अहमदनगर जिल्हा

  • माझा महाराष्ट्र – माहिती जिल्ह्यांची –

अहमदनगर जिल्हा

भाग 1 ला                                                   दि. 01 मे, 2025  

=========================================================

संकलन आणि मांडणी :-        श्री.लक्ष्मण काटेकर, सोलापूर (महाराष्ट्र).

shivnitee@gmail.com  Contact @ 7588020886.

=========================================================

“अहमदनगर  जिल्हा”

अहमदनगर

 हे महाराष्ट्रातील शहर सीना नदीच्या काठावर वसलेले आहे जे पुण्यापासून ईशान्येकडे साधारणपणे १२० किलोमीटरवर आहे. हे शहर अहमदनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

इतिहास

                 १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरोबगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्‍हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे १६३६ पर्यंत टिकली.मोगल बादशहा शहाजहानने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला तर १८१७मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर घेतले. शहरात अहमदनगरचा किल्लारेणुकामाता मंदिर (केडगांव) व चांदबीबी महल व बाग-ए-बहिश्त महल (सावेडी)अशी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या शहराला नगर या नावानेसुद्धा ओळखतात. निजामशाहीचा संस्थापक पाथरीचा कुलकर्णी मध्ययुगीन कालखंडात दक्षिण हिंदुस्थानमध्ये ज्या पाच शाह्या होऊन गेल्या त्यामध्ये अहमदनगरची निजामशाही ही स्वराज्याच्या पायाभरणीसाठी पूरक ठरली. हिंदुस्थानमध्ये मुस्लिम सत्तेची सुरुवात झाल्यानंतर विविध भागांत त्यांनी आपली सत्तास्थाने निर्माण केली. त्यासोबत अनेक वास्तूंची निर्मिती झाली. आपल्या साम्राज्यविस्ताराचा एक भाग म्हणून त्यांनी संबंधित राजधानीला वा वास्तूला स्वतःची वा परिवाराची नावे दिली. त्यानुसार अहमदनगरच्या निजामशाहीलाही मोठा रोमांचकारी इतिहास लाभलेला आहे. अहमदनगर हे मूळचे शहर नसून प्रसंगानुसार त्याची उभारणी झालेली आहे. देवगिरीवर स्थापन झालेल्या बहामनी या राज्यात निजाम उल मुल्क पदवी धारण करणारा मलिक अहमद हा मूळचा हिंदू घराण्यातील असून परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या बहिरंभट कुलकर्णीचा नातू असून बहिरंभटाचा मुलगा तिमाभटाने मुस्लिम धर्म स्वीकारला. मलिक अहमद हा तिमाभटाचा मुलगा असून बहामनी साम्राज्यात पराक्रम गाजवत तो सुभेदार पदापर्यंत पोहोचला. बहामनी साम्राज्याचा दिवाण महंमद गवाणमुळे साम्राज्यविस्तार झाला परंतु राज्यकारभारावरील पकड ढिली होत गेल्याने बहामनी साम्राज्यातील प्रत्येक सुभेदाराने स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण केले. त्यानुसार मलिक अहमदने जुन्नर या ठिकाणी राजधानी ठेवून स्वतःचे निजामशाही नावाने स्वतंत्र झाल्याचे घोषित केले. तेव्हा बहामनीच्या फौजांनी मलिक अहमदवर आक्रमण केले. तेव्हा भिंगार गावाजवळील इमाम घाटात बहामनी सैन्याचा दारुण पराभव केला. विजय मिळवून देणारा परिसर म्हणून याच ठिकाणी २८ मे १४९० रोजी त्याने एका शहराची स्थापना केली. त्याला नाव दिले अहमदनगर. विशेष म्हणजे मलिक अहमदच्या फौजेत असणा-या राजा, सेनापती, प्रधान आणि काझी अशा सर्वांच्याच नावात अहमद होते. आपल्या मूळ पुरुषाच्या नावावरून या घराण्याने बहिरंभटावरून बहिरी नाव धारण केले तर पुढे प्रत्येक राजाने स्वतःला निजामशहा हा किताब लावला तर त्यांच्या साम्राज्याला निजामशाही म्हटले गेले. मलिक अहमद निजामशहा बहिरीने त्या ठिकाणी एका भुईकोट किल्ल्याची पायाभरणी केली. त्यानुसार अंडाकृती किल्ल्याचा परिघ मैलाचा असून किल्ल्याच्या भोवती मोठा खंदक तर बाजूने २२ मोठे बुरूज आहेत. किल्ल्यामध्ये पाण्याकरिता गंगा, जमुना, मछलीबाई व शक्करबाई नावाच्या ४ विहिरी असून सोनमहल, मुल्कआबाद, गगन महल, मीना महल, बगदाद महल यांसारखे महाल बांधले. दिवसेंदिवस यात वाढ होत गेली. तत्कालीन कालखंडात किल्लेवजा एका स्वतंत्र शहराची निर्मिती झाली. त्या भागाला कोटबाग निजाम म्हटले गेले. या कोटबाग निजामचे वैभव एवढे मोठे, अतिभव्य होते की, याची तुलना कैरो व पॅरिससारख्या भव्य शहरांसोबत व्हायची. अहमदनगरच्या निजामशाहीत एकूण ११ निजाम होऊन गेले. पैकी चौघांचे खून झाले. १२५ वर्षे या सत्तेने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. निजाम या शब्दाचा अर्थ होतो जमिनीची व्यवस्था पाहणारा, त्यामुळे संबंधित सुभेदाराला निजाम उल मुल्क ही पदवी असायची. अशी पदवी असणा-या दोन सरदारांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. पहिले १४९० चे अहमदनगरचे निजामशाही आणि दुसरे १७२४ चे हैदराबादचे निजामशाही. त्यामुळे या दोन सत्तांचा परस्पर कोठेही संबंध नाही. अहमदनगरच्या निजामशाहीत मलिक अंबरसारखा शूर आणि धोरणी प्रधान होऊन गेला. ज्याने जमीन महसूल व्यवस्था सुधारली. शिवाय शत्रूशी लढण्याकरिता गनिमी काव्याच्या युद्धनीतीचा अवलंब केला. म्हणून त्याला गनिमी कावा युद्धनीतीचा जनक म्हटले जाते. स्वराज्याला पोषक ठरणारी पाश्र्वभूमी याच निजामशाहीने दिली. कारण छत्रपती शिवरायांचे मूळ पुरुष बाबाजी भोसलेंपासून आजोबा मालोजीराजे, वडील शहाजी भोसलेंसह सर्व भाऊबंद याच निजामशाहीत पुढे आले. एवढेच नाही तर मालोजीराजे यांनी इंदापूर या ठिकाणी तर चुलते शरीफजी यांनी भातोडी (नगरजवळील)या ठिकाणी झालेल्या युद्धात निजामासाठी प्राण अर्पण केले. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे घडले तेच मुळी निजामशाहीत. मलिक अंबरनंतर त्यांनी निजामशाही वाचविताना मुर्तुजा निजामाला घेऊन परंडा या ठिकाणी गादी ठेवून स्वतंत्रपणे कारभार चालविला. शाहजहानने स्वतः निजामशाहीविरोधात मोहीम आखली नसती तर शहाजीराजांनी स्वतःच स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली असती. भोसले घराण्याबरोबर याच निजामशाहीत सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर घराणे नावारूपाला आले. या एकत्रितपणामुळेच विवाहबंधनातून नवीन कार्याची निर्मिती झाली. भोसले व घोरपडे हे घराणे मूळ एकच असून या घराण्यातील कर्णसिंहाला निजामाने राजे घोरपडे-बहाद्दर नावाचा किताब दिला होता. तेव्हापासून घोरपडे हे नाव उदयास आले. सोलापूर, परंडा, औसा, उदगीर, धारूर, देवगिरी, यांसारखे अनेक भुईकोट किल्ले निजामशाहीतच पुढे आले. साम्राज्यविस्तार करताना आदिलशहाबरोबर झालेल्या युद्धात इब्राहिम निजामशहा ५ ऑगस्ट १५९५ रोजी नळदुर्गात मरण पावला. तरी परंतु निजामशहा आणि आदिलशहाचे संबंध सुरळीत राहिल्याने पहिल्या बु-हाणशहा (१५०८ ते १५५३) ला इस्माईल आदिलशहाची मुलगी दिली होती. तर हुसेन निजामशहाची मुलगी चांदबिबी ही अली आदिलशहाला दिली होती. या शाही विवाहात सोलापूरचा किल्ला आंदण म्हणून वापरला गेला. निजामशाहीची देणगी म्हणजे हुसेन निजामशहाच्या काळात चिकबुरूज नावाने जगातील भव्य असणारी तोफ तयार केली. ५५ टन वजनाची ही तोफ बरेच दिवस परंड्याच्या किल्ल्यात होती. पुढे परंडा आदिलशहाकडे आल्यानंतर ऑगस्ट १६३२ साली ती विजापूरला गेली. तोफ वाहून नेण्याकरिता १० हत्ती व ४०० बैल लागायचे. सोलापूर व विजयनगरवर याचा वापर झाला. विजापूरच्या सर्जा बुरुजावर मुलुखमैदान नावाची ही तोफ पर्यटकांचे आकर्षण आहे.शेवटचा निजामशहा मुर्तुजा (तिसरा) हा मोगलांच्या कैदेत गेला आणि १६३६ साली पूर्ण निजामशाही साम्राज्य बुडाले. तेव्हापासून १७५९ पर्यंत अहमदनगर मोगलांच्या ताब्यात होते. शाहिस्तेखान, मिर्झाराजा जयसिंग आणि औरंगजेबाने छत्रपती शिवरायांविरोधात मोहीम आखण्यापूर्वी बरेच दिवस नगरमध्ये मुक्काम ठोकला होता. मोगलांचा विजापूरकडे जाणारा रस्ता म्हणजे औरंगाबाद, अहमदनगर, परंडा, काटी, जरखेड, मोहोळवरून पुढे जायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनाही नगरचा किल्ला ताब्यात राहावा अशी इच्छा होती. म्हणून त्यांनी ३० मे १६६४ साली आक्रमण केलेले आहे. मध्ययुगीन कालखंडातील फेरिस्तासारखा इतिहासकार निजामशाहीतच घडला गेला. मराठा साम्राज्याच्या विरोधात मोहीम काढणारा औरंगजेब शेवटी परत जाण्याकरिता निघाला तेव्हा १७०६ ते १७०७ या दरम्यान अहमदनगरमध्येच राहिला. त्यामुळे त्याच्या कैदेत असणा-या छत्रपती शिवरायांच्या पत्नी सकवारबाई, शंभूराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई, मुलगा शाहूसह अनेक मराठ्यांनी अहमदनगरचा पाहुणचार घेतलेला आहे. एवढेच नाही तर सतत २६ वर्षे दक्षिणेच्या मोहिमेवर असणारा औरंगजेब वार्धक्यामुळे २० फेबु्रवारी १७०७ रोजी अहमदनगरमध्येच वारला. पुढे १७५९ साली मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर तो महादजी शिंदेच्या जहागिरीत होता. मराठी साम्राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे नाना फडणीसांना नगरच्याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. पुढे १८१७ रोजी तो ब्रिटिशांनी जिंकल्याने त्यांनी अहमदनगरला लष्करी छावणी उभारली. ती आजही कायम आहे. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचे कैदी याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. ब्रिटिशांमुळे शहराच्या आधुनिकीकरणाला चालना मिळाली तर १९४२ ला स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी काँग्रेसने आंदोलन उभे केले तेव्हा अनेक राजकीय कैदी नगरच्या किल्ल्यात डांबण्यात आले. पैकी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा मुक्काम दोन वर्षे होता. यादरम्यान त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ नावाचा ग्रंथ इथेच लिहिला. तर या ठिकाणी तुरुंगात असताना आंबेडकरांनी ‘थॉट ऑफ पाकिस्तान’ व मौलाना आझादांनी ‘गुबारेखातीर’ लिहून काढला. छत्रपती शिवरायांचे एक विश्वासू सेनापती खंडेराव कदम नगरजवळील प्रवरा देवळालीचे रहिवासी. अशा रीतीने अहमदनगरची निजामशाही म्हणजे हिंदू-मुस्लिमांचा मिलाफ होता. एवढेच नाही तर अल्लाउद्दिन खिलजीनंतर दक्षिणेतील हिंदूंची तलवार म्यान झाली होती. तिला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम निजामशाहीत घडून आले. एका अर्थाने अहमदनगरची निर्मिती स्वतः मलिक अहमदने केलेली असल्याने या शहराच्या नामांतराचा विषय कधी चर्चेला आल्याचे दिसत नाही. निजामाच्या सहिष्णुतेमुळेच अनेक मराठा सरदार तर पुढे आलेच शिवाय ज्ञानेश्वरांपासून ते शेख महंमदापर्यंतचे अनेक संत याच परिसरात निर्माण झाले. म्हणूनच संतकवी दासगणूंनी अहमदनगरविषयी लिहिताना म्हटले आहे की, मराठेशाहीचे जननस्थान पुण्यभूमी महापावन

मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या उदयकाली विठोजी भोसले, मालोजी भोसलेलखुजी जाधवराव निंबाळकर, पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्याच्या पदरी सेवेत होते. देवळाली प्रवरा येथील सरदार बाजी कदमराव ह्यांना साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्ल्यावर फितवा करून मिळवून दिल्याबद्दल देवळाली प्रवरा आणि रुई ही गावे इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती. पुढे विजापूरकारांशी लढताना बाजी कदमांचा बंकापूर ( कर्नाटक ) येथे मृत्यू झाला. आजही त्यांचे वंशज हे देवळाली प्रवरा येथे आहेत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत हे घराणे आले. खंडेराव कदम आणि तिसरे बाजी हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. ह्यांच्याकडे राजगड किल्ल्याची तटसरनौबती होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळनाडू येथील वली गंडापुराम हा किल्ला जिंकला. ह्या किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी स्वराज्यासाठी आपले पूर्ण योगदान अर्पण केले. पानिपतच्या लढाईत ह्या घरातील सात पुरुष कामी आले. आजही कदमांकडे पारंपरिक आणि दुर्मिळ अशी जुनी शस्त्रे जपलेली आहेत. त्यांत धोप तलवारी, गूर्ज, कट्यारी, ढाली, बिचवे, हस्तिदंती गुप्त्या, भाले, शिवकालीन शिवराया आणि इतर ऐतिहासिक साधने आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा हे नगर जिल्ह्यातील पहिली नगरपालिका असलेले शहर आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेस भारताच्या माजी राष्टपती प्रतिभा पाटील ह्यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय भूजल पुरस्कार’ मिळालेला आहे. हा पुरस्कार तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग व तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार ह्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष श्री मुरलीधर कदम ह्यांनी स्वीकारला.. महत्त्वाचे म्हणजे देशातील फ़क़्त ह्या एकाच नगरपालिकेला हा सन्मान मिळालेला आहे.

अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. आजच्या परिस्थितीत अहमदनगर जिल्हा हा सर्वांत पुढारलेला आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात राहाता तालुकात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. ‘राळेगण सिद्धी’ या खेड्याने जिल्ह्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर ‘हिवरे बाजार’ हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले.
महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ चौ.कि.मी. तर लोकसंख्या ४०,८८,००० इतकी आहे.
               राज्याच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा व औरंगाबाद जिल्हे; पूर्वेस बीड जिल्हा ; पूर्व व आग्नेय दिशांस उस्मानाबाद जिल्हा; दक्षिणेस सोलापूर जिल्हा, तर नैऋत्येस व पश्चिमेस पुणे जिल्हा व ठाणे जिल्हा हे जिल्हे वसलेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणार्‍या या जिल्ह्याने राज्याचे ५.५४% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे. 
                जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रामुख्याने अकोले तालुका व संगमनेर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगांमध्ये अकोले तालुक्यात (नगर, नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर) आहे. शिखराची समुद्रसपाटीपासून उंची १६४६ मीटर आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रमुख डोंगररांग हरिश्चंद्राची रांग या नावाने ओळखली जाते. जिल्ह्याचा काही मध्य भाग व उत्तर भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. गोदावरी, भीमा, सीना, मुळा व प्रवरा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, ढोरा, घोड नदी, कुकडी याही नद्या जिल्ह्यातून व जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहतात. अहमदनगर जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान आल्हाददायक आहे. प्रामुख्याने जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.

हवामान
               अहमदनगर जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान आल्हाददायक आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्याच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.
दळणवळण
                  जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५०) जातो. तसेच कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग २२२ पारनेर, नगर, पाथर्डी या तालुक्यांतून जातो. पुणे-औरंगाबाद हा जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा राज्यमार्ग असून अहमदनगरला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती अहमदनगर-पुणे या मार्गावर. अहमदनगर रेल्वे स्थानक हे दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी. चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून अहमदनगर-बीड-परळी आणि पुणतांबा-शिर्डी रेल्वे मार्ग आहे. संगमनेरहून रंधा धबधब्याकडे जाताना लागणारा विठे घाट व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट – हे नगर जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.

विशेष
                मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी. ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हटले जाते, तो ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात सर्वांत जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला, आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला राज्यातील जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.
              अहमदनगर जिल्हा ओळखला जातो तो सहकारी साखर कारखान्यांचा मूल स्रोत म्हणून! डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली (१९२३), तसेच राज्यातील पहिला साखर कारखाना स्थापन केला (जून, १९५०), आणि सहकार या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ श्री. धनंजयराव गाडगीळ या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयी सुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.
ऐतिहासिक महत्त्वाचे
               या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मोगल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात अगस्ती ऋषींनी विंध्य पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर (आत्ताच्या नगर जिल्ह्याच्या परिसरात) वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे.

निजामशाही
                 १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुऱ्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली.
निजामशाहीच्या पडत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये नगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगरवर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.

इ.स. १९४२चे चलेजाव आंदोलन
                 इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी.घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार – ए – खातिर हे ग्रंथ याच शहरात लिहिले

भूगोल

             अहमदनगर शहराचे जगाच्या नकाशावरचे स्थान १९.०८° उत्तर अक्षांश, ७४.७३° पूर्व रेखांश असे आहे व शहराची समुद्रसपाटीपासून उंची ६४९ मीटर आहे.अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाने मोठा आहे.या शहराला सात जिल्यांनी जोडले आहे.

नद्या

             गोदावी नदी व कृष्णा नदीची उपनदी भीमा या दोन मुख्य नद्या अहमदनगर जिल्ह्यातून वाहतात. बाकीच्या नद्या – प्रवरा, मुळा, सीना आणि धोरा. प्रवरा ही गोदावरीची उपनदी आहे.r hu प्रवरा नदीचे पाणी उंचावरून पडून रंधा धबधबा तयार झला आहे.

प्रसिद्ध व्यक्ती

वाहतूक व्यवस्था

         मुंबई – विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग २२२ अहमदनगर शहरातून जातो. अहमदनगर हे पुणेऔरंगाबादसोलापूरनाशिकबीड या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी राज्य महामार्गांनी जोडले गेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अहमदनगरला जाण्यासाठी सोईस्कर आहेत. दौंडमनमाड लोहमार्गावरील अहमदनगर हे महत्त्वाचे स्थानक आहे. येथून जाणार्‍या सर्व प्रवासी रेल्वेगाड्या अहमदनगरला थांबतात. अहमदनगरचे रेल्वे वेळापत्रक येथे पहा.[१]

अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

  • सारे जहाँ से अच्छा – पेन्सिल चित्र – अहमदनगरचे प्रसिद्ध चित्रकार श्री. प्रमोद कांबळे यांनी भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये भारतातील नामवंत ५०० महान व्यक्तींची चित्रे ६५ फूट X १७ फूट आकारमानाच्या एका मोठ्ठ्या भिंतीवर काढली आहेत. इ.स. १९९७ साली काही महिन्यांमध्ये त्यांनी सारे जहाँ से अच्छा हे जगातील सर्वांत मोठे पेन्सिल चित्र पूर्ण केले.
  • शनी शिंगणापूर – येथे शनीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. येथे कुठल्याही घराला आणि बँकांनासुद्धा कुलपे नाहीत. शनिदेव चोरांपासून गावाचे रक्षण करतो अशी स्थानिक लोकांची भावना आहे.
  • शिर्डी – हे ठिकाण साईबाबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
  • सिद्धटेक – येथील सिद्धिविनायक मंदिर हे अष्टविनायक मंदिरांपैकी एक आहे.विशाल गणपती मंदिर – हे नगरचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिर अहमदनगरच्या माळीवाडा भागात आहे.
  • रेणुकामाता मंदिर (केडगांव) – हे मंदिर केडगाव येथे आहे. ते अहमदनगर रेल्वेस्थानकापासून साधारणपणे ३ किलोमीटरवर आणि अहमदनगर बसस्थानकापासून सुमारे ५ किलोमीटरवर आहे.
  • भुईकोट किल्ला – इ.स. १९४२ मध्ये येथे जवाहरलाल नेहरू यांना इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. तेथे त्यांनी “डिस्कव्हरी ऑफ इंडिया” हे पुस्तक लिहिले.
  • हरिश्चंद्रगड – एक ऐतिहासिक किल्ला. हा नगरपासून अंदाजे १२५ किलोमीटर अंतरावर आहे. सुप्रसिद्ध कोकण कडा येथेच आहे.
  • श्रीक्षेत्र “भगवानगड” हे महाराष्ट्र राज्यातील बीड-अहमदनगर जिल्ह्यांतील सीमेवर असलेल्या, खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे मंदिर आहे. तसेच जनार्दनस्वामीभगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या समाध्या येथे आहेत. सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते.
  • महानुभाव आश्रम शिक्षण संस्था, वांबोरी : या आश्रमाची स्थापना सन २००३ मध्ये झाली. सुमारे ४०० विद्यार्थी या संस्थेत महानुभाव तत्त्वज्ञान व साहित्य यांचे अध्ययन करतात. संस्कृत साहित्याचार्य ऋषिराज शास्त्री महानुभाव हे या आश्रमाचे संचालक आहेत.
  • राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील श्री.संत कवी महिपती महाराज समाधी.

सलाबतखान दुसरा यांची कबर (चांदबीबी महाल)

शाह डोंगरावर अहमदनगर शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर, सलाबतखान दुसरा यांची कबर आहे.चौथे निजामशाहच्या (1565-88) कारकीर्दीत सलाबतखान  महान राजकारणी आणिअंतर्गत मंत्री होते.ही इमारत तीन मजली आणि अष्टकोनी आहे. स्थानिक रहिवाशांनी कधीकधी चुकून चंदीबीबी महल म्हणून संदर्भ दिला.
सलाबतखान दुसरा इ.स. 1580 मध्ये ही इमारत बांधली. इमारत सुमारे 70 फूट उंच आहे आणि गॅलरी सुमारे 20 फूट रूंद आहे.या ठिकाणी, सलाबतखानशिवाय त्याच्या दोन बेगम आणि मुलांची कबरदेखील आहे.

दमडी मशीद

अहमदनगर किल्ल्याजवळ स्थित, इ. स. 1567 मध्ये  साहिर खाननी दमडी मशिदीची स्थापना केली. मशिदीचा विस्तृत आकार आणि शिलालेख यासाठी प्रसिध्द आहे. येथे युरोप लोकांची  आणि इतर लोकांची कबरे  आहेत. मुगल पुरातन वास्तू – दमडी मशिदीची प्रतिकृती आहे गुजरातमध्ये आढळते.

कोटला 12 इमाम

उल्लेखनीय मशिदीला बारा इमामांचे कोताळा (बारा संतांचा किल्ला) असे म्हणतात.इ.स 1536 मध्ये बुर्हान निजाम शाह यांनी त्यांचे मंत्री शाह ताहिर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधली होती. बुरहान शाहने मशिदी शाह ताहिरच्या ताब्यात दिली आणि ती एक धर्मादाय संस्था आणि महाविद्यालय म्हणून वापरात आली.

कुंपणाची भिंत (91 * 91 मीटर) दगड आणि चुना या पासून तयार केलेली आहे.पूर्वेस व दक्षिण बाजूला दोन दरवाजे आहेत. बारा इमामांचा कोटाला निजामशाही वास्तुकलाचा एक उत्कृष्ठ नमुना आहे, जो त्याच्या कोरलेल्या आणि सजावलेल्या कमानीसाठी प्रसिद्ध आहे.यात तीन आयतांचे एकच प्रार्थना सभागृह आहे, प्रत्येकी पाच पाट्या खोल आहे आणि त्यावर सपाट छत आहे. समतोल वास्तुकला, सुबक रचना आणि उत्तम कारागिरीचे हे अतिशय सुंदर उदाहरण आहे.

कोट बाग निजाम

बहमनी राजाचा  सूड घेऊन उध्वस्त करण्यासाठी ज्याने अविश्वासाचा प्रयत्न केला आणि त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अहमद निजामशाह, आता मलिक अहमद  म्हणून स्वतःला म्हणतात, त्याने दौलताबाद नष्ट करण्याचा निर्णय घेतला. अहमदनगरच्या 75 मैलांवर दक्षिण-पश्चिम असलेल्या दौलताबादच्या काही अंतरावर येण्यासाठी त्यांनी अहमदनगरला पुण्याजवळील जुन्नर येथून आपले मुख्यालय हलविले. 1494 मध्ये सिना नदीच्या डाव्या काठावर अहमदनगर शहराची स्थापना झाली. शहराच्या मध्यभागी बाग निजाम होता (विजयाची बाग). 1499 मध्ये, मलिक अहमदला त्याचा सूड त्यांनी दौलताबादच्या किल्ल्यावर कब्जा केला आणि बहामन साम्राज्याचा नाश केला. या दुसऱ्या विजयाची आठवण म्हणून त्यांनी बाग निजाम भोवतीची भिंत उभारली. बाग निजाम नंतर अहमदनगर किल्ला बनला.

बाग रौझा

हे ऐतिहासिक स्मारक, काळ्या दगडांनी बांधलेले, अहमद निजामशाह यांचे निवासस्थान होते. हे ठिकाण एकेकाळी अहमद निजाम शाह यांचे एक घर होते. हे 16 व्या शतकात राजा निजामी यांनी बांधले होते. ही संपूर्ण स्मारक काळ्या दगडापासून बनलेली आहे जी दिल्ली गेटच्या अगदी जवळ आहे. पर्यटक इथे भेटायला येतात तेव्हा, जवळच एक दगड स्मारक असे म्हटले जाते की, 1565 मध्ये विजयनगर राजाच्या विरोधात तलकिटच्या युद्धात स्वतःला ओळखणारे एक राजघराण्याचे गुलाम अली  याचे आहे. गुलाम अली तिसरे निजामशाहच्या काळात होते.

फरिया बाग पॅलेस

हे स्थान निजामशाहचा मुलगा बुरहान शाह,जो सातव्या वर्षी 1508 मध्ये सिंहासनावर बसला होता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आला. हे महल प्राचीन काळातील कला व संस्कृतीची झलक दाखविते. हे उद्यान अष्टकोनी स्वरूपात केले जाते. येथे एक मोठे घुमट-आकार असलेले हॉल आहे. निजाम शाही राजा या राजवाड्यात शतरंज खेळत होते.

अहमदनगर भुईकोट किल्ला

या किल्ल्याला 500 वर्षांचा इतिहास असून  निजामशाहीचा संस्थापक अहमद  बादशाहाने शहर  वसविण्यापूवी इ.स.1490 मध्ये किल्ला बांधला. या किल्ल्याचा परिघ 1 मैल 80 यार्ड इतका असून किल्ल्यास 22 बुरुज आहेत. किल्ल्याभोवती अभेद्य तटबंदी आहे व त्याभोवती विस्तीर्ण खंदक आहेत. खंदक ओलांडण्यासाठी ब्रिटीशांच्या काळात इ.स.1832 मध्ये मागील बाजूस झुलता पूल बांधण्यात आला, अजूनही त्याचे अवशेष बाकी आहेत.

चौथा रेजीमेंट अहमदनगर, 1841

मुघल काळानंतर मराठा साम्राज्याचा अर्धा शतक 1803 मध्ये वेलिंग्लीच्या ड्यूक ऑर्थर वेलेस्ली यांनी अहमदनगर किल्ल्यावर कब्जा केला, परंतु ते पेशवेला दिले. 1817 साली ब्रिटिश लष्करींनी अहमदनगर ताब्यात घेतला आणि त्यानंतर ते राहिले. 1830 साली, ब्रिटीश सैन्याने अहमदनगरला पोहचण्यास सुरुवात केली, जी पूर्णत: ब्रिटिश सैन्याची गाडी बनली. 184 9 साली स्थानिक शेतकर्यांनी कलेक्टरकडे तक्रार केली की बार्ट प्रॅक्टिस घेऊन आर्टिलरी युनिट्सनी त्यांची शेती नष्ट केली जात आहे. कलेक्टरांनी त्यांच्याकडून कब्जा केलेली जमीन ताब्यात घेण्यास सेनाला विचारले. 1849 ते 1852 पर्यंत ब्रिटिशांनी किल्ल्याभोवती 400 एकर जमीन हस्तगत केली आणि कॅन्टोनमेंटची निर्मिती सुरू केली. 1889 मध्ये अहमदनगर गॅझेटियर मध्ये प्रकाशित केलेल्या विस्तृत खात्यांनुसार, फील्ड आर्टिलरी, युरोपियन इन्फंट्रीतील आमच्या कंपन्या आणि इंडियन इन्फंट्रीची एक कंपनी अहमदनगर येथे ताब्यात घेण्यात आली होती. 1913 साली 500 घोडेससाठी एक स्मृती डिपार्ट स्थापन करण्यात आले. 1897 मध्ये, अहमदनगरमध्ये एकूण 559 एकर जमीन लष्कराला प्राप्त झाली होती.

सेंट जॉन कॅथलिक चर्च

सेंट जॉन कॅथलिक चर्च हे ब्रिटीश काळाशी संबंधित आर्किटेक्चरचे उत्कृष्ट प्रदर्शन आहे. अठराव्या शतकात अहमदनगरमध्ये मोठ्या संख्येने सैनिकी युनिट तैनात करण्यात आले होते परंतु त्यांच्या पवित्र पुनरुज्जीवनसाठी त्यांचे जवळचे कोणतेही स्थळ नव्हते, अगदी केरकीहून परत येणारे पॅडरही होते. शेवटी अखेरीस सैनिकांना ब्रिस्टर्सने चर्च बांधले. ऐतिहासिक स्मारक असल्याने, सेंट जॉन्स चर्च हे अहमदनगरचे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे. चर्च रजिस्टरानुसार, 1817 मध्ये या ठिकाणी आगमन करण्यासाठी ऑक्सिलीरी हॉर्सेड कॅव्हलरी हे पहिले ब्रिटिश सैन्याची युनिट होते. नंतर 1830 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीत एक मोठी सैन्याची संख्या पाठविली गेली आणि हे ठिकाण एक मोठे छावणी बनले.

चर्चच्या दफनभूमीत आपल्याला अहमदनगरमध्ये तैनात असलेल्या ब्रिटीश सैन्याचे अनेक कबर सापडतात. दक्षिण-पूर्वेकडे रोमन कॅथलिक चर्च आणि एपिस्कोपलियन चर्च हे आणखीन दोन चर्च येथे जवळच आहेत.सेंट जॉन्स कॅथलिक चर्च हे अहमदनगरच्या बाहेरील भागात भिंगार येथे आहे.

औरंगजेब कबर

खुलताबाद गावात स्थित असलेला औरंगजेब महान मुगल सम्राटांचा शेवटचा होता. 1680 च्या सुमारास शिवाजी महारांजाच्या मृत्यू झाल्यानंतर औरंगजेब संपूर्ण दख्खन साम्राज्य जिंकला आणि त्याच्या राजवटीखाली आणला. त्यांनी आपले राज्य भिंगार जवळ स्थापन केले आणि 1707 सालात  वयाच्या  91 पर्यंत तेथेच ते राहिले. येथे  त्यांना दफन करण्यात आले . त्याच कबर परिसर मध्ये, औरंगजेबचा दुसरा मुलगा, आझम शाह, आणि त्याची पत्नी यांचे समाधीही आहे.

लष्कर दल मुख्यालय

1921 मध्ये, सहा  कार कंपन्या येऊन  1924 मध्ये रॉयल टँक कॉर्प्स शाळाची स्थापना रॉयल टँक कॉर्प्सच्या प्रशासकीय कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अहमदनगर येथे करण्यात आली.

आनंद धाम

अहमदनगरची जमीन या भूमीवर जन्मलेल्या अनेक संतांनी पवित्र केली आहे. त्यापैकी एक जैन संत श्री आनंद ऋषिजी महाराज आहेत. पोस्टल विभागातर्फे रु. 4 / – आचार्य आनंद ऋषिजी महाराज यांच्या सन्मानार्थ मुद्रांक छापलेले आहे. आचार्य आनंद ऋषिजी महाराज हे असे एक संत होते, ज्यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान त्यांच्या अनुयायांना त्यांच्या अध्यात्मिक मार्गदर्शनाप्रमाणे विपुल व महत्त्वपूर्ण होते. त्यांचा जन्म 1900 साली शिरल चिंचंदी, अहमदनगर येथे झाला आणि 13 व्या वर्षी रतन ऋषिजी महाराज यांच्याकडून दीक्षा मिळाली आणि अशाप्रकारे त्यांनी स्वतःला आध्यात्मिक उपक्रमातील जीवन व मानवतेसाठी सेवा म्हणून आत्मसात केले. त्याच्या शिकवणुकींमध्ये प्रेम, अहिंसा आणि सहनशीलतेमध्ये खोलवर रुजलेली होती. ते नऊ भाषांमध्ये प्रवीण होते आणि त्यांनी मराठी व हिंदी भाषांतून मोठ्या प्रमाणात लेखन केले. त्यांनी अनेक शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांची स्थापना केली आणि अनेक आरोग्य संस्थांची पुनर्रचना केली आणि नियतकालिकांची स्थापना केली. 1965 साली त्यांना “आचार्य” हे नाव देण्यात आले आणि 1992 मध्ये त्यांचा स्वर्गवास  झाला.आनंद धाम त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आला.

अहमदनगर ऐतिहासिक संग्रालय आणि संशोधन केंद्र

अहमदनगर ऐतिहासिक संग्रहालय मे 1960 मध्ये स्थापन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील या संग्रहालयमध्ये या संग्रहालयात सूक्ष्म पेंटिंग, शिल्पे, शस्त्रं, पगडी आणि हस्तलिखित इत्यादिंचा एक अनोखा संग्रह आहे. गणेश मूर्तीचा विशेष विभाग आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे मूळ रंगविलेल चित्र ,  जर्मनीची साखळी नसलेली  सायकल , तांत्रिक गणपती, संस्कृत – मराठी शब्दकोश, 200 फूट लांबीच्या कुंडली ही या संग्रहालयाची  काही आकर्षणे आहेत.

(गुरुवारी, संग्रहालय बंद राहते. इतर दिवशी, भेट देण्याची वेळ – सकाळी 10 ते  संध्याकाळी 5 पर्यंत.)

कवलरी टँक संग्रहालय

टैंक संग्रहालयमध्ये, ब्रिटीश शैलीतील तोफ आणि गोळे ठेवले आहेत. आर्मड कॉर्प सेंटर आणि शाळा केंद्राजवळ स्थित असलेले कवलरी टँक संग्रहालय आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन 1994 मध्ये बी.सी. जोशी यांच्या हस्ते झाले. आशियातील एकमेव संग्रहालय आहे .अनेक राज्यकर्त्यांच्या कारकीर्दीदरम्यान वापरलेले दारुगोळा आणि शस्त्रे  येथे ठेवलेले आहेत. येथे 40 देशांतील टँकदेखील प्रदर्शित केले गेले आहेत जे अद्वितीय आहेत.

मेहेर बाबा समाधी

मेहेर बाबा (फेब्रुवारी 25, इ.स. 1894 – जानेवारी 31, इ.स. 1969) (जन्मनाव मेरवान शेरियार इराणी) हे भारतीय गूढवादी व आध्यात्मिक गुरू होते. इ. स. 1954 मध्ये आपण या युगातील अवतार आहोत अशी जाहीर घोषणा त्यांनी केली होती.

बालपणात त्यांच्यामध्ये अध्यात्माचा ओढा असण्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हजरत बाबाजान या मुस्लिम साध्वीशी त्यांचा परिचय झाला आणि सात वर्षे चाललेली आध्यात्मिक रुपांतरणाची प्रक्रिया सुरू झाली.पुढच्या काही महिन्यांमध्ये आणखी चार आध्यात्मिक व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधला. उपासनी महाराज यांच्या समवेत ते सात वर्षे राहिले. नंतर त्यांनी सार्वजनिक कार्य सुरू केले. पर्शियन भाषेत मेहेर बाबाचा अर्थ ‘दयाळू पिता’ असा होतो. सुरुवातीच्या काही अनुयायांनी त्यांना हे नाव दिले. महारोगी, गरीब, मानसिक रुग्णांसाठी अनेक धर्मार्थ कार्ये त्यांनी केली.

शुक्लेश्वर मंदिर, भिंगार

हे मंदिर हजारो वर्षांपूर्वीचे आहे. हे रामायण काळापासून आहे.  भृगु ॠषींचे  शुक्राचार्य यांनी समांगा नदीच्या पश्चिम बाजूला भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी खूप तपश्चर्या केली होती. नानासाहेब पेशवे यांच्या आदेशानुसार सदाशिवभाऊ हे पानिपतची  लढाई लढण्यासाठी निघत होते. या घटनेचे स्मरण करून शुक्लेश्वर मंदिराचे पुनर्विकास करण्यात आले.  1757 मध्ये हैदराबादच्या निजाम यांनी नगरच्या किल्ल्याला भेट दिली व शुक्लेश्वर मंदिरासमोर बेलभंदरची मूर्ती बांधली.  विश्वास पाटील यांनी त्यांचे पानिपत कदंबरीत भिंगारच्या शुक्लेश्वर मंदिराचा  उल्लेख केला आहे.

नृसिंह मंदिर

नगरपासून सुमारे 17 कि.मी. अंतरावर भातोडी गाव येथे सुमारे 400-450 वर्षे जुन्या तलावाच्या जवळील कलावंतीण  महल, एकंगबाबी मैदान आणि प्रसिद्ध नृसिंह मंदिर आहेत. येथे नृसिंह पुतळ्याऐवजी तांडला आहे.

 

 

शिव मंदिर पारनेर

प्रवाहाच्या दोन्ही बाजूस शिव मंदिर पारनेरपासून जवळ जवळ 1.5 किलोमीटरच्या दोन लहान प्रवाहाच्या मध्ये शंकराचे दोन मंदिर आहेत आणि स्थानिक…

पाच दगडांचे दरवाजे

अहमदनगरच्या निजामशाही काळात मध्ययुगीन काळातील मोठ्या तटबंदीचे दरवाजे बांधले गेले. दरवाजे दगडांनी बांधलेले आहेत आणि घुमटचे बांधकामात विटा आणि चुना…

टोका येथील सिध्देश्वर, देवी आणि विष्णु मंदिर

प्रवारा आणि गोदावरी नद्यांच्या संगमावर स्थित केयेगाव टोका येथील तीन मंदिरे असलेला एक समूह आहे.येथे सिध्देश्वर महादेव मंदिर, देवी आणि…

घोटाण येथील जैन मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर

जैन मंदिरात गर्भगृह, अंतराळ, मंडप आणि मुखमंडप यांचा समावेश आहे. मंडप आणि आंतराळाची छत आणि गर्भगृहाच्या दाराचे चौकट सुंदर सजावटांसह…

कर्जत येथील शिव मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर

मल्लिकार्जुन मंदिर बसाल्ट खडकाने बनवलेले आहे आणि बाह्य भाग साधा पृष्ठभाग आहे.मंदिरामध्ये गर्भगृह आणि मंडपाचा समावेश आहे. मंदिर समोर नंदी…

ढोकेश्वर गुहा

दगडाच्या पठारातून निर्माण झालेल्या दोन खडकाळ पर्वंतामधील एक पर्वताच्या पूर्व दिशेस,  त्रिभुज कक्ष असलेले एक सर्वात मोठे  सभागृह म्हणजे ढोकेश्वर गुहा आहे….

रतनगड

रतनवाडीपासून 6 किलोमीटर अंतरावर, भंडारदरापासून 23 किमी, पुणे पासून 183 किमी आणि मुंबईपासून 197 किमी अंतरावर असलेल्या रतनगड हे महाराष्ट्रातील…

खर्डा किल्ला

खर्डा किल्ला, तालुका जामखेड , खर्डा म्हणजे पूर्वीचे शिवपटटण.  11 मार्च 1795 रोजी मराठयांनी याच  ठिकाणी निजामावर विजय मिळविला, त्या…

रेहकुरी  काळवीट अभयारण्य

रेहकुरी गाव कर्जत तालुक्यातील अहमदनगर शहरापासून सुमारे 80 किमी अंतरावर स्थित आहे. रेहकुरी दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राणी काळवीट  च्या अभयारण्यचे…

हरिश्चंद्रगड

खिरेश्वरपासून 8 किमी अंतरावर, भंडारदरापासून 50 किमी अंतरावर, पुण्यापासून 166 किमी आणि मुंबईपासून 218 कि.मी. अंतरावर, हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील अहमदनगर…

जिल्ह्याचे रूपरेखा

सहकारातून ग्रामोध्दार व संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा अहमदनगर  जिल्हा पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला आहे. क्षेञफळाच्या दृष्ट्टीने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असलेल्या या जिल्हयाचे एकूण भौगोलिक क्षेञ 17048 चौ.कि.मी. असून ते राज्याच्या क्षेञफळाच्या 5.6 टक्के आहे.या जिल्हयाच्या उत्तर सीमेवर नाजिक ईशान्येस औरंगाबाद पूर्वेस बीड व उस्मानाबाद हे जिल्हे असून दक्षिण सीमेवर सोलापूर, पश्चिम सीमेवर ठाणे व पुणे जिल्हे लागून आहेत. 2011 च्या जनगणनेप्रमाणे जिल्हयाची एकूण लोकसंख्या 4543159 आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भाग व पूर्वेकडील सखल भाग हे जिल्हयाचे स्वाभाविक विभाग आहेत. पश्चिम भागातील हवामान थंड व कोरडे तर पूर्व भागातील हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्हयातील सरासरी पर्जन्यमान 382 मि. मीटर इतके असून पर्जन्यमानाची वाटणी असमान आहे. गोदावरी व भीमा या जिल्हयातील प्रमुख नद्या आहेत. अहमदनगर जिल्हयाच्या उत्तर सीमेवरुन गोदावरी नदी वाहते. प्रवरा व मुळा या तिच्या उपनद्या आहेत. भीमा नदी जिल्हयाच्या दक्षिण सीमेवरुन वाहते. दक्षिण भागातून सीना,हंगा, घोड या नद्या दक्षिणेकडे वाहतात. काळी लालसर, काळी बरड व पांढरी या प्रकारात जिल्हयाची जमीन विभागलेली आहे. जनगणना 2011 नुसार जिल्हयात 1584 गांवे( तीन निर्जन गावांसह घानेगाव, सुजलपूर व गोंधवणी ) 14 तालुक्यात विखुरलेली आहेत. 14 पंचायत समित्या, 1311 ग्रामपंचायती, 1 महानगरपालिका, 9 नगरपालिका, 1(शिर्डी ) नगर पंचायत व 1 कटकमंडळ जिल्हयात आहेत. रब्बी ज्वारी हे जिल्हयाचे मुख्य पिक, खरीप हंगामात बाजरी, भूईमूग, मठ, सोयाबीन व मूग ही पिके तर रब्बी हंगामात ज्वारी, गहु, हरभरा ही पिके घेतली जातात. ऊस हे जिल्हयाचे प्रमुख नगदी पिक असून त्यामुळे जिल्हयाची आर्थिक प्रगती झाली आहे. द्राक्षे, संञी, डाळींबेइ. फळांचे उत्पादनही जिल्हयात घेतले जाते. जिल्हयातील बागायत शेती प्रामुख्याने विहिरींच्या पाण्यावर केली जाते. गंगापुर, भंडारदरा, मुळा, घोड, कुकडी या धरणाच्या पाटपाण्यामुळे शेतजमिन ओलीताखाली येण्यास मदत झाली आहे. सहकार क्षेत्रातील अग्रणी ही आपली ओळख अहमदनगर जिल्हा आजही जटकवून आहे. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना सन 1950 मध्ये प्रवरानगर येथे उभारला गेला. जिल्हयात 2015-16 या वर्षाअखेर सर्व प्रकारच्या एकूण 5295 सहकारी संस्था आहेत. उद्योग क्षेत्रात अहमदनगर जिल्हा प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्र राज्याच्या निम्म्याहून अधिक साखरेचे उत्पादनएकटया नगर जिल्हयात केले जाते. 2016 अखेर जिल्हयात 20 साखर कारखाने कार्यरत आहेत. जिल्हयात मार्च 2016 अखेर 100 टक्के विद्युतीकरण झालेलेअसून विद्युतीकरण झालेल्या खेडयांची व शहरांची संख्या 1603आहे. अहमदनगर जिल्हयामध्येआरोग्य सेवे अंतर्गत सार्वजनिक व शासन सहाय्यित रुग्णालये, 20 दवाखाने, 96 प्राथमिक आरोग्यकेंद्रे व 555 उपकेंद्रे उपलब्ध आहेत. अंगणवाडीपासून अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालया पर्यंत तसेच कृषि विद्यापीठाच्या सर्व शैक्षणिक सोयी अहमदनगर जिल्हयात उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातले पहिले कृषि विद्यापीठ राहुरी येथे स्थापन झाले असून कृषि अध्यापन व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहे. सप्टेंबर 2016 अखेर 5046 प्राथमिक शाळा, 956 माध्यमिक शाळा व 1085 उच्च माध्यमिक शाळा जिल्हयात आहेत. मध्य रेल्वेचा 197 कि.मी. लांबीचा मार्ग जिल्हयातून जातो. सर्व प्रकारच्या 22186.87 कि.मी.लांबीच्या रस्त्यांनी जिल्हयातील 1584 गांवे जोडली असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे प्रवासी वाहतूकीचे विस्तृत जाळे या जिल्हयात आहे. एस. टी. मार्गाची एकूण लांबी 60471 कि.मी.असून एस.टी. महामंडळाच्या 841 एस.टी. बसेस जिल्हयात रस्त्यावर धावतात.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही जिल्हयाची अग्रणी बॅक असून जिल्हयात एकूण 610  वर्गीकृत  बँकाची कार्यालये आहेत. आशिया खंडात सहकार क्षेञात प्रथम क्रमांकावर असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवती सहकारी बॅकेच्या व इतर सहकारी बॅकेच्या एकू ण 296 शाखा जिल्हयात मार्च 2016 अखेर कार्यान्वित होत्या. अहमदनगर जिल्हयाची अन्नधान्याची बाजारपेठ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आदर्श ग्राम योजनेचा मानदंड स्थापित केलेले पारनेर तालुक्यातील राळेगणसिध्दी हे गांव आदर्श खेडे म्हणून प्रसिद्ध आहे. विविध राज्यातील प्रशासकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, शासकीय प्राधिकारी,सामाजिक कार्यकर्ते व विविध देशी-विदेशी संस्था/ संघटनांचे प्रतिनिधी येथील कामांची पाहणी करण्यासाठी व अभ्यासासाठी भेट देत असतात. जलसंधारण, स्वच्छ इंधन इ. द्वारे लोकसहभागातून शाश्वत विकासाचा मूलमंत्र नगर तालुक्यातील  हिवरेबाजार गावाने राज्यात घालून दिला आहे. श्री साईबाबांची शिर्डी व अवतार मेहेरबाबांचे मेहराबाद ही अहमदनगर जिल्हयातील धार्मिक स्थळे ही भारतातील नव्हेतर जगातील अनेक भक्तांची श्रध्दा स्थाने आहेत. याशिवाय श्री ज्ञानेश्वर मंदिर (नेवासा), श्री शनी शिंगणापूर, श्री दत्त मंदिर (देवगड) व चौंडी ( पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मस्थान), हजारो भाविकांचे श्रद्धास्थान भगवानगड (पाथर्डी)  व  सिध्दी विनायकाचे  सिध्दटेक या तीर्थक्षेञांनी भाविकांच्या मनात अहमदनगर जिल्हयाचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे.

 

इतिहास

              अहमदनगरचा प्रारंभिक इतिहास 240 बी.सी.सी पासून सुरू होतो. जेव्हा मौर्य सम्राट अशोकच्या संदर्भात परिसराचा उल्लेख केला जातो. हे ठिकाणाला जिल्ह्याच्या दृष्टीने कोणतेही  महत्व नव्हते परंतु सध्याच्या शहराच्या शेजारच्या छोट्या-छोट्या गोष्टी जुन्नर  व पैठण यांच्यात महत्वाच्या बायपास जागा म्हणून ओळखल्या जात होत्या. ई.स.पूर्व 90 ते  ई.स. 300या काळात सत्ताधारी राजघराण्यानी अहमदनगर वर राज्य केले. त्यानंतर राष्ट्रकूट राजवंश यांनी 400 ई.स. पर्यंत राज्य केले. 670 ई.स. चालुक्य व पाश्चात्य चालुक्य राजे. 670 to 973 ई.स.-राष्ट्रकूट राजे. गोविंद ३ रा  (785 to 810) आणि त्यानंतर 973 to 1190 ई.स.-पाश्चात्य चालुक्य राजे.अकोला तहसीलमधील हरिश्चंद्रगड येथे लेणी आणि मंदिराची रचना आणि या काळात तयार करण्यात आली. पाश्चात्य चालुक्या नंतर 1170 ते 1310 या काळात देवगिरी यादव यांनी राज्य केले. अहमदनगरच्या ईशान्येस ७४ मैल  भागात, देवगिरी (आधुनिक दौलताबाद) यादवची राजधानी होती. यावेळी सर्वात उल्लेखनीय मंत्री आणि राजकारणी हा हेमाद्री  होता ज्यानी मोडी लिपीचा शोध लावला होता आणि जो अद्याप बुद्धीवादिंकडून  अभ्यास केला जात आहे.हेमद्रि खरोखर बुद्धिमान होते. चुनखडी  आणि सिमेंट  न वापरता इमारतींचे बांधकाम करण्याची संकल्पना निर्माण झाली .यामध्ये त्यांची मुख्य कल्पना अशी आहे की, एकमेकांच्या वर मध्यम आकाराचे दगड विशिष्ट कोनात रचून  अशा रीतीने भरणे म्हणजे भिंतीला  मंदिराचा आकार दिला जाईल.संपूर्ण जिल्हाभर पसरलेली अशी  26 मंदिरे याबद्दल साक्ष देतात. यादवांचे प्रसिद्ध राजा रामदेवराव,  यांच्या समकालीन  संत  ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात  त्यांच्या महान कार्याचा  उल्लेख केला आहे.  हेमाद्री हे  या  प्रतिष्ठित राजाचे मंत्री होते. इतका  मजबूत आणि धाडसी, पण लष्करी अपरिपूर्णतेमुळे 1294 मध्ये दिल्लीच्या मोघल राजा जल्लाल्द्दीन खिलजीचा  सरदार मुख्याधिकारी  अलादीन खिल्जी यांच्या हस्ते राजा चा पराभव झाला.विंध्य पर्वतरांगांच्या दक्षिणेकडे असलेल्या मुसलमान राजाचे हे पहिले  आक्रमण.या विजयाने दख्खनमध्ये  मुस्लीम गढीची स्थापना करण्याच्या मुस्लिम महत्वाकांक्षाला जोरदार  यश मिळाले.

वारंवार झालेल्या आक्रमणानंतर 1318 मध्ये यांचे वर्चस्व संपले.1338 मध्ये दिल्लीच्या सम्राट मोहम्मद तुघलघकाने देवगिरीला आपली राजधानी बनवून त्याचे नाव दौलताबाद ठेवले. त्यानंतर तुघलक दौलताबादला निघून गेला आणि सम्राटाच्या सरदारांनी लोकांना लुटून नेऊन त्यांचे घरे आणि महाल इमारती यांना आग लावली. एक गटाचा नेता आणि एक अफगान सैनिक अलादीन हसन गांगु दिल्ली सम्राटांच्या शक्तीचा नाश करण्यात व 1347 साली गुलबर्गा येथे स्वतंत्र राज्य स्थापन करण्यात यशस्वी ठरला. हे राज्य बहामनी किंवा ब्राह्मण राज्य म्हणून ओळखले जाते. हे राज्य 150 वर्षे टिकले व हसन गंगू बहमनी नंतर 13 राजांनी राज्य केलं. त्यानंतर बहामनी राज्याची पाच स्वतंत्र राज्ये विभागली गेली. अहमदनगर त्यांच्यापैकी एक होते, जे निजामशाही म्हणून ओळखले जाऊ लागले . या विजयाने डेक्कनमध्ये मुस्लीम गढीची स्थापना करण्याच्या मुस्लिम महत्वाकांक्षाला जोरदार आक्रमक यश मिळाले. पुनरावृत्ती झालेल्या आक्रमणानंतर 1318 मध्ये अॅडम वर्चस्व संपुष्टात आला. महाराष्ट्राने दिल्लीतून नियुक्त राज्यपालांचे राज्य सुरू केले आणि देवगिरी येथे तैनात केले. 1338 मध्ये दिल्लीच्या सम्राट मोहम्मद तुघलकाने देवगिरीला आपली राजधानी बनवून त्याचे नाव दौलताबाद नाव ठेवले. त्यानंतर तुघलक दौलताबादला निघून गेला आणि सम्राटाच्या अवाढव्य सरदारांनी त्यांना लोकांना लुटले आणि घरे आणि महाल इमारती जाळल्या. मुस्लिम धर्मातील एका अफगान सैन्याने अल्लादिन हसन गंगूने दिल्ली साम्राज्याची सत्ता उलथून टाकले  आणि 1347 मध्ये गुलबर्गा येथे स्वतंत्र राज्य स्थापन करायला यशस्वी ठरले. हे राज्य बहामनी किंवा ब्राह्मण राज्य म्हणून ओळखले जाते. हा राज्य 150 वर्षे टिकला, हसन गंगू बहमनी नंतर 13 राजांनी राज्य केलं. हसन गंगूचे प्रशासन प्रशंसनीय होते आणि प्रशासनाची रचना हि त्याची महान शक्ती ठरली. यानंतर पुढील राजे, जेव्हा 1460 मध्ये मोठा दुष्काळ पडला, त्यावेळी 1472 आणि 1473 मध्ये पुनरावृत्ती झाली. या काळात, थोर पुरुष बळकट व आज्ञाभंग करणारे बनले. प्रशासकीय संकटाचा सामना करण्यासाठी, प्रशासनात मोठे बदल घडवून आणण्यासाठी पंतप्रधानांनी मोहम्मद गवनेचा विचार केला. थोर लोक अतिशय व्यथित झाले आणि राजाला प्रभावित केले. त्यांनी मोहम्मद गवई यांच्यावर विविध आरोप लावले. राजाच्या मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यासाठी त्यांनी पुरेसे शहाणपण आणि मूर्खपणाचा विश्वास ठेवण्यासाठी राजा खूपच कमकुवत आहे. अशाप्रकारे 1487 मध्ये गरीब गबन मारले गेले. त्यानंतर बहामनी राज्याची पाच स्वतंत्र राज्ये विभागली गेली. अहमदनगर त्यांच्यापैकी एक होता, निजामशाही म्हणून प्रसिद्ध होता. मोहम्मद गवन यांची निजाम-उल-रामभाई भैरी यांनी बहामनीच्या कार्यालयात पदवी संपादन केली आणि 1485 च्या आसपास भिर आणि अहमदनगर यांना त्यांची इस्टेट्समध्ये जोडण्यात आले. अहमदनगरच्या निजामशाही राजघराण्यातील संस्थापक मलिक अहमद यांना या क्षेत्राचे व्यवस्थापन करण्यात आले. सर्व प्रथम मलिक अहमद यांनी पुना जिल्ह्यातील जुन्नर येथे आपले मुख्यालय बनवले. 1486 मध्ये निजाम-उल-मुळची हत्या झाली आणि मलिक अहमद बहामनी राज्याचे पंतप्रधान झाले.मलिक अहमद राजापासून दूर असताना, राजा ने मलिक खानच्या विरोधात जाण्यासाठी सेनापती जहागीर खानला आज्ञा दिली. मलिक खान जवळजवळ अपुरी तयारी होती आणि त्याच्याबरोबर थोडी सेना होती.परंतु मोठ्या धैर्यवान आणि असामान्य चालीने त्याने 28 मार्च 1490 रोजी अहमदनगरच्या पूर्व मैदानावरील जहांगीर खान आणि बहामनी राज्याच्या सैन्याचा पराभव केला.त्यांचे मुख्यालय, जुन्नर दौलताबादपासून लांब होते, म्हणून 1494 मध्ये त्यांनी सिना नदीच्या डाव्या किनाऱ्यावर बाग निजाम जवळ एक शहर उभारले,ज्याला त्याच्यानंतर अहमदनगर नावाने संबोधले जाऊ लागले.अहमद निजाम अजूनही शांत नव्हता आणि बहामनी सैन्यावर बदला घेण्याची इच्छा होती. 1499 मध्ये तो अखेर यशस्वी झाला आणि दौलताबादचा किल्ला ताब्यात घेतला आणि तेथे त्यांची सेना तैनात केली. या विजयाचे स्मरण ठेवण्यासाठी अहमद निजाम यांनी बाग निजाम (हा अहमदनगरचा सध्याचा किल्ला) याच्याभोवती भिंत उभारली आणि त्यात लाल दगडांचा एक महाल बांधला.अहमद निजाम 1508 मध्ये मरण पावला आणि त्याचा सात वर्षांचा मुलगा बुर्हान सत्तेवर आला.

बुर्हान निजाम शहा( 1508 to 1553)

              बुर्हान निजाम शहा सात वर्षांचा बालक असल्यामुळे, मुकामील खान दखानी, या सक्षम राजकारण्याची राजाचे सरंक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली .अखेर सत्तेचाळीस वर्षांच्या राजवटीनंतर 1553 साली चोपन्न वयाच्या बुर्हान निजाम शाहचा मृत्यू झाला.

हुसेन निजाम शाह ( 1553-1565)

              हुसेन निजाम शाह आपल्या वयाच्या तेराव्या वर्षी त्यांच्या वडिलांनंतर सत्तेवर आला. हुसेन निजाम शाह यांनी अहमदनगर किल्ला दगडात बांधला. सुरवातीला किल्ला माती पासून बनविलेला होता. आता नवीन जोडणी म्हणून किल्ल्याभोवती एक खंदक बांधला गेला ज्यामुळे शत्रूला दगडांच्या भिंतीपासून सुरक्षित अंतरावर ठेवता आले. विजयनगरचा हिंदू राजा राम राजा याने , अनेकदा अहमदनगर किल्ल्यावर  हल्ला केला आणि हुसैन यांना जुन्नरपर्यंत जाण्याचा इशारा दिला.बीजापुरचा आदिल शाह ,हुसेन निजाम शाहाविरुद्ध राम राजाला नेहमी मदत करायचा. हुसैन निजाम शाहला मुस्लिम राजांमधील एकमेकांबद्दल वाईट भावना बाळगण्याच्या निरर्थकतेची जाणीव झाली.तो 1564 मध्ये रामराज यांच्या विरोधात बिजापूर, बेदर आणि गोवळ कोंड्याच्या राजांकडे सहभागी झाला.या चार राजांच्या एकत्रित लष्कराने 1565 मध्ये रामराज्याचा पराभव केला.यानंतर हुसेन निजाम शाह याचे अहमदनगर येथे निधन झाले, त्याला चार मुले व चार मुली होत्या.

मुर्तझा निजाम शाह ( 1565-1588)

               मुर्तझा निजाम शाह, हुसेनचा मुलगा तो अल्पवयीन असतानाच त्याला सिंहासन मिळाले.राजकुमारांनी आपल्या वडिलांना तिरस्काराने वागवले आणि त्यांना स्नानासाठी गेले असताना, दरवाजे बंद करुन खिडक्या खाली एक मोठी आग पेटविली. अशाप्रकारे 1588 साली राजा गुदमरल्याने मृत्युमुखी पडला.

मिरान हुसेन निजाम शाह( 1588)

               मिरन हुसैन यांनी मिर्झा खानचे पंतप्रधान म्हणून नियुक्त केले परंतु सुखवाद आणि अतिरेकीपणा वगळता काहीच काळजी घेतली नाही.मिर्झा खानने मिरन हुसेनला राजघराण्यातील पुरुष सदस्यांना ठार मारण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मिरन हुसेन यांनी पंधरा सरदारांची हत्या केली. काही दिवसांनंतर मिरन हुसेनने मिर्झा हुसैन यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मिर्जा हुसेनने ह्यांना हे कळले तेव्हा त्याने राजावर कब्जा केला आणि चुलत भाऊ इब्राहिम आणि इस्माईल यांना पूण्याहून बोलावले.नवीन राजाचे स्वागतास किल्लाच्या आत जात असतांना, जमालखान, अनेक अधिकारी व सैनिकांसह एकत्रित होऊन दरवाजात जमले व त्यांनी मिरन हुसेनला भेटावयास जाण्याची मागणी केली. जेव्हा मिर्झा खानने हे पाहिले तेव्हा त्याने मिरन हुसेनचे डोके कापून बुरुजावर लावले.

इस्माईल निजाम शाह( 1588 to 1590)

                   जमाल खानने इस्माईलला निजाम शाह म्हणून मान्यता दिली.जेव्हा साम्राज्यातील अस्वस्थते बद्दल सम्राट अकबराला माहिती झाले,तेव्हा त्यांनी बुर्हान निजाम (इस्माइल शाहचे वडील ) यांना दख्खनकडे जाण्यास सांगितले. यापैकी एक लढ्यात जमाल खानचा मृत्यू झाला. बुर्हान निजामने त्याचा मुलगा ताब्यात घेतला आणि त्याला तुरुंगात ठेवले.

बुर्हान निजाम शाह (दुसरा)(1590 to 1594)

                   बुर्हान निजाम शाह वयाने खूपच वयस्कर होते आणि सुखवाद आणि अतिरेकीपणात मग्न होते. त्याच्या कारकिर्दीत काही महत्त्वाचे झाले नाही. 15 मार्च 1598 रोजी त्यांचे निधन करण्यापूर्वी त्यांनी त्यांचे उत्तराधिकारी इब्राहिमची नेमणूक केली.

इब्राहिम निजाम शाह 1594

                    इस्माईल निजाम यांनी आपल्या वडिलांच्या सल्ल्याद्वारे मियां मंजू दखनी जे त्याचे शिक्षक होते त्यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केले.इस्माईलचा राज्यात येखलास खान यांच्या नेतृत्वाखाली व मियां मंजू यांच्या नेतृत्वाखाली असे दोन पक्ष एक होते.एक प्रकारचे यादवी युद्ध त्यांच्यात होते.आदिल शाह नेहमी अहमदनगरला जिंकून घेण्याची इच्छा करीत होता, म्हणूनच हे काळल्यावर तो अहमदनगरच्या सीमेकडे सरकू लागला.यखलास  खानला लढायचे होते परंतु मियां मंजूने शांततेचा समारोप करण्याचे प्रस्तावित केले जेणेकरून दख्खनच्या सर्व सैन्याची संयुक्त ताकद सम्राट अकबर यांच्या इराद्याने आक्रमण पूर्ण करू शकेल.

अहमद  (II) 1594-95

                      विजापूर आक्रमणात राजाच्या डोक्यात गोळी मारली गेली. त्यामुळे चार महिने त्याचे शासन संपले.इब्राहिम निजाम शाहच्या मृत्यूनंतर बहुतेकाना असे वाटले की, राजाचा एकुलता पुत्र बहादूर, याच्या नावाची राजा म्हणून घोषणा होईल पण , मियान मंजू याला यांचा विरोध होता. पण त्याऐवजी अहमद यांना आणण्याचे मान्य करण्यात आले आणि बहादूर जो राजा इब्राहीमचा मुलगा होतो त्याला जबरदस्तीने चावंड किल्ल्याकडे पाठवून देण्यात आले. लवकरच आपापसात भांडणे सुरु झाली आणि रक्तपात सुरु झाला.मियान मंजूने सर्व प्रकारचे अत्याचाराचेउच्चाटन करायचे होते आणि म्हणून त्याने राजकुमार मुराद, सम्राट अकबर यांचा मुलगा, जो नंतर गुजरातमध्ये होता, त्याचे सैन्य अहमदनगरला पाठवण्या साठी पत्र लिहिले.दख्खनवरआक्रमण करण्याची संधी मिळण्याची वाट पाहत असलेल्या राजकुमाराने  हे   निमंत्रण लगेच स्वीकारले. मुराद अहमदनगरला जाताना अनेक प्रतिष्ठित नेत्यांनी यखलस खान याला सोडून ते मियां मंजूला सामील झाले.मियान मंजूने आधी राजकुमार मुराद यांच्याकडे निमंत्रण पाठवण्याची आपली चूक मान्य केली आणि निजाम शाहीच्या हितासाठी राजकुमार मुरादचा प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याने अहमद सह अहमदनगरच्या  बाहेर पडला  आणि चांद बीबीला  किल्ल्याचे रक्षण करण्याची विनंती केली.  राजकुमार मुराद यांचे आक्रमण परतून लावण्यास सांगितले.मुरादने अहमदनगरच्या किल्ल्यावर हल्ला केला परंतु चांद बीबींनी अहमदनगरच्या बहादूर शाहची राजा म्हणून घोषणा केली व चांद बीबींनी त्याचे आक्रमण परतवून लावले. 15 99 मध्ये अकबरने राजकुमार दानियल मिर्झा आणि खान खानान यांना अहमदनगर ला पाठविले व किल्ल्याला वेढा घातला. सुल्ताना चांद बीबी प्रभावी प्रतिकार करू शकलानाही. म्हणून तिने राजकुमार दानियल यांच्याशी बोलणी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हमीद खान यास ते मान्य नसल्याने त्याने विरोध केला व चांदबीबी ला ठार केले.मग मुगलांनी किल्ल्यात  प्रवेश केला आणि बहादूर याला पकडण्यात आले आणि दिल्लीला पाठविण्यात आले.

मुर्तझा निझाम शाह  (1600-1613)

                    सम्राट अकबर याने जरी आपल्या अधिकाऱ्यांना दख्खनच्या राज्याची देखभाल करण्यास नियुक्त केले तरी निजाम शाहच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला.त्यांनी त्यांचे स्वातंत्र्य गमावले होते त्यांनी शाह अली राजाचा मुलगा मुर्तझा याला राजा घोषित केले. 1636 मध्ये निजाम शाही संपली. 

मोघल किंवा दिल्लीचे राज्य (1636 to 1759)

                    शिवाजी, मराठा राजा यांनी अहमदनगर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरावर हल्ला केला. त्यांच्याजवळ मजबूत सेना नव्हती पण सैन्याने गनिमी युद्ध चालू ठेवले आणि मोगला सैन्याला त्रास दिला. शाहजहांने औरंगजेबला 1636 मध्ये व पुन्हा 1650 मध्ये व्हाईसरॉय म्हणून नेमले. शिवाजीने 1657 आणि 1665 मध्ये अहमदनगरवर आक्रमण केले. इतर वेळी शिवाजी महाराजांचे मंत्री आणि सहकार्यांनी अहमदनगर येथे एकत्रितपणे हल्ला केला.औरंगजेबाने मराठ्यांचे  स्वतंत्र राज्याचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला परंतु ते कधीच यशस्वी झाले नाही आणि शेवटी अहमदनगरमध्ये २१ फेब्रुवारी १७०७ रोजी त्याचे निधन  झाले.

मराठ्यांचे राज्य  (1759 to 1817)

                   निजाम-उल-मुल्कच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन मुलांमधे सलाबत जंग व गझी उद-दीन यांच्यात वाद झाला.या राजकीय गोंधळामध्ये निजामांचा किल्लेदार कवी जंग यांनी पेशव्यांना साथ  दिली.निजाम 1760 मध्ये उदगिर येथे पराभूत झाला.

निजामने अहमदनगर व अहमदनगरच्या प्रांताचा मोठा भाग सोडला. 17 9 5 मध्ये खर्डा येथे निजामला पुन्हा मराठांनी पराभूत केले. १७९५  मध्ये सवाई माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर मराठ्यामध्ये मध्ये वादसुरु झाले . 17 9 7 मध्ये दौलतराव सिंदिया यांनी बाजीराव पेशवे यांच्याकडून अहमदनगरच्या किल्ल्याचा ताबा घेतला सिंधिया यांनी 17 9 7 मध्ये प्रसिद्ध राजकारणी नाना फडणवीस अहमदनगर किल्ल्यात कैदेत होते. अखेरीस तो 17 9 8 मध्ये सोडले पण अतिशय निराश झालेले नाना फडणवीस 1800 साली मरण पावले.

यशवंतराव होळकर आणि दौलतराव सिंदिया यांनी बाजीराव पेशवेला सतत त्रास दिला.म्हणूनच त्यांनी 31 डिसेंबर 1802 रोजी मंत्रीमंडळाची बैठकित ब्रिटिशांशी त्यांच्या सुरक्षेसाठी एक करार केला.

ब्रिटिश राज्य (1817 to  1947 )

                 जेव्हा इंग्रजांनी अहमदनगरचा ताबा घेतला तेव्हा अहमदनगर  जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर होते.  ब्रिटीश सैनिक व स्वातंत्र्यसैनिक यांच्यातील  सतत संघर्ष आणि दुष्काळ यांच्यामुळे अनेक माजी श्रीमंत वसाहती निर्मनुष्य झाल्या होत्या. ते गावोगावी, डोंगराळ आणि डोंगराळ भागात प्रामुख्याने पारनेर, जामगांव आणि अकोला भागात आश्रय घेऊन शस्त्रे गोळा करत होते. कोळी  आणि भिल्ल यांनी एकत्रित ब्रिटिश सैन्याला  त्रास  दिला. राघोजी भांग्रीया यांच्या नेतृत्वाखाली हे बंड  होते. शेवटी 1847 साली पंढरपूरला ते पकडले गेले आणि लगेच त्याला फाशी देण्यात आली. 1857 च्या महान स्वातंत्र्य संग्रामात (इंग्रजांनी ‘शिपाई बंडाळी’ असे संबोधले) अहमदनगर हे प्रचंड अशांततेचे एक ठिकाण होते. भाजीजी भागोजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय स्वातंत्र्यसैनिक सुमारे 7000 भिल्ल होते. ते डोंगराळ प्रदेशातील आणि विशेषत: पारनेर, जामगाव, राहुरी, कोपरगाव आणि नाशिकच्या परिसरात सक्रिय होते. परंतु अखेरीस इंग्रजांविरूद्ध  आवाज उठविण्याच्या या सर्व प्रयत्नांना नकार देण्यात आला आणि गुलामगिरी  टिकून राहिली. सुमारे 1880 पर्यंत  सर्वत्र जवळजवळ शांतता होती.

लोकमान्य टिळकांनी संपूर्ण भारतातील राजकीय चळवळी सुरु करण्यात आल्या  आणि त्या ब्रिटिश सरकारद्वारे  सक्तीने बंद करण्यात आल्या.  1920 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर 1 9 20 मध्ये महात्मा गांधींनी पुढाकार घेतला व सविनय कायदेभंग चळवळीची जबाबदारी घेतली. हजारोंच्या संख्येने  सत्याग्रह केला  आणि त्यांना  अटक करण्यात आली.  1920 ते 1941 दरम्यान सत्याग्रहाच्या अनेक आंदोलनांची सुरूवात झाली. 9 ऑगस्ट 1 942 पासून 1944 पर्यंत देशभरात सर्व भारतीयांनी शेवटच्या नि: शस्त्र आंदोलनाची सुरूवात केली. महात्मा गांधी, सरदार पटेल , राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, सुभाष चंद्रारा बोस, डॉ. सय्यद महमूद, शंकरराव देव यांना अटक करण्यात आली. गांधी वगळता बहुसंख्य नेत्यांना अहमदनगर किल्ल्यात ठेवले होते. जवाहरलाल नेहरू, त्यांचे प्रसिद्ध पुस्तक लिहिले गेले अहमदनगर किल्ल्यात “द डिस्कव्हरी ऑफ इंडिया”

माझा महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सविस्तर इतिहास माहिती दररोज एक जिल्हा ह्या स्वरुपात आपणासमोर देत आहोत, तरी आपण त्या संदर्भाचा अभ्यासासाठी नक्कीच उपयोग करून घ्याल अशी प्रांजळ अपेक्षा !!!…..

अधिक माहितीसाठी सहज संपर्क – ७५८८०२०८८६

संकलन आणि मांडणी :-                            

श्री.लक्ष्मण काटेकर, सोलापूर (महाराष्ट्र).

shivnitee@gmail.com

Contact @ 7588020886.

Leave a comment