⛳ जाणता राजा ⛳
लेखन :- शिवश्री लक्ष्मण काटेकर.
📞 7588020886
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराजांना “जाणता राजा” म्हणून ओळखले जाते
कारण त्यांच्या विचारशक्ती, ध्येयवाद, आणि प्रजा कल्याणाच्या कार्यामुळे त्यांना एक अत्यंत बुद्धिमान, कल्पकता, निर्णयक्षमता, अचूक धोरण, न्यायविषयक धोरण, समाजप्रति आपुलकी, धैर्यशील, आणि दूरदृष्टी असलेले शासक मानले जाते.
संकल्पना :- शिवश्री लक्ष्मण काटेकर
जाणता राजा हे विशेषण त्यांच्या व्यासंगी नेतृत्वावर प्रकाश टाकतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक चांगल्या व्यवस्थापनाच्या आणि प्रशासनाच्या धोरणांचा अवलंब केला होता, जसे की प्रजेला न्याय देणे, प्रशासनात पारदर्शकता राखणे, आणि आपल्या राज्यातील सर्व जाती-धर्मांना आदर देणे. याशिवाय, त्यांच्या लढाऊ कौशल्यांमुळे आणि युद्धतंत्रामुळे ते एका योग्य योद्ध्याच्या रूपातही ओळखले जातात.
त्यांनी अनेक वेळा आपल्या शत्रूंना चकवा देऊन आपल्या राज्याची सुरक्षा केली आणि आपल्या सैन्याचे उत्तम नेतृत्व केले. त्यांचे युद्धकौशल्य, आचारधर्म, आणि राज्यकारभारातील कौशल्य हे सर्व त्यांच्या “जाणता राजा” या पदवीला योग्य बनवतात.
तसेच नेमकं उदाहरण समजून घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना “जाणता राजा” असे रयत म्हणत असे आणि आजही का म्हणतात ते अगोदर समजून घेऊ.
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची उभारणी करताना सागरी तट सुरक्षित करण्यासाठी गलबत उभी करायची होती. त्यासाठी मजबूत म्हणलं तर लाकडी गलबत असल्याने “सागाची” लाकडं लागणार होती. महाराजांनी चौकशी केली तर स्वराज्य सह्याद्रीच्या डोंगराळ भागात जास्त असल्याने सागाची झाडे कमी होती.
त्यावर पर्याय म्हणून आंब्याची आणि फणसाची झाडाची संख्या जास्त असल्याने सागाच्या एवढे जरी नसले तरी जरा बरे प्रमाणात ही लाकडे टिकत असल्याने आंबा आणि फणसाची लाकडे वापरण्यास महाराजांनी परवानगी दिली खरी पण ह्या वेळी महाराजांनी जे शब्द वापरलेत त्या शब्दांमुळे महाराज ‘जाणता राजा’ म्हणून ओळखले जातात.
महाराज गलबत बनवण्यासाठी असलेल्या लोकांना आणि सुचवलेल्या दरबाराला उद्देशून सांगतात कि, “गलबत बनवण्यासाठी लागणारी सागाची किंवा इतर जातीच्या लाकडांची व्यवस्था करण्यासाठी स्वराज्याची जबाबदारी आहे, ते आम्ही पूर्ण करू. पण स्वराज्यातील एकही आंब्याचं किंवा फणसाची झाड तोडता कामा नये. कारण ती झाडे एक दोन वर्षात येत नसून त्यासाठी 10 ते 20 वर्षे ते शेतकरी त्याला जपत आणि जगवत असतात स्वतःच्या लेकरासारखं त्याला जपत असतात तेंव्हा कुठे ही झाड फळ देत आहेत. आणि स्वराज्याची उभारणी करताना ही लेकरांच्या समान जपलेली झाडे तोडून आम्हाला स्वराज्य नाही उभे करायचे. तेंव्हा हि आमची सूचना समजा नाहीतर हुकूम आदेश पण स्वराज्यातील एकाही झाडाला सोडा पण त्याच्या फांदी पानाला जरी तोडलं तर माफ केले जाणार नाही.
पुढे गलबत उभी झाली सर्व प्रकारच्या बाबींची काळजी घेतली गेली, परंतु ह्या घटनेचा विचार करता महाराज रयतेचा किती विचार करत होते, किती छोट्या गोष्टी देखील विचार पूर्वक समजून रयतेच भलं होण्याची स्वप्न पाहत होते हे दिसून येत.
ह्या वरून समजत की ह्या अशा अनेक गोष्टी घटना आहेत ज्या मधून महाराजांनी रयतेच्या भल्यासाठी वेळोवेळी निर्णय घेतले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना रयत आणि आपण सर्वजण “जाणता राजा” असे म्हणतो.
✒️ लेखन ✒️
शिवश्री लक्ष्मण काटेकर
शिवरायांचा मावळा
⛳ छत्रपती शासन ⛳
रयतेच्या सर्व स्तरातील गरीब कुणबी पासून व्यापारी आणि बारा बलुतेदार अठरा अलुते दार सर्वांना सोबत घेऊन राज्य करणे तसेच सर्वांची पीडा जाणून घेणे आणि त्यांच्या रयत सुखी कशी होईल यासाठी राज्य केले त्यांनी म्हणून जाणता राजा म्हणत असावेत
नवनाथ वरपे – कार्ला
LikeLike
Yash Upase Omarga:
शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हणत कारण ते सर्व रयतेचा विचार करून सर्वधर्मसमभाव सांभाळून सर्वांना प्रत्येकाच्या कौशल्य विकासाचा विचार करून काम देऊन त्यांनी प्रत्येक प्रत्येकाच्या प्रत्येक धर्माचा विचार करून व त्यांचा आदर करीत असत त्यामुळे त्यांना जनतेचा राजा म्हणत होते तसेच ते सर्व जनतेचे हित पाहत होते.
शिवाजी महाराजांच्या किल्ल्यात मुस्लिम समाजासाठी मस्जित असायच्या आणि प्रत्येक बारा बोलते दरासाठी काम असायचं मग रयतेचा राजा प्रजा खुश रयत खुश तर रयतेचा राजा सुद्धा खुश असायचा
LikeLike