━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━
◼️आज काल सगळीकडे संवाद कमी होत चालले दिसत आहेत. त्यामुळे नातं गुदमरत चालली आहेत.
━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━
✒️संकलन : प्रविण सरवदे, कराड,
आज काल सगळीकडे संवाद कमी होत चालले दिसत आहेत. आपले आई वडील आणि घरातील सर्व नाती तसेच इतर नातेवाईक आपल्याशी किती स्वतः हून संवाद साधतात. ते फारच कमी दिसतात किंवा दिसतच नाहीत.
अशा वेळी आपण त्यांना “Ego” असेल, “Attitude” असेल किंवा अती काम असेल म्हणून त्यांना सोडून देतो. पण आजकाल या “Virtual” जगात सगळे जण “Online” मात्र दिसत असतात.
अगदीं Face book वर, Messenger आणि What’s app हे Platform असे आहेत की, काही आधी नवीन मैत्री करुन तिथेच जास्त Chatting केली जात आहेत.
मग त्या समोरच्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष किती ओळखतो, हे तर फार दूरच असत. अशा या व्यक्तीमध्ये बरीच माणसं भावनिक गुंतत जातात, आणि मग अरे त्या अमुक व्यक्तीचा Massege आला नाही की, लगेच अस्वस्थ होतात. असे हे बिनबुडाचे गुरफटण खरच टिकून राहील तरी का.?
त्यामुळे आपण स्वतः ला हळूहळू विसरत जातो. तिला आपण नको आहोत का.? किंवा ती टाळू लागली आहे असे काहीसे विचार सतत मनात येऊन मन नैराश्याकडे आपण जाऊ लागते.
हल्ली हेच जवळजवळ सर्व करताना दिसून येत आहेत. म्हणूनच अश्यासाठी वेळीच आपल्या जवळच्या विश्वासातील व्यक्तीशी संवाद साधणे म्हणजे बोलणें गरजेचे आहे.
एखाद्या जवळच्या व्यक्तीची आठवण आली की लगेच क्षणभर का होईना स्वतःहून Call करुन त्या व्यक्तीशी संवाद साधन अणि मन मोकळं कारणं खुप गरजेचे आहे, कारण त्या व्यक्तीला तुम्ही पूर्वी पासून ओळखत असतातच ना.
जगायचं राहून गेल नाही पाहिजे. क्षणभंगूर जीवनामध्ये किती दिवस आहोत आणि कधी विकेट जाईल याची काहीच खबर नाही कोणालाच. आयुष्य जात रुसण्या फुगण्यात, अबोला पकडण्यात, बऱ्याच वेळा आधी कोणी बोलाव यातही वर्ष निघून जातात. जीवनाच्या सर्व्हिस मध्ये कोणीच पर्मनंट नाही. आज आहे तर उद्या नाही. शेवटी फक्त फोटोरुपी आठवणीच राहतात.
जगून घ्या, बोलून घ्या, मनमुराद हासून घ्या, आलंच रडायला तर रडून ही घ्या. रुसल असेल कोणी तर स्वतः बोलुन सुरवात करून पहा. प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. वय, नोकरी, व्यवसाय, प्रतिष्ठा, जात पात, धर्म यापलीकडे जाऊन् जगता आल पाहिजे. नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या. लहानपणी वाटत मोठ व्हावं, मोठेपणी वाटत श्रीमंत व्हावं आणि म्हातारपणी वाटत परत लहान व्हावं.
या सगळ्या चक्रव्हुवात् जगायचं मात्र राहून जात. ज्याला जे आवडत त्यासाठी स्वतः वेळ काढावा. खूप कमवून तरी कुठ घेऊन जायचं आहे आणि समजा कमवलं तरी पुढच्या पिढीला ते टिकवता आल् पाहिजे यावर ही आपला अभ्यास हवा.
आज मनमारून जगाल ही पण तुमच्या मनाचं काय? पैसे नक्कीच कमवा पण स्वतासाठी ही थोड जगा. खूप काही कमवाल ही पण स्वतःचे छंद, स्वतःची आवड, स्वतःच्या इच्छा जर राहिल्या असतील तर मात्र सर्व काही कमावून ही आपण कफल्लक आहोत. म्हणून जगायचं राहून नाही गेल् पाहिजे अस जगा.
दररोज परमेश्वराला प्रार्थना करा. आजपर्यँत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशिर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृध्दीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हास सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये. याचीही काळजी तुच घे.
आपल्या जिवलग व्यक्तींच्या आठवणी, आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा, पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा. एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यांना मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका. समाजातील खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड, लोकांपासुन सावध व दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.
▣▬▬▬✥⊰༺☬༒☬༻⊱✥▬▬▬▣