
करपावली / करपल्लवी म्हणजे हातांच्या बोटांच्या विशिष्ट हालचाली करून समोरील व्यक्तीला सूचक संदेश देणे होय.करपावलीची पार्श्वभूमी :-करपावली ही सांकेतिक लिपी असून,ती महाराष्ट्राचे लोकनाट्य ‘गोंधळ’ या मध्ये सादरकर्ता गोंधळी हा आपला ‘गोंधळ’ घालून झाल्यानंतर रसिक गणांकडून बक्षीस किंवा त्याची बिदागी घेतो.ती बिदागी घेऊन झाल्यानंतर गोंधळी आपल्या हातांच्या बोटांच्या विविध हालचाली करून देणगीदार रसिकास त्यांचे नाव-गाव हळूच विचारतो आणि तो हातांच्या इशा-यांद्वारे त्या देणगीदाराचे नाव मंचावरील जरा दूर असणाऱ्या त्याच्या साथीदाराला सांगतो आणि तो सवंगडी त्या इशा-याचा योग्य तो अर्थ लावून त्यांच्या नावा-गावाचा शब्द गीत गाऊन मोठ्याने उच्चारतो.याच बोटांच्या हालचालींच्या सांकेतिक भाषेला ‘करपावली लिपी/भाषा’ असे म्हटले जाते.आपली ही अचंबित करणारी कला आपल्या यजमानांना सादर करून तिच्या बदल्यात घवघवीत बिदागी आपल्याला मिळावी, एवढीच माफक अपेक्षा या गोंधळी कलावंतांची असते.यामध्ये एकूण ३६ वर्ण असतात.जे विविध हस्तमुद्रांनी दर्शविलेले असतात,ही लिपी पिढ्यानपिढ्या संक्रमित झाली.चित्र :- करपावली/करपल्लवी , स्त्रोत :- गुगल.अशी आहे ही करपालवी ची पार्श्वभूमी.गोंधळी,भुत्या हे उत्तम बहुरूपी असतात.त्यांना नाना प्रकारची कला-कौशल्ये ‘वेश असावा बावळा,परि अंगी असाव्या नाना कळा’ या उक्तीनुसार अवगत असतात.ही लोकं खूप चतुर असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी यांची पारख करून यांचा आपल्या गुप्तपणे खात्यात कार्यक्षम वापर करून घेऊन आपले गुप्तहेर खाते अधिक कार्यक्षम बनविले.अशाच एका थोर बहुरूप्याचे एक सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे गुप्तहेर खात्याचे प्रमुख ‘बहिर्जी नाईक’ हे होय.गोंधळी लोकांनी हेरखात्यामध्ये अधिक भरीव समर्थपणे बजावली.शिवरायांनी यासाठी त्यांना अवगत असलेल्या करपालवी भाषेचा चांगलाच वापर करून घेतला.निश्चित मोहिमांची नावे सांगणे कठीण आहे; ‘कारण इतिहास मुका आहे’; परंतु उंबरखिंडीची लढाई,पन्हाळगडचा वेढा,मिर्झा राजे जयसिंहाच्या छावणीतील गस्त अशा मोहिमांमध्ये त्यांनी याचा वापर तर्कानुसार अधिक केला असावा.शत्रूच्या छावणीतील अत्यंत गुप्त वार्ता मोठ्या कौशल्यपूर्वक पद्धतीने प्राप्त करून ती आपल्या दूरवर उभ्या असलेल्या सह-हेराला बिनबोभाट पोचविणे,ते सुद्धा अगदी प्रत्यक्ष शत्रूसमक्षदेखील या कलावंत हेरांना सहज शक्य होत असे.आग्य्राच्या कैदेत महाराज असताना किंवा जालना येथे रणमस्तखानाच्या तावडीतून महाराजांची सुटका करताना बहिर्जी नाईकांनी अशाच पद्धतींचा वापर नक्कीच केला असणार