- माझा महाराष्ट्र – माहिती जिल्ह्यांची –
“अकोला जिल्हा”
भाग 4 था दि. 04 मे, 2025
=========================================================
संकलन आणि मांडणी :-
श्री.लक्ष्मण काटेकर, सोलापूर (महाराष्ट्र).
laxman.katekar@gmail.com
Contact @ 7588020886.
=========================================================
अकोला जिल्ह्याचा इतिहास
अकोला हा विदर्भातील जिल्हा आहे. निजामशाहीच्या काळात हैद्राबाद संस्थानमध्ये समाविष्ट असणारे अकोला हे शहर ब्रिटिश काळात-१९व्या शतकात- बेरार प्रांतात आले. अकोला जिल्ह्यातील आकोट येथे ब्रिटिशांची नागपूरकर भोसल्यांशी लढाई झाली होती. जुन्या किल्ल्यांचे अवशेष आजही अकोल्यात दिसतात. असदगड, नरनाळा हे त्यापैकीच होत.नरनाळा किल्ला आणि तेथील वन्यजीव अभयारण्य ह्या तर आहेतच अकोल्याच्या लक्षणीय गोष्टी. कोणत्याही गावाच्या नावाशी एखादी घटना, कथा-दंतकथा किंवा एखादी व्यक्ती जोडलेली असते. अकोला या शहराशीदेखील अकोलसिंग नावाच्या रजपूत सरदाराचा संबंध आल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. त्यानेच हे शहर वसविल्याचे सांगितले जाते व त्याच्या नावावरूनच शहराचे नाव अकोला ठेवण्यात आले.
अकोला हे उत्तर महाराष्ट्रातीलमहाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे.पूर्वी मध्य प्रदेशमध्ये मोडणारा हा जिल्हा १९५६ साली मुंबई प्रांतात सामील करून घेण्यात आला व त्यानंतर १९६० मध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेबरोबरच अकोला जिल्ह्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला. अकोला जिल्हा हा विदर्भाच्या अमरावती प्रशासकीय विभागात येतो. जुलै १, इ.स. १९९८ रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले.त्यामुळे अकोला व वाशीम हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले.जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पुर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशीम जिल्हा तर पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.
पश्चिम विदर्भात वसलेला अकोला जिल्हा (Akola District)! ’काॅटन सिटी’ म्हणुन सर्वत्र असलेली या जिल्हयाची ओळख आजतागायत कायम आहे. अकोला हे शहर आदिम काळापासुन विदर्भाचा भाग आहे. प्राचीन काळात होउन गेलेल्या राजा अकोलसिंह यांच्या नावावरून या शहराचे नाव अकोला पडले असावे असे इतिहासात डोकावल्यास आपल्याला समजते. राजा अकोलसिंहने गावाचे रक्षण करण्याकरता या ठिकाणी मातीची मोठी भिंत उभारली होती पण याला किल्ल्याचे स्वरूप औरंगजेब साम्राज्याचा नवाब असदखानाने प्राप्त करून दिले. मुगल सम्राट औरंगजेबा ने अकोला हे गाव असदखानाला बक्षिस म्हणुन दिले होते. त्या काळी अकोल्याच्या चारही बाजुने मोठी भिंत बांधण्यात आली त्याला चार मोठे दरवाजे ठेवण्यात आले, दहिहंडा वेस, बाळापुर वेस, अगरवेस आणि गजवेस अशी त्यांची नावं! आज असदगड किल्ल्याची काळाच्या ओघात दुरावस्था झाली असली तरी त्याच्या मजबुत भिंती आजही त्याच्या भक्कमपणाची साक्ष देत भुतकाळाचे स्मरण करून देतात.
अत्यंत सुबक व मनमोहक शहीद स्तंभ 1857 च्या उठावाचे प्रतिक म्हणुन नगरपालीकेच्या वतीने बांधण्यात आला आहे, किल्ल्याच्या पुर्ननिर्मीती करता आणि शहीद स्तंभाच्या बांधकामाकरता 20,951 मजुरांनी काम केल्याचे सांगण्यात येते, 1957 साली सुरू झालेले हे कार्य 12 एप्रील 1959 ला पुर्ण झाले. मोर्णा नदीच्या किना.यावर वसलेला हा किल्ला अकोला शहराचे ऐतिहासिक महत्व आणि वैभवाची साक्ष देतो. किल्ल्यावरून दिसणारा सुर्याेदय आणि सुर्यास्त मनाला सुखावणारा आहे.
- जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – अकोला
- क्षेत्रफळ – 5,429 चौ.कि.मी.
- लोकसंख्या – 18,18,617 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
- तालुके – 7 – अकोट, बाळापूर, तेल्हारा, अकोला, मूर्तीजापूर, पातुर, बार्शी टाकळी.
- सीमा – उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशिम जिल्हा असून पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.
- अकोला हे शहर दोन भागात विभागल्या गेले आहे, मोर्णा नदीच्या एका बाजुला असलेले जुने शहर आणि दुस.या भागात तयार झालेले नवे शहर.
- अकोल्यातला असदगढ किल्ला आणि जवळ असलेले बाळापुर किल्ला आणि नरनाळा किल्ला या शहराला जुना इतिहास असल्याची साक्ष देतात.
- शहराच्या उत्तरेला अमरावती जिल्हयातील अंजनगाव सुर्जी दर्यापुर हे तालुके पुर्वेकडे अमरावती दक्षिणेकडे वाशिम आणि पश्चिमेकडे बुलढाणा जिल्हा आहे. (1999 पर्यंत वाशिम हा अकोल्याचाच भाग होता)
- महान हे मोठे धरण असुन शहराला याच धरणातुन पाणीपुरवठा केला जातो.
- वान हे मोठे धरण तेल्हारा तालुक्यात असुन नैसर्गीक रित्या डोंगराच्या मधे वसलेल्या या धरणाला तीन जिल्हयांच्या सीमा जोडल्या गेल्या आहेत अकोला, बुलढाणा आणि अमरावती
- राजराजेश्वर हे महादेवाचे मंदीर शहराचे आराध्यदैवत असुन अतिशय प्राचीन अश्या या मंदीराला जागृत देवस्थान मानल्या जातं, बरेच अनुभव आणि आख्यायिका या मंदीराशी जोडल्या गेल्या आहेत.
- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे अकोल्याच्या वैभवात भर घालणारे विद्यापीठ कृषी संबंधी नवनवे संशोधनं करण्याकरता प्रसिध्द आहे त्याचा विस्तीर्ण असा हिरवागार परिसर मनाला सुखावणारा आहे.
- या विद्यापीठा समोरच महाबीजची मोठी इमारत दिमाखात उभी आहे.
- सर्वोपचार रूग्णालय या जिल्हयातील शासकीय रूग्णालयामुळे रूग्णांची मोठया प्रमाणात गर्दी शहरात पहायला मिळते.
- शहरात खाजगी रूग्णालयांची मोठया प्रमाणात सुविधा उपलब्ध असल्याने दुरूनदुरून रूग्ण उपचाराकरता या ठिकाणी येतात
अकोला जिल्हा विशेष –
- अकोला हे शहर अकोलसिंग नावांच्या रजपूत सरदाराने वसविले असल्याचे सांगितले जाते. या शहराचा ‘आईन-ए-अकबरी’ यामध्ये नरनाळ्याच्या सुभ्याचा अकोला हा एक परगणा असल्याचा उल्लेख आढळतो. कापसाचे आगार म्हणून हा जिल्हा ओळखला जातो.
- 22 किमी. क्षेत्रावर पसरलेला, 67 बुरूज व 27 दरवाजे असलेला किल्ला इतिहास प्रसिद्ध असू गाविलगडच्या पर्वतरांगेत वसला आहे.
अकोला जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
- अकोला – मोरणा नदीमुळे या शहराचे जुने व नवे असे दोन भाग पडलेले आहे. पंजाबराव कृषी विधापीठाचे मुख्य ठिकाण, सतीमाता मंदीर व जैन मंदीर व जैन मंदीर प्रसिद्ध आहे.
- बाळापूर – बालापूरचा किल्ला 1757 मध्ये इस्माईल खानाने पूर्ण केला या किल्ल्याच्या खाली बळादेवीचे मंदीर आहे.
- नरनाळा – येथील 22 दरवाज्यांचा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे. 1509 मध्ये महाबत खानाने बाधलेली मस्जिद आहे.
- मूर्तीजापूर – येथे संत गाडगे महाराजांचा आश्रम आहे.
- पातुर – हे साग व चंदनी लाकडासाठी प्रसिद्ध आहे.
- पारस – औष्णिक वीज निर्मिती केंद्र.
- अकोट – सतरंज्या व गोणी प्रसिद्ध.
- आडगाव – ता. अकोट, मुगल काळातील परगण्याचे हे केंद्र. याच गावात 1671 साली व्दारकेश्वराचे मंदीर बाधण्यात आले. गावाजवळच इंग्रज अधिकारी मेजर बुलक याचे थडगे आहे.
- हिवरखेड – आंब्यासाठी प्रसिद्ध आहे.
अकोला जिल्हयाची वैशिष्ट्ये –
- मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात सातपुड्याच्या पर्वत रांगेतून उगम असलेली पूर्णा नदी ही अकोल्या जिल्ह्याची प्रमुख नदी होय.
- अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम या जिल्ह्याची निर्मिती 1 जुलै 1998 रोजी करण्यात आली.
- अकोला जिल्ह्यातून गेलेले राष्ट्रीय हमरस्ते – धुळे-कोलकत्ता (6)
- अकोला जिल्ह्यात शिवाजी शिक्षण संस्थेच्या जास्त शाळा आहेत.
अकोला जिल्ह्यातील पर्यटन स्थळं – Places to Visit in Akola
- सालासार बालाजी मंदीर – Salasar Balaji Temple
अकोला शहरातील गंगा नगर भागात 2014 साली या मंदीराची निर्मीती करण्यात आली असुन अतिशय विस्तीर्ण परीसरात देखणे मंदीर भावीकांचे आणि पर्यटकांचे लक्ष वेधुन घेण्यात यशस्वी झाले आहे. मंदीरात हनुमानाची, श्रीराम दरबार, राधाकुष्णाची, आणि महादेवाची मुर्ती स्थापीत करण्यात आली असुन स्वच्छ आणि सुशोभीत केलेला परिसर पाहुन मनाला प्रसन्नता आणि शांतीचा लाभ मिळतो, समोरच हिरवळीचा बगीचा तयार केला असुन विविध रंगीबेरंगी कारंजे देखील आकर्षक आहेत. नित्य होत असलेली भजनं, धार्मीक कार्यक्रमांमुळे भक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.
- अन्नपुर्णा माता मंदीर – Annapurna Mata Mandir
येथुन काही अंतरावर अन्नपुर्णा मातेचे मंदीर देखील पाहाण्यासारखे आहे.
- राजराजेश्वर मंदीर – Raj Rajeshwar Temple
अकोला शहरातील जुने शहर भागात असलेले हे मंदीर अकोला शहराचे ग्रामदैवत आहे. फार प्राचीन असा इतिहास या मंदीराला लाभलेला असुन महादेवाचे फार भव्य असे शिवलिंग या ठिकाणी आहे. या मंदीराविषयी एक कहाणी सांगितली जाते ती अशी राजा अकोलसिंहाची पत्नी या महादेवाची निस्सिम भक्त होती ती भल्या पहाटे या शिवलिंगाचे दर्शन घेण्याकरता नियमीत या मंदीरात येत असे, राजा अकोलसिंहाला राणीवर संशय आल्याने त्याने एकदा तिचा पाठलाग केला राणी शिवलिंगाचे दर्शन घेत असल्याचे पाहुन राजा मनोमन खजील झाला पण संशय घेतल्याने राणी दुखावली गेली तिने राजेश्वराला स्वतःमधे सामावुन घेण्याविषयी साकडे घातले त्याचक्षणी पिंड दुंभगुन राणी त्यात गुप्त झाली, पुढे कित्येक दिवस राणीचे केस आणि साडीचा पदर शिवपिंडी बाहेर होते पण नित्य पुजेमुळे आज तो पदर जरी त्या ठिकाणी दिसत नसला तरी शिवपींडीला पडलेली भेग आजही पहायला मिळते . प्रत्येक सोमवारी, श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला राजराजेश्वराच्या दर्शनाकरता भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी या ठिकाणी पहायला मिळते.
या शिवाय राणीसती मंदीर, रिझर्व माता, अक्कलकोट ची देवी ही देवीची मंदीर नवरात्रात भाविकांच्या गर्दीने ओसंडुन वाहात असतात.
- पातुरची रेणुका माता – Renuka Mata Temple
अकोला शहरापासुन जवळपास 30 कि.मी. अंतरावर पातुर तालुक्यात उंच गडावर आई रेणुकेचे मंदीर आहे. जे भाविक माहुर ला जाउन रेणुका देवीचे दर्शन घेउ शकत नाही ते या ठिकाणी येउन दर्शनाचा लाभ घेतात. हिरव्यागार उंच गडावर आई रेणुकेचे हे मंदीर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आहे. या गडावरून संपुर्ण पातुर चे विहंगम दृश्य नजरेस पडते. जवळपास दोनशे ते 250 पाय.या चढुन मंदीरात दर्शनाकरता जाता येते, मंदीरात आल्यानंतर आई रेणुकेचा मुखवटा दृष्टीस पडतो आणि भाविक सर्व श्रम कष्ट विसरतात. पातुरला रेणुकामातेच्या दर्शनाला यावयाचे असल्यास अकोल्यावरून मोठया प्रमाणात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आणि खाजगी बसेस उपलब्ध आहेत शिवाय खाजगी वाहनाने देखील या ठिकाणी पोहोचता येते.
- काटेपूर्णा अभयारण्य – Katepurna Wildlife Sanctuary
अकोला शहरापासुन 30 कि.मी. अंतरावर निसर्गाने वेढलेले आणि प्राकृतिक सौंदर्याचा परिसस्पर्श झालेले काटेपुर्णा अभयारण्य पशु पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. अनेक पक्षी आणि प्राणी इथे वास्तव्याला असुन निसर्गप्रेमी मोठया संख्येने इथे भेट देण्याकरता गर्दी करतात अनेक प्रकारच्या वनस्पती आणि वृक्ष येथे असुन जवळपास 115 प्रकारच्या वनस्पती इथे आढळतात. काटेपुर्णा अभयारण्य चार शिंगाच्या अॅंटीलोप आणि भुंकणा.या हरणाकरता प्रसिध्द आहे. या व्यतिरीक्त काळे हरीण, कोल्हा, जंगली डुक्कर, ससा, निलगाय, जंगली मांजरी, मोर आणि माकड देखील आहेत. काटेपुर्णा जलाशयामुळे या ठिकाणी विविध प्रजातींचे पक्षी देखील आकर्षीत होतात.
- नरनाळा किल्ला – Narnala Fort
अकोल्यापासुन साधारण 65 कि.मी. अंतरावर नरनाळा किल्ला असुन यालाच शहानुर किल्ला देखील म्हंटल्या जातं. या किल्ल्याचे नाव राजपुत शासक नरनल सिंह यांच्या नावावरून ठेवण्यात आले. 15 व्या शतकात या किल्ल्यावर मोगलांनी कब्जा केला आणि याचे पुर्ननिर्माण केले त्यामुळे याला शहानुर किल्ला देखील म्हंटले जाते. आज या किल्ल्याची दुरावस्था झाली असुन ब.याच गोष्टी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत तरीही बुलंद दरवाजा, येथील तोफ, किल्ला पाहाण्यासारखा आहे. आजुबाजुला असलेले सृष्टीसौंदर्य पाण्याचे तलाव येथील निसर्गसौंदर्यात भर घालतात.
खटकाली, पोपटखेड येथील धरण ही देखील प्रेक्षणीय स्थळं असुन पाहाण्यासारखी आहेत वळणावळणाच्या या रस्त्यावर खाजगी वाहनाने येणे श्रेयस्कर ठरते.
- वारी हनुमान – Wari Hanuman Mandir
तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान हे ठिकाण भाविकांकरता आणि पर्यटकांकरता आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. रामदास स्वामींनी या ठिकाणी हनुमानाची मुर्ती स्थापीत केली असुन दुरून दुरून या ठिकाणी भाविक दर्शनाकरता आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याकरता येत असतात. मंदीरा नजीक हनुमान सागर प्रकल्प नावाचे मोठे धरण असुन आसपासच्या परीसरातील सर्वात मोठे धरण म्हणुन प्रसीध्द आहे. डोंगरांच्या सान्निध्यात तयार झालेल्या या धरणातुन पावसाळयात पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर या मंदीराजवळचा परिसर अतिशय सुरेख दिसतो. या ठिकाणी भाविक मोठया प्रमाणात भंडारे आणि रोडगे करण्याकरता एकत्र येतात. मामा भाच्चा नावाचा डोह या ठिकाणी असुन या ठिकाणी मामा आणि भाच्च्याने एकत्र अंघोळ करू नये असे मानल्या जाते. या ठिकाणी येण्याकरता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध असुन खाजगी वाहनाने देखील या ठिकाणी पोहोचता येतं.
- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ – Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth
महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ म्हणुन नावलौकीक मिळवलेल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा परिसर अकोला शहराचे वैभव आहे. 20 ऑक्टोबर 1969 ला या कृषी विद्यापीठाची अकोल्यात स्थापना झाली. संशोधनं, कृषी शिक्षण, शिक्षण विस्तार, अनुसंधान अश्या जवाबदा.या कृषी विद्यापीठ आज पार पाडत आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपुर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ हे विदर्भातील 11 जिल्हे कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.
कृषी विद्यापीठाचे नागपुर येथे एक केंद्र असुन गडचिरोली येथे नुकतेच एक केंद्र स्थापीत झाले आहे.
विद्यापीठ परिसर फार विस्तीर्ण असुन हिरवळीने नटलेला आहे. मोर, ससे, विविध सापांच्या प्रजाती, हरीण येथे नेहमी पहायला मिळतात. इथली हवा शुध्द आणि प्रदुषणरहीत असल्याने सकाळच्या वेळेस माॅर्निंग वाॅक करण्याकरता शेकडो नागरिक इथे येतात.
| इतर नावे | ताप्ती |
| उगम | मुलताईजवळ |
| मुख | अरबी समुद्र |
| पाणलोट क्षेत्रामधील देश | मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात |
| लांबी | ७२४ किमी (४५० मैल) |
| उगम स्थान उंची | ७४९ मी (२,४५७ फूट) |
| पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ६५,१४५ |
| उपनद्या | पूर्णा, गिरणा नदी, वाघूर |
| धरणे | उकाई धरण, काकरापार धरण, हतनूर धरण |
उगम
तापी नदी मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात मुलताईजवळ उगम पावते. या ठिकाणाचे संस्कृतातील मूळ नाव मूळतापी” आहे.
मुख
670 कि.मी. लांबीचा प्रवास केल्यानंतर तापी सुरत शहराजवळ खंबाटच्या आखातात अरबी समुद्राला जाऊन मिळते.
उपनद्या
पूर्णा नदीचा उगम सातपुड्याच्या डोंगरांत मध्यप्रदेश राज्याच्या दक्षिण भागात भैसदेही येथून झाला आहे. हिचे प्राचीन नाव पयोष्णी असे आहे. ही नदी तापी नदीला संमातर अशी पश्चिमेकडे वाहत वाहत, शेवटी जळगाव जिल्ह्यातील चांगदेव येथे तापी नदीला मिळते. आरणा नदी, आस नदी, उतावळी नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी,गांधारी नदी, गोतमा नदी, चंद्रभागा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, निर्गुणा नदी, पेंढी नदी, बोर्डी नदी, भावखुरी नदी, मन नदी, मास नदी, मोर्णा नदी, वाण नदी,विश्वगंगा नदी, शहानूर नदी, ज्ञानगंगा नदी या पूर्णेच्या उपनद्या आहेत. पूर्णा नदी ही तापी नदीची उपनदी आहे. पूर्णा नदी अमरावती, अकोला, बुलढाणा व जळगाव या जिल्ह्यांमधून वाहते. पूर्णा नदीचे खोरे सुमारे ७५०० किलोहेक्टर इतके आहे. एकेकाळी बारमाही वाहणारी ही नदी आता अपुरा पाऊस व उगम स्थळावरील जंगलतोड यामुळे मृतावस्थेकडे झुकत आहे.
पूर्णा नदीला संपूर्णा नदी किंवा पयोष्णी नदी असेही म्हणतात,
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुका पूर्णपणे पूर्णा नदीवर अवलंबून आहे.
अनेर नदी
| अनेर नदी | |
| पाणलोट क्षेत्रामधील प्रदेश- बडवानी जिल्हा, मध्य प्रदेश, | जळगाव जिल्हा, महाराष्ट्र |
अनेर नदी ही मध्य प्रदेश–महाराष्ट्र राज्यांतील सातपुडा टेकड्यांच्या दक्षिण उतारावर ६०० मीटर उंचीवरील, अक्षांश २१° २३‘ उ./७५° ४५‘ पूर्व, या जागेवर उगवते. जळगाव जिल्ह्यातील वैजापूर हे गाव पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरील शेवटचे गाव आहे. या गावातून वाहणारी अनेर नदी ही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची नैसर्गिक सीमारेषा आहे. पुढे ही
नदी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून वाहते. तापीला उजवीकडून मिळणारी ही तापीची सर्वात मोठी उपनदी आहे. नैर्ऋत्य दिशेला ९४ कि.मी. वाहून, अनेर नदी जळगाव जिल्ह्यातील पिळोदा या गावाजवळ तापीला मिळते. अनेर नदीच्या काठावर तोंदे, अजंदे, होळ, नांथे, मोहिदा, वेळोदे, पिळोदा ही गावे आहेत. जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले अनेर धरण हे मातीचे धरण याच नदीवर आहे. अनेर नदीचे खोरे १७०२ चौरस किलोमीटर आकारमानाचे आहे.
उगम
गिरणा नदी ही भारत देशामधल्या महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ती नाशिक जिल्ह्यात सह्याद्री डोंगर रांगेमधील ‘दळवट’ या गावी उगम पावते. ही नदी नाशिक जिल्ह्यात सुरवातीला पूर्व दिशेला वाहते आणि नंतर जळगाव जिल्ह्यात उत्तरेकडे मार्ग बदलून तापी नदीला मिळते.
उपनद्या
वाटेत तांबडी, आराम, मालेगावजवळ मोसम आणि नंतर पांझण या प्रमुख नद्या मिळाल्यावर ती नांदगाव तालुक्याच्या सीमेवरून ईशान्य दिशेने जळगाव जिल्ह्यात शिरते. चाळीसगाव तालुक्यातून भडगाव महालातील भडगावनंतर थोडे पूर्वेस गेल्यावर तिला तितूर नदी मिळते. मग भडगाव, पाचोरा, एरंडोल, जळगाव तालुक्यांच्या सीमांवरून जाऊन भुसावळ — सुरत लोहमार्गाच्या उत्तरेस वायव्येकडे व नंतर पश्चिमेकडे जाऊन अंमळनेर, एरंडोल, जळगाव व चोपडा तालुक्यांच्या सीमांजवळ ती तापीस मिळते.
खोरे
गिरणा नदीच्या खोऱ्यातील जमीन उपजाऊ आहे व ती तीव्रतेने कसली जाते. गिरणेच्या खोऱ्यात भात, नागली, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा व इतर द्विदल धान्ये, ऊस, भुईमूग, कापूस इ. पिके होतात.
गिरणा-तांबडी संगमानंतर चणकापूर येथे व चाळीसगाव तालुक्यात जामदा येथे गिरणेवर बांध घालून कालवे काढलेले आहेत. तसेच गिरणा धरण हे धरणही प्रसिद्ध आहे. मालेगाव तालुक्यातील पांझण धरणयोजनेचा फायदा मुख्यतः जळगाव जिल्ह्यालाच होणार आहे. वाघूर नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. ती तापी नदीची उपनदी आहे. वाघूर नदीचा उगम औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा लेणी मध्ये झाला आहे. ही नदी औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यांमधून वाहते. भुसावळतालुक्यातील शेळगावजवळ वाघूर नदीचा तापीशी संगम झाला आहे. पौराणिक दाखल्यांनुसार तापीला सूर्यकन्या मानले जाते. या नदीच्या नावावरून १९१५ साली थायलंड येथील एका मोठ्या नदीचे ‘तापी’ असे नामकरण केले गेले.
भावखुरी नदी ही महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी शहानूर नदीची उपनदी आहे, आणि शहानूर नदी ही पूर्णा नदीची उपनदी आहे.
वाण नदी ही पूर्णा नदी ची उपनदी आहे. वाण नदी अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्हामधून वाहते.
माझा महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सविस्तर इतिहास माहिती दररोज एक जिल्हा ह्या स्वरुपात आपणासमोर देत आहोत, तरी आपण त्या संदर्भाचा अभ्यासासाठी नक्कीच उपयोग करून घ्याल अशी प्रांजळ अपेक्षा !!!…..
अधिक माहितीसाठी सहज संपर्क – ७५८८०२०८८६
संकलन आणि मांडणी :-
श्री.लक्ष्मण काटेकर, सोलापूर (महाराष्ट्र).
Laxman.katekar@gmail.com
Contact @ 7588020886.