माणुसकी
@ 6IX2K25
माणुसकी ही नसते फक्त शब्दांत,
ती दिसते कृतीत, मनाच्या थरांत.
कोणी रडताना डोळे पुसणं,
किंवा भुकेल्याला अन्न देणं.
नात्यांची वीण जपणं असतं,
कधी परक्यांनाही आपलं मानणं असतं.
वाऱ्यासारखी मोकळी, शांतसुद्धा,
पण गरज पडता वीजेसारखी झपाटसुद्धा.
धर्म, जात, भाषा विसरून
एक हात मदतीचा पुढे करणं
हीच खरी माणुसकी असते,
हृदयातली दिव्यता असते.
दगडांमध्ये देव शोधतो जो,
पण माणसात माणूस ओळखत नाही –
तो हरवलेला वाटसरू ठरतो,
कारण माणुसकीशिवाय माणूस अधूरा असतो.
जपा ती, वाढवा ती,
कारण शेवटी आठवण येते तीच –
माणुसकी!
*शिवश्री लक्ष्मण काटेकर*
432FJCMF74
7588020886
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼