रायगडावरील शिरकाई देवी

राजधानी रायगड किल्ल्यावरील शिरकाई देवी चे दुर्मिळ चित्र

पंचारती मधील ज्योत त्या तेजोवलयाला ओवळायला अजून प्रकाशमान होऊन तेवत* …….
शिर्काईच्या कळसाला स्पर्शून येणारा वारा गडाच्या तटांना बिलगत आलिंगन देत असे…..

अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असे हिचे स्वरूप आहे

शिर्काई (शब्दतोड केल्यास लगेच लक्षात येईल की शिरक्यांची देवी/आई.) आजही देवीला आई म्हणतात. महाराजांच स्वराज्य हे मावळातल्या सवंगड्यांना घेऊन निर्माण झालं. यांच कुळदैवत होत शिर्काई देवी. (या शिर्काई देवीची मुळ मुर्ती (रायगडच्याही अगोदरची) आजही मुळशीतल्या “शिरकवली” या गावात आहे.) या मावळ्यांसाठी आणि गडदैवता म्हणुण शिर्काई देवीचे मंदिरे रायगडावर बांधण्यात आले. मात्र आत्ता आपल्याला जे मंदीर दिसते ते मुळ मंदिर नाही, हे मंदिर नंतर शिवसमाधी बांधताना बांधण्यात आले आहे. या मंदिराचा मुळ चौथारा हा होळीचा माळ ते गंगासागर या दरम्यान असलेला जो चौथारा आहे तोच हा मुळ मंदिराचा भाग. सिद्दीने किंवा मुघलांनी हे मुळ मंदिर उध्वस्त केल्याने मुर्ती उघड्यावर पडली होती, वीज पडुन ती थोडी भंगलीही होती, नंतर समाधी बांधताना या मुर्तीसाठी एक छानस मंदिर बांधुन ही मुर्ती त्यात स्थापन केली.

Leave a comment