शिवकालीन दिनविशेष दि.१५ सप्टेंबर.

🚩 शिवनिती 🚩
शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष
💎 दि. १५ सप्टेंबर 💎
XV9/2021

https://bit.ly/2X1CLNc

.

दि. १५ सप्टेंबर, १६७५
इंग्रज व्यापारी वखारीच्या आडून आपण तटस्थ असल्याचे दाखवत मुघल आणि सिद्दीला छुप्या पद्धतीने मदत करत असत.इंग्रज नीती पक्की ओळखून असणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याशी जशास तसे वागत होते.राज्याभिषेक समारंभावेळी हेन्री ओक्झेडेन सोबत झालेला तह विसरून महाराजांनी मुघल प्रांतातील इंग्रजांची डूमगाव ची वखार लुटली होती.शिवाजी महाराजांचा कौल असल्याशिवाय आदिलशाही आणि मुघल प्रांतातल्या आपल्या वखारी सुरक्षित नाहीत हे ओळखून इंग्रजानी आपला सॅम्युअल ऑस्टिन हा वकील रायगडावर महाराजांच्या भेटीसाठी पाठवला होता.६ सप्टेंबरला रायगडावर आलेल्या ऑस्टिनला महाराजानी 7 तारखेला भेट दिली पण या भेटीत महाराजांनी त्याला कोणतेही आश्वासन दिले नाही. त्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी ऑस्टिनला महाराजांची भेट मिळाली.भेटीत महाराजांनी डूमगाव वखारीच्या लुटीबाबत कानावर हात ठेवले.त्यांच्या वखारींना कौल देण्यासही ते फारसे अनुकूल नव्हते पण ऑस्टिन ने खूपच आग्रह केल्यावर महाराजांनी त्याची मागणी मान्य केली.सॅम्युअल ऑस्टिन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावर दुसऱ्यांदा भेट झाली ती तारीख होती १५ सप्टेंबर १६७५.

दि.१५ सप्टेंबर, १६७९
कॅप्टन एनसाईन ह्युजेस आजारी पडल्याने त्याला विश्रांती देवून लेफ्टनंट फ्रांसिस थोर्पला रवाना करण्यात आले. थोर्प १७ सप्टें रोजी रिवेंज जवळ पोचला व मिन्चींच्या आदेशावरून तो खांदेरीच्या बेटाजवळ नांगर टाकून उभा राहिला. मिन्चीन ह्या वेळी बेट आणि भूमी यांच्या मध्ये वारयाची अनुकूलता पाहत रिवेंज घेवून गस्त घालीत होता. दि.१८ सप्टें च्या रात्री मिन्चीनला काही गोळाबरीचे आवाज आले व तपास करण्याकरिता तो १९ च्या सकाळी थोर्पच्या शिबाडाजवळ गेला. थोर्प त्यावेळी दारूच्या नशेत होता व त्याने ‘आपण काळ रात्री बेटावर उतरण्याचा प्रयत्न केला परंतु काही लोकांना दिसल्यामुळे आपण परत आलो’ असे मिन्चीन ला सांगितले. मिन्चीन यावर संतप्त होवून थोर्पला दिलेल्या आदेशाचे पालन कर व आततायीपणा करू नकोस असे सांगून रिवेंजवर परतला.मिन्चीन परतताच त्याला पुन्हा तोफांचे आवाज आले व त्याला दिसले की थोर्प दिवसाढवळ्या पुन्हा खांदेरीवर उतरण्याचा प्रयत्न करीत आहे.त्याने अविचारी थोर्पच्या कृत्यामुळे डोक्याला हात लावला.त्याने रिवेंजवरील सैनिकांना ताबडतोप थोर्पच्या मदतीकरिता पाठवले परंतु मदतीची होडी शिबडाजवळ पोचण्याआधीच त्याला २ शिबाडे परत फिरून येताना दिसली. परत येणाऱ्या शिबाडावरील ‘सार्जंट Nash’ रिवेंजवर आला व त्याने घडली हकीगत सांगितली –
“थोर्पने दारूच्या नशेत शिबाड खांदेरीच्या अत्यंत जवळ नेले व शिवरायांच्या माणसांशी त्याची बाचाबाची झाली व त्यांनी थोर्पच्या शिबाडावर गोळीबार सुरु केला, इतर २ शिबाडे मदतीला पोचण्यापूर्वीच थोर्पचे शिबाड खांदेरीच्या किनाऱ्याला लागले व मराठ्यांनी हल्ला करून ते शिबाड काबीज केले. या हल्ल्यामध्ये कॅप्टन थोर्प व इतर २ युरोपियन मारले गेले तसेच इतर बरेच सैनिक गंभीर जखमी झाले. खांदेरीवरील शिबंदीने शिबाड ताब्यात घेतले व त्याची डोलकाठी काढून घेतली व ते किनाऱ्याला लाऊन ठेवले आहे.

दि.१५ सप्टेंबर, १६८३
(अश्विन शुद्ध पंचमी, शके १६०५, रुधिरोद्रारी संवत्सर, वार शनिवार,) म्हणजेच आजच्याच दिवशी शहाआलम दक्षिण कोकणच्या स्वारीवर. आता खऱ्या अर्थाने राजकारणाच्या पटावर छत्रपती संभाजी महाराजांचे राजकारण रंगू लागले होते. आरमारात पोर्तुगिजांचा त्रास कमी कसा होईल याचबरोबर पोर्तुगिजांवर आब राखून मुघली सेनेला त्यांचा होणारा दाणागोटा व रसदेचा पुरवठा खंडित झाला तर मुघली सैन्याचे खच्चीकरण होऊन त्याचे सामर्थ्य घटेल व त्रस्त होऊन ते फार काळ स्वराज्यात राहणार नाही या द्रृष्टीनेच छत्रपती संभाजी महाराज पोर्तुगिजांकडे पहात होते. त्यामुळे उत्तरेतील बंदोबस्त करून दक्षिण गोव्याकडे जाण्यापुर्वी मोघली फौजेचा सुगावा लागणे गरजेचे होते.त्यामुळेच छत्रपती संभाजी महाराज जेव्हा गोव्यावर चालून जात आहेत अशी बातमी औरंगजेबास लागली तेव्हा त्याने आजच्याच दिवशी शहाआलमला दक्षिण कोकणच्या स्वारीवर पाठविले! त्यावेळी शहाआलम बरोबर इखलासखान, आतशखान, जाननिसारखान हे सरदार होते. राजकारणाच्या पटावर औरंगजेब व छत्रपती संभाजी महाराज यांनी सारीपाट उघडला होता.

दि.१५ सप्टेंबर,१६८४
“आपली पातशाही वाढवावी,पठाणांची नेस्तनाबूत करावी,दक्षिणेची पातशाही आम्हा दक्षिणीयांच्या हातात राहील ते करावे.उत्तरेतील मुघलांचा हात इकडे शिरकू देऊ नये.”हे दूरदर्शी धोरण छत्रपती शिवाजी महाराज,गोवळकोंड्याचा कुतुबशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्यात ठरले होते.त्यांच्या निधनानंतर दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाचा शंभुराजेंच्या विरोधात टिकाव लागत नसल्याने त्याने विजापुरवर आक्रमण करायचे ठरवले.त्यामुळे शंभुराजेंनी विजापुरला मदत पाठवली.यासंबंधीची इंग्रजांची नोंद,”मोगल फौजा विजापूरच्या तटाभोवती वेढा देऊन आहेत.गोवळकोंड्याचा राजा,शंभूराजा व अदिलशहा यांचा एक गट झाला आहे.हे त्रिकुट मोगलांशी संगर करण्याच्या तयारीत आहे.यावर्षी भांडणाचा निकाल लागेल आणि हे या प्रांताचे धनी होतील. शंभूराजे व पोर्तुगीज यांच्यात भांडण चालूच आहे आणि शंभूराजे फक्त मोगल जाण्याची वाट पाहत आहे.सवड मिळताच तो त्यांचा प्रदेश गिळंकृत करीलच.” या पत्रावरून शंभूराजे हे आपल्या पित्याच्या रण नीतीने स्वराज्य चालवत होते हे लक्षात येते.कारवारहून सुरतेला पाठवलेल्या या पत्राची तारीख होती १५ सप्टेंबर, १६८४.

🚩 जय जिजाऊ
🚩 जय शिवराय
🚩 जय शंभूराजे

सर्वांना कळविण्यात येत आहे की, खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये. शिवकालीन दिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी, त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.

🔔 शिवनिती

Whatsapp link :-

https://bit.ly/2X1CLNc

Telegram link :-

https://t.me/joinchat/Thc_cR1dJcbQfpKl

Facebook group :-

https://bit.ly/3nejoeR

Website link :-

https://shivnitee.business.blog

https://Shivnitee.blogspot.com
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Leave a comment