सुंदरता आणि स्वभाव

🚩जय जिजाऊ, जय शिवराय🚩
🙏शिवविचारावर आधारित बोधकथा🙏

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये एक गड होता. त्या गडावर दोन मावळे राहत होते—सूर्याजी आणि विठोजी.

सूर्याजी अत्यंत देखणा, उंच, आकर्षक व्यक्तिमत्वाचा होता. त्याच्या वेशभूषेत, चालण्यात एक रुबाब होता. त्यामुळे तो जिथे जाई तिथे लोक त्याच्याकडे लगेच आकर्षित व्हायचे.
पण त्याचा स्वभाव थोडा गर्विष्ठ होता—तो इतरांना कमी लेखायचा.

दुसरीकडे विठोजी साधासुधा, सामान्य दिसणारा; पण मनाने खूप मोठा होता. तो सर्वांशी प्रेमाने वागायचा, गरजूंना मदत करायचा, आणि सहकाऱ्यांना नेहमी प्रोत्साहन द्यायचा.

एकदा गडावर आले. त्यांनी मावळ्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. सर्वांना वेगवेगळी कामं दिली.

सूर्याजीला शस्त्र प्रदर्शनाचं काम दिलं, तर विठोजीला गावातील लोकांची मदत करण्याची जबाबदारी दिली.

सूर्याजीने आपलं कौशल्य दाखवलं—त्याची तलवारबाजी पाहून सगळे थक्क झाले.
पण तो लोकांशी कठोरपणे बोलत होता.

विठोजी मात्र गावात गेला, आजारी लोकांची सेवा केली, भुकेल्यांना अन्न दिलं, आणि सगळ्यांशी आपुलकीने वागला. लोकांच्या डोळ्यांत त्याच्याबद्दल आदर आणि प्रेम निर्माण झालं.

संध्याकाळी महाराजांनी दोघांनाही दरबारात बोलावलं.
महाराज म्हणाले—
“सूर्याजी, तुझी सुंदरता आणि पराक्रम लोकांचं लक्ष वेधून घेतात. पण विठोजीचा स्वभाव लोकांच्या हृदयात जागा निर्माण करतो.”

हे ऐकून सूर्याजीला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने विठोजीकडून नम्रता आणि चांगला स्वभाव शिकण्याचा निर्धार केला.

बोध:
सुंदरता क्षणिक असते, पण चांगला स्वभाव कायमचा मनात घर करतो.

Leave a comment