एकच राजा…….
एकच राजा इथे जन्मला या शिवनेरी किल्ल्यावर.
एकच राजा… इथे जन्मला डोंगरी कपारी आणि दरी जनता सारी या राजाला वाकुनी सदैव मुजरा करी
जन जनसेवे साठी जीव झिजविला
कधीच स्वतःची पर्वा न करी
यवनास या सदैव नडला या सर्वांचा नाश करी
कोणासही न कधी तासा रयतेचे असे स्वराज्य उभारी कधी न ही कोणास घाबरला सर्वांना समान न्याय करी
राजे तुम्ही यावे जन्माला, त्यासाठी सर्वांना साकडं करी आधी जिजाऊंनी यावे जन्माला त्यासाठी आम्ही रचू शब्दनगरी
शिवश्री लक्ष्मण काटेकर,
सोलापूर