शिवकालीन दिनविशेष- दि.९ सप्टेंबर

🚩 शिवनिती 🚩
शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष
💎 दि. ९ सप्टेंबर 💎

https://shivnitee.business.blog

९ सप्टेंबर, १६६७
छत्रपती शिवराय रायगडहून कुडाळला रवाना झाले.
स्वराज्याच्या सीमेलगत असणारे पोर्तुगीज आपल्या सरहद्दीवर असणाऱ्या जनतेवर धार्मिक अत्याचार करत.१६६७ च्या दरम्यान गोव्याचा पोर्तुगीज व्हाइसरॉय कोंदी द सांव्हिसेंती हा तर अतिशय धर्माध होता.त्याच्याच छळापुढे नमते घेत बारदेस मधील ४ हजार हिंदू लोकांनी धर्मातंर केले होते.त्यातच महाराजांच्या भीतीने गोव्यात पळून गेलेले लखम सावंत,केशव नाईक,केशव प्रभू हे कोकणातील देसाई गोव्यालगतच्या स्वराज्याच्या प्रदेशात धाडी घालत.५ सप्टेंबरला लखम सावंताचा पुतण्या नारबा सावंत याने पोर्तुगीजाना बरोबर घेऊन वेंगुर्लेवर हल्ला केला होता.वेंगुर्ला येथील डच महाराजांशी मैत्री राखून होते. त्यांच्या विनंतीवरून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह धर्मान्ध पोर्तुगीज आणि कोकणातील देसायांना धडा शिकवण्यासाठी रायगडावरून कुडाळकडे निघाले.महाराज कुडाळावर चालून गेले ती तारीख होती अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे ९ सप्टेंबर १६६७.

https://shivnitee.business.blog

९ सप्टेंबर, १६७१.
इंग्रजांच्या मुंबई येथील गव्हर्नरने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो की, “शिवाजीच्या हाती खांदेरी असणे, म्हणजे मुंबईवर टांगती तलवार आहे.”

https://shivnitee.business.blog

९ सप्टेंबर, १६७९
ह्युजेस ने ९ सप्टेंबर रोजी मुंबईला संदेश रवाना केला व कळवले की मराठे खांदेरीला तट उभारत असून ते तोफगाडेही तयार करताना दिसत आहेत. त्यांनी बेटावर आतील बाजूस काही खोपटी बांधली आहेत व विविध ठिकाणी आडोसेही तयार केले आहेत. ह्यादरम्यान मुंबईकरांना त्यांच्या सुरतेतील मुख्यालयाकडून हा प्रयत्न मोडून काढावा व बेट ताब्यात घ्यावे असा स्पष्ट आदेश आला व त्याप्रमाणे आता मुंबईकरांनी १६ तोफा असणारी ‘रिवेंज’ नामक फ्रिगेट कॅप्टन विल्यम मिन्चीनच्या अधिपत्याखाली खांदेरीस रवाना केली.

९ सप्टेंबर, १६८६
औरंगजेब बादशहाने अखेर आदिलशाही संपवली.
जी भूमिका इ. स. १६६५, ते इ. स. १६६६, मध्ये शिवरायांनी घेतली. त्यानुसार अदिलशाही, मराठे, व निजामशाही एकत्र येऊन मोगलशाही संपवून टाकावी. त्यास मात्र, अदिलशाहीने व निजामशाहीने विरोध दर्शविला… तीच अदिलशाही औरंगजेबाने अश्विन शुद्ध द्वितीया, शके १६०८, संवत्सर क्षय, गुरूवार, म्हणजेच आजच्या दिवशी ९ सप्टेंबर इ.स.१६८६ मध्ये नेस्तनाबूत करून टाकली. औरंगजेब मराठेशाही आणि मराठा साम्राज्य कधिच संपवू शकला नाही. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर अखंड २७, सत्तावीस वर्षे मराठ्यांचा यल्गार अग्निप्रमाणे प्रखर होत गेला व अखेर औरंगजेबास खुलताबाद येथे म्रुत्यूनंतर गाडले गेले. मराठ्यांच्या चिवट संघर्षाने औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच खणली गेली.

🚩 जय जिजाऊ
🚩 जय शिवराय
🚩 जय शंभूराजे

सर्वांना कळविण्यात येत आहे की, खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये. शिवकालीन दिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी, त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.

🔔 शिवनिती

Whatsapp link :-

https://bit.ly/2X1CLNc

Telegram link :-

https://t.me/joinchat/Thc_cR1dJcbQfpKl

Facebook group :-

https://bit.ly/3nejoeR

Website link :-

https://shivnitee.business.blog

https://Shivnitee.blogspot.com

Leave a comment