अमरावती जिल्हा

  • माझा महाराष्ट्र – माहिती जिल्ह्यांची –

अमरावती जिल्हा

भाग 3 रा                                                     दि. 03 मे, 2025

=========================================================

संकलन आणि मांडणी :-                           

श्री.लक्ष्मण काटेकर, सोलापूर (महाराष्ट्र).

laxman.katekar@gmail.com

Contact @ 7588020886.

=========================================================

अमरावती

अमरावतीचे प्राचीन नाव ‘उदुंबरावती ’ याचे प्राकृत नाव ‘उमरावती’ आणी अमरावती हे नाव अनेक शतकापासुन आहे. अमरावतीला प्राचीन अंबादेवी मंदीर आहे त्यापमुळे अमरावती नाव आहे असा समज आहे. अमरावतीला प्राचीन शिलालेख आहेत ते ही १०९७ मध्येर भगवान आदीनाथ आणी भगवान रिशबनाथ यांचे संगमरवरी दगडाचे पुतळे उभारले आहेत.१३ व्या शतकामध्येय गोविदंप्रभुनी अमरावतीला भेट दिली. याच काळात वरहद हा देवगिरीचा हींदुराजा (यादव)च्याय नियमानुसार राहत होता. १४ व्याि शतकामध्येा अमरावतीचे काही लोक अमरावती सोडुन गुजरात आणी माळवा या भागात स्थायईक झाले. अमरावतीचे स्था निक लोक काही काळा नंतर परत अमरावतीला आले. १६ व्या शतकामध्ये. औरंगपुरा ( आत्तााचा साबणपुरा) कडुन जुम्माी मशिद बादशहा औरंगजेबास भेट म्हणुन दिले. १७२२ मध्ये छत्रपती शाहु महाराज अमरावती आणी बडनेरा येथे राणोजी भोसले यांना भेटले. जेव्हाा अमरावती भोसले की अमरावतीला म्हरणुन ओळखत होते.अमरावतीची पुर्नबांधणी आणी भरभराठी राणोजी भोसले यांनी देवगाव आणी अजंनगाव सुर्जी चा तह आणी गावीलगडचा विजय (चिखलद-याचा किल्लाा) झाला तेव्हाद केली. ब्रिटीश जनरल ऑथर वेलस्ली चा अमरावती येथे कॅम्पज अमरावती .

भौगालीकदृष्ट या अमरावती ही समुद्रसपाटी पासुन ३४० मी. वेढलेली आहे. शहराच्या पुर्व भागाकडे पोहरा व चिरोडीच्याग टेकडया आहेत. माल टेकडी ही शहराच्या मध्य भागी आहे. मालटेकडीची उंची ६० किमी आहे. हा पुतळा मराठयांचा जाणता राजा श्री शिवाजी महाराजाचा मोठया उंचावर आहे. पुर्वेकडे दोन मोठे तलाव आहेत, एक म्हणजे छत्री तलाव आणी दुसरे म्हवणजे वडाळी तलाव. महाराष्ट्राोच्याआ पुर्वेकडील भागात अमरावती आहे . मुबंई – कलकत्तां हायवे मार्ग आहे. पश्चिम विदर्भाचे हे मुख्य विभाग आहे

अमरावती (मूळ नाव उमरावती) हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील एक शहर आहे. अमरावतीला विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते, शैक्षणिकदृष्ट्या अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघरही संबोधले जाते. विदर्भामध्ये प्रशासनाच्या दॄष्टीने दोन उपविभाग केले आहेत, नागपूर आणि अमरावती. त्यांपैकी अमरावती उपविभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम हे जिल्हे येतात. अमरावती शहर हे महाराष्ट्रातील दाट लोकवस्ती असलेल्या महानगर क्षेत्रांमध्ये सातव्या क्रमांकावर येते. हे शहर अमरावती जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात ऐतिहासिक अशी अंबा व श्रीकृष्ण मंदिरे आहेत.

१९८३ मध्ये स्थापन अमरावती महानगरपालिका, ही “खाजगी जकात ” म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६४६,८०१ इतकी आहे. त्यापैकी ३३०,५४४ पुरुष व ३१६,२५७ महिला आहेत. अमरावती शहरातील लिंग गुणोत्तर १०००:९५७ आहे.

अमरावती
महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: अंबानगरी
—  शहर  —
  २०° ५५′ ५९.८८″ N, ७७° ४५′ ००″ E
गुणक: 20.56°N 77.45°E
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
• उंची
८५.१४ चौ. किमी
• ६५६.५४ मी
जिल्हाअमरावती
लोकसंख्या
• घनता
लिंग गुणोत्तर
६,४६,८०१[१] (२०११)
• ७,५९७/किमी
त्रुटि: “१०००:९५७” अयोग्य अंक आहे /
कोड
• दूरध्वनी
• आरटीओ कोड

• +०७२१
• MH-27

गुणक20.56°N 77.45°E

अमरावती               

 हे शहर अमरावती जिल्हा तसेच अमरावती विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. अमरावती या शब्दाचा अर्थ पुराणातील देव इंद्र याची नगरी / राजधानी असा होतो. या शहरात जुन्या काळी उंबराची झाडे खूप होती म्हणून या शहराला उमरावती असे म्हटले जाई.

अमरावती याच नावाचे एक गाव आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात आहे.

इतिहास

अमरावतीचे पुरातन नाव औदुंबरावती होते, ते प्राकृतमध्ये उंबरावती होते. शिवाय हिला प्राचीन काळी इंद्रपुरी म्हणून ओळखले जायचे. उंमरावती याचे स्पेलिंग Umraoti असल्याने त्याच्या उच्चारानुसार गावाचे नाव अमरावती झाले. जुनी अमरावती येथील भगवान आदिनाथ ऋषभनाथ यांच्या संगमवरी मूर्तीच्या पायथ्याशी असलेल्या शिलालेखावर अमरावती या नावाचा पहिल्यांदा उल्लेख आढळतो. या मूर्ती इ.स. १०९७ मधील आहेत.

मध्ययुगीन भारतीय इतिहासातील दख्खन च्या सुलतानशाही (इ.स.१४९०-इ.स.१६९०) पैकी १ वऱ्हाड वा बेरार प्रांताची इमादशाही (इ.स.१४९०-इ.स.१५९०) ची राजधानी असलेली एलिचपूर ही नगरी याच जिल्ह्यामधील एक शहर आहे. त्या शहराला हल्लीअचलपूर म्हणतात.

गोविंद महाप्रभू यांनी १३व्या शतकात अमरावतीला भेट दिली होती. १४ व्या शतकात दुष्काळ व अवर्षणामुळे अमरावतीमधील लोक माळवा व गुजरातमध्ये स्थलांतरित झाले होते रावबहादूर रघुनाथ नरसिंह मुधोळकर, दादासाहेब खापर्डे, मोरोपंत विश्वासनाथ जोशी, शिवाजीराव पटवर्धन, शिक्षण महर्षि भाऊसाहेब देशमुख असे अनेक भारतीय स्वातंत्र्यसेनानी अमरावतीचे होते.

हवामान

अमरावतीचे हवामान हे उन्हाळ्यात गरम व कोरडे आहे. येथील हिवाळा थंड व कोरडा आहे. येथे उन्हाळा मार्च ते जून, पावसाळा जुलैपासून ऑक्टोबरपर्यंत , आणि त्यानंतर मार्चपर्यंत हिवाळा असतो. सर्वाधिक तापमान २५ मे १९५४ रोजी ४६.७° सेल्सियस असे होते आणि सर्वात कमी तापमान ९ फेब्रुवारी इ.स. १८८७ रोजी ५.०° सेल्सियस इतके होते.

शहर समुद्रसपाटीपासून उंचीवर वसलेले असल्यामुळे अमरावतीचे हवामान थंड आहे.[ संदर्भ हवा ] भरपूर प्रमाणात झाडे व शहराच्या परिसरात असणाऱ्या तलावांमुळे पाण्याची मुबलकता आहे. मेळघाट व चिखलदरापरिसर येथून जवळच आहे. शहराजवळ १० किलोमीटरवर पोहरादेवी हे अभयारण्य आहे. शहराला लागूनच डोंगर असल्यामुळे डोंगर कुशीत बसल्यासारखे हे सुंदर शहर मनाला आकर्षित करते.

शहरातील पेठा

  1. अंबापेठ              2.राजापेठ            3. श्रीकृष्णपेठ

अमरावती जिल्ह्याला लागून असणारा परिसर व गावांची नावे : –

१) वाठोडा शुक्लेश्वर २) अडणगाव ३) अनकवाडी ४) आसरा ५) ऋणमोचन ६) कानफोडी ७) खोलापूर ८) गणोजा ९) गौरखेडा १०) चाकूर ११) जसापूर १२) दाढी पेढी १३) धामोरी १४) निंभा १५) परलाम १६) पांढरी १७) बुधागड १८) भातकुली १९) मलकापूर २०) म्हैसपूर २१) म्हैसांग २२) लोणटेक २३) शिंगणापूर २४) सायत

ही सर्व गावे अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात येतात. भातकुली येथील जैन मंदिरही प्रसिद्ध आहे.

शिक्षण

अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर संबोधले जाते, इथल्या शैक्षणिक वातावरणामुळे पूर्ण विदर्भ तसेच मराठवाडा व मध्य प्रदेशातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. अमरावती विद्यापीठ हे शहराच्या पूर्वेस आहे. पर्वत पायथ्याशी असलेले हे विद्यापीठ अतिशय नयनरम्य वातावरणात आहे. विविध प्रकारच्या झाडांनी समृद्ध असलेला याचा परिसर खूप मोठा आहे. या विद्यापीठाला आता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठअसे नाव देण्यात आले आहे. येथे संत गाडगेबाबा अध्यासन चालवले जाते.

शैक्षणिकदृष्ट्या अमरावती हे विदर्भात फार विद्यार्थिप्रिय ठिकाण आहे. येथे अनेक महाविद्यालये आहेत. शिक्षणाच्या सोयींमुळे अमरावती हे पश्चिम विदर्भाचे महत्त्वाचे शिक्षणकेंद्र आहे. शहराचे एक मोठे आकर्षण म्हणजे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळवीर वामनराव जोशी यांच्या प्रेरणेने अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बरेच जुने शारीरिक शिक्षण महाविद्यालय असून संपूर्ण भारतातून मुले येथे शिक्षणासाठी येतात. या व्यायामशाळेच्या परिसरात १९८९ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. या व्यायामशाळेने १९३६ साली यवतमाळच्या डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांच्या नेतृत्वाखाली बर्लिन ऑलिम्पिकच्या वेळी भरलेल्या जागतिक व्यायाम परिषदेला आपला चमू पाठवला होता. दीड-दोन महिने आगबोटीने प्रवास करीत हा चमू आपला भगवा झेंडा घेऊन जर्मनीत पोहोचला. तिथे व्यायाम परिषदेत व्यायामशाळेच्या खेळाडूंनी मल्लखांब, योगासने आणि गदगा फिरवणे हे भारतीय व्यायामप्रकार करून दाखवले, त्याचे जगभर कौतुक झाले होते. प्रेक्षकांमध्ये व्यासपीठावर हिटलर, गोबेल्स प्रभृती हजर होते.

शाळा

अमरावती जिल्ह्यात सरकारी शाळांव्यतिरिक्त खालीलप्रमाणे खाजगी शाळा आहेत.

  1. अस्मिता शिक्षण मंडळाचे अस्मिता विद्या मंदिर
  2. आदर्श प्राथमिक शाळा.
  3. ऑयस्टर इंग्लिश स्कूल, अमरावती.
  4. इंडो पब्लिक स्कूल
  5. DRS मुलांची शाळा
  6. दीप इंग्रजी प्राथमिक शाळा
  7. नवीन उच्च माध्यमिक शाळा
  8. नारायण दास हायस्कूल
  9. पवित्र क्रॉस कॉन्व्हेंट
  10. प्रगती विद्यालय
  11. भंवरीलाल सामरा इंग्रजी हायस्कूल
  12. मणिबाई गुजराती हायस्कूल
  13. महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, (बडनेरा)
  14. गोल्डन किड्स इंग्रजी हायस्कूल (मुलांची शाळा)
  15. मोहनलाल सामरा प्राथमिक शाळा
  16. मित्र उर्दू हायस्कूल
  17. मित्र इंग्रजी हायस्कूल
  18. राजेश्वरी विद्या मंदिर
  19. राठी विद्यालय
  20. श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय
  21. लाठीबाई शाळा
  22. वनिता समाज
  23. विद्वान प्रशाळा
  24. शिवाजी M.P.H.S.School
  25. श्री समर्थ हायस्कूल
  26. सरस्वती विद्यालय
  27. सेंट थॉमस इंग्रजी हायस्कूल
  28. सेंट फ्रान्सिस हायस्कूल
  29. ज्ञानमाता हायस्कूल
  30. न्यू हाई स्कूल मेन शाम चौक

अर्थकारण

  1. अंबादेवी रोड
  2. आयर्विन चौक
  3. इतवारा बाजार
  4. कॉटन मार्केट
  5. खंडेलवाल मार्केट
  6. गांधी चौक
  7. जवाहर रोड
  8. जयस्तंभ चौक
  9. जोशी मार्केट
  10. तख्तमल इस्टेट
  11. नवाथे चौक
  12. श्याम चौक
  13. सराफा बाजार

वाहतूक व्यवस्था

रेल्वे वाहतूक

अमरावती शहरात अमरावती, बडनेरा आणि नवीन अमरावती ही तीन मुख्य रेल्वे स्थानके आहेत. अमरावती स्थानक हे जुन्या शहरात आहे. बडनेरा हे स्थानक मुंबई – कलकत्ता लोहमार्गावरील एक प्रमुख जंक्शन आहे. तसेच नवीन अमरावती स्थानक हे अमरावती – नरखेड लोहमार्गावर वसले आहे.

अमरावती येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या

क्रमांकआगगाडीचे नावगंतव्यस्थानकधीसुटण्याची वेळ
५११३६पॅसेंजरबडनेरारोज०२:१५
५११३८पॅसेंजरबडनेरारोज०३:५५
१२११९इंटरसिटी एक्सप्रेसअजनीसोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र०५:३०
१२७६६सुपरफास्ट एक्सप्रेसतिरुपतिसोम, गुरु०६:५५
५११४०पॅसेंजरबडनेरारोज०७:१५
५९०२६फास्ट पॅसेंजरसुरतसोम, शुक्र, शनि०९:००
५११४२पॅसेंजरबडनेरारोज११:४५
५१२६१पॅसेंजरवर्धारोज१५:१०
१२१५९सुपरफास्ट एक्सप्रेसजबलपूररोज१७:४५
११४०६एक्सप्रेसपुणेसोम, शनि१८:३०
५११४६पॅसेंजरबडनेरारोज१८:५०
१२११२अंबा सुपरफास्ट एक्सप्रेसमुंबईरोज१९:०५
५११४८पॅसेंजरबडनेरारोज२०:२५
५११५०पॅसेंजरबडनेरारोज२३:४०

लोकजीवन

जुनी अमरावती

एकेकाळी अमरावती जवाहर गेट, खोलपुरी गेट, नागपुरी गेट आणि अंबा गेट यांच्या आतच सामावलेली होती. काळानुसार अमरावतीचा विस्तार झाला व तटबंदीच्या आतील अमरावतीला ‘जुनी अमरावती’ असे म्हणले जाऊ लागले. सराफा बाजार (दागिन्यांचा) जवाहर गेटच्या आतमध्ये वसलेला आहे.

उत्सव

तटबंदीच्या आतमध्ये भाजी बाजार आणि बुधवारा असे दोन प्रभाग आहेत. हे दोन्ही प्रभाग गणेश चतुर्थीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहेत. भाजी बाजारमधील छत्रपती शिवाजी मंडळ व सार्वजनिक मंडळ ही नावाजलेली गणेशोत्सव मंडळे आहेत. बुधवार्‍यामधील लक्ष्मीकांत गणेशोत्सव मंडळ, आझाद हिंद मंडळ, नीलकंठ मंडळ, आणि अनंत मंडळ ही प्रसिद्ध आहेत. या मंडळांतर्फे गणेशोत्सवाच्या काळात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.

मंदिरे

जुन्या अमरावतीमध्ये भाजी बाजारात बाळकृष्ण मंदिर, मुरलीधर सोमेश्वर मंदिर, नारायण गुरु मठ, लक्ष्मी नारायण मंदिर, जैन श्वेतांबर मंदिर, काळा मारोती मंदिर , काळा राम मंदीर , सत्यनारायण मंदीर , राधाकृष्ण मंदीर , दत्त मंदीर , मृगेंद्र मठ , इत्यादी . मंदिरे आहेत. नीलकंठ मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, मुंजाबाबा मंदिर,एकवीरा देवी मंदिर ही बुधवार्‍यामध्ये आहेत. अंबा देवी मंदिर हे अंबा गेटवर आहे. तिथेच मृगेंद्रस्वामी मठही आहे. जामा मशीद साबनपुरा येथे आहे.

विस्तार

अमरावती शहराची रचना फार छान आहे. रुंद रस्ते आणि शहराचा विस्तीर्ण विस्तार शहराला भव्यता देतात. मुख्य चौक म्हणजे राजकमल चौक, आयर्विन चौक, श्याम चौक, राजापेठ चौक, पंचवटी चौक, अंबापेठ चौक, आणि ज्या अंतिम बस स्थानकाला येथे डेपो असे म्हणतात तो डेपो चौक.

हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहराला तटबंदी आहे. आणि त्याला असलेले दरवाजे – अंबा गेट , जवाहर गेट अशा नावाने प्रसिद्ध आहेत. जुने गाव हे तटबंदीच्या आत वसलेले असायचे. आज शहराचा विस्तार फार झाला आहे. आता महापालिकेच्या सरहद्दी बाजूच्या उपनगरांच्याही बाहेर गेल्या आहेत. वलगाव, बडनेरा आता अमरावती शहरात मोडतात. शहराचे मुख्य भाग म्हणजे अंबा पेठ, गाडगे नगर, साईनगर, श्रीकृष्ण पेठ, दस्तुर नगर, राजापेठ, सातुर्णा, कंवर नगर, रुक्मिणी नगर, यशोदा नगर, इत्यादी.

अमरावती शहराच्या १० किमी दक्षिणेला मुंबई-भुसावळ-वर्धा-नागपूर रेल्वे मार्गावर बडनेरा हे एक रेल्वे स्थानक आहे. शहराची वाढ झपाट्याने बडनेऱ्याच्या दिशेने होत आहे.

अमरावती हे औद्योगिक वाढीचे शहर आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये कुऱ्हा गावी असलेला विदर्भ शुगर मिल लिमिटेड हा चालू असलेला एकमेव साखर कारखाना आहे

सांस्कृतिक

अंबादेवी हे शहराचे मुख्य दैवत आहे. शहराच्या मध्यावर अंबापेठेत देवीचे पुरातन देऊळ आहे. रुक्मिणीने श्रीकृष्णाला याच मंदिरात बोलावले होते, असे म्हटले जाते. येथे श्रीकृष्णाने देवीची पूजा करून रुक्मिणीला सोबत नेले होते. मंदिराच्या जवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या खाली योगाचार्य जनार्दन स्वामी यांची समाधी आहे.

श्री शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेला तपोवन हा कुष्ठरोग्यांसाठीचा प्रकल्प शहराच्या पूर्वेला विद्यापीठाच्या इमारतीसमोर आहे.

 

 

शिक्षण

महत्त्वाची महाविद्यालये

  1. केशरबाई लाहोटी कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय
  2. कृषि महाविद्यालय
  3. श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय.
  4. तक्षशिला कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
  5. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय
  6. प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेरा
  7. बियाणी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
  8. विदर्भ ज्ञान विज्ञान संथेचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
  9. विद्याभारती कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
  10. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
  11. शासकीय तंत्रनिकेतन
  12. श्री शिवाजी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
  13. सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय
  14. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय

खेळ

  1. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ चे शारीरिक शिक्षण महाविद्यालय

पर्यटन स्थळे

  1. चिखलदरा
  2. मेळघाट
  3. सेमाडोह
  4. अंबादेवी मंदिर
  5. श्री क्षेत्र बहिरम
  6. बांबू उद्यान
  7. छत्री तलाव
  8. वडाळी तलाव
  9. पिंगळादेवी गड
  10. एकवीरादेवी मंदिर
  11. अष्टमासिद्धी
  12. अप्पर वर्धा धरण (नल-दमयंती सागर)
  13. श्री क्षेत्र कोंडेश्वर
  14. माताखिडकी श्रीकृष्ण मंदिर
  15. वाठोडा शुक्लेश्वर

पार्श्वभूमी

  1. १८५३ च्या कराराद्वारे हैदराबादच्या निजामाने अमरावती जिल्ह्यासहित सर्व बेरार (वऱ्हाड) ईस्ट इंडिया कंपनीकडे काही काळाकरिता सुपूर्द केला. कंपनीने वऱ्हाड प्रांताचे दोन जिल्ह्यांमध्ये विभाजन केले –
  2. दक्षिण वऱ्हाड – त्याचे मुख्यालय हिंगोली येथे होते.
  3. पूर्व वऱ्हाड – उत्तर वऱ्हाडचे रूपांतर पूर्व वऱ्हाडात करण्यात आले. त्याचे मुख्यालय अकोला येथे होते.
  4. १८६४ मध्ये अमरावतीमधून यवतमाळ जिल्हा वेगळा करण्यात आला.
  5. १९०३ मध्ये निजामाने वऱ्हाड ब्रिटिश भारत सरकारकडे कायमस्वरूपी सुपूर्द केला.
  6. १९०३ मध्ये वऱ्हाड हा मध्यप्रांताला जोडण्यात आला, आणि मध्यप्रांत व बेरार असा मोठा प्रांत निर्माण करण्यात आला. तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड कर्झन याने वऱ्हाड मुंबई प्रांतास जोडण्यास नकार दिला. मराठी भाषिकांमध्ये प्रांतिक फूट पाडणे हा त्याचा हेतू होता.
  7. १९५६ मधील राज्य पुनर्रचनेदरम्यान अमरावती जिल्ह्यासहित विदर्भातील सर्व जिल्हे तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले.
  8. १९६० मध्ये महाराष्ट्र व गुजरात वेगळे झाल्यावर अमरावती जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला. अमरावती जिल्हा हा पूर्णपणे दख्खनच्या पठारावर आहे.

अमरावती येथे अम्बा माता मन्दिर प्रसिद्ध आहे.असे म्हटले जाते की, येथुन रुथ्मिणी देवी चा हरण झालेले.गिल्लेवडे, साम्बारवडी,रोडगे ही प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहेत.

प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौंडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्यातळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असे सांगतात.

अमरावती जिल्हा हा महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३.९८ टक्के क्षेत्र या जिल्हाने व्यापलेले आहे. अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे. विदर्भातील महत्वाचा, शैक्षणिकदृष्ट्या प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. सामाजिक क्षेत्रामध्ये या जिल्ह्याचे नाव खूपच अग्रेसर आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. पंजाबराव देशमुख इत्यादी महत्त्वाच्या व्यक्ती या जिल्ह्यात होऊन गेल्या आहेत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. अमरावती जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले चांदूरबाजार तहसिलातील माधान हे गाव श्री गुलाबराव महाराजांची कर्मभूमी आहे. १९४६ साली डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अमरावतीजवळ तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामाची स्थापना केली. अमरावती येथील अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी मंदिरप्रवेश चळवळ सुरू केली. १९३२ साली त्यांनी अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय व शिवाजी शिक्षण समितीची स्थापना केली. शिवाजी शिक्षण समिती आज विदर्भातील अग्रणी शिक्षण संस्था आहे. १८९७चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन अमरावती येथे भरले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष सी. शंकरन नायर हे होते.

विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान

अमरावती जिल्ह्याला अकोला,यवतमाळवर्धा आणि वाशीम या जिल्ह्यांच्या सीमा लागल्या आहेत. अमरावती जिल्ह्याची सर्वात जास्त सीमा मध्यप्रदेश या राज्याला लागली आहे. अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा सीमावर्ती प्रदेश आहे. या जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी हे तालुके संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहेत. भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातील मोठी संस्था आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होणारे दादासाहेब खापर्डे , वीर वामनराव जोशी याच जिल्ह्यातील होते.

अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना बाजार हे गाव गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. याच गावी हिंद सेवक संघाची शाखा होती.

अमरावती जिल्ह्याचा इतिहास

अमरावती या शब्दाचा अर्थ पुराणातील देव इंद्राची नगरी / राजधानी असा होतो. अमरावती जिल्ह्याच्या परिसराचा संबंध महाभारताशी जोडला असल्याचे संदर्भ पौराणिक कथा दंतकथांत आढळतात. भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी ही कुंडिनपूरच्या राजाची कन्या असल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. हेच गाव आता कौंडिण्यपूर म्हणून ओळखले जाते. गावाजवळील अंबादेवीच्या मंदिरात रुक्मिणी पूजेसाठी आली असताना तिचे श्रीकृष्णाने अपहरण केले अशी कथा सांगितली जाते. श्रीकृष्णाच्या ”अमर’ या नावावरून अमरावती हे नाव रूढ झाल्याचेही मानले जाते.अमरावती जिल्ह्याने मौर्य, गोंड, मोगल, मराठे व ब्रिटीश अशा अनेक राजवटी पाहिल्या आहेत. १८५३ पर्यंत निजामाच्या अधिपत्याखाली असणारा हा जिल्हा नंतर इंग्रजांच्या हाती आला. १९५६ साली झालेल्या राज्य पुनर्रचनेनंतर अमरावती मध्य प्रदेशातून महाराष्ट्राकडे म्हणजे मुंबई प्रांताकडे आला. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाले, तेव्हा अमरावतीला स्वतंत्र जिल्ह्याचे अस्तित्व प्राप्त झाले.

अमरावती जिल्हा
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा
MaharashtraAmravati.png महाराष्ट्रच्या नकाशावरील स्थान
देश भारत
राज्यमहाराष्ट्र
विभागाचे नावअमरावती विभाग
मुख्यालयअमरावती
तालुकेचांदुर बाजार • चांदुर रेल्वे • चिखलदरा • अचलपूर • अंजनगाव सुर्जी • अमरावती तालुका • तिवसा • धामणगांव रेल्वे • धारणी • दर्यापूर • नांदगाव खंडेश्वर • भातकुली • मोर्शी • वरुड
क्षेत्रफळ१२,२३५ चौरस किमी (४,७२४ चौ. मैल)
लोकसंख्या२८,८७,८२६ (२०११)
साक्षरता दर८८.२३%
लिंग गुणोत्तर१.०५५ /
जिल्हाधिकारीश्री किरण गित्ते, भा.प्र.से.
लोकसभा मतदारसंघअमरावती
विधानसभा मतदारसंघअचलपूर • अमरावती • तिवसा • दर्यापूर • धामणगांव रेल्वे • बडनेरा • मेळघाट • मोर्शी

पर्यटनस्थळ

  • अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे. अमरावती शहरापासून ९० किमी अंतरावर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३६हजार फूट उंचीवर सातपुड्याच्या कुशीत आहे. चिखलदऱ्याच्या परिसरात आठ प्रेक्षणीय स्थळे असून गाविलगडचा किल्ला , किचकदरा, आणि विराटराजाचा महाल इत्यादी मुख्य आकर्षणाची ठिकाणे आहेत. वैराट हे येथील सर्वात उंच ठिकाण आहे.
  • सालबर्डी हे पर्यटनस्थळ मोर्शीपासून ८ किमी अंतरावर आहे. येथे महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथील गरम पाण्याचे झरे हे एक प्रमुख आकर्षण आहे. संत मारुतीमहाराजांची समाधी आणि महानुभाव पंथाचे प्रसिद्ध मंदिर ही येथील काही ठळक आकर्षणे आहेत.
  • विदर्भाची प्राचीन राजधानी म्हणून कुंडीनपूर हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते.
  • रिद्धपूर हे महानुभाव पंथीयांचे हे प्रमुख तीर्थस्थळ आहे.

  • अचलपूर तालुक्यातील बहिरम हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे.हे मंदिर सुमारे १२५ फूट उंचीवर आहे. चढण्यास १०८ पायऱ्या आहेत. येथे साडेसहा फूट उंच गणेशमूर्तीआहे.या मंदिरासमोर सहा टन वजनाची घंटा आहे. सातपुड्याच्या कुशीतील हे ठिकाण महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर आहे. येथे बहिरम (भैरव) या देवाची पूजा केली जाते. येथे दरवर्षी महिनाभर जत्रा चालते.ती यात्रा डिसेंबर महिन्यात सुरू होते. येथील मातीच्या हंडीत शिजवलेले मटण खास चवीचे म्हणून खवैय्यांमध्येत प्रसिद्ध आहे.
  • अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक कापूस हे आहे. पूर्णा, तापी व वर्धा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. वर्धा नदीवर सिंबोराजवळ जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. शहानूर नदीवर शहानूर प्रकल्प आहे. अमरावती शहराला वडाळी तलाव व छत्री तलाव या तलावांतून पाणी पुरवठा होतो.
  • अमरावती येथे रासायनिक खताचा कारखाना आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये रेगूर ही काळी मृदा मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील हवामान उष्ण व कोरडे आहे. १९४२ च्या चळवळीत या जिल्ह्याचे महत्त्वाचे योगदान आहे. ब्रिटिशांच्या दडपशाहीने जिल्हा हादरून गेला असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरीवर थाप मारून जिल्ह्यातील तरुणांना राष्ट्रीय आंदोलनास प्रेरित केले. ..
  • चिखलदरा या ठिकाणाचे उल्लेख महाभारतात आढळतात. याच ठिकाणी भीमाने कीचकाचा वध करून त्याला दरीत फेकून दिले. त्यामुळे त्याला ‘किचकदरा’ असे नाव पडले, त्यावरूनच पुढे ते चिखलदरा झाले. महाराष्ट्रातील एकमेव कॉफी उत्पादक प्रदेश म्हणून चिखलदरा ओळखला जातो. आताशा येथे मध व स्ट्रॉबेरीचेसुद्धा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जात आहे. मेळघाट हा जंगलव्याप्त परिसर अभयारण्य म्हणून घोषित केल्या गेला आहे. १९७२ला घोषित केल्या गेलेल्या देशातील १५ व्याघ्रप्रकल्पांतील हा एक. येथे १००हून अधिक वाघ आहेत. वाघांव्यतिरिक्त हा प्रदेश अस्वल, सांबर, रानडुक्कर, जंगली कुत्रे, मोर आदींसाठी प्रसिद्ध आहे.

चिखलदऱ्याजवळची काही आकर्षण केंद्रे :

  1. मेळघाट व्याघ्रप्रकल्प, कोलखास आणि सेमाडोह हे निसर्गरम्य स्थळे.
  2. गाविलगड किल्ला.
  3. नर्नाळा किल्ला.
  4. पंडित नेहरू बॉटनिकल गार्डन
  5. ट्रायबल म्युझियम

अलीकडच्या काळात चिखलदरा हे ठिकाण पॅराग्लायडिंगसाठी हळूहळू उदयास येत आहे. भारतात पॅराग्लायडिंग मोजक्याच ठिकाणी होते. महाराष्ट्रातील हे तिसरे ठिकाण आहे.

अमरावती शहरात आणखी काही पर्यटन व प्रेक्षणीय स्थळे खालीलप्रमाणे :

  • अंबादेवी मंदिर,अमरावती
  • एकविरा देवी मंदिर
  • बांबू उद्यान अमरावती
  • श्री क्षेत्र कोंडेश्वर अमरावती
  • छत्री तलाव
  • वडाळी तलाव

चिखलदरा

  चिखलदरा
महाराष्ट्र • भारत
—  तालुकाsex  —
महाराष्ट्रराज्य महाराष्ट्रराज्य
२१° १२′ ३६″ N, ७७° ४३′ १२″ E
गुणक: 21.21°N 77.72°E
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हाअमरावती
भाषामराठी
तहसीलचिखलदरा
पंचायत समितीचिखलदरा
कोड
• दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ++०७२१
• MH27

गुणक21.21°N 77.72°E


चिखलदरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.

आख्यायिका

चिखलदऱ्याचा मनोरंजक इतिहास आपल्याला अगदी महाभारत काळापर्यंत मागे घेऊन जातो. पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदर्‍यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झर्‍यात भीमाने आंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते.

निसर्ग

चिखलदर्‍याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. चिखलदर्‍याच्या घाटात किंवा चिखलदर्‍याहून सेमाडोहला जाणार्‍या रस्त्यावर वाघ दिसू शकतात. मोर, रानकोंबडा, अस्वले तर बर्‍याच मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र सह्याद्रीतल्या सदाहरित जंगलांसारखी घनदाट हिरवीगार झाडी येथे दिसत नाही. येथील जंगल शुष्क पानझडीच्या अरण्याच्या प्रकारात मोडते. कॉफी हे येथील मुख्य उत्पादन आहे. कॉफीला लागणारे ७० ते ८० फॅरनहाइट तापमान येथे लाभते.

प्रेक्षणीय स्थळे

चिखलदर्‍याला विदर्भाचे नंदनवन असे म्हणतात.

( चिखलदरा येथील बहुतेक स्थळांची नावे ब्रिटिश अधिकार्‍यांनी दिलेली आहेत.)

  1. पंचबोलचे नाव इको पॉईंट.
  2. देवी पॉईंट
  3. नर्सरी गार्डन
  4. प्रॉस्पेट पॉईंट
  5. बेलाव्हिस्टा पॉईंट
  6. बेलेन्टाईन पॉईंट
  7. भीमकुंड‎
  8. मंकी पॉईंट
  9. लॉग पॉईंट
  10. लेन पॉईंट
  11. वैराट पॉईंट
  12. हरिकेन पॉईंट

गाविलगड

गाविलगड / गवळीगड
Gavilgad4.jpg
नावगाविलगड / गवळीगड
उंची११०० फूट
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीसोपी
ठिकाणअमरावती जिल्हामहाराष्ट्रभारत
जवळचे गावचिखलदरा
डोंगररांगसातपुडा


               गाविलगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. किल्ल्याच्या भोवती घनदाट जंगल आहे. १२ व्या / १३ व्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य गोंडानी घेतला. गाविलगड हा वैभवशाली बांधकाम असलेला किल्ला विदर्भाचे भूषण आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारचा असून तो अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यामध्ये आहे.

हवामान

  • पाऊस : १५५ से.मी.
  • तापमान : हिवाळा – ५ से. , उन्हाळा : ३९ से.

इतिहास

महाभारतातल्या भीमाने कीचकाशी कुस्ती करून त्याचा इथे वध केला व त्याला बाजूच्या दरीत फेकून दिले अशी कथा आहे. कीचकाची दरी म्हणजे कीचकदरा. चिखलदरा हा कीचकदरा या शब्दाचे मराठी रूपांतर आहे. इ.स. १८०३ मध्ये दुसऱ्या मराठे-इंग्रज युद्धात या किल्यावर महत्त्वाची लढाई झाली होती. ऑर्थर वेलस्लीच्या इंग्रजी सैन्याने येथे मराठ्यांचा निर्णायक पराभव केला.

हा भूभाग बहमनी सुलतानांच्या ताब्यात होता. तत्पूर्वी या डोंगरावर गवळी लोकांनी मातीचा कोट उभारला होता, अशी वदंता आहे. बहमनी सुलतानाच्या काळात सातपुड्याच्या संरक्षणासाठी शहाबुदीन अहमदशहाने हा बलदंड किल्ला बांधून उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. पुढे हा किल्ला औरंगजेबाकडे आला. नंतरच्या काळात हा भोसल्यांच्या ताब्यात असताना यावर बेणीसिंह नावाचा किल्लेदार होता. त्यावेळी झालेल्या इंग्रजांबरोबरच्या युद्धात बेणीलिंगाने अतुलनीय पराक्रम केला. त्याच्या या पराक्रमाची प्रशंसा जनरल सर जेस्पर निकोल्स यांनी आपल्या नोंदवहीत करून ठेवली आहे.

अमरावतीचे प्राचीन नाव ‘उदुंबरावती ’ याचे प्राकृत नाव ‘उमरावती’ आणी अमरावती हे नाव अनेक शतकापासुन आहे. अमरावतीला प्राचीन अंबादेवी मंदीर आहे त्यापमुळे अमरावती नाव आहे असा समज आहे. अमरावतीला प्राचीन शिलालेख आहेत ते ही १०९७ मध्येर भगवान आदीनाथ आणी भगवान रिशबनाथ यांचे संगमरवरी दगडाचे पुतळे उभारले आहेत.१३ व्या शतकामध्येय गोविदंप्रभुनी अमरावतीला भेट दिली. याच काळात वरहद हा देवगिरीचा हींदुराजा (यादव)च्याय नियमानुसार राहत होता. १४ व्याि शतकामध्येा अमरावतीचे काही लोक अमरावती सोडुन गुजरात आणी माळवा या भागात स्थायईक झाले. अमरावतीचे स्थानिक लोक काही काळा नंतर परत अमरावतीला आले. १६ व्या शतकामध्ये. औरंगपुरा ( आत्तााचा साबणपुरा) कडुन जुम्माी मशिद बादशहा औरंगजेबास भेट म्हणुन दिले. १७२२ मध्ये छत्रपती शाहु महाराज अमरावती आणी बडनेरा येथे राणोजी भोसले यांना भेटले. जेव्हाा अमरावती भोसले की अमरावतीला म्हरणुन ओळखत होते.अमरावतीची पुर्नबांधणी आणी भरभराठी राणोजी भोसले यांनी देवगाव आणी अजंनगाव सुर्जी चा तह आणी गावीलगडचा विजय (चिखलद-याचा किल्लाा) झाला तेव्हाद केली. ब्रिटीश जनरल ऑथर वेलस्ली चा अमरावती येथे कॅम्पज अमरावती .

विशेष करून हे ठिकाण अमरावतीच्याल लोकांना चांगलेच ओळखीचे आहे. १८ व्याव शतकाच्यास शेवटी संघिय राज्यव निझाम आणी भोसलेच्यां अधिनियमात अमरावतीचे लोक होते. त्यांनी रेव्हे्न्युट ऑफीसरची नियुक्ती केली पंरतु डिफेन्सा सिस्टीयमला हे मान्य नव्हाते. १५ डिसें. १८०३ मध्येत गाविलगड ब्रिटीशांनी जिेंकला. देवगावच्या तहानंतर वरहदने निझाम सोबत मित्रत्वाचे नाते ठेवले.

वरहद हा निझामच्याा ऐकाधिकाराने राहत होता. त्या नंतर १८०५ च्या जवळपास पेंढारींनी अमरावतीवर हल्लाह केला. त्यानवेळी अमरावतीच्याय सावकार आणी व्याापा-यांनी सात लाख चिटटु पेढां-याला दिले आणी अमरावतीचे संरक्षण केले. निझामाचे अर्ध्यात शतकापर्यंत राज्यक होते. ब्रिटीशाच्याख काळात लोक सुखात होते पंरतु दृष्टक निझामाच्यान काळात दु:खी होते . १८५२ ते १८७१ या काळात ब्रिटीशांनी अनेक सरकारी इमारती बांधल्याट. रेल्वेु स्टेहशन हे १८५९ ला बांधल्या गेले. आयुक्तारचा बंगला १८६० ला बांधल्याम गेला. न्यानयालय हे १८८६ मध्येे बांधल्याो गेले. (आजचे एस.डी.ओ. कार्यालय) तहासिल कार्यालय आणी मुख्य पोस्टि ऑफिस १८७१ ला बांधण्याहत आले. याच काळामध्येळ मध्ये कारागृह, जिल्हालधिकारी कार्यालय, विश्रामगृह कॉटन मार्केट बाधुंन झाले होते. १८९६ मध्येळ दादासाहेब खापर्डे, श्री.रंगनाथपंत मुधोळकर, सर मोरोपंत जोशी, श्री प्रल्हा.दपंत जोग, हे अमरावतीचे राजकारणी होते. १३ व्याह शतकामध्येर १८९७ मध्येश २७-२९ डिंसे.ला कॉग्रेस सभा होती. या सभेला ही सर्व राजकारणी उपस्थित होती.

१९२८ ला श्री महात्मा् गांधी आणी श्री लोकमान्यर तिलक यांनी अमरावतीला भेट दिली. द म्यु निसीपल ए.व्हि. हॉय स्कुकल चे उदघाट्क श्री सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते. केले. याच काळात “ सविनय अवज्ञा आंदोलन “चे मुख्य कार्यालय अमरावतीला आहे .२६ एप्रिल १९३० ला “ प्रसिध्द मिठ सत्याआग्रह “ हा “दहिहंडी” येथिल पाणी घेऊन करणयात आला आणी डॉ. सोमण यांनी मुबंई येथुन समुद्राचे पाणी याप्रसंगी आणुन १०,००० लोकांनी मिठ तयार केले तेही विर वामनराव जोशी यांच्याम अधिपत्यापखाली करण्यागत आले १८ व्यात शतकामध्येा अमरावती शहराची व्या पार व्योवसायात मोठया प्रमाणात वाढ झाली. त्यायमुळे या विभागामध्ये् हे शहर अत्यंत श्रिमंत आहे. हैद्राबादच्यात निझामासोबत ब्रिटीश ईस्ट कंपनीने तह केला होता. त्या तहानंतर ब्रिटीशांनी या प्रदेशाचे दोन जिल्हे् केले. एक विभाग म्हणजे उत्तकरे कडील भाग ज्या्चे मुख्यन ठिकाण बुलढाणा आहे . आणी दुसरे मुख्य‍ काण म्हसणजे अमरावती. १८६४ यवतमाळ जिल्हाभ (थोडक्यांत दक्षीणपुर्व भाग जिंकल्या गेला) वेगळा केला. १८६७ मध्ये एलीचपुर जिल्हाल हा वेगळा केला. १९५६ मध्येा अमरावती जिल्हा हा मुंबई राज्याचा एक भाग बनले आणी महाराष्ट्रा चा एक भाग बनले.

भौगालीकदृष्टया अमरावती ही समुद्रसपाटी पासुन ३४० मी. वेढलेली आहे. शहराच्या पुर्व भागाकडे पोहरा व चिरोडीच्याग टेकडया आहेत. माल टेकडी ही शहराच्या मध्य भागी आहे. मालटेकडीची उंची ६० किमी आहे. हा पुतळा मराठयांचा जाणता राजा श्री शिवाजी महाराजाचा मोठया उंचावर आहे. पुर्वेकडे दोन मोठे तलाव आहेत, एक म्हणजे छत्री तलाव आणी दुसरे म्हवणजे वडाळी तलाव. महाराष्ट्राोच्याआ पुर्वेकडील भागात अमरावती आहे.

मुबंई – कलकत्तां हायवे मार्ग आहे. पश्चिम विदर्भाचे हे मुख्य विभाग आहे.

गडावरील ठिकाणे

किल्ल्यावर निजामकालीन कोरीव मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. गडावर २ तलाव आहेत. साधारणत: १० तोफा नाजूक स्थितीमधे असल्या तरी अजूनही शाबूत आहेत. घोडे, हत्ती इत्यादींचे कोरीव काम व हिंदुस्तानी, उर्दू, अरबी या भाषांमधील मजकूर तोफांवर आढळतो.
मात्र, किल्ल्याची तटबंदी, बुरूज ढासळण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्याच्या आतील राणीमहाल, दरबार व तलाव आजही तत्कालीन वैभवाच्या खुणा जपून आहेत. या किल्ल्यापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेला आमनेर येथील छोटा किल्ला म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार; पण तोही दुर्लक्षित आहे.

शार्दुल दरवाजाचे भव्य आणि भक्कम बांधकाम चकित करण्यासारखे आहे. दरवाजावरील शार्दुलाची शिल्पे प्रेक्षणीय अशीच आहेत. लांबरुंद पायऱ्या संपल्या की दरवाजामधून किल्ल्यात प्रवेश होतो. आतील पहारेकऱ्यांच्या उभे राहण्याच्या जागा व घुमट पाहून पुढे गेल्यावर पुन्हा एक दरवाजा लागतो. हा दरवाजा म्हणजे चौथा दरवाजा आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर गडाचा मुख्य असा दिल्ली दरवाजा वाट अडवून उभा असतो. हा या मार्गावरील पाचवा दरवाजा आहे. या भव्य दरवाजाच्या आतल्या बाजूला पहारेकऱ्यांच्या निवासाचे कक्ष आहेत. दरवाजाला लागूनच असलेले अशा प्रकारचे भव्य बांधकाम महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर सहसा आढळत नाही.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

या किल्ल्याला १३ मार्चइ.स. १९१३ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.

कसे जाल ?

चिखदऱ्यापासून मध्य रेल्वेचे बडनेरा हे जवळचे स्थानक ११० किलोमीटरवर आहे. त्याचे मुंबई पासूनचे अंतर ७६३ किमी आहे. एस टी महामंडळाच्या येथे येणाऱ्या गाड्या अमरावतीअकोलावर्धानागपूर इथून नियमित सुटतात. चिखलदरा येथे पोहोचण्यासाठी दोन मुख्य गाडीमार्ग आहेत. त्यापैकी एक जळगाव, भुसावळ, बऱ्हाणपूरकडून धारणी, हरिसाल, सेमाडोह व तेथून चिखलदरा असा येतो. हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून येत असल्यामुळे, हा गाडीरस्ता सूर्यास्त ते सूर्योदय या रात्रीच्या वेळांत बंद करण्यात येतो.

दुसरा मार्ग अमरावती, अचलपूर, परतवडा, ते चिखलदरा असा आहे. या मार्गावर धामनगाव गढी ते चिखलदरा हा घाटरस्ता आहे. चिखलदरा येथे मुक्कामाची व जेवणाची उत्तम सोय होऊ शकते. चिखलदऱ्यापासून गाविलगडाचा बलदंड किल्ला दोन कि.मी. अंतरावर आहे. हे दोन किलोमीटरचे अंतर कोणत्याही वाहनाने पार पाडता येते. चिखलदऱ्याकडून निघालेल्या एका दांडावरील पठारावर गाविलगडाचा किल्ला बांधलेला आहे.

ऑक्टोबर ते जून या काळात येथील हवामान खूपच छान असते.

टूरीझम-मेळघाट

महत्वाची ठिकाणे

अमरावती जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

चिखलदरा – अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे. अमरावती शहरापासून ९० किमी अंतरावर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३६हजार फूट उंचीवर सातपुड्याच्या कुशीत आहे. चिखलदर्‍याच्या परिसरात आठ प्रेक्षणीय स्थळे असून गाविलगडचा किल्ला , किचकदरा, आणि विराटराजाचा महाल इत्यादी मुख्य आकर्षणाची ठिकाणे आहेत. वैराट हे येथील सर्वात उंच ठिकाण आहे. चिखलदरा या ठिकाणाचे उल्लेख महाभारतात आढळतात. याच ठिकाणी भीमाने कीचकाचा वध करून त्याला दरीत फेकून दिले. त्यामुळे त्याला ‘किचकदरा’ असे नाव पडले, त्यावरूनच पुढे ते चिखलदरा झाले. महाराष्ट्रातील एकमेव कॉफी उत्पादक प्रदेश म्हणून चिखलदरा ओळखला जातो.

सालबर्डी – सालबर्डी हे पर्यटनस्थळ मोर्शीपासून ८ किमी अंतरावर आहे. येथे महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथील गरमपाण्याचे झरे हे एक प्रमुख आकर्षण आहे. संत मारुतीमहाराजांची समाधी आणि महानुभाव पंथाचे प्रसिद्ध मंदिर ही येथील काही ठळक आकर्षणे आहेत.

कुंडीनपूर – विदर्भाची प्राचीन राजधानी म्हणून कुंडीनपूर हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते.

रिद्धपूर – रिद्धपूर हे महानुभाव पंथीयांचे हे प्रमुख तीर्थस्थळ या जिल्ह्यात आहे.

बहिरम – अचलपूर तालुक्यातील बहिरम हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे.हे मंदिर सुमारे १२५ फूट उंचीवर आहे. चढण्यास १०८ पायर्‍या आहेत. येथे साडेसहा फूट उंच गणेशमूर्ती आहे.या मंदिरासमोर सहा टन वजनाची घंटा आहे. सातपुड्याच्या कुशीतील हे ठिकाण महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर आहे. येथे बहिरम (भैरव) या देवाची पूजा केली जाते. येथे दरवर्षी महिनाभर जत्रा चालते.ती यात्रा डिसेंबर महिन्यात सुरू होते. येथील मातीच्या हंडीत शिजवलेले मटण खास चवीचे म्हणून खवैय्यांमध्ये प्रसिद्ध आहे.

gate1

मेळघाट व्याघ्र प्रकल्पि हे मध्ये भारतातील सातपुडा पर्वतरांगामधील दक्षिणेकडील शाखा वर स्थित आहे, त्या ला गाविलगढ असे संबोधल्याट जातेृ वैराट येथे सर्वोच्च बिंदू ( इ.स. ११७८ मीटर . समुद्रसपाटीपासून वरील) बाजुस पूर्व – पश्चिम कार्यरत उच्च रिज आहे, ती रिझर्व्ह सीमारेषा तयार करते. तो वाघाचा एक अविभाज्य आवास आहे. येथिल वन हे ”टेक्टोजना ग्रॅनडीज”(सागवानील लाकुड) द्वारे राखले गेलेले उष्णदेशीय कोरडा नियमितपणे पाने गळणारा आहेृ रिझर्व्ह पाच प्रमुख नद्यांचा एक पाणलोट क्षेत्र आहे उदा. खंडू, खापरा, सिपना, गडगा आणि डोलार, ह्रया सर्व नद्या तापी नदीच्या उपनद्या आहेत. रिझर्व्ह उत्तर सीमा क्षेत्र हे तापी नदीद्वारे दर्शविल्या जाते. मेळघाट हे राज्याचे मुख्य जैव विविधतेचे भांडार आहे. मेळघाटाचा उतार हा पूर्णा नदीचा पाणलोट भाग तयार करतो. मेळघाट प्रदेश मधुन तीन प्रमुख उपनद्या चंद्रभागा, अदनानी आणि वान हया पूर्णा नदितून वाहतात. चिखलदरा हे समुद्रसपाटीपासून ११०० मीटर उंची वर स्थित एक पठार आहे. मेळघाटाला निसर्गाने काही नोंद गुणांसह एक खडबडीत भौगोलिक परिस्थितीच्यात स्वरूपात संरक्षण देऊ केली आहे. माखला, (Makhala) , चिखलदरा ,चिलदरी (Chiladari) ,पाटुला (Patulda) आणि गूगामल (Gugamal) खडकाळ प्रदेशात मधे मोठ्या प्रमाणात आहेत. सातपुडा पर्वतरांगांमधील जंगल सान्निध्य क्षेत्र हे दीर्घकालीन संवर्धन क्षमतेची हमी देते. संवर्धन इतिहास: मेळघाट परिसर हा १९७४ मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हrणून घोषित करण्यात आले होते. सद्यास्थितीत एकूण क्षेत्र सुमारे १६७७ चौ.किमी आहे. रिझर्व्ह क्षेत्रापैकी ३६१.२८ चौ किमी जागा ही गूगमल (Gugamal) राष्ट्रीय उद्यान कोर क्षेत्र करिता तसेच ७८८.२८ चौ.किमी क्षेत्र रिझर्व्ह ,मेळघाट वाघ अभयारण्य क्षेत्र बफर असे एकत्र मेळघाट अभयारण्य म्हणून १९९४ मध्ये राज्य सरकारने पुन्हा सूचित करण्यात आले होते, ( कि ज्यापैकी २१.३९ चौ.किमी. जागा हि वनमध्ये येत नाही). उर्वरित क्षेत्र एक ‘ अनेक वापर क्षेत्र’ म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वी, मेळघाट वाघ अभयारण्य १५९७.२३चौ.किमी एक क्षेत्र १९८५ मध्ये स्थापन करण्यात आली. त्यारनंतर गुगामल(Gugamal) राष्ट्रीय उद्यान १९८७ मध्ये या अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला. पुरातत्व घाबरत: चिखलदरा पठारावर गाविलगढ किल्ला आणि नरनाळा किल्ला हे क्षेत्र सौंदर्याचा मूल्य जोडून मेळघाट व्याघ्र दक्षिण भाग गरज नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर, या पुरातत्व वास्तूचा अभ्यागतानी पार्श्वभूमीवर प्रसन्न वन आनंद घेतात.

चिखलदरा

आकर्षित पर्यटन स्थळे

               भिमकुंड (किचकदरी)                                  वैराट देवी                                  सुर्यास्‍त पॉईंट
               बिर धरण                                                 पंचबोल पॉईंट                             कालापाणी धरण
               महादेव मंदिर                                             सेमाडोह व्‍याघ्र प्रकल्‍प                   हरिकेन पॉईंट
               मोझरी पॉईंट                                              प्रोस्पेक्ट पॉईंट                             देवि पॉईंट
               गोराघाट                                                   शक्‍कर तलाव                             मालविय आणि सुर्यास्ताचे पॉईंट
               सरकारी उद्यान                                           संग्रहालये                                  धबधबे
               धाराकुरा                                                   बकादरी                                     पंचधारा धबधबे
               गाविलगढ किल्‍ला

सेमाडोह

सेमाडोह हे सिपना नदिजवळील वन जंगल छावणी, दाट मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकतील, धारणी तहसील, जिल्हा अमरावती मध्ये वसलेले एक तालुका आहे. त्या मध्येव चार वसतिगृह ( 60 बेड ) आणि दहा कॉटेज ( 20 बेड )आहे. कॉटेज अलीकडेच नूतनीकरण करून आणि चांगल्या स्थितीत आहेत . उपहारगृहाच्याच पुढे संग्रहालय आहे . सर्वात महत्त्वाचे म्हकणजे वाघ , अस्व ल , चित्यांच्या आणि इतर जंगल प्राणी जसे भागात वन्य जीवन उपस्थिती आहे. या संकेतस्थळाची भेटण्या ची व्य वस्था् वन विभाग अमरावती यांचेकडेकरता येते.

अमरावती

सातपुडा पर्वतश्रेणी

महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीवर सातपुडा पर्वतश्रेणी आहे. तिच्या दक्षिणेस तापी-पूर्णा खोरे आहे. सातपुड्याच्या धुळे जिल्ह्यातील डोंगररांगांना तोरणमाळचे डोंगर असे संबोधले जात असून येथील तोरणमाळ शिखराची उंची १, ०३६ मी. आहे. अमरावती जिल्हातील डोंगररांगांना गाविलगड टेकड्या, मेळघाट डोंगररांगा असे म्हणतात. सातपुड्यातील “बैराट” हे (१,१७७ मी.) हे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर अमरावती जिल्ह्यात गाविलगड टेकड्यात आहे. चिखलदरा (१,११५ मी.) हे थंड हवेचे ठिकाण याच डोंगररांगांत आहे. धुळे जिल्ह्यात गाळणाडिंगर नांदेड -मुदखेड डोंगर , भंडार गोंदिया -दरेकसा टेकड्या, गडचिरोली -चिरिली टेकड्या परभणी, नांदेड जिल्हयांच्या सीमेवर निर्मल रांगा, नागपूर जिल्हयात गरमसूर डोंगर या प्रमुख स्थानिक डोंगररांगा आहेत

महानुभवांची काशी – रिध्दपूर

महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील रिध्दपूर येथे श्री गोविंदप्रभु यांची समाधी आहे. महानुभव पंथाचे तीर्थक्षेत्र आहे. येथील कृष्ण आणि रामनाथ मंदिर पुरातन आहे. चैत्र व आषाढ पौर्णिमेला येथे महानुभव पंथाची मोठी यात्रा भरते. या यात्रेत देशातील महानुभव पंथातील लोक सहभागी होतात. महानुभव पथांची काशी म्हणून हे शहर प्रसिध्द आहे.

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव-सुरजी

अंजनगाव हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर असून, येथून जवळच असलेले सुरजी हे या शहराचेच एक जुळे शहर आहे. येथील संत गुलाबबाबांचे समाधी मंदिर प्रसिद्ध आहे. ब्रिटिश आणि मराठी सैन्यांत येथे घनघोर लढाई झाल्याचा उल्लेख आपल्याला इतिहासात पाहायला मिळतो. शहानूर नदीच्या किनार्‍यावर हे शहर वसलेले आहे. येथून जवळच असलेल्या शहानूर धरणातून सायफन पद्धतीने १५६ गावे आणि दोन शहरांना पाणीपुरवठा होतो.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी

मोर्शी हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय असल्याने राज्य शासनाची कार्यालये या शहरात आहेत. मध्य प्रदेशची सीमा या शहरापासून अगदी जवळ आहे. त्यामुळे या शहरातील लोक बोलताना मराठीबरोबरच हिंदी भाषेचाही वापर मोठ्या प्रमाणात करतात. प्रसिद्ध वर्धा धरण येथून अगदी जवळ आहे.

अमरावती जिल्ह्यातील भातकुली

भातकुली हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. प्राचीन काळी हे शहर भोजकूट या नावाने ओळखले जात असे. पूर्वीच्या हैदराबाद संस्थानातील बेरार विभागात हे शहर येत असे. सध्या तालुक्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात अनेक सरकारी कार्यालये आहेत. या शहरापासून अगदी जवळ असलेल्या भालशी येथील प्राचीन शिव मंदिर देशभर प्रसिद्ध असून, ते महर्षी विश्वमित्र यांनी बांधले अशी आख्यायिका आहे.

बडनेरा येथील कमलीवाले बाबा यांचा दर्गा

बडनेरा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. येथे रेल्वेचे मोठे जंक्शन आहे. या शहराचे मुख्य दोन भाग असून एका भागाचे नाव जुनी बस्ती, तर दुसर्‍या भागाचे नाव नवी बस्ती असे आहे. जुन्या वस्तीतील हजरत अलमास शाह उर्फ कमलीवाले बाबा यांचा दर्गा प्रसिद्ध आहे. प्रतिवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात येथे उरुस साजरा केला जातो. हा उरुस म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानले जाते.

वैदर्भ राज्याची राजधानी कौण्डीण्यपूर

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर कौण्डीण्यपूर वसले.  पूर्वीच्या वैदर्भ राज्याची ही राजधानी असल्याचे मानले जाते. याठिकाणी ताम्रपाषाण युगापासून वसाहत असल्याचे दाखले मिळाले आहेत. भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केल्याची अख्यायिका असून, रुक्मिणीचे भव्य मंदिर या गावात आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

विदर्भातील अमरावती शहर हे विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शैक्षणिकदृष्ट्या अमरावती हे विदर्भात फार विद्यार्थिप्रिय ठिकाण आहे. येथे अनेक महाविद्यालये आहेत. शिक्षणाच्या सोयींमुळे अमरावती हे पश्चिम विदर्भाचे महत्त्वाचे ठिकाण आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना १ मे १९८३ साली करण्यात आली. हे विद्यापीठ शहराच्या पूर्वेस, पर्वत पायथ्याशी आणि अतिशय नयनरम्य वातावरणात आहे. विविध प्रकारच्या झाडांनी समृद्ध असलेला याचा परिसर खूप मोठा आहे. येथे संत गाडगेबाबा अध्यासन चालवले जाते. शैक्षणिकदृष्ट्या अमरावती हे विदर्भात फार विद्यार्थिप्रिय ठिकाण आहे. येथे अनेक महाविद्यालये आहेत. शिक्षणाच्या सोयींमुळे अमरावती हे पश्चिम विदर्भाचे महत्त्वाचे ठिकाण आहे.

प्राचीन शहर अचलपूर

अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे आणि अतिशय प्राचीन शहर आहे. या शहराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असून अनेक पुरातन वास्तू याची साक्ष देतात. शहरावर मोगल, मराठे, निजामांनी राज्य केले आहे. जिल्ह्यातील दुसरे, तर विदर्भातील सातवे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असा लौकिक असलेल्या या शहराचा कारभार नगरपालिकेमार्फत चालवला जातो. समुद्रसपाटीपासून ३६९ मीटर उंचीवर हे शहर वसलेले असून, सपन आणि बिचन नावाच्या दोन नद्या या शहराबाहेरुन वाहतात. मध्य प्रदेशच्या सीमेवर हे शहर वसलेले आहे. तिनशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले दुल्हागेट आजही शहराचे वैभव आहे. हे गेट इस्माईल खान या सरदाराने बांधले आहे. दुल्हा रहेमान यांच्या दर्ग्याकडे रस्ता जात असल्याने गेटचे नाव असे पडले.

अमरावती जिल्हा

विदर्भातील अमरावती विभागाचे प्रमुख ठिकाण असलेला अमरावती हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. (आंध्र प्रदेशातही अमरावती नावाचा एक जिल्हा आहे) चिखलदरा हे विदर्भातील एकमेव गिरिस्थान आणि राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण याच जिल्ह्यात आहे.  संपूर्ण महाराष्ट्रात केवळ याच ठिकाणी कॉफीचे मळे आहेत.  चिखलदरा विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.

मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध असणारा, तसेच वर्‍हाडी बोलीचे वैशिष्ट्य आवर्जून जपणारा अशीही अमरावतीची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा सीमावर्ती प्रदेश आहे.

या जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी हे तालुके संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना बाजार हे गाव गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.

कसे पोहोचाल?

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे कसे पोहचाल

मेळघाटला  रस्‍ता, रेल्‍वे  आणी विमाणमार्ग्‍ व्‍दारे भेट देता येते. सेमाडोह पर्यटक केंद्राचा मध्‍यबिंदु आहे. डिजीटल गाव हरीसाल हे सेमाडोह पासून २५ कि.मी. अंतरावर आहे. चिखलदरा हे मेळघाटाची दुसरी बाजु तसेच विदर्भामधील एक महत्‍वाचे पर्यटन स्‍थळ आहे. चिखलदरा मध्‍ये अनेक खाजगी होटेल्‍स तसेच वैराट हे जंगल सफारीची गेट आहे.

रेल्‍वे मार्ग

चिखलदरा/सेमाडोह/कोलकास/हरीसाल- अमरावती पासून १० किमी. अंतरावर बडनेरा जंक्‍शन वर उतरा.

विमानसेवा

सर्वात जवळचे विमाणतळ नागपुर आहे जे दररोज मुंबई, दिल्‍ली, कोलकाता, बेंगळुरु, रायपुर ,इंदोर यांचेशी जोडलेले आहे.

रस्‍ता मार्ग

मेळघाट ला पोहचण्‍याकरीता वेगवेगळे रस्‍ता मार्ग खालील प्रमाणे उपलब्‍ध आहेत.

सेमाडोह

नागपुर ते अमरावती (१६० कि.मी.), अमरावती ते परतवाडा (५० कि.मी.), परतवाडा ते सेमाडोह (४५ कि.मी.)

कोलकास

कोलकास हे प्रसीध्‍द पर्यटन स्‍थळ सेमाडोह वरुन १३ किं.मी अंतरावर महामार्ग्‍ क्र ६ वर आहे.

वैराट/ चिखलदरा

वैराट हे चिखलदरा मधील जंगल सफारीचे गेट असुन परतवाडा पासुन ३२ कि.मी. अंतरावर आहे.

हरीसाल

हरीसाल हे पर्यटन स्‍थळ  सेमाडो पासुन २५ कि.मी. अंतरावर महामार्ग्‍ क्र ६ वर आहे

मेळघाट मधील नागरीक

मेळघाटमध्ये  आदीवासी लोकांचे वास्तव्य असुन तेथे मुख्यता कोरकू, गोंड, निहाल, बलाई या जातीचे लोक आढळतात व उर्वरीत लोक हे गवळी जातीचे आहे.

गवळी

गवळी हे लोक परंपरेने व्यापलेले असतात. शेती करण्यामध्ये त्यांना फारसा रस नसतो हे लोक मुख्यता गुरे-ढोरे सांभाळुन आपला उदर निर्वाह करतात. त्यांच्;याकडे मोठया प्रमाणात शेळया-मेंढया असतात तसेच प्रत्येक परीवाराकडे साधारण  २०-४० प्राणी असतात. दुग्जन्य पदार्थ विक्री करणे हे त्यांचे महत्वाचे उत्पादन साधन आहे. गवळी लोक हुशार तसेच मेहनती असतात.

कोरकु / गोंड / निहाल

जवळपास एका शतकापासुन पारंपारीकरीत्या कोरकु लोक हे जंगल संरक्षण तसेच जंगलामध्ये काम करुन उत्पादन घेण्यासाठी ओळखले जातात. हे लोक नेहमी जंगल संरक्षणासाठी तसेच जंगल विकासासाठी मजुर पुरवतात. १९७३ नंतर वनहक्क कायदया अंतर्गत येथील स्थानीक लोकांनी प्रत्येक परीवाराकरीता ५ एकर इतकी जमीन मिळवली असुन त्यावर ते उदरनिर्वाह करतात. डेअरी व्यवसायाकरीता त्चेकडे परवानगी नसते.

बलई/ गवलान/ राठया

बलई लोक  अभ्यारण्यामधील गावांमध्ये स्थायीक झाले आहेत. गवलान लोकांना पारंपारीक दृष्टया इतर अनुसुचीत जमाती पेक्षा महत्वाचे मानले जाते हे लोक प्रामुख्याने शेती करतात. खांडवा ते अकोला मार्ग जोडण्याकरीता बाहय स्त्रोतामार्फत मजुर बोलवण्यात येतात. रेल्वे चे काम पुर्ण झाल्यानंतर हे लोक गावामध्ये थायीक झाले आहेत यांना राठया म्हणतात. हे लोक खुप मेहनती तसेच स्वभावाने रागीट असतात

अमरावती जिल्ह्यातील लोकजीवन

अमरावती हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहराला तटबंदी आहे. आणि त्याला असलेले दरवाजे – अंबागेट , जवाहर गेट अशा नावाने प्रसिद्ध आहेत. याच जिल्ह्यातील मेळघाट परिसरात चिखलदरा व धारणी या तालुक्यांत आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. त्यातील ८० टक्के लोकसंख्या कोरकू आदिवासींची आहे. तसेच या परिसरात कोलाम, बसोडे, गोंड, माडिया-गोंड, ढाणका यांसारख्या आदिवासी जमातींचेदेखील वास्तव्य आहे. घराच्या मागील बाजूने बाहेर पडण्याची पद्धती या लोकांमध्ये आढळते. भात हे त्यांचे मुख्य अन्न होय.

भाताला ते ”बाबा चावळी’ असे म्हणतात.  ”ढेमसा’ हे गोंडांचे काठीनृत्य, ”गावबांधणी’ हे कोलाम जमातीचे पारंपरिक नृत्य व माडियांचे ”रेला’ हे नृत्य ही येथील सांस्कृतिक वैशिष्ट्ये आजही जपलेली आढळतात.

निवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)

शासकीय विश्रामगृह

कोलकास विश्राम गृह

कोलकास विश्रामगृह हे जंगलामध्ये १५ कि.मी. अंतरावर घनदाट जंगलामध्ये उभारण्त आलेले आहे. हि सर्व विश्रामगृह वनविभागाच्या अधिपत्याखालील आहेत. तेथे राहणे साठी वनविभागची परवानगी घ्‍यावी लागते तसेच एका वेळी १२ लोकांची राहण्‍याची व्‍यवस्‍था  होवु शकते. अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी विश्राम गृह मा. इंदिरा गांधी यांचे साठी  कोलकास विश्रामगृह  बांधण्यात आले होते.

सेमाडोह पर्यटक सकुल

सेमाडोह येथे पर्यटन संकुल   उभारण्यात आले असुन येथे पर्यटकांसाठी राहण्याची उत्तम सुविधा आहे. सेमाडोह पर्यटन संकुल जंगलाच्या  मध्यस्थानी  उभारण्यात आलेले असून,  घनदाट जंगल व डोंगरांनी व्यापलेले आहे. येथे १० रुम असून सर्व सुविधा उपलब्ध आहेत

पर्यटक पॅकेजेस

मेळघाट पर्यटनातंर्गत  वनविभागाव्‍दारे पर्यटकांना  अभ्यांगत प्रवेश शुल्क, गाडी प्रवेश शुल्क, कॅमेरा शुल्क, जंगल मार्गदर्शक शुल्क् वनविभाग विश्राम गृहनिवास शुल्क इ. शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या पत्रानुसार आकारण्यात येतात. महाराष्ट्र शासनाचे पत्र क्र डब्ल्यु .एल. पी.-१००९/ सी.आर-५६/एफ-१, दिनांक १७/०८/२०११.

  • शासकीय विश्राम गृह डबल बेड सुट ४००/- रुपये.
  • पर्यटक झोपडी सेमाडेाह ३५०/- रुपये
  • पर्यटक झोपडी सेमाडोह (अ-प्रकार) ५००/- रुपये
  • सेमाडेाह वस्तीगृह रूपये ५०/- प्रत्येकी बेड.
  • जंगल सफारी रुपये २२/- प्रत्‍येकी
  • पर्यटक मार्गदर्शक रुपये ११०/- प्रत्येकी सहल.
  • अभ्यांगत प्रवेश शुल्क रुपये  २२/- प्रतयेकी प्रौढ, रुपये ११/- प्रत्येकी लहान मुल.
  • वाहन प्रवेश शुल्क रूपये ८३/- बस/ट्रक करीता.
  • रूपये ५५/- जीप/ कार करीता.
  • रूपये १७/- मोटर सायकल करीता.
  • स्टील कॅमेरा (भारतीय नागरीक) ३/- रूपये
  • स्टील कॅमेरा (विदेशी नागरीक) ३/- रूपये
  • व्हिडीयो कॅमेरा (भारतीय नागरीक) ६/- रूपये.
  • व्हिडीयो कॅमेरा (विदेशी नागरीक) २२/- रूपये
  • व्हिडीयो शुटींग(व्यावसायीक ) रुपये १६५००/ प्रत्येक दिवशी .
  • फोटोग्राफी (व्यावसायीक ) रुपये ५००/ प्रत्येक दिवशी.

अमरावती जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

विदर्भातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच अमरावती जिल्हा कृषीप्रधान असून लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्रावर अन्नधान्याची लागवड केली जाते. ज्वारी हे जिल्ह्यातील एक प्रमुख पीक आहे. जिल्ह्यातील अन्नधान्य पिकांखालील क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र ज्वारीखाली आहे. महाराष्ट्रातील फक्त अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा भागात कॉफीचे मळे आढळतात. तसंच कापूस हे जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी पीक आहे. कापसाखलील क्षेत्र व कापसाचे उत्पादन या दोन्हींचा विचार करता हा जिल्हा राज्यात नेहमीच आघाडीवर असतो.जिल्ह्याचा डोंगराळ भाग वगळता इतर मैदानी प्रदेशात काळी-सुपिक माती मोठ्या प्रमाणावर आढळते. कापूस या पिकासाठी अगदी अनुकूल असलेली ही माती ‘रेगूर मृदा’ किंवा ‘कापसाची मृदा’ म्हणून संबोधली जाते.

अमरावती जिल्ह्यात तूर, गहू, हरभरा, ऊस, मिरची, मोसंबी व विड्याच्या पानांच पीक व उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. नागपूर प्रमाणेच अमरावती जिल्हाही संत्र्यांच्या उत्पादनात राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा या भागातील जंगलांमध्ये चांगल्या प्रतीचे बांबू मोठ्या प्रमाणावर आढळत असल्यामुळे येथे बांबूची लागवड जाणीवपूर्वक केली जाते.

अमरावती जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

संत गुलाबराव महाराज – प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील माधान या गावी जुलै, १८८१ मध्ये झाला.  रचली. वेदांत, उपनिषदे, आत्मज्ञान, प्राचीन संत साहित्य, ध्यान-योग-मधुराभक्ती, आयुर्वेद, डार्विन-स्पेन्सर आदी शास्त्रज्ञांचे सिद्धांत – हे त्यांच्या अभ्यासाचे, चिंतनाचे व लेखनाचे विषय होत. ”मधुराद्वैत’ (मधुरा भक्ती व अद्वैत विचार यांचा समन्वय) हा नवा विचार त्यांनी भक्तांना दिला.

संत गाडगेबाबा – महाराष्ट्रात गावोगावी पायी फिरून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे संत गाडगे महाराज यांचे मूळ गाव (शेंडगांव, ता. अंजनगांव-सूर्जी) ह्याच जिल्ह्यात आहे. हेच संत गाडगेबाबांचे जन्मगाव होय.

संत तुकडोजी महाराज – राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे तुकडोजी महाराज ह्यांचे यावली हे जन्मगाव आहे. मोझरी येथे संत तुकडोजी महाराजांनी १९३५ मध्ये गुरुकुंज आश्रम स्थापन केला. मोझरी येथेच महाराजांचे समाधी स्थान आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख – जुने राजकीय नेते, शिक्षण क्षेत्रात विशेष कामगिरी केलेले आणि पं. नेहरू पंतप्रधान असताना मंत्री मंडळात कृषी खाते सांभाळणारे डॉ.पंजाबराव देशमुख हे मुळचे अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावचे.

वीर वामनराव उर्फ दादा जोशी – थोर स्वातंत्र्यसैनिक व नाटककार वीर वामनराव उर्फ दादा जोशी हे अमरावती जिल्ह्यातलेच होत. स्वातंत्र्यपूर्व काळात वामनरावांनी क्रांतिकार्यात भाग घेतला. सुमारे १० वर्षे त्यांनी तुरुंगवास भोगला, नंतर ते महात्मा गांधीजींचे अनुयायी बनले. त्या काळात ”राक्षसी महत्त्वाकांक्षा’, ”रणदुंदुभी’ या रुपकात्मक नाटकांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात जनजागृती करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

गो.नी.दांडेकर – ज्येष्ठ ऐतिहासिक व प्रादेशिक कादंबरीकार गो.नी. (गोपाळ नीळकंठ) दांडेकर यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण परतवाडा (तालुका अचलपूर) येथे झाले होते.

प्रतिभाताई पाटील – भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील ह्यांचे अमरावती येथे निवासस्थान आहे.

अमरावती जिल्हयाची भौगोलिक माहिती

अमरावतीच्या उत्तरेला मध्य प्रदेश; पूर्वेला नागपूर व वर्धा; दक्षिणेला यवतमाळ; नैऋत्येला व पश्र्चिमेला अकोला जिल्हा – अशी जिल्ह्यांची रचना आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या २०११ च्या गणनेनुसार २८,८७,८२६ इतकी आहे. मध्य प्रदेशातील खांडवा व बैतुल हे जिल्हे अमरावतीच्या उत्तर सीमेवर आहेत. जिल्ह्यातील हवामान विषम व कोरडे आहे. अति कडक उन्हाळा व कडक थंडी अशी स्थिती या जिल्ह्यात आढळते. उत्तर-पश्र्चिमेकडील डोंगराळ भागातील हवामान मात्र थंड व आल्हादायक असते. जिल्ह्याच्या वायव्येकडील (उत्तर-पश्र्चिम) धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांनी मिळून बनलेल्या भागास मेळघाट म्हटले जाते. या जिल्ह्यातून तापी, पूर्णा, वर्धा, सिपना या मोठ्या नद्या तर कापरा, गाडगा, चुडामण, खोलाट अशा लहान नद्या वाहतात.

अमरावती जिल्ह्यातील दळणवळण सोयी

मुंबई-भूसावळ-नागपूर-कोलकाता, मूर्तिजापूर-अचलपूर, खांडवा-अकोला-पूर्णा, व बडनेरा-अमरावती हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. या लोहमार्गांमुळे अमरावती हे शहर मुंबई, जळगाव, नागपूर, कोलकाता, दिल्ली, चेन्नई या मोठ्या शहरांना जोडले गेले आहे. हाजीरा-धुळे-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून जातो. या दळणवळणाच्या साधनांमुळे अमरावतीमधील शेतीमाल व इतर उद्योगांना बाजारपेठ मिळाली आहे.

अमरावती जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

उत्तम प्रतीचा कापूस या जिल्ह्यात पिकत असल्यामुळे हातमाग, यंत्रमाग, सूत गिरण्या, जिनिंग आणि प्रेसिंग मिल हा व्यवसाय जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केला जातो. तसंच सतरंजी, घोंगड्या विणण्याचा व्यवसाय जिल्ह्यात चालतो. जिल्ह्यात देवगाव नागपूर (ता. चांदूर रेल्वे) व रामनगर येथे सहकारी साखर कारखाने आहेत, तसेच अमरावती, अंजनगाव, वरूड, अचलपूर, दर्यापूर, मोर्शी  येथे औद्योगिक वसाहती ही आहेत व सातुर्णा येथे सहकारी औद्योगिक वसाहत आहे. अमरावती व मोझरी येथे औषधांचे कारखाने असून, अमरावती येथेच रासायनिक खते व प्लॅस्टिकच्या वस्तु उत्पादित केल्या जातात.

  1. अमरावती जिल्हयाची वैशिष्ट्ये –
  • कुंडीनपूरचा राजा भीष्मकाची कन्या रुक्मिणी ही भगवान श्रीकृष्णाची पत्नी असल्याचा उल्लेख महाभारतात सापडतो.
  • वर्धा नदीच्या काठावर कौंडण्यपुर येथे विठ्ठल-रुक्मिणी चे मंदीर विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे मोठी यात्रा भरल्या जाते. ही भगवान श्रीकृष्णाची पत्नी असल्याचा उल्लेख महाभारतात सापडतो.
  • मर्यादापुरषोत्तम रामाचे आजी अजोबा नल, दमयंतीपैकी नल यांची कौंडण्यपुर ही जन्म नगरी असल्याचा उल्लेख आढळतो.
  • अमरावती जिल्ह्यातून वाहणार्‍या नद्या – तापी, पूर्णा, वर्धा, पेढी, चंद्रभागा, विदर्भा, गाडगा, सिपना, शहाणूर
  • अमरावती जिल्ह्यामध्ये औधोगिक वसाहती – अमरावती, अंजनगाव, दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, वरुड.
  • ढाकणे-कोलखाज वन्यप्राणी अभयारण्य अमरावती जिल्ह्यात आहे.
  • अमरावती विधापिठाचे नाव-संत गाडगे बाबा अमरावती विधापीठ.
  • अमरावती जिल्ह्यामध्ये कृषी उत्पादनाच्या प्रमुख बाजारपेठा- अमरावती, चांदूर, दार्यापूर, अचलपूर, धामनगांव, वरुड.
  • अमरावती जिल्ह्यामध्ये  प्रमुख औधोगिक उत्पादने – तेल गाळणे, हस्तकला, यंत्रमाग, कापड, हातमाग.
  • अमरावती जिल्ह्यातून गेलेला राष्ट्रीय हमरस्ता – घुळे-कलकत्ता (6)
  • अमरावती जिल्ह्यातील आदिवासी जमाती – कोरकू व गोंड
  • अमरावत जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण – चिखलदरा

माझा महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सविस्तर इतिहास माहिती दररोज एक जिल्हा ह्या स्वरुपात आपणासमोर देत आहोत, तरी आपण त्या संदर्भाचा अभ्यासासाठी नक्कीच उपयोग करून घ्याल अशी प्रांजळ अपेक्षा !!!…..

अधिक माहितीसाठी सहज संपर्क – ७५८८०२०८८६

संकलन आणि मांडणी :-                            

श्री.लक्ष्मण काटेकर, सोलापूर (महाराष्ट्र).

Laxman.katekar@gmail.com

Contact @ 7588020886.

Leave a comment