अलंकारिक शब्द

शिष्यवृत्ती परीक्षा व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अलंकारिक शब्द.

 
अकलेचा खंदक – अत्यंत मूर्ख माणूस

अष्टपैलू – सर्वगुणसंपन्न 

अकरावा रुद्र – अतिशय तापट माणूस

अरण्यरुदन – ज्याचा उपयोग नाही असे कृत्य 

अक्षरशत्रू – निरक्षर , अडाणी 

अळवावरचे पाणी – फार काळ न टिकणारे 

अकलेचा कांदा – मूर्ख 

उंटावरचा शहाणा – मूर्खपणाचा सल्ला देणारा

ओनामा – सुरुवात ,प्रारंभ 

उंबराचे फूल – दुर्मिळ वस्तू 

कर्णाचा अवतार – उदार मनुष्य

कळसूत्री बाहुले – दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा

कळीचा नारद – कळ लावणारा 

कुंभकर्ण – अतिशय झोपाळू 

काडीपहिलवान – हडकुळा 

कोल्हेकुई – क्षुद्र लोकांची बडबड 

कुपमंडूक – संकुचित वृत्तीचा 

खडाष्टक – जोरदार भांडण 

खडाजंगी – मोठे भांडण 

खेटराची पूजा – अपशब्दाने खरडपट्टी काढणे 

खुशालचेंडू – चैनीखोर माणूस 

गंगा-यमुना – अश्रू 

गर्भश्रीमंत – जन्मापासून श्रीमंत 

गाजरपारखी – कसलीही पारख नसलेला, मूर्ख 

गंडांतर – भीतिदायक संकट 

गुळाचा गणपती – मंद बुद्धीचा 

गुरुकिल्ली – मर्म , रहस्य 

घरकोंबडा – घराबाहेर न पडणारा 

गोगलगाय – गरीब निरुपद्रवी मनुष्य 

चर्पटपंजरी – निरर्थक बडबड

घोरपड – चिकाटी धरणारा

छत्तीसचा आकडा – शत्रुत्व  

चौदावे रत्न – मार 

टोळभैरव – कामात नासाडी करणारे लोक 

जमदग्नीचा अवतार – रागीट 

त्रिशंकू – धड ना इकडे,धड ना तिकडे 

ताटाखालचे मांजर – दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा

दळुबाई – भेकड मनुष्य 

दगडावरची रेघ – कधीही न बदलणारे

धोपट मार्ग – सरळ , नेहमीचा मार्ग  

देवमाणूस – चांगला सज्जन माणूस

नंदीबैल – हो ला हो म्हणणारा  

नवकोट नारायण – खूप श्रीमंत 

पाताळयंत्री – कारस्थान करणारा 

पर्वणी – अतिशय दुर्मिळ योग 

पिकले पान – म्हातारा 

पांढरा कावळा – निसर्गात नसलेली वस्तू 

पोपटपंची – अर्थ न कळता पाठांतर करणारा 

बोकेसंन्यासी – ढोंगी मनुष्य 

 
बिनभाड्याचे घर – तुरुंग 

बृहस्पती – बुद्धिमान 

बोलाचीच कढी – केवळ शाब्दिक वचने

भाकडकथा – बाष्कळ गोष्टी 

भगीरथ प्रयत्न – आटोकाट प्रयत्न 

मंथरा – दुष्ट स्त्री 

भीष्मप्रतिज्ञा – कठीण प्रतिज्ञा 

मारूतीचे शेपूट – लांबत जाणारे काम 

मायेचा पूत – पराक्रमी मनुष्य , मायळू 

मेषपात्र – बावळट 

मृगजळ – केवळ आभास 

लंकेची पार्वती – अत्यंत गरीब स्त्री 

रामबाण औषध – अचूक गुणकारी 

वाटाण्याच्या अक्षता – नकार 

लंबकर्ण – बेअकली 

वाहती गंगा – आलेली संधी

वामनमूर्ती – ठेंगू किंवा बुटका माणूस 

शेंदाड शिपाई – भित्रा 

शकुनीमामा – कपटी मनुष्य 

सव्यसाची – उलटसुलट कामकरणारा 

सांबाचा अवतार – अत्यंत भोळा माणूस 

स्मशानवैराग्य – तत्कालिक वैराग्य 

सूर्यवंशी – उशिरा उठणारा

सुळावरची पोळी – जीव धोक्यात घालणारे काम 

श्रीगणेशा – प्रारंभ 

Leave a comment