🚩 शिवनिती 🚩
शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष
💎 दि. १२ सप्टेंबर 💎
दि.१२ सप्टेंबर, १३९८
मोगल आक्रमक तैमूरलंगाने ९३,००० मुस्लिम सैन्यानिशी सिंधू नदी पार केली आणि तो निघाला लाहोरच्या दिशेने. हीच सुरुवात होती तैमूरलंगाच्या दिल्लीवरील आक्रमणाची.
दि.१२ सप्टेंबर, १६२७
इब्राहीम आदिलशाह मरण पावला आणि त्याचा तिसरा मुलगा मुहम्मद गादीवर आला. याचवेळी निजामशाहीतील वजीर मलिक अंबरही १६२६-२७ दरम्यान मृत्यू पावला.
https://shivnitee.business.blog
दि.१२ सप्टेंबर, १६६२
छत्रपती शिवरायांनी मोरेपंतांना पेशवेपदी नेमले.
https://shivnitee.business.blog
दि. १२ सप्टेंबर, १६६६
आग्रा सुटकेनंतर छत्रपती शिवाजी महाराज राजगड येथे आगमन…||
छत्रपती शिवाजी महाराजांना शोधण्यासाठी औरंगजेबाने फौजेची अनेक पथके वेगवेगळ्या मार्गांनी पाठविली. बहुधा छत्रपती शिवाजी महाराज वेषांतर करून हुलकावण्या देत असावे. कारण कोणत्याही तुकडीला त्यांना शोधून काढता आले नाही. संभाजीराजेबरोबर असल्यामुळे शिवाजी महाराजांना त्यांची काळजी वाटत होती. एक तर ते वयाने लहान होता. ते बरोबर असल्यामुळे शिवाजी महाराजांचा माग शोधून काढणे शत्रूला सुलभ होते. तेव्हा शिवाजी महाराजांनी असा विचार केला की संभाजीराजेंना मथुरेत ठेवावे आणि आपण पुढे मार्गक्रमण करावे. मथुरेत असलेले शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सेवक कृष्णाजीपंत व काशीपंत यांच्या स्वाधीन संभाजी राजेंना करून शिवाजी महाराजानी निर्धास्तपणे दक्षिणेचा मार्ग स्वीकारला.
छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या मार्गाने राजगडला परत आला याविषयी इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. आग्ग्राहून परत येताना दूरचा मार्ग शिवाजी महाराजांनी स्वीकारला असावा असे मत सर जदुनाथ सरकार यांनी दिलेले आहे. या मताप्रमाणे आग्रा-मथुरा वाराणसी-प्रयाग-गोंडवण-हैद्राबाद या मार्गाने शिवाजी राजे राजगडाकडे परतले असावे. परंतु समकालीन राजस्थानी कागदपत्रांवरून असे दिसते की शिवाजी महाराज ज्या मार्गाने आग्र्याला गेले त्याच मार्गाने राजगडकडे परतले कारण आग्र्याहून निसटल्यावर तो नरवरच्या घाटापर्यंत आल्याचा उल्लेख एका राजस्थानी पत्रामध्ये आलेला आहे. आग्ऱ्याला जाताना ते राजगड ,खडसी (छत्रपती संभाजीनगर) हंडिया भोपाळ-सिरोज-नरवर-ग्वाल्हेर-घोलपूर-आग्र्याला मार्गाने औरंगजेबाच्या भेटीसाठी गेला होता. बहुधा त्याच मार्गाने तो राजगडकडे परत आला असावा.
दिनांक १२ सप्टेंबर १६६६ रोजी निवडक लोकांसह शिवाजी महाराज राजगडला सुखरूप पोहचले. १९ ऑगस्ट रोजी त्यानी स्वत:ची सुटका करून घेतली आणि त्यानंतर तब्बल २४ दिवसांनी ते राजगडला पोहचले जर ते गोंडवण-हैद्राबाद मार्गाने आले असते तर त्यांना अधिक दिवस लागले असते. शिवाजी महाराज राजगडला सुखरूप पोहचल्यानंतर राजमंडळामध्ये आणि कुटुंबियांमध्ये मोठा आनंद पसरला अष्टप्रधान मंडळ, इतर सर्व अधिकारी, राजगडवरील सर्व सेवक आणि मावळे यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. राजमाता जीजाबाई हिला औरंगजेबाच्या पोलादी पिंजऱ्यात अडकलेला आपला पुत्र तेथून निसटून सुखरूपपणे आपल्यापाशी परत आला याचा आनंद केवढा झाला असेल ते शब्दात सांगता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज रायगड सुखरूप पोहोचल्यानंतर जवळजवळ दोन महिन्यानंतर म्हणजे नोव्हेंबर १६६६ मध्ये कृष्णाजी पंताने संभाजी राजेला राजगडावर आणले. ते येईपर्यंत शिवाजी महाराज राजगडला आल्याची बातमी गुप्त ठेवण्यात आली असावी. कारण जेधे शकावलीत असा उल्लेख आहे की ‘मार्गशिर्ष शुद्ध पंचमी शके १५८८ (२० नोव्हेंबर १६६६) रोजी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजेसह वर्तमान राजगडास आले.’ रायगड आल्यानंतर शिवाजीराजेंनी सवड न घेता आगामी मोहिमेची तयारी सुरू केली.
https://shivnitee.business.blog
दि.१२ सप्टेंबर, १६८६
विजापूर अखेर मुघलांनी जिंकले. सहा महिन्याच्या अथक परिश्रमा नंतर विजापूर राज्याचा पाडाव झाला आणि अजून एक दक्षिणेतली शाही मुघलांनी गिळंकृत केली. शेवटचा सुलतान सिकंदरशाह आदिलशाह याने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आणि रसूलपूर येथील औरंगजेबाच्या छावणीत जाण्यास तो विजापूरच्या रस्त्यातून निघाला.
https://shivnitee.business.blog
दि.१२ सप्टेंबर,१६८६
बादशहा औरंगजेबाला दक्षिणेत येऊन ३-४ वर्षे झाली तरी मराठ्यांच्या विरोधात तो सर्वच आघाड्यावर अपयशी ठरला होता. प्रचंड सेनासागर आणि अमाप संपत्ती असणाऱ्या बादशहाला सह्याद्रीच्या छाव्याने अपुऱ्या साधनसामग्रीने टक्कर दिली होती.या आघाडीवर अपयश आल्याने व संभाजीराजे,अदिलशाही व कुतुबशाही ह्या तिन्ही सत्ता अपल्याविरोधात एकत्र आल्याचे लक्ष्यात येताच त्याने विजापुर वर स्वारी करण्याचा निर्णय घेतला.विजापूरच्या बचावासाठी संभाजीराजे आणि कुतुबशाह यांनी मदत पाठवूनही त्याचा फारसा उपयोग झाला नाही.स्वतः बादशहाच्या नेतृत्वाखाली विजापूर किल्ल्याला वेढा घातला गेला. बाहेरून मदत मिलणे अशक्य झाल्याने आणि अंतर्गत बंडाळीने पोखरल्याने आदिलशहाने शरणागती पत्करली. विजापूरी सरदार अब्दुल रौफ आणि सर्जाखान यांच्या चिटणीसानी मुघल सरदार गाझिउद्दीन फिरोजजंग याची भेट घेऊन वाटाघाटी केल्या आणि शेवटचा आदिलशाही सुलतान सिकंदर हा आपले सिंहासन सोडून रसुलपुर येथे औरंगजेबाच्या छावणीतील दरबारात गेला.बादशहाला त्याने मुजरा केला.विजापूरचा सुलतान मुघलांचा सरदार झाला.विजापूरचा पाडाव झाला ती तारीख होती रविवार १२ सप्टेंबर १६८६.
🚩 जय जिजाऊ
🚩 जय शिवराय
🚩 जय शंभूराजे
सर्वांना कळविण्यात येत आहे की, खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये. शिवकालीन दिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी, त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.
🔔 शिवनिती
Whatsapp link :-
Telegram link :-
https://t.me/joinchat/Thc_cR1dJcbQfpKl
Facebook group :-
Website link :-
https://shivnitee.business.blog
https://Shivnitee.blogspot.com
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩