शिवकालीन दिनविशेष दि.१४ सप्टेंबर

🚩 शिवनिती 🚩
शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष
💎 दि. १४ सप्टेंबर 💎
XIV9/2021

https://bit.ly/2X1CLNc

दि.१४ सप्टेंबर,१६७८
“दक्षिण दिग्विजय मोहीम”
कर्नाटक, तमिळनाडू येथे दीर्घकाळ चाललेली दक्षिण दिग्विजय मोहीम आटोपून परतीच्या प्रवासात छत्रपती शिवराय “नागापट्टण” येथे मुक्कामी.

दि.१४ सप्टेंबर, १६७९
खांदेरी बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाने कोटाचे बांधकाम सुरू होते.आपल्या आरमारी हालचालींना मर्यादा येणार हे ओळखून मुंबईकर इंग्रजानी त्याला विरोध करण्यासाठी आणि त्याकामी होणारा रसद पुरवठा रोखण्यासाठी एंसाईन ह्युजेस च्या नेतृत्वाखाली ३ शिबाडे आणि सैन्याच्या ६ पलटणी देऊन त्याला खांदेरी जवळ पाठवले होते.४ सप्टेंबर ला बेटाजवळ आलेला ह्युजेस ११ तारखेपर्यंत तिथे राहिला.पण ११ तारखेला समुद्रात वादळ झाल्याने तो पोर्तुगीज हद्दीत गेला.त्याच्या मदतीला आलेल्या मींचीन या इंग्रज अधिकाऱ्याला ह्युजेस ची शिबाडे दिसली नाहीत.वादळी हवेमुळे मींचीन नेही आपली रिव्हेंज ही फत्तेमारी खोल समुद्रात आत नेली.चिवट मराठी आरमाराने ही संधी साधून आपली रसद या दरम्यान खांदेरीवर पोहोचती केली.वादळामुळे पोर्तुगीज हद्दीत गेलेला ह्युजीस आजारी पडल्याने आपल्या शिबाडासह मुंबई बंदरात परत गेला.एंसाईन ह्युजेस आपली शिबाडे घेऊन मुंबई बंदरात परत गेला ती तारीख होती १४ सप्टेंबर १६७९.

दि.१४ सप्टेंबर,१७९७
होळकर घराण्यातील एक थोर शूर पुरुष. यशवंतराव हे महादजी शिंदे यांच्या खालोखाल मराठे सरदारांतील एक कर्तबगार वीरपुरुष होते. यशवंतराव हे तुकोजीराव होळकर यांना यमुनाबाई या दासीपासून झालेले पुत्र होते. त्यांना विठोजीराव हे सख्खे, तर काशीराव व मल्हारराव हे सावत्रभाऊ होते. तुकोजीरावांनंतर इंदूरच्या गादीसाठी तंटे सुरू झाले, तेव्हा काशीराव यांनी पेशव्यांचा, तर दुसऱ्या मल्हाररावांनी सर्जेराव घाटग्यांचा आश्रय घेतला. शिंदे यांच्याकडून दुसरे मल्हारराव यशवंतराव होळकर भांबुर्ड्याच्या लढाईत मारले गेल्यानंतर.

🚩 जय जिजाऊ
🚩 जय शिवराय
🚩 जय शंभूराजे

सर्वांना कळविण्यात येत आहे की, खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये. शिवकालीन दिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी, त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.

🔔 शिवनिती

Whatsapp link :-

https://bit.ly/2X1CLNc

Telegram link :-

https://t.me/joinchat/Thc_cR1dJcbQfpKl

Facebook group :-

https://bit.ly/3nejoeR

Website link :-

https://shivnitee.business.blog

https://Shivnitee.blogspot.com
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Leave a comment