती असून उत्सवाच्या काळात राम व सीता यांच्या दुसऱ्या दोन उत्सवमूर्ती सजविलेल्या असतात. रुई गावातील श्रीराम नवसाला पावणारा रूचा राम म्हणून प्रसिद्ध आहे. भक्तांचे मनोरथ पूर्ण करतो अशी गावांतील भाविकांची श्रद्धाआहे.

                              गुढीपाडव्यापासून गावात सुरू होणारा श्रीराम जन्मोत्सव दशमीपर्यंत चालतो. नवमीच्या दिवशी रामजन्म आणि दशमीला या ठिकाणी श्रीरामाचा लग्न सोहळा होतो. नवमीला दुपारी जन्मसोहळा झाल्यानंतर रात्री रामाचा नामकरण सोहळा होतो. फुलांनी सजविलेल्या पाळण्यात रामाचे नामकरण होते. दशमीच्या दिवशी गावातून दिंडी काढली जाते. टाळमृदंगाच्या गजरात फुगड्या खेळल्या जातात. दिंडी गावातून मठात आल्यानंतर भट, वासुदेव, बोबड्या ही सोंगे ग्रामस्थ सादर करतात. राम मंदिरात दशमीच्या उत्तररात्री श्रीरामाचा सीतेबरोबर ‘विवाह’ लावला जातो. विवाहापूर्वी मंदिरात येणाऱ्या व‍ऱ्हाडींना (भाविकांना) अक्षता वाटप करतात. अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हटली जातात. रामजन्मसोहळ्याचा समारोप मंगल सोहळ्यानेच म्हणजेच रामाच्या लग्नाने व्हावा असा समर्थांचा दंडक होता, तो आजही पारंपरिक पद्धतीने पाळला जातो.

                       उत्सवाच्या काळात पंचयुक्त पवमान, नवसाच्या पंगती, नित्योपासना, दासबोध, पारायण, संगीत रामायण कथा आदी कार्यक्रम चालतात. अकरा दिवसांच्या काळात परिसरातील पंधरा गावांतील ग्रामस्थ सहभागी होतात. या उत्सवातून चारशे वर्षांपासूनची ग्रामीण लोकसंस्कृती व परंपरा जोपासली जात आहे. पारंपरिक सोंगे आणि भारुडांनी गावकऱ्यांनी उत्सवाच्या माध्यमातून लोकसंस्कृती जपली आहे. त्यामुळे या ठिकाणी उत्सवाच्या काळात नवसाच्या पंगती घातल्या जातात. संपूर्ण गाव या उत्सवात सहभागी होते. येथील मंदिराला जगद्गुरु शंकराचार्य, संत भगवानबाबा, ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांनी भेटी दिल्या आहेत.

                       शिवलेणी (जोगाई मंडप; हत्तीखाणा) ही महाराष्ट्रातील राज्यातील अंबाजोगाईबीड जिल्हामधील हिंदू गुहा स्मारके आहेत.राजा उदयादित्याच्या (इ.स. १०६० ते १०८७) राज्यात “एकूण टेकडीच्या आत खोलवर कोरलेल्या आणि खोदलेल्या उत्खननात खोदलेल्या गुहेत असलेल्या सर्व शिलालेखातील खुर्च्या बाहेर काढल्या गेल्या होत्या. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणानुसार “भारतीय कलांची उत्तम हितसंबंधातील उदाहरणे” अशी शिल्पे समाविष्ट आहेत, हिंदू आणि हिंदू पुराणातील गोष्टींचे वर्णन, देव आणि देवीचा समावेश असलेल्या ह्या हिंदू धर्मातील कलाकृती आहेत.

सिंधफणा नदी (देवनागरी लेखनभेद: सिंधफणा नदी) ही महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातून वाहणारी नदी आहे. ती गोदावरीची उपनदी आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातल्या चिंचोली गावानजीक बालाघाटडोंगरांमध्ये ती उगम पावते. तिथून वाहत जाऊन माजलगाव तालुक्यातील मंजरथ गावाजवळ गोदावरीस मिळते. माजलगाव गावानजीक तिच्यावर माजलगाव धरण बांधले आहे.

सोन्ना थडी हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातील गाव आहे. हे गाव माजलगावाच्या पूर्वेस १६ कि.मी. अंतरावर गोदावरीच्या तीरावर वसले आहे.

                  सौताडा हे स्थळ पाटोदा तालुक्यात असून येथील विंचरणा नदीवरील धबधबा प्रसिद्ध आहे. पाटोदा तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी विंचरणा नदी वाहत जाऊन पुढे सौताडा येथे विंचरणेचा प्रवाह सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत कोसळतो. येथील धबधबा प्रसिद्ध आहे.

                  ह्याच ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि सीतामाई ह्यांचा काही काल रहिवास लाभल्याचे लोक बोलतात. तसेच त्यांचे राहण्याचे ठिकाणाविषयी डोंगराच्या कपारीत सीतामाई आपली राहत असल्याचे बोलत असून सितामाईचा संसार असल्याचे सांगतात.

                       हे जामखेड म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचे शेवटचे ठिकाण असून त्यामुळे बीडची सर हद्द समजली जाते. येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी मोठी यात्रा भरते आजुबाजू शेजार जिल्ह्यातील हजारो भाविक या ठिकाणी तीर्थक्षेत्र आणि निसर्गाच्या पर्वणीचा आनंद घेण्यासाठी येतात.

                                     येथे मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी आहे   कडा येथील महेश मंदिर व मौलानीबाबा दर्गा आष्टीला लिमटाका गणेश, पिंपळेश्‍वर महादेव व शनिदर्शन बीड येथील आकाशवाणी, दुरदर्शन केंद्र, अंबाजोगाईचे योगेश्वरी मंदीर,परळीचे वैद्यनाथ मंदिर ,धायगुडा पिंपळा येथील दुरदर्शन उच्चशक्ती प्रक्षेपण केंद्र ,परळी येथील दोन थर्मल पॉवर स्टेशन, माजलगाव प्रकल्प,धनेगाव प्रकल्प,गिरवली 400 के.व्ही . सबस्टेशन या दहा र्ममस्थळांचा समावेश आहे.

  • बीड:-

                जिल्ह्याचे मुख्य ठिकाण बिंदुसरा नदीकाठी वसले आहे. जिल्हयातील सर्वात मोठे शहर . शहरात कंकालेश्र्वराचे जलमंदिर आहे. सुरेख व कलात्मक बांधणीमुळे हे जलमंदिर प्रेक्षणीय ठरले आहे. शहराजवळच्या टेकडीवर खंडेश्र्वराचे प्राचीन मंदिर, आहे. शहरात पीर बालाशहा व मन्सूरशाह यांचे दर्गे आहेत. शहरापासून जवळच खजाना ही प्रसिद्ध विहिर आहे. या विहिरीस कायम पाणी असते. बीड शहराच्या पश्चिमेस सु. ४ किमी. वर प्रसिद्ध ‘खजाना विहीर’ आहे. अलीकडील काळात बीड औद्योगिक व शैक्षणिक शहर म्हणूनही विकसित होत आहे.

                          आंबेजोगाई किंवा अंबेजोगाई तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले अंबाजोगाई शहर ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे. येथे बऱ्याच शैक्षणिक संस्था असून एक वैद्यकीय आणि तंत्रशिक्षणाचे महाविद्यालय आहे. निजामी अमलात हे गाव मोमिनाबाद नावाने ओळखले जात असे.स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे (जे रझाकारांविरुद्ध लढले) या प्रसिद्ध व्यक्तींचा या शहराशी संबंध आला आहे. गावात जोगाई व खोलेश्र्वर यांची प्राचीन मंदिरे आहेत. जोगाईच्या मंदिरामुळे हे गाव अंबेजोगाई म्हणून ओळखले जाते. अंबाजोगाईचे योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. अंबेजोगाई हे ठिकाण देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक मानले जाते.आद्यकवी मुकुंदराज व संतकती दासोपंत यांच्या समाधी येथे आहेत. ज्ञानेश्र्वरांनी येथील मुकुंदराजाच्या समाधीला भेट दिल्याचा उल्लेख सापडतो. दासोपंतांनी लिहिलेली बारा मीटर लांब व एक मीटर रुंदीची पासोडी येथे पाहावयास मिळते. येथील क्षयरोग रुग्णालय विख्यात आहे. क्षयरोग लवकर बरा होण्यासाठी येथील कोरडे हवामान उपयुक्त ठरते. अंबाजोगाईला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती बस स्थानक असून, महाराष्ट्र तसेच गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील शहरांशी जोडले गेले आहे. जवळील रेल्वे स्थानक परळी येथे आहे. जवळील विमानतळ लातूर येथे असून अंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई आहे.

                                   भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ येथे आहे. परळी वैजनाथ तालुक्यातील ऐतिहासीक शिवमंदीर प्रसिद्ध आहे. बारा ज्योतीर्लिंगांपैकी हे (आद्य) ज्योतीर्लिंग आहे. हे तालुक्याचे मुख्य ठिकाण जिल्ह्यातील एकमेव रेल्वे जंक्शन येथील वैजनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैजनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. अंबाजोगाईपासून परळी वैजनाथ ५५ कि. मी. अंतरावर आहे तर परभणीपासून ६१ कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणापासून वाहनाची सतत सोय आहे. परळी येथील औष्णिक विद्युतकेंद्र राष्ट्रीय पातळीवरही महत्त्वाचे गणले जाते. येथे औद्योगिक वसाहत असून औद्योगिकदृष्ट्या परळी झपाटयाने विकसित होत आहे. 

                            श्रीक्षेत्र भगवानगड हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र आहे. श्रीक्षेत्र भगवानगड हिंदू समाजाचे भाविकांमध्ये हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. बीड जिल्ह्यातील खरवंडीच्या बाजूलाच धौम्य ऋषीचा धौम्यगड होता. धौम्य ऋषी पांडवांचे पुरोहित होते. याठिकाणी भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड उभा राहिला.

               श्रीक्षेत्र गहिनीनाथगड हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र आहे. श्रीक्षेत्र गहिनीनाथगड हिंदू भाविकांमध्ये हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे.

                 गावात एका टेकडीवर नाथ पंथातील नाथ कानिफनाथ भ्रमण करत असताना काही दिवस तपशर्या केली .जालिंदर नाथानी येवलवाडी ता.शिरूर जि.बीड येथे वास्तव्य केले.

                            धर्मापुरी हे महाराष्ट्र राज्यातील गाव आहे. ते बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात आहे. हे ठिकाण अंबेजोगाई – अहमदपूर मार्गावरील मोठे गाव आहे. परळी, अंबाजोगाई, अहमदपूर, गंगाखेड आणि पानगाव शहरांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. इथे एक प्राचीन किल्ला असून एक तळे आहे. गावापासून जवळच मरळशीद मंदिर आहे. गावामधेच एक जुने राम मंदिर आहे.

                   गोदावरीकाठी गेवराई तालुक्यात वसले आहे. येथील शनिमंदिर प्रसिद्ध आहे. शनिअमावस्येस येथे मोठी यात्रा भरते. १७६३ मध्ये येथे झालेल्या लढाईत थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला ही लढाई राक्षसभुवनची लढाईम्हणून इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे. राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०, इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठे व हैदराबादचा निझाम यांच्यात झाली. यात निझामाचा सडकून पराभव झाला.

                केदारेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन शिवमंदिर आहे. याचे स्थापत्य चालुक्य शैलीत केले आहे. धर्मापुरीचे शिवमंदिर कोरीव शिल्पकामासाठी प्रसिद्ध आहे.

                                   ऐतिहासीक शिवमंदीर प्रसिद्ध आहे. दहाव्या ते 11 व्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य (सहावा) याने हे मंदिर बांधले. हे दशावतारी मंदिर आहे. त्यावर ग्रीक शिल्पकलेची छाप आढळते. शतकांपूर्वी बीड नगरीवर राज्य होतं ते हैदराबादच्या निझामाचं. या काळात दसरा सण उत्साहात व्हायचा. लोक सीमोल्लंघनासाठी खंडेश्वरीला जात. निझाम सरकारच्या वतीने खंडेश्वरी मंदिरासमोर मंडप टाकले जात. जवळपास सर्व मुस्लिम अधिकारी, प्रतिष्ठित मुस्लिम नागरिक व व्यापारी या पेंडॉलमध्ये येत व पानसुपारी घेऊन एकमेकांना शुभेच्छा देत. धूलिवंदनाच्या दिवशी अंधर्शद्धा, अस्पृश्यता या सारख्या विषयावर व्ाख्याने होत. लोक चौकात एकमेकास प्रेमाने रंग लावत. शतकापूर्वी बीडची मंदिरे आजच्या सारखी नव्हती. नगरीतील मुख्य मंदिर कंकालेश्वर बंद होते. तिथे खनकाह होते. पुढे महाशिवरात्रीच्या जत्रेलाही बंदी घालण्याचा निर्णय निझामाच्या मंत्रिमंडळाने घेतला. निझामाने सरकारी हुकूम काढून शामबुवा पाठक या पुजाऱ्यास मंदिरात पूजेसाठी नियुक्त केले. ही कोंडी फुटायला 1915 उगवावे लागले. क्रांतिकारी तरुण पुरुषोत्तम गोडसे याने निझामाला भीक न घालता पोलिसांचे कडे तोडून कंकालेश्वर मंदिरातील पिंडीला अभिषेक केला. 17 सप्टेंबर 1948 अर्थात हैदराबाद स्वातंत्र्यदिनी दिवशी हे मंदिर खऱ्या अर्थाने मुक्त झाले. 

                     पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथे अश्वलिंग संस्थानवर ऐतिहासीक शिवमंदीर प्रसिद्ध आहे. 

                     महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनात र्शावण महिन्यात माजलगाव तालुक्यातील पुरूषोत्तमपुरीत पुरूषोत्तमाच्या दर्शनास जातात. अधिक मासात या ठिकाणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यात पुरूषोत्तमपुरीचे मंदीर उल्लेखनीय ठरते. या मंदिराचे यादवकालीन वेगळे स्थापत्य की मंदिराच्या बांधकामात वापरलेल्या विटा चक्क पाण्यावर तरंगतात. इसवीसन 1310 मध्ये रामचंद्रदेव यादवांचा मंत्री पुरूषोत्तम याने हे मंदिर उभारले. त्यामुळे या भागास पुरूषोत्तमपुरी नाव पडले. मंदिरातील मुख्य देवतेलाही पुरूषोत्तम या नावाने ओळखल्या जावू लागले. 

                        मराठवाड्यातील एकमेव असलेल्या ब्रनाथ येळंब येथील ब्रनाथ महाराजांचा यात्रोत्सव र्शावण महिन्यात चौथ्या सोमवारी मोठय़ा उत्साहात पार पडला. या वेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी शिरूरतालुक्यातील येळंब येथे ब्रrानाथ महाराजांचे मराठवाड्यातील एकमेव मंदिर आहे. नगर-बीड या दोन जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील या मंदिरास शेकडो वर्षांची परंपरा आहे. सिंदफणा नदीच्या काठावर असणार्‍या ब्रrानाथ महाराजांच्या हेमाडपंती मंदिराचा सध्या जीर्णोद्धार करण्यात येत आहे. मूळ गाभारा दगडाचाच ठेवून सभागृह व अन्य कामे लोखंड व सिमेंटची करण्यात येत आहेत. र्शावण महिन्यात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्याही मोठी असते. चैत्र महिन्यातील तिसर्‍या सोमवारी अंबिलचा कार्यक्रम होतो. या दिवशी सर्व जाती धर्माचे लोक महराजाच्या अंबिलाचा आस्वाद घेतात. चौथ्या सोमवारी युवकांनी गंगेहून आणले. या कावडीची मिरवणूक काढण्यात आली. कावडीच्या पाण्याने ब्रrानाथ महाराजांना अभिषेक करण्यात येतो. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

                        शाहूनगर भागातील गजानन कॉलनी येथे अर्धा एकर क्षेत्रफळ असलेल्या व 37 बाय 22 या जागेत लोकसहभागातून मंदिराचे तळघर व स्लॅबचे काम पूर्ण झाले. या मंदिरात राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान आणि गणपती या पाच मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. एक कासवही आणले जाणार आहे. 

                 बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रायमोह गावापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर येवलवाडी येथे जालिंदरनाथांचे पुरातन मंदिर आहे. परिसरात विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर, हनुमान मंदिर आहे

                बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बर्‍हाणपूर येथे मावलाई देवीचे पुरातन मंदिर आहे. एप्रिल महिन्यात विविध ठिकाणी पंधरा, आठ आणि दोन दिवसांची यात्रा भरते.परंपरेनुसार याही वर्षी यात्रेत माणसांकरवी बारा गाड्या ओढल्या जाणार आहेत. यात्रेच्या दुसर्‍या दिवशी लोकवर्गणीतून कुस्ती स्पर्धा घेतली जाते. राज्यस्तरावर लिखान करणारे पत्रकार, राष्ट्रीय व राज्य खेळाडू तयार करणार्‍या संघटकाला येथील मावलाई बहुद्देशीय संस्थेच्या वतीने मावलाई राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो.

  • दत्तमंदिर, बीड शहरातील सुभाष रोडवरील ऐतिहासीक दत्तमंदिर प्रसिद्ध आहे. दत्तमंदिराच्या सांस्कृतिक सभागृहाचे व जीर्णोद्धाराचे काम चालू 
  • कोळगांव (गेवराई तालुका, बीड जिल्हा) गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे सूर्यमंदिर देवगिरी संस्थान आहे. हनुमानमहाराज हाडुळे हे संस्थानचे मठाधिपती आहेत.
  • तारकेश्वरगड, बीड जिल्हा येथे वेदांतचार्य सद्गुरू नारायण महाराजांची समाधी आहे.

                                 श्रीक्षेत्र कपिलधार हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील एक निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे. बीड शहराच्या दक्षिणेस १९ किमी मांजरसुंभा व तेथून दीड किलोमीटरवर छोट्या टेकड्यांच्या दरीत दहा मीटर उंचीवरून पडणाऱ्या जलप्रपाताच्या पायथ्याशी हे स्थान आहे. येथे मन्मथस्वामींचे या लिंगायतांच्या सत्पुरुषाची टुमदार समाधी मंदिर आहे. लिंगायतपंथीयां ते एक श्रध्दास्थान आहे. जवळच कपिलधार नावाचा धबधबा आहे. गर्द वनश्रीच्या सान्निध्यात येथे. तुलसीविवाहाच्या वेळी येथे पाच दिवस यात्रा भरते. 

                             सुमारे ७00 यादवकालीन आडाचा इतिहास असलेल्या शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र नागनाथ मानूर. कालौघात या गावातील तब्बल साडेसहाशे आड आज बुजून गेले आहेत तर उरले सुरले पाच पन्नास आड जुन्या इतिहासाची साक्ष देत कसेबसे आपले अस्तित्व जपत आहेत. या गावचा गत इतिहास पाहता त्रिकोनी, चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी अशा प्रकारचे आड येथे आहेत. काही भागात तर खापरी आड ही बघायला मिळतात. खापरापासून तयार करण्यात आल्यामुळे त्यांना खापरीआड म्हणत. सातशे आड आणि सातशे माड (मंदिर) असलेले मानूर हे परिसरात एकमेव गाव आहे.

                      पाटोदा तालुक्यात पिंपळवंडी या गावालगत डोंगरदरीत असलेल्या आणि कार्तिकस्वामी मंदिरामुळे अलीकडील काळात भाविकांची रीघ वाढल. तेराव्या शतकात यादव काळात निर्माण झालेल्या हेमाडपंती मंदिरांमध्ये पिंपळवंडी येथील अश्वलिंग, कार्तिकस्वामी मंदिराची उभारणी झाली. निझाम राजवटीत संकटांचा सामना करूनही हे देवस्थान आज तेवढय़ाच ताठ मानेने उभे आहे. भारती परंपरा आणि संन्याशी मठाची परंपरा लाभलेल्या या संस्थांचा कारभार सध्या महादेवानंद भारती (मधुकर शास्त्री महाराज) हे पाहत आहेत. पिंपळवंडीचे अश्वलिंग देवस्थान मात्र गेल्या दहा वर्षांपर्यंत तरी दुर्लक्षितच होते. याबरोबरच मागील दहा वर्षांपासून येथील कार्तिकस्वामी मंदिरही मराठवाड्यातील भाविकांच्या दृष्टिपथात आले. कार्तिक पौर्णिमेला दर्शनासाठी भाविक गर्दी करू लागले. 

  • तलवाडा (गेवराई तालुका, बीड जिल्हा) 
  •                                               बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात तलवाडा या गावी डोंगरावर र्शी त्वरिता देवीचे भव्य मंदिर आहे. भक्ताच्या हाकेला त्वरित म्हणजे लवकर धावते म्हणून देवीला त्वरिता देवी नाव पडले. हे मंदिर 1662 मध्ये निर्मित शिवकालीन मंदिर असल्याचा उल्लेख दीपमाळेवरील शिलालेखावर आहे. तलवाडा गावचे नाव निझाम राजवटीत त्वरितापूर होते असे म्हटले जाते. त्वरितापूर निवासिनी त्वरिता देवी असा उल्लेख इतिहासात आढळतो. देवीच्या चार हातात कमळ, खंजीर, गदा, परशु अशी चार आयुधे आढळतात. देवीची मूर्ती स्वयंभू सुमारे तीन फूट उंचीची आहे. त्वरिता देवीचे रूप विष्णुरूपी असून, मूर्ती चतुभरुज आहे. देवी चौरंगावर विराजमान आहे म्हणून त्वरिता देवी ही नारायणी वैष्णवीचा अवतार मानली जाते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. गाभारा पूर्व-पश्चिम आहे. डोंगराच्या पायथ्याशी तुळजा देवी मंदिर आहे. मंदिरात देवीच्या दर्शनाला जाणार्‍यांसाठी एकाबाजूने 200 पायर्‍या आहेत व दुसर्‍या बाजूने मंदिरापर्यंत वाहन जाते. नारायणी त्वरिता देवीचे हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असल्याचे मानले जाते. दसरा, हनुमान जयंती चैत्रपौर्णिमेनंतर यात्रा महोत्सव भरतो. त्वरितादेवी ट्रस्ट या मंदिराची देखरेख करते. 
  • औरंगपूर (अंबाजोगाई तालुका, बीड जिल्हा) 

                                औरंगपूर तालुका अंबाजोगाई या गावाजळव कळंब-अंबाजोगाई रस्त्यावर उभा राहत असलेल्या सद्‌गुरू संत तुकाराम महाराज पावनधामवर तुकाराम बीजनिमीत्त फार मोठा धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात. संत तुकाराम मंदिर असलेले मानूर हे बीड जिल्ह्यात एकमेव गाव आहे. संत तुकाराम मंदिर महाराष्ट्र, कर्नाटकात कुठेच नाही. 

  • बीड जिल्ह्यात दगडवाडी-खरगवाडी या गावी डोंगरावर र्शी ज्ञानेश्वर आर्शमत्व आहे. 
  •  
  • रामगड, बीड जिल्हा बीड जिल्ह्यात शहरानजीक असलेल्या र्शीक्षेत्र रामगड येथे र्शीराम, लक्ष्मण व सीतामाई यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आहे. रामगडही प्रभू रामचंद्राने पाऊल ठेवलेली भूमी असून वनवासात असताना प्रभू रामचंद्रांनी मुक्काम केलेली जागा आहे.
  • मोहिनीराज, बीड बीड तालुक्यातील बालाघाट डोंगर पट्टयामधील बोरफडी आणि हिवरा पहाडी गावाच्या मध्य ठिकाणी उंच डोंगरावर भगवान शंकराचे श्री क्षेत्र मोहिनीराज देवस्थान आहे.
  • मंजरथ, बीड जिल्हा बीड जिल्ह्यात मंजरथ हे गोदावरीच्या काठावरील तीर्थक्षेत्र असून, या ठिकाणी गोदावरी आणि सिंदफणा या नद्यांचा संगम आहे. या गावास दक्षिण काशी असे संबोधले जाते. या ठिकाणी त्रिविक्रमाचे मंदिर आहे. ४00 वर्षांपूर्वी अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला ८00 फूट लांब आणि ६0 फूट उंच घाटही.
  • रामगड, बीड जिल्हा बीड जिल्ह्यात शहरानजीक असलेल्या बाजारपुल जैनभवनाजवळ येथे मुक्ताईचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीस्थळ आहे.
  • चिंचवण (महिकावती नगर), बीड:-येथे मंकावती देवीचे मंदिर शुद्धा येथे पहावयास मिळते.
  • राजाहरिश्चंद्र मंदिर, बीड राजाहरिश्चंद्र यांचे जागृत आणि भारतातील एकमेव मंदिर हरिश्चंद्र पिंपरी ता.वडवणी, जी.बीड येथे आहे.
  • मांजरसुभा, बीड हे गाव बीड तालुक्यात आहे. बीड, अहमदनगर उस्मानाबाद व अंबेजोगाईस जाणारे रस्ते या ठिकाणी एकत्र येतात.    गोदाकाठी राक्षसभूवन, पुरूषोत्तमपुरी, मंजरथ, गंगामसला येथे प्राचीन मंदिरे आहेत.
  • नायगाव अभयारण्य:- भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांसाठी प्रसिद्ध असलेले नायगाव अभयारण्य बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात आहे.
  • आष्टी :- आष्टी तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथील हजरतशाह बुखारी यांचा दर्गा अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
  • सौताडा :- हे स्थळ पाटोदा तालुक्यात असून येथील विंचरणा नदीवरील धबधबा प्रसिद्ध आहे. विंचरणेचा प्रवाह येथे सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत कोसळतो. (६८.५९ मी.) असून त्याच्या पायथ्याशी रामेश्वर मंदिर आहे. तेथे श्रावणात तिसऱ्या दिवशी मोठी यात्रा भरते. 350 फूट उंचावरून पडणारा रामेश्वर धबधबा आणि निसर्गरम्य रामेश्वर मंदिर कायमच पर्यटकांना खुणावत असते. विविध प्रकारची वनराई फुलवतानाच पर्यटकांना जाण्या-येण्यासाठी छोटे रस्ते, पॅगोडा, वाहनतळ, व्ह्युह पॉइंट तसेच लहान आकाराचे साठवण बंधारे बांधण्यात आले आहेत. वनविभागाच्या बीड परिक्षेत्राच्या पाटोदा उपवन विभागामार्फत रामेश्वर परिसरात पर्यटनस्थळ विकास करण्यात आला आहे. शिवदरा येथील शिवमंदिर शिवद-याच्यानिसर्ग रम्य परिसरात शिवमंदीरासह विठ्ठल रूक्मीणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, कार्तीक स्वामी मंदिर आहे. शिरूरकासार येथे महाशिवरात्रीनिमित्त धाकटी अलंकापुरी सिद्धेश्वर संस्थानवर भाविकांनी दर्शनासाठी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली.
  •  
  •  बीड जिल्ह्यातील शिवालये
  • कंकालेश्‍वर,
  • सोमेश्‍वर,
  • निळकंठेश्वर,
  • पुत्रेश्वर,
  • जटाशंकर,
  •  मार्कंडेश्वर,
  • पापनेश्‍वर,
  • पुत्रेश्‍वर, 

  • बीड तालुक्यातील कपीलधार,
  • चाकरवाडी,
  • नागनाथ देवस्थान,
  • बेलश्वर गेवराई येथील चिंतेश्‍वर महादेव मंदिर,
  •  कल्पेश्‍वर,
  • रूद्रेश्‍वर,
  • भाटेपुरी 
  •  पाटोदा तालुक्यातील अश्वलिंग,
  • भामेश्वर,
  • सौताडा येथील रामेश्‍वर मंदिर 
  • आष्टी येथील पिंपळेश्‍वर  महादेव मंदिर 
  • माजलगाव येथील सिध्देश्वर  केज तालुक्यातील उत्तरेश्‍वर पिंप्री,
  • तांबवेश्वर
  •  धारुरचे धारेश्वर,
  • कारी येथील सिध्देश्वर
  • अंबाजोगाईच्या खोलेश्वर, बुट्टेनाथ
  • शिरुर कासारच्या सिध्देश्वर मंदिर
    परळी वैजनाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.

याशिवाय धारूर (धारूर तालुक्याचे मुख्य ठिकाण) हे एक . ऐतिहासिक स्थळ आहे. येथे फतेहबाद नावाचा डोंगरी किल्ला आहे. सोन्याचांदीच्या व्यापारासाठीही प्रसिद्ध. अमळनेर (पाटोदा तालुक्यात . तांब्या पितळेच्या भांडयासाठी प्रसिद्ध या उद्योगाचे येथे सु. ११ कारखाने असून त्यांतील विविध प्रकारच्या भांड्यांचा महाराष्ट्रात सर्वत्र पुरवठा केला जातो.), धर्मपुरी (अंबेजोगाई तालुकयात केदारेश्र्वराचे हेमाडपंती मंदिर), पांचाळेश्र्वर ( गोदावरीकाठी, महानुभावपंथीयांचे दत्त मंदिर, हे स्थळ गोदावरी नदीच्या तीरावर असून नदीपात्रात मध्यभागी दत्तमंदिर आहे. हे ठिकाण दत्तात्रेयाचे भोजनस्थळ म्हणून मानले जाते. येथे चैत्र वद्य सप्तमीस मोठी यात्रा भरते ), चिंचोली ( पाटोदा तालुक्यात थंड हवेचे ठिकाण,सर्वांत उंचावर (८८९ मी.), गहिनीनाथाचे मंदिर ), नवगण -राजूरी ( बीड तालुक्यात नऊ गणेशमूर्ती असलेले मंदिर) ही जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची स्थळे आहेत. 

शहरातील खंडोबा मंदिरासमोरील उंच दीपमाळा प्रेक्षणीय आहेत. येथील शहेनशावली,बालाशाह इ. दर्गे प्रसिद्ध आहेत. नारायणगड हे उंच ठिकाण निसर्गसुंदर आहे. येथे विठ्ठल व महादेव यांची मंदिरे असून कार्तिक पौर्णिमेस मोठी यात्रा भरते. येथील मंदिरे व समाध्या दगडी कामासाठी प्रसिद्ध आहेत. यांशिवाय बीडपासून ७ किमी. अंतरावरील वडवनी हे गाव हातमागावरील टेरिकॉटच्या कापडासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात या कापडास मोठ्या प्रमाणात मागणी असते.

बीड शहरातील ऐतिहासीक स्थान: बारादरी : सरदार सुलतानजी निंबाळकर यांचे निवासस्थान. निजामाने त्याचे रूपांतर न्यायालयात केले. मदरसे – फोकानिया : 100 वर्षांपूर्वी निजामाने सर्वात पहिल्या सरकारी शाळेचा पाया रचला. (नंतरची मल्टिपर्पज हायस्कूल) देशमुख यांची हवेली : बीडचे वतनदार सिद्धोजी नाराोजी देशमुख यांची 100 वर्षांपूर्वीची हवेली. जुनी तहसील : बहमनी कालखंडात या ठिकाणी टाकसाळ होती, असे मानले जाते. निजामाने या इमारतीचे रुपांतर रुग्णालयात केले. निजामाची सनद : खंडेश्वरीचे पुजारी बीडकर यांना निजामाने ही सनद दिल्याचा दावा बीडकर करतात. दीपमाळ : खंडेश्वरी मंदिराच्या परिसरातील ह्या दीपमाळ. अनेक वर्षांपासून ऊन वाऱ्याला तोंड देत इतिहास मनात साठवत आहेत. बीडचे जहागीरदार सुलतानजी निंबाळकर यांनी शहराच्या पूर्वेकडील बाजूस उभारलेल्या खंडोबा मंदिरापासून सहा फुट अंतरावर 70 फुट उंचीच्या दोन दीपमाळा उभारल्या. या दीपमाळीवर एकाच वेळी 400 दिवे लावण्याची व्यवस्था आहे. खंडोबाचे मंदिर उभारण्यासाठी जहागीरदार निंबाळकर यांना मराठा सरदार महादजी शिंदे यांनी मदत केली होती. दीड एकराचा हा भाग असून त्यावर ही इमारत आहे. दहा बाय दहा फुट चौथरा असून चुन्याचे बांधकाम आहे. अतिशय नयनरम्य परिसरातील ही वास्तू आजही बीडच्या वैभवाची साक्ष देते. राज्यासह आंध्र, कर्नाटक आदी राज्यातून बीड जिल्ह्यात येणारे नागरिक या ठिकाणी आवर्जून येतात. जवळच खंडेश्वरी देवीचे मंदिर आहे. नवरात्रात हा परिसर लक्ष दिव्यांच्या रांगोळीने उजळून निघतो. या दीपमाळीवर विविध देवतांची शिल्पे आहेत. पूर्वी दीपमाळेच्या टोकावर तुळशीवृंदावन होते ते भग्नावस्थेत आहे. रचना आठ कोनात असून प्रत्येक कोनाला एक खिडकी आहे. दीपमाळेवरुन पूर्ण बीड शहर दिसते.

शहरातील धार्मिक स्थळांचे स्वरूप शतकापूर्वी आज सारखे नव्हते. कंकालेश्वरचे खनकाह होते. दत्त मंदिर मात्र बीडच्या तरुण क्रांतिकारकांचे मुख्य स्थळ होते. असंख्य तरुण इथे व्यायामासाठी येत व राष्ट्रभक्तीवर चर्चा करीत. याच मंदिरात शहरातील पहिला सार्वजनिक गणपती बसवला. पुढे पुरुषोत्तमराव गोडसे यांनी त्या मंडळाचे नेतृत्त्व केले. निझामाच्या कचाट्यातून बीड मुक्त झाल्यावर भारतीय सैन्याचे प्रमुख जनरल चौधरी यांचा सत्कार झाला होता. तो याच मंदिरात.. 

बीड शहरात मुस्लिम बांधवा ईदगाह नाका, गरीब मस्जिद, कादरिया मस्जिद, ईदगाह इस्लामपुरा येथे सामूहिक नमाज अदा करण्यात येते.

माझा महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सविस्तर इतिहास माहिती दररोज एक जिल्हा ह्या स्वरुपात आपणासमोर देत आहोत, तरी आपण त्या संदर्भाचा अभ्यासासाठी नक्कीच उपयोग करून घ्याल अशी प्रांजळ अपेक्षा !!!…..

अधिक माहितीसाठी सहज संपर्क – ७५८८०२०८८६

संकलन आणि मांडणी :-                            

श्री.लक्ष्मण काटेकर, सोलापूर (महाराष्ट्र).

shivnitee@gmail.com

Contact @ 7588020886.

Leave a comment