🚩 शिवनिती 🚩
शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष
💎 दि. २० सप्टेंबर 💎
XX9/2021
🚩जय जिजाऊ
🚩जय शिवराय
🚩जय शंभूराजे.
https://shivnitee.business.blog
दि. २० सप्टेंबर, १६६७
गोव्याचा विजरई कोंदि द सांव्हिसेंति याने पोर्तुगालच्या बादशाहास २० सप्टेंबर १६६७ रोजी एक पत्र पाठवले. त्या पत्रात त्याने छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आल्याचा व त्यानंतरच्या काही घडामोडींचा वृत्तांत पोर्तुगालच्या बादशाहास कथन केलेला आहे. ते पत्र प्रस्तुत करत आहेे नक्की वाचा.
“छत्रपती शिवाजी महाराज मोगलांकडून सुटल्यावर त्यांनी फळांच्या बंद पेटाऱ्यांतून छत्तीस तास प्रवास केला व आपल्या डोंगराळ प्रदेशांत ज्या दिवशी पोहोंचला त्याच दिवशी त्यांनी अनेक ठिकाणी सैन्य पाठवून पुष्कळ संपत्ती आणली. आदिलशाहाने त्यांच्यावर चाळीस हजार घोडदळ व मोठें पायदळ पाठविलें. हे सैन्य घाटावरून उतरल्यावर आदिलशाहाच्या जनरालास एक मोठा खजिना नजर केला त्यामुळे हा जनराल, खुद्द त्याच्याच स्वामीच्या राज्यामध्ये जाळपोळ व लूट करून परत गेला! हा जनराल गोव्याशेजारी अवघा दहा कोसांवर आला होता व त्यामुळे आम्हांस त्याची मोठी धास्ती वाटत होती. विजापूरकरांचे सैन्य परत गेल्यावर लगेच छत्रपती शिवाजी महाराजांनी विद्युत्वेगानें कोंकणांत कूच करून, त्यानें सदरहु जनरालास बहाल केलेल्या संपत्तीपेक्षां कितीतरी अधिक पटीनें लूट तेथें मिळविली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सत्तेखाली पुष्कळ देसायांस आणिलें व तो आतां फोंड्यास आमचा जवळचा शेजारी झाला आहे. त्याची धूर्तता, शौर्य, चपळाई व युद्धविषयक दुरदृष्टि लक्षांत घेतां त्याची सीझर व शिकंदर यांच्याशी तुलना करतां येईल. हा माणूस सर्वच ठिकाणीं असतो व कोठेंच त्याची अमूक जागा म्हणून नाहीं.”
https://Shivnitee.blogspot.com
दि. २० सप्टेंबर, १६६९
छत्रपती शिवरायांनी सिंहगड किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळाले नाही. पुढे मार्च १६७० मध्ये तानाजी मालुसरे व त्यांच्या साथीदारांनी सिंहगड किल्ला जिंकून घेतला.
https://Shivnitee.blogspot.com
दि.२० सप्टेंबर, १६७२
किल्ले सिंधुदुर्गची पाहणी!
( अश्विन शुद्ध नवमी, शके १५९४, संवत्सर परिघावी, शुक्रवार ) आजच्या दिवशी छत्रपती शिवरायांनी किल्ले सिंधुदुर्गची संपूर्ण पाहणी करून गड किती सक्षम आहे याची माहिती घेतली.
https://Shivnitee.blogspot.com
दि.२० सप्टेंबर,१६८१
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यपदावर आल्यावर शंभुराजेंनी कर्नाटक प्रांताचे सुभेदार म्हणून आपले मेव्हणे हरजीराजे महाडिक यांची नेमणूक केली तर कारभार शामजी नाईक पुंडे यांना सांगितला.पुढे छत्रपती शंभुराजेंच्यावर झालेल्या विषप्रयोगाच्या कटात शामजींचा हात असल्याच्या संशयावरून हरजीराजेनी त्यांना ऑगस्ट १६८१ मध्ये अटक केली होती. या संबंधीची इंग्रजांची नोंद,”ज्या अर्थी शामजी नाईकाने महाराजांच्या आज्ञेविरुद्ध वर्तन केले आहे त्या अर्थी त्याला कामावरून बडतर्फ केले आहे. त्यास कैद करावे.शामजींच्या ऐवजी हरजीराजे महाडिक यांस सुभा सांगितला आहे. महाराजांच्या आज्ञेवरून हरजीराजे यांनी शामजी नाईकास कैद केले असून सुभ्याचा कारभार तेच पाहू लागले आहेत.
https://Shivnitee.blogspot.com
दि. २० सप्टेंबर, १६८४
मुंबई बंदराचा आश्रय घेऊन मराठी मुलखात लूटमार करणाऱ्या सिद्दीला शह देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी इंग्रजांशी तहाच्या वाटाघाटी सुरू केल्या.मुघल,सिद्दी आणि पोर्तुगीज यांच्याशी बिघडलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर हा तह महत्वाचा होता.या तहात सिद्दीचा बंदोबस्त इंग्रजानी करण्याचे कलम होते.त्यामुळे एप्रिल १६८४ मध्ये सिद्दी कासम मुंबईकडे आला तेव्हा इंग्रजानी त्याला अडवले आणि इथे फक्त त्याला पाणी मिळेल असे सांगितले. रागावलेला सिद्दी रसद आणण्यासाठी उंदेरीला गेला पण पाण्यासाठी त्याला मुंबईवर अवलंबून राहणे भाग होते.१६८० मध्ये शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी तह केला होता पण इंग्रजानी तो पाळला नव्हता.आता छत्रपती शंभुराजेंनी केलेल्या प्रयत्नामुळे त्यांना तो पाळणे भाग होते.या तहाने सिद्दीच्या हालचालींना चांगलाच पायबंद बसला.’तहात ठरलेल्या अटीप्रमाणे त्याला मुंबईत थारा न मिळाल्याने १६८४ च्या सप्टेंबर महिन्यात त्याला सुरतेस जावे लागले. मुंबईत मदत मिळाल्यावाचून सिद्दीला या बाजूला राहणे शक्य नव्हते.
https://Shivnitee.blogspot.com
दि.२० सप्टेंबर, १६८६
दि.१२ सप्टेंबर १६८६ रोजी विजापूर राज्याचा पाडाव झाला.शेवटचा आदिलशहा सिकंदर हा केवळ १८ वर्षाचा सुलतान औरंगजेबाच्या दरबारात हजर झाला.औरंगजेबाने त्याला आपला सरदार करून घेतले व खान ही पदवी दिली आणि वार्षिक १ लाखाची तैनात लावून दिली.त्यांनतर औरंगजेबाने सिंहासनावर बसून मांगली दरवाज्याच्या बाजूने किल्ल्यात प्रवेश करून किल्ला आणि आतील राजवाड्याची पाहणी केली.याप्रसंगी त्याने रस्त्यातून जाताना सोन्याच्या आणि चांदीच्या नाण्यांचा वर्षाव केला. त्यानंतर त्याने जामा मशिदीत जाऊन नमाज अदा केली आणि सिकंदरच्या राजवाड्यात विश्रांती घेतली.तिथे दरबार भरवून विजापुरी सरदाराकडून नजराणे घेतले.या विजयाप्रित्यर्थ तयार केलेला विजयलेख प्रसिद्ध अश्या मलिक इ मैदान या तोफेवर कोरून ठेवावा अशी औरंगजेबाने आज्ञा दिली.
https://Shivnitee.blogspot.com
दि.२० सप्टेंबर, १७९२
शिंदे होळकरांचा लाखेरीचा संग्राम शके १७१४ च्या आश्विन शु. ४ रोजी शिंदे-होळकर यांच्यांत लाखेरी येथे प्रचंड सामना होऊन होळकरांचा पराभव झाला. या सुमारास महादजी शिदे पुण्यास येऊन दौलतीची व्यवस्था पाहण्यात गुंतले होते. तेव्हां उत्तरेत एक विपरीत प्रसंग घडून आला. महादजी शिंदे पुण्यास आले त्या वेळी त्यांनी सर्व कारभार गोपाळराव भाऊ, आचाजी रघुनाथ, जिवथा यक्षी, आदींच्या ताब्यात दिला होता. याच वेळी होळकरांच्या मनांत शिंदेचा मोड करावा असे होतेच. तुकोजी होळकर व त्यांचे मुलगे मल्हारराव आणि यशवंतराव यांच्या मनांत हा विचार फार दिवसांपासूनचा होता. त्याप्रमाणे होळकरांची तीस हजार फौज लाखेरीच्या खिडीत तयार झाली असतांना शिंदेच्या वतीने डी बॉयनने त्यांवर चाल केली. डी बॉयनजवळ नऊ हजारांचा पायदळ कंपू व तोफखाना होता. ” खिंडीच्या टोकावर ड्यू डनेकच्या अडतीस तोफा मोक्याचे स्थळ पकडून तयार होत्या. दोन्ही उतरणीवर दाट जंगल व खालील मैदान पावसाने अद्याप ओले होते. दोनहि बाजूंम प्रवीण सेनापतींनी पाश्चात्य युद्धपद्धतीचा अवलंब केलेला. हिंदुस्थानच्या इतिहासातील हा पहिलाच एतद्देशीय सामना होता.-” डी बॉयनच्या तोफा बैलांच्याकडून खिंडीत आणस्था जात असतानाच त्याच्या दारूच्या कोळ्यांत होळकरां कडील ड्यू भनेकचे गोळे येऊन पडले आणि मोठाच भडका उडाला. आणि होळकरांच्या सैन्याने जोराचा हल्ला केला. परंतु बाजूच्या झाडीत डी बॉयनचे कसलेले पायदळ व तोफरवाना लपलेला होता, त्यांनी पुढे येऊन होळकरांवर मोठाच हल्ला केला. त्यापुढे डयू ड्रनेकचे काही चालले नाही. या संग्रामात त्याचे पंधराशें लोक मात्र थोडक्या अवधीत कामास आले. डी बॉयनच्या तान्यांत खिंड येऊन होळकरांकडील अडतोस तोफा त्यास मिळाल्या. या लढाईत विजय मिळाला म्हणून शिंद्यांना मोठाच उत्सव केला. डी थॉयन लिहितो : “भी सिंद्याकरितां अनेक रणसंग्राम केले, पण लाखेरीसारखा निकराचा व अत्यंत चितेचा असा दुसरा कोणताच संग्राम झाला नाही.
🚩 जय जिजाऊ
🚩 जय शिवराय
🚩 जय शंभूराजे
सर्वांना कळविण्यात येत आहे की, खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये. शिवकालीन दिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी, त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.
🔔 शिवनिती
Whatsapp link :-
Telegram link :-
https://t.me/joinchat/Thc_cR1dJcbQfpKl
Facebook group :-
Website link :-
https://shivnitee.business.blog
https://Shivnitee.blogspot.com
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩