*नीट परीक्षा आणि अंतिम रात्र*
नीट परिक्षधारक विद्यार्थी व पालक आपणास नमस्कार .
नीट साठी दोन वर्ष किंवा त्याहून अधिक वेळ घालवला आहे .
प्रयत्न करणे महत्त्वाचे होते ते कमी जास्त प्रमाणात केलेलं आहेत .
उद्या माईंड फ्रेश राहणे आवश्यक आहे . त्यामुळे आज उशिरापर्यंत जागरण करू नये .भलेही 2-3 वाजेपर्यंत रोज जागायची सवय असली तरीही उद्याच्या परीक्षेसाठी फ्रेश माईंड आणि मन संतुलीत व शरीर स्वस्थ आसने अत्यंत आवश्यक आहे .त्यामुळे आहे रात्री उशिरापर्यंत जागू नका .
हे राहिले ते राहिले म्हनून अजिबात धावपळ करू नका .
उद्या कसे होईल म्हणून चींतने ग्रासून जाऊ नका अथवा मला सराव येते म्हणून ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नका .वर्षभर सराव करून परीक्षेच्या ऐनवेळी अपसेट होवू नका किंवा आता कसे होईल म्हणून न झोपता राहू नका .
तुम्ही मेहनत खूप घेतली आहे आता जे होईल ते होईल या निर्णय क्षमतेने हिमतीने परीक्षेला सामोर जा . आईवडिलांच्या खूप अपेक्षा आहेत आता आपले कसे होईल किंवा मार्क कमी आले तर आई वडील काय म्हणतील या चिंतेत अजिबात राहू नका . तुम्ही तुमचा बेस्ट स्कोअर देण्याचा प्रयत्न कराल .आईवडील व आप्तेष्ट हे तुमच्या सोबत नेहमीच राहिले आहेत आणि सोबत राहतील .
आज मस्त आराम करा आणि उद्या पॉजिटीव्ह थिंकिंग ने परीक्षेला सामोरे जा विजय तुमचा नक्की आहे .
आईवडील तुम्हाला बिलकुल रागावणार नाहीत त्यामुळे दोन वर्षात आपण जे केले आहे ते उद्या आपणास परिपूर्ण देवून यायचे आहे .
उद्या ज्या गोष्टी सोबत न्यायाच्या आहेत त्या आजच काढून ठेवा व सोबत घेवून जा .
रोज सकाळी आपण ज्या वेळेस उठतो त्या वेळी किंवा एखादा तास उशिराने उठा. फ्रेश व्हा.रूटीन प्रमाणे नियोजित तयार व्हा .
आज परीक्षा आहे म्हणून सकाळी लवकर उठून हे पाठ करतो ते वाचतो म्हणून अभ्यासासाठी धावपळ करू नका . ज्या गोष्टीत विरंगुळा वाटतो आपणास ज्यातून आनंद मिळतो ती बाब आवश्य करा . शांत रहा .फक्त फोकस तीन तासांचे ठेवा . दोन वर्ष मेहनत केलेली आहे ते स्मरणात राहुद्या . आयत्यावेळी धावपळ केल्याने घाई होते . दळण लवकर दळायचे म्हणुन आयत्या वेळी स्पीड वाढविल्याने जमत नाही. कारण भाकरी तरी चिकट होतात किंवा पीठ आबड धोबड आल्याने भाकरी कडक होतात त्यामुळे सकाळी घाई न करता रूटीन प्रमाणे शांत राहून परीक्षेला जाण्याची तयारी करा .
परीक्षेला जाताना दृढ आत्मविश्वासाने व सकारात्मक विचाराने सामोरे जा .
दोन वर्षात 600-650 मार्क घेत आलो किंवा 250-300 मार्क घेत आलो याचा फारसा आनंद किंवा दुःख मानू नका. परीक्षेच्या 2 ते 5:20 या वेळेत जे आपले माईंड चालते ते महत्त्वाचे ठरणार आहे . तोच वेळ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे .
परीक्षेमध्ये जे सोपे वाटतात ते प्रश्न आगोदर सोडवा . पहिली फेरी झाल्यानंतर एकदा किती मार्क येत आहेत याचे क्यालकुलेशन करा आणि नंतर दिमाखाला जरा कामात आणुन अवघड प्रश्नाकडे वळा. परीक्षे संदर्भाने आपल्या क्लास मध्ये जे जे आपणास सांगितले आहे ते परीक्षेमध्ये फॉलो करा .
दिवस आपला आहे .मस्त छान रहा . उद्याचा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे.एकदा मोठा श्वास घ्या परीक्षेला अजिबात न घाबरता सकारात्मकतेने सामोरे जा . सर सलामत तो पगडी पचास. आनंदी व प्रसन्न रहा. दिवस आपला आहे विजय आपला आहे .
परीक्षेसाठी सर्वाँना खूप खूप शुभेछा .
*लक्ष्मण काटेकर*
सोलापूर