जगात खयव जावा… कितीव भाषा शिका… बोला …पण मालवणी भाषा एक नंबराकच…
नेमकं वर्मावर बोट ठेवणाऱ्या १०८ मालवणी म्हणी
विसरलात तर नक्की वाचा मालवणी म्हणी…..
जरी बोचक आणि खोचक असल्या तरीही त्या ऐकून हसू फुटतंच…
१ आकाडता बापडा, सात माझी कापडा – स्वतः जवळ असलेल्या थोड्याश्या मालमत्तेचे/हुशारीचे/कलेचे प्रदर्शन माडंणे.
२ आयत्यार कोयत्ये – (कोयता=एक ह्त्यार) दुसर्यच्या श्रमाचे श्रेय लाटणे.
३ आळशी उटाक आनी शिमरा शिंकाक – आळशी मनुष्य काम टाळण्यासाठी निमित्त शोधतच असतो.
४ इतभर तौसा नी हातभर बी – (तौसा=काकडी)
५ कुल्यापाटी आरी नी चांभार पोरांक मारी – (आरी=एक हत्यार) आपल्या निष्काळजीपणा बद्दल इतरानां जबाबदार धरणे.
६ कोणाच्यो म्हशी नी कोणाक उठा बशी – परस्पर संबंध नसतानाही एखादी जबाबदारी अंगावर येऊन पडणे.
७ खळ्यात मुतलला आनी जावयाक घातलला सारख्याच – जावई कंपनी खरोखरच एवढी कृतघ्न असते का?
८ खांद्यार बसयलो तर कानात मुतता – मिळालेल्या सवलतीचा गैरफायदा घेणे.
९ खुळा भांडता वझरा वांगडा – (वझर=पाण्याचा छोटा झरा)निरर्थक भांडण.
१० खेकट्याक मेकटा – जशास तसे.
११ गजालीन खाल्लो घोव – गप्पागोष्टी रंगात आल्यामुळे महत्वाच्या कामांचा विसर पडणे.
१२ गावता फुकट भाकरी तर कित्याक करु चाकरी – तुम्हीपण किमान अशा एकाला तरी ओळखत असालच.
१३ गावला तेचा फावला – (गावला=मिळालं; फावला=फायदा झाला)
१४ गावात लगीन नी कुत्र्याक बोवाळ – निमंत्रणा शिवाय कार्यक्रमात सहभाग घेऊन पुढे पुढे करणे.
१५ चुकला माकला ढॉर धामपुरच्या तळ्यात – (ढॉर=गाय/बैल)
१६ तुका नको माका नको घाल कुत्र्याक – दोघांच्या भाडंणाचा लाभ तिसर्यालाच होणे.
१७ दिसला मडा, इला रडा – (मडा=प्रेत) इतरानां त्रासदायक ठरणारी सवय/खोड.
१८ देणगे सारख्या घोरीप – (घोरीप=नाटक) मानधना नुसार नाटक रंगते.
१९ नदी आधी व्हाणो, कढलल्यो बर्यो – (व्हाणो=वहाण) संकटाची चाहूल लागताच योग्य ती खबरदारी घ्यावी.
२० नाय देवच्या भाषेक बोंडगीचे वाशे – (बोंडगी=निरुपयोगी झाड; वाशे=छपरासाठी लागणारे लांब व मजबूत लाकूड) सरळ नकार न देता पोकळ आश्वासन देणे.
२१ नालकार रडता म्हणान त्यालकार रडता – (नालकार=नारळवाला; त्यालकार=तेली).
२२ पादर्याक निमीत पावट्याचा – (पावटे=एक स्फोटक धान्य?) चुक अमान्य करून खोटी कारणं देण्याची सवय.
२३ पानयात हगलला काय दडान र्हवाचा नाय – सत्य कधीच लपून रहात नाही.
२४ पावळेचा पाणी पावळेक जाताला – मुळचे गुणधर्म सहजा सहजी जात नाहीत.
२५ पिकला पान घळतलाच – वय झालं की मृत्यु अटळ असतो.
२६ पोरांच्या मळणेक बी नाय भात – (मळणी=पिकलेल्या भाताची रोपं शेवटी बैलांकडून तुडऊन घेऊन उरलं सुरलं धान्य मिळवण्याची एक पद्धत) ठराविक कामं जाणकार व्यक्तिकडून करून घेतलेली बरी.
२७ भोपळन बाय पसारली नी पाटचे गुण इसारली – थोडीशी प्रतिष्ठा प्रसिद्धी मिळाल्यावर स्वतःची कुकर्मे सोइस्करपणे विसरणे.
२८ मिठाक लावा नी माका खावा – प्रत्येक गोष्टीत विनाकारण नाक खुपसण्याची खोड.
२९ मेल्ल्या म्हशीक पाच शेर दूध – हयात नसलेल्याची उगाच खोटी स्तुती करणे.
३० मोव थय खोव – (मोव=मधाचे पोळे; खोव=मधमाशा ) फायदा असेल तिथे धाव घेणे.
३१ येरे दिसा नी भररे पोटा – कसलीच प्रगती न होता दिनक्रम चालू रहाणे.
३२ येवाजलला साधात तर दळीदार कित्याक बाधात – योजना साध्यच न झाल्यास चांगले दिवस कुठून येतील?
३३ लिना लिना नी भिकार चिन्हा – (लिना=लिहिणे) पुर्वी शाळेतल्या शिक्षणावर फारसा विश्वास नसायचा.
३४ वसाड गावात एरंड बळी – (वसाड=ओसाड, एरंड=उंच वाढणारे उपयोगशून्य झाड) उपलब्धतेनुसार वापर.
३५ वेताळाक नाय बायल, भामकायक नाय घोव – ओढून ताणून जमलेली जोडी.
३६ सरकारी काम, तीन म्हयने थांब – टेबलाखालून खाणार्यांची रांग किती लांब!!
३७ सरड्याची धाव वयपुरती – (वय=कुंपण)
३७ सात पाच रंभा नी पाण्याचा नाय थेंबा – (रंभा=नटुन थटुन मिरवणार्या बायका) सभोवताली कामचुकार माणसेच असतील तर कामं कशी होतील?
३८ हयरातय नाय नी माशातय नाय – (हयर=साप सदॄष मासा)
३९ हळ्कुंडाच्या पदरात शेळ्कुंड – (हळकुंड=हळदीची कांडी; शेळकुंड=गोवर्या) चांगल्याच्या पदरी वाईट पडणे.
४० हात पाय र्हवले, काय करु बायले – अगतिक – असहाय्य होणे.
४१ हो गे सुने घरासारखी – ज्या लोकां बरोबर रहायच आहे त्यांच्याशी जुळुऊन घेतलेलं योग्य.
४२ देणा नाय घेणा आणि कंदिल लावन येणा – नस्ती उठाठेव कित्या करा .
४३ करुन गेलो गाव आणि …. चा नाव
४४ काप गेला भोका रवली – (काप – कानातलो दागिनो) । वैभव संपले आणि भकास खूणा र्हवले.
४५ कावळो बसाक फांदी मोडाक – काय योगायोग आसतत बघा.
४६ मोठ्या लोकंची वरात आणि हगाक सुद्धा परात
४७ हगणार्याक नाय तरी बघणार्याक होई लाज
४८ कापाड न्हेला बायन आणि चींधी नेली गायन – (कापाड – बरी साडी) बरा काय होता तेचो दानधर्म केलो आणि उरलला चोरयेक गेला.
४९ गावकारची सुन काय पादत नाय? – गावकार म्हणजे गावातले मानकरी.
५० कपाळार मुकुट आणि खालसुन नागडो – फक्त दिसाकच भपकेदार.
५१ कोंबो झाकलो म्हणान उजवाडाचा रव्हत नाय – खरा काय ता भायर येतालाच.
५२ दोडकार्याचा कपाळात तिनच गुंडे – किती प्रयत्न केलो तरी परिस्थिती काय बदलत नाय.
५३ केला तुका – झाला माका
५४ कोको मिटाक जाता मगे पावस येता.
५५ करुक गेलं गणपती आणि झाला केडला – (केडला-माकड)
५६ कशात काय आणि फटक्यात पाय
५७ आपला ठेवा झाकान आणि बघा दुसऱ्याचा वाकान
५८ दिस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती
५९ आवस रडता रोवाक आणि चेडू रडता घोवाक
६० करून करून भागलो आणि देव पूजेक बसलो
६१ जेच्या मनात पाप तेका पोरा होती आपोआप
६२ जेच्या खिशात आणो तो म्हणता मीच शाणो
६३ जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाय
६४ फूडचा ढोर चाल्ताला तसा पाटला
६५ भेरा म्हणता तेरा आणि माजाच तूनतुना खरा
६६ आपली मोरी आणि मुताक चोरी?
६७ हाडाची काडा आणि बोच्याचा तूनतुना
६८ गायरेतले किडे काय गायरेतच रवनत नाय
६९ आवस सोसता आणि बापूस पोसता
७० आंधळा दळता आणि कुत्रा खाता
७१ अंधारात केला पण उजेडात इला
७२ कायच नाय कळाक – बोको गेलो म्हाळाक
७३ एक कानार पगडी आणि घराक बायल उघडी
७४ येळार येळ – शीगम्याक खेळ
७५ घरासारखो गुण, सासू तशी सून
७६ चल चल फुडे तीन तीन वडे
७७ चव नाय रव धनगरा पोटभर जेव
७८ चुलीतला लाकूड चुलीतच जळाक होया
७९ शेजारणीचा रस्सा आणि पोळयेचा काढून बसा
८० उडालो तर कावळो बुडलो तर बेडूक
८१ मडकेत कडी पाटी जीव ओढी
८२ घरणी बरोबर वाकडा ता खायत चुलीतली लकडा
८३ पडलो तरी नाक वर
८४ एक मासो आणि खंडी भर रस्सो
८५ खिशात नाय दमडी आणि खावची हा कोंबडी
८६ धाक नाय दारारो, फुकटचो नगारो
८७ तरण्याक लागली कळ आणि म्हाताऱ्याक इला बळ
८८ वसावसा खान आणि मसणात जाणा
८९ दुकान नाय उघडला, तो इलो उधारेक
९० नावाजललो गुरव देवळात हगलो
९१ राती राजा आणि सकाळी कपाळार बोजा
९२ डाळ भात लोणचा कोण नाय कोणचा
९३ देव गेल्लो हगाक आणि ह्यो गेल्लो अक्कल मागाक
९४ तुमचा तुमका आणि खटपट आमका?
९५ गाढवा गुळ हगती तर घोरपी भीक कित्या मागती?
९६ सुने आधी खावचा, लेकी आधी लेवचा
९७ वरये दितय तुका गावकार म्हण माका
९८ शेजारी पाजारी मड्याक आणि पावणे सोयरे वड्याक
९९ बघून बघून आंगण्याची वाडी
१०० अरदो मिरग सारण गेलो आणि म्हारणीच्या झिलान उतव बांदलो
१०१ कोणाची जळताहा दाडी आणि तेच्यार कोण पेतयता इडी
१०२ बारशाक वारशी नसाय आणी अवळात बसलो देसाय
१०३ पानवेलीच्या धर्मान शेगलाक पाणीख
१०४ होळयेक पोळी आणि शिमाग्याक गाळी
१०५ खट बायलेशी पडली गाठ – म्हणता उठ मेल्या चटणी वाट
१०६ अमवाशेचो जल्म आणि तसलाच कर्म
१०७ रागान केला रायता – तेका मेळला आयता
१०८ इलय तरी वडे; नाय इलय तरी वडे !!