सोलापूर शहराच्या नावाचा इतिहास

सोलापूर बद्दल आपणास काहीच माहीत नाही..

बघा,सोलापूर बद्दल आपणास काहीच माहीत नाही.काही निमित्ताने गुरुदेवांकडे जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा एका साधकाने सोलापूर म्हणजे 16 पूर हे कोणते विचारले असता 2000 वर्षा पूर्वीच्या सोलापुरची खुप गुह्य माहिती प्रगट झाली:-

०१. काळजापुर
०२. सन्नलगी
०३. कुंभगिरी(कुंभारी)
०४. बद्रिकापुरी (बद्रीमनी-बोरामणी)
०५. दुर्गन्हळ्ळि (दर्गनहळ्ळि)
०६. मातापूर (विंचूर-तेथे भीमेच्या पात्रात गणपती आहे)
०७. होतृगी (होटगी)- म्हणजे ‘होता-अध्वर्य=सामवेदींची ब्राह्मण वस्ती होती ०८. कमठपुरम-ब्राह्मणांना लागणारी मातीची भांडी करणारे लोक तेथे होते-कुमठा
०९. मंद्रपुरी-मंद्र स्वरात वेदगान करणाऱ्यांची वस्ती-मद्रेवाड़ी
१०. वलयश्रुंग-सर्व गावांना वेढुन देखरेख करून संरक्षण करणारे टॉवर (tower)-वळसंग
११. शैलग्राम-घरास लागणारे दगड पुरावणारे लोक रहात-शेळगी
१२. दधिस्थान-दूध दही पुरावणारे गाव (दहिटणे)
१३. प्रफुल्लपुर(पोफळी)-गायत्री उपासनेचे स्थान. ब्रह्म समवेत गायत्री उपासनेत दारूहळद imp असते, येथे कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण त्याची शेती करत.
१४. तद् वलयं-वळसंग च्या tower(दुर्बिण विद्या) वर उभारल्यावर हे शेवटचे टोक दिसत असे-तडवळ
१५. रामपुर व लक्ष्मणपुर(आजचे लच्चाण)
१६. अस्त्रद(आहेरवाडी)-अस्त्र शस्त्राचा साठा असणारे गाव. त्या आगाराचा प्रमुख लिंगायत पण हिशेब ठेवणारे ब्राह्मण म्हणून मग त्या ब्राह्मण्णांना शेती वाडी देऊन तेथे ठेवले व शेजारी वस्त्रद-वस्त्र पुरावणारे गाव.

या सर्वांची राजधानी (capital) सोलापूर (सुवर्णपुर=सोन्नलगी). असे हे ब्रह्मदेव गायत्रीचे उपासना स्थान असलेले सोलापूर होते.

रविंद्र कुलकर्णी

Leave a comment