शिवकालीन दिनविशेष दि.११ सप्टेंबर

🚩 शिवनिती 🚩
शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष
💎 दि. ११ सप्टेंबर 💎

https://bit.ly/2X1CLNc

दि.११ सप्टेंबर, १६५७
छत्रपती शिवाजी महाराज कल्याणच्या दिशेने रवाना झाले.

दि.११ सप्टेंबर, १६५७
बादशहा औरंगजेबाला एकूण चार बायका होत्या.त्यातील प्रमुख राणी होती दिलरसबानू बेगम.ही शहानवाजखानाची मुलगी होती.औरंगजेब आणि दिलरसबानूचा विवाह आग्रा येथे ८ मे १६३७ रोजी झाला होता.दिलरसबानूला ५ मुले झाली होती. यातील शेवटचा मुलगा शहजादा अकबर याच्या जन्मानंतर आजारपणात ती ८ ऑक्टोबर १६५७ ला औरंगाबाद येथे मरण पावली. पुढे शहजादा अकबराने आपल्या बापाशी बंड करून संभाजीराजेचा आश्रय घेतला.दक्षिणेत आलेल्या औरंगजेबा पासून बचाव करण्यासाठी राजापूरच्या फ्रेंच व्यापाऱ्याच्या सहकार्याने अकबर इराणला गेला.नंतरच्या काळात नोव्हेंबर १७०४ मध्ये पर्शिया येथे तो मरण पावला.संभाजीराजे आणि पोर्तुगीज यांच्यात झालेल्या तहात त्याने मध्यस्ती केली होती.बादशहा औरंगजेब आणि त्याची पत्नी दिलरसबानू यांचा पुत्र शहजादा अकबर याचा जन्म औरंगाबाद येथे झाला होता ती तारीख होती ११ सप्टेंबर १६५७.

शहजादा महंमद अकबराचा भाद्रपद शुद्ध चतुर्दशी, शके १५७९, राक्षस संवत्सर, शुक्रवार म्हणजेच ११, सप्टेंबर १६५७, रोजी जन्मदिवस! शहजादा महंमद हा संभाजी महाराजांपेक्षा फक्त ४, चार महिने लहान पण जन्मवर्ष आणि इतर बाबतीत बरेचसे साम्य! कदाचित हा अनपेक्षित दैवयोग असावा. पादशहाजादा महंमद अकबर हा छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा अवघा ४, चारच महिन्यांनी लहान होता. अकबराच्या मातेचे नाव दिलरसबानू.
ती राजपूत राजकन्या होती.

दि.११ सप्टेंबर,१६७९
दर्यासारंग दौलतखान कुमक घेउन इंग्रजांबरोबरच्या लढाईसाठी माईनाक भंडारीच्या मदतीला खांदेरी येथे पोचला.
इंग्रजांची ‘हंटर’, ‘रिवेंज’ आणि इतर ३ लढाउ जहाजे खांदेरीला वेढा टाकून उभी होती. दौलतखानाने इंग्रज अधिकारी ‘केग्विन’चा पाडाव केला, माईनाक भंडारीला रसद पोचती केली आणि ‘नागाव’ला पुन्हा रसद घेण्यासाठी परत गेला.

https://bit.ly/2X1CLNc

दि.११ सप्टेंबर, १६८६
विजापूर किल्ला जिंकण्यासाठी आलेला बादशाह औरंगजेबाने आपली छावणी रसूलपूर येथे टाकली होती.तिथून तो मोहिमेची सूत्रे चालवत होता.४ जुलैला त्याने तोफांच्या माऱ्याने किल्ल्याचे बुरुज उध्वस्त करण्यास व तटाखाली सुरुंग उडवण्याचा हुकूम दिला.४ सप्टेंबर ला तो स्वतः लढाईच्या मोर्चावर पाहणी करण्यासाठी गेला.मोगल फौजांच्या आक्रमक हल्ल्याने घाबरून विजापूरचा सुलतान सिकंदर आदिलशहा घाबरला.आदिलशाहीचा कारभार सय्यद मसूद,अब्दुल रौफ व सर्जाखान या तीन सरदाराकडे होता.१० सप्टेंबरला अबुल रौफचा मुन्शी सय्यदखान जाऊन मुघल सरदार गाझिउद्दीन खानाला भेटला व त्याने तहासंबंधी प्राथमिक बोलणी केली.दुसऱ्या दिवशी अबुल रौफ हा आदिलशाहीचा मुख्य सरदार गाझिउद्दीन खानाला जाऊन भेटला.तहाची बोलणी व करारमदार करून तो परत किल्ल्यात गेला.आदिलशाही सरदार अबुल रौफ ने गाझिउद्दीन खानाची भेट घेतली ती तारीख होती ११ सप्टेंबर १६८६

https://bit.ly/2X1CLNc

दि.११ सप्टेंबर,१७००
संताजी घोरपडे यांनी धनाजी जाधवांचा पराभव केला.

दि.११ सप्टेंबर, १७५१
सिंहगड किल्ल्याच्या दारूगोळ्याच्या कोठारावर ११ सप्टेंबर १७५१ रोजी वीज पडून गडावर मोठा स्फोट झाला होता. ज्यामुळे गडावरील अनेक इमारतींना हानी पोहोचली होती. ज्याच्या दुरुस्तीसाठी ८७०० रुपये खर्च पडल्याचीही नोंद आहे. पुढे याच इमारतीत ब्रिटिशांनी काही काळ चर्चही थाटले होते.

🚩 जय जिजाऊ
🚩 जय शिवराय
🚩 जय शंभूराजे

सर्वांना कळविण्यात येत आहे की, खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये. शिवकालीन दिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी, त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.

🔔 शिवनिती

Whatsapp link :-

https://bit.ly/2X1CLNc

Telegram link :-

https://t.me/joinchat/Thc_cR1dJcbQfpKl

Facebook group :-

https://bit.ly/3nejoeR

Website link :-

https://shivnitee.business.blog

https://Shivnitee.blogspot.com
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Leave a comment