मराठी गौरव दिन

मराठी गौरव दिनानिमित्त
मंडळी आपल्या मराठीमध्ये भाषेमध्ये ‘ळ ‘ अक्षर म्हणजे खरंच वेगळेपण आहे.
मराठी मध्ये जर
‘ळ’ हे अक्षर नसतं,
तर काय काय झालं असतं,
ऐका.

कोणाला काही कळलं नसतं,
कोणी कुठेच वळलं नसतं.
जपाची माळ,चिपळ्या,टाळ,
वेळ,काळ, दिवाळीचा फराळ.
जळजळ नाही, मळमळ नाही.
कोणाबद्दल कळकळ नाही.
निळा, पिवळा अथवा जांभळा,
काळाच काय, नसता सावळा.
बगळा, कावळा, कोहळा, भोपळा.
कवळी नाही, कोवळी नाही,
चवळी नाही,टवळी नाही.
माळ्यावरती जळमट नाही.
जाळी करून कोळी नाही.
मासोळी नाही, जेवणासाठी
थाळी नाही.
उन्हाळा, हिवाळा सोडाच.
नसता अवकाळी पावसाळा.
माशाला गळ, छातीत कळ,
पाण्याचा नळ, झाडाला फळ,
कानात मळ,
काही काही कळलं नसत
जर मराठीत “ळ” नसत.

श्री.दुर्गा शिशुविहर व प्राथमिक
शाळा इसबावी पंढरपूर

Leave a comment