🚩 शिवनिती 🚩
शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष
💎 दि. २१ सप्टेंबर 💎
XXI9/2021
🚩जय जिजाऊ
🚩जय शिवराय
🚩जय शंभूराजे.
https://shivnitee.business.blog
दि. २१ सप्टेंबर, १६६५
पुरंदरच्या तहाच्या वाटाघाटी सुरू असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाचा तळकोकणाचा भाग आपल्या ताब्यात घेण्याची मोहीम त्यांनी सुरू केली.मुघलांनी महाराजांची कोंडी केल्याचे पाहून आदिलशहानेही आपला सरदार इखलासखान याला सैन्यासह कोकणात पाठवले.महाराजाना ही बातमी कळताच तेही राजगडावरून कोकणात गेले.इखलासखानाने यावेळी महाराजांच्याकडून राजापूर,दाभोळ,वेंगुर्ले,कुडाळ हा भाग जिंकून घेतला.पण महाराजांनीही थोडी माघार घेऊन राजापूर परत जिंकून घेतले. महाराजांचे व आदिलशाहीचे युद्ध कोकणात सुरू असतानाच पुरंदरच्या पायथ्याशी छावणीत असलेल्या मिर्झाराजे जयसिंह यांना सिंहगड पाहण्याची इच्छा झाली.त्यानुसार मिर्झाराजे सिंहगडावर गेले.नुकताच तहानुसार ताब्यात आलेला सिंहगड पाहून त्याची योग्य ती व्यवस्था लावून त्यांनी एक रात्र गडावर मुक्काम केला.व दुसऱ्या दिवशी ते परत आपल्या छावणीत परतले.अनेक आठवणी आणि मराठ्यांच्या पराक्रमाची, गौरवाची साक्ष देणाऱ्या सिंहगडाला मिर्झाराजे जयसिंहानी भेट दिली ती तारीख होती, दि.२१ सप्टेंबर १६६५.
दि. २१ सप्टेंबर, १६८४
छत्रपती संभाजीराजे पोर्तुगीजांच्यावर चालुन गेल्याची संधी साधून मुघलांनी थेट मराठ्यांच्या राजधानीच्या परिसरात हल्ले केले. रामसेजच्या वेढ्यात अपयशी ठरलेला शहाबुद्दीन खान पुण्याच्या आसपास होता,त्याने माणकोजी नावाच्या सरदाराला बरोबर घेऊन देवघाट उरतरुन रायगडाच्या परिसरातील निजामपूर वर हल्ला केला आणि आसपासच्या खेड्यांची लूट केली.या पराक्रमाबद्दल त्याला गाझिउद्दीनखान बहाद्दूर हा किताब आणि २ मण सोने,धनुष्यबाण व दहा हजार रुपये बक्षीस देण्यात आले.तिथून तो पुण्याकडे परत आला आणि सिंहगडाकडे रवाना झाला.पुढे सप्टेंबर महिन्यात त्याला पुन्हा रायगडाच्या मोहिमेवर पाठवण्यात आले. यावेळी त्याला खिलतीची वस्त्रे,पाच घोडे व त्याचा मुलगा कमरुद्दीन याचीही नेमणूक त्याच्यासोबत करण्यात आली. त्याला एक तलवार व इतर सरदारांना वस्त्रे देण्यात आली. शहाबुद्दीनखान उर्फ गाझिउद्दीन बहाद्दूर रायगडाच्या मोहिमेवर निघाला ती तारीख होती दि.२१ सप्टेंबर, १६८४.
दि. २१ सप्टेंबर, १६८७
औरंगजेबाने ‘गोवळकोंड्याचा’ वेढा सक्तिने चालवला असता, एका फितुर अधिकार्याने २१ सप्टेबर रोजी मध्यरात्री गडाचे दरवाजे उघडून मोगलास आत घेतले. त्या फितुर अधिकार्याचे नाव अजुन ज्ञात नाही.
🚩 जय जिजाऊ
🚩 जय शिवराय
🚩 जय शंभूराजे
सर्वांना कळविण्यात येत आहे की, खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये. शिवकालीन दिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी, त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.
🔔 शिवनिती
Whatsapp link :-
Telegram link :-
https://t.me/joinchat/Thc_cR1dJcbQfpKl
Facebook group :-
Website link :-
https://shivnitee.business.blog
https://Shivnitee.blogspot.com
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩