🚩 शिवनिती 🚩
शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष
💎 दि. १० सप्टेंबर 💎
https://shivnitee.business.blog
१० सप्टेंबर, १६६६
छत्रपती शिवरायांनी कोल्हापूर जवळील “किल्ले रांगणा” जिंकला.
या किल्ल्याचा खूप मोठा इतिहास आहे.
समुद्र सपाटीपासून सुमारे ७७० मीटर उंचीवर असणारा हा किल्ला.
शिलाहार वंशीय राजा महामंडलेश्वर भोज (दुसरा) ने इसवी सन ११८७ च्या आसपास बांधला.
बहामणी राजा महमद गवाण याने इसवी सन १४७० मध्ये जिंकला.
१६५७ पर्यंत आदिलशहाच्या ताब्यात तर,
नंतर शिवाजी महाराजांनी विजापुरांकडून जिंकून घेतला,
१६७०-७१ मध्ये शिवाजी महाराजांनी या गडाची डागडूगी केली.
या डागडूगीसाठी ६००० होन खर्च केल्याची इतिहासात नोंद आहे… कोल्हापूर वरून थेट ७० कि. मी. अंतरावर असलेले पाटगाव या ठिकाणावरून ७/८ किलोमीटर वर आहे.
https://shivnitee.business.blog
१० स्पटेंबर, १६८६
विजापूरची आदिलशाही किल्ला बरेच दिवस वेढा घालूनही ताब्यात येत नसल्याने औरंगजेब बादशाह सोलापूरच्या किल्ल्यातून १४ जुन १६८६ ला विजापूरकडे निघाला.३ जुलै ला त्याने रसुलपुर येथे आपली छावणी टाकली.४ सप्टेंबरला स्वतः बादशाह वेढ्याच्या ठिकाणी गेला आणि त्याने सरदारांना काही सूचना केल्या. विजापूरात यावेळी सिकंदर आदिलशहा राज्य करत होता.पण सिकंदर नामधारी सुलतान असून मुख्य सत्ता सैयद मसूद,अब्दुल रौफ व सर्जाखान ह्या प्रमुख सरदार लोकांकडे होती.विजापूरला येणारी रसद बंद झाल्याने आणि मुघलांनी तटाखाली सुरुंग पेरून तट उडवून देण्याचे नियोजन केल्याचे समजताच आदिलशहाने घाबरून आपले वकील औरंगजेबाकडे बोलणी करण्यासाठी पाठवायचे ठरवले.त्याप्रमाणे अब्दुल रौफचे मुन्शी सय्यदखान व सय्यद मखदूम ,सर्जाखानचा मुन्शी शेख हुसेन हे हाफिज अफजलच्या बरोबर सख्य करण्यासाठी जाऊन मुघल सरदार गाझिउद्दीनखानला भेटले व रात्री परत किल्ल्यात गेले.या भेटीची तारीख होती १० सप्टेंबर १६८६.
https://shivnitee.business.blog
१० सप्टेंबर, १८००
शके १७२२ च्या भाद्रपद व. ७ रोजी प्रसिद्ध पुरुष धोंडोजी वाघ हे इंग्रजांकडून ठार झाले.
मराठेशाहीच्या पडत्या काळांत दक्षिणेत धोंडोजी वाघ यांचे मोठेच प्रस्थ होते. यांचे मूळचे आडनांव पवार असे असून सिधोजी व बहिरजी पवार हे दोघे बंधु आदिलशाहीच्या नोकरीस होते. अनागोंदी जवळ कृष्णाकाठच्या रानातून यांनी वाघिणीचे दूध आणून दिल्याबद्दल मुलतानाने त्यांस ‘वाघ’ हा किताब दिला. धोंडोजी वाघ हे प्रथम काही दिवस पटवर्धन व करवीरकर यांच्या फौजेत चाकरीत होते. टिपू व मराठे यांच्या मुलखांत धोंडोजीनें अनेक प्रसंगी दंगेधोपे करून लुटालूट केली. शेवर्टी टिपूने यांना कैदेत ठेविले. टिपू मेल्यानंतर त्याचे राज्य इंग्रजांकडे आले. त्या वेळी सर्व कैद्यांना मुक्त करण्यांत आले. त्यांत धोंडोजी वाघहि सुटले; लागलीच जमवाजमव करून इंग्रजांनाहि उपद्रव देण्यास यांनी सुरुवात केली. जनरल आर्थर वेलस्ली हा टिपूच्या राज्याचा बंदोबस्त पाहत होता. तुंगभद्रेच्या दक्षिणेस पुंडाई करणाऱ्या घौडोजीचे पारिपत्य करण्याचे इंग्रजांनी ठरविले. पटवर्धन, इंग्रज व व धोंडोपंत गोखले यांच्या फौजा एकत्र झाल्या. परंतु वाघांनी मोठ्या धोरणानिशी गोखल्यांच्या फौजेचा पराभव केला. धोंडोजीची प्रतिष्ठा फारच वाढली. वाघाचें शिर आणून देणारास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर झाले! इंग्रज आणि पटवर्धन यांनी मोठी योजना आंखून चोही बाजूंनी वाघास कौंडण्याचा विचार केला. हे वृत्त धोंडोजीस समजलेच. लागलीच ते मलप्रभेचा कांठ सोडून पूर्व दिशेस कृष्णा – मुंगभद्रा यांच्या दरम्यान रायचूरच्या भागात शिरले. मागून त्यांचा पाठलाग होत होता. शेवटी कोठेहि जाण्यास अवकाश राहिला नाही
तेव्हां भाद्रपद व.७ रोजी धोंडोजी वाघ ठार झाले. “वाघ रात्रीसच पळून जातो की काय या धसक्यामुळे इंग्रजांना चैन नव्हते… पहाटेस कूच करून
वस्लीने सूर्योदयास भन्नूर येथे वाघांस गाठले. तो लगेच तयार होऊन लढाईस उभा राहिले. लढाईत तीन गोळ्या लागून वाघ ठार झाले. फौज उधळून गेली.
🚩 जय जिजाऊ
🚩 जय शिवराय
🚩 जय शंभूराजे
सर्वांना कळविण्यात येत आहे की, खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये. शिवकालीन दिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी, त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.
🔔 शिवनिती
Whatsapp link :-
Telegram link :-
https://t.me/joinchat/Thc_cR1dJcbQfpKl
Facebook group :-
Website link :-
https://shivnitee.business.blog
https://Shivnitee.blogspot.com
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩