हरभरा

डहाळा म्हणजे पोटऱ्यात आलेला हरभरा…!!

याचे अलीकडे विविध प्रकार आहेत..!

पण

चाफा ही खूप रूचकर असलेली हरभऱ्याची जात..!!

संकरित पण प्रेम अंकुरित..!!

हरभरा नंतर हरभरा दाळ या रूपांत येतो..!

घोड्याचे हे आवडते खाद्य..!!

काटेवाडी आणि मारवाडी घोडे यांना हा पोषक आहार दिला जातो..!!

पुरणपोळी करताना पुरण असते ते हरभरा डाळीचे..!!

ती शिजवून राहिलेले पाणी आमटी साठी वापरतात..!
ती सार म्हणून ओळखली जाते..!!

या आहाराचे थेट रक्त होते..
म्हणून
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी यांना दररोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो..
आणि
वरती
पानाचा विडा..!!

या आहाराला पाकशास्त्रात विशेष महत्त्व आहे..!
सुगरण स्त्री ही यावरून ओळखली जाते..!!

काही भागात हिला चेलची असेही म्हणतात..!
विशेषतः विदर्भात..!!
तीन दिवस ती आहे अशी राहते..!
खराब होत नाही..!
ओठांनी खावी इतकी मऊ असते..!!

संत एकनाथ महाराज यांच्या घरी दररोज पुरणपोळीचा स्वयंपाक करत असत.
गावजेवण असे..!!

हरभरा हा भरा भरा खाल्ला तर रुचकर लागतो..!

हिरव्या हरभऱ्याची भाजी सुद्धा करतात.
आणि
हरभऱ्याच्या पानांची भाजी खुडून आणली जाते, ती पण आंब असताना खूप छान लागते.
नंतर उन्हात वाळवून ती वर्षभर टिकवून ठेवली जाते.
ती पण कधीं करा..
छान लागते.
माझ्या सासूबाई लोखंडी तव्यात ही वाळलेली हरभऱ्याची भाजी खूप स्वादिष्ट करत असत.
हरभरा ओला असताना तव्यात भाजून त्याची आमटी पण करतात.
माझी आई अशी उसळ पण करत असे..!
सोलाण्याची आमटी असे ती म्हणत असे.

भाजलेले हरभरे आणि कच्चे शेंगदाणे चवदार लागतात..!!

हरभऱ्याचे लहान झाड..
म्हणून म्हणतात…
हरभऱ्याच्या झाडांवर चढवू नका..!!

असा हा हरभरा…लै भारी..!!

कोकणात पण मिळतो..
पुण्यात आला तर मिळेल..!

Leave a comment