🚩 शिवनिती 🚩
शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष
💎 दि. १६ सप्टेंबर 💎
XVI9/2021
https://bit.ly/2X1CLNc
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
दि.१६ सप्टेंबर, १६७२
शिवराय काही निवडक मंडळींसह शिवथर भागात दाखल झाले.
दि. १६ सप्टेंबर, १६८१
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कर्नाटक प्रांताचा सुभेदार असणाऱ्या रघुनाथ नारायण हणमंते यांना संभाजीराजेच्या विरोधातील कटात हात असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती.कर्नाटक प्रांतासारख्या विस्तीर्ण आणि दूरच्या प्रदेशावर विश्वासू माणूस असणे आवश्यक होते. दूरदर्शी संभाजीराजेंनी या प्रदेशावर आपले मेव्हणे हरजीराजे महाडिक यांची नेमणूक केली.राजेंच्या आज्ञेवरून हरजीराजे, श्यामजी नाईक पुंडे, जैताजी काटकर व दादाजी काकडे हे सरदार मार्च १६८१ ला कर्नाटकात रवाना झाले.स्वराज्यवारील मुघलांच्याबरोबच सिद्दी, इंग्रज व पोर्तुगीजांच्या विरोधातील संभाव्य लढ्याला तोंड देत त्यांना रोखण्यासाठी शंभुराजेंना महाराष्ट्रात राहणे गरजेचे होते.त्यामुळे त्यांनी “हरजीराजेना कर्नाटक प्रांताचे सर्वाधीकार आणि कर्नाटकातील सर्व गड किल्ल्यांचा अधिकार सोपविला होता. याबरोबरच राजांनी तेथील सर्व सुभेदार व इतर अधिकाऱ्यांना हरजीराजेच्या आज्ञेत राहण्याची सूचना केली होती.”पोर्टो नोव्होचे हवालदार गोपाळ दादाजी यांनी इंग्रजांच्या सेंट जॉर्जच्या वखारीला पाठवलेल्या या पत्राची तारीख होती १६ सप्टेंबर १६८१.
दि. १६ सप्टेंबर, १६८२
आपल्या बापविरोधात बंड करून दक्षिणेत संभाजीराजेच्या आश्रयाला आलेला मुघल राजपुत्र शहजादा अकबराने पाली येथे शंभुराजेंची भेट घेतली.या भेटीत राजेंनी त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ऑगस्ट १६८२ मध्ये या दोघांची पुन्हा एकदा भेट झाली. या भेटीत शंभुराजेंनी अकबराला आपल्या मुलखातुन समुद्रमार्गे राठोडांच्या मुलखात पाठवायचे ठरवले. ही बातमी औरंगजेबाला कळताच त्याने त्या मार्गातील आपल्या सुभेदारांना हुकूम पाठवला की अकबर दिसताच त्याची वाट अडवावी व त्याला कैद करावे.शंभुराजेंच्या बरोबर झालेल्या या भेटीनंतर शहजादा अकबर तिकोना येथे थांबला.पण उत्तरेत मुघली ऐशोआरामात राहणाऱ्या अकबराला तेथील हवा मानवली नाही.त्यामुळे त्याला जैतापूर येथे ठेवण्यात आले. तेथील हवाही अकबराला मानवली नाही.अकबरासोबत आलेले त्याचे नातेवाईकही आजरी पडले. शहजादा अकबराच्या अवस्थेचे वर्णन असलेली मुघल दरबारच्या आखबारातील या नोंदीची तारीख होती १६ सप्टेंबर १६८२.
🚩 जय जिजाऊ
🚩 जय शिवराय
🚩 जय शंभूराजे
सर्वांना कळविण्यात येत आहे की, खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये. शिवकालीन दिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी, त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.
🔔 शिवनिती
Whatsapp link :-
Telegram link :-
https://t.me/joinchat/Thc_cR1dJcbQfpKl
Facebook group :-
Website link :-
https://shivnitee.business.blog
https://Shivnitee.blogspot.com
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩