श्री बुधभूषणम् श्लोक ००२ ते ००६

🚩 श्री बुधभूषण 🚩
🖋 _“स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शिवपुत्र, शिवशंभू, छत्रपती संभाजीराजे भोसले महाराजांच्या “ विचारातून आणि लेखनातून साकारलेल्या “बुधभूषण” पवित्र ग्रंथाचे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून या पवित्र ग्रंथाचे वाचन होण्यासाठी एक छोटासा प्रयत्न.माझ्या लाडक्या राजाने 350 वर्षापुर्वीच लिहिलेला पवित्र ग्रंथ “बुधभूषण” मधील श्लोक व त्याचा मराठीत अर्थ देण्याचा एक प्रयत्न आहे ह्यातून कोणाची मने दुखावणे अथवा समाजात तेढ निर्माण होऊ नये, अशी सर्वाना विनंती.*वार :- मंगळवार*

दि. जाने. 21, 2020
वेळ -20:00*अध्याय : १ ला (अ)* *१. देवतावंदन* 🖋 *संकलन* श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर.

📞 7588020886

📕 संस्कृत काव्य 📕

🚩 श्लोक क्रमांक :-००२

शशाडकमौलि भसितेन भासूरं पंचानन शैलसुताधिनाथ | त्र्यक्ष गिरीशदशबाहूमंडित कुबेरमित्र सततं नमामि ||२||

🚩 मराठी अनुवाद:-
भालप्रदेशीच्या मुकुटावर चंद्र विराजमान झालेला, भस्माने शरीर चकाकत असणारा, सिंहस्वरूपी शैलकन्येचा प्राणप्रिय पति, त्रिनेत्रधारी, हिमालयाचा स्वामी पर्वतेश्वर दशभुजानी शोभणारा, कुबेराचा मित्र असणाऱ्या त्या अष्टनामाभिधानी देवतेस श्री श्री शिवशंकरास मी नेहमीच विनम्र अभिवादन करीत असतो.
(शिवशक्तीस्वरुप ऐक्याचे शाक्तधर्माचे शंभुराजे साक्षात प्रतीक होते.)

🚩 श्लोक क्रमांक ००३
विरिश्चि विष्णुवंदितं, नगअधिराजकन्यका | विभूषितार्धविग्रह प्रभुतवंदिसंस्तुतम || लसज्जटातट स्फुरत सुरापगाविनि:सर -| विशुद्धवारिशीतलं, नमामि चन्द्रशिखरंम ||३||

🚩 शब्दार्थ:- 🚩
अर्धविग्रह – अर्धाभाग सांधलेला,
नगा…. का….- पार्वती
सुरापगा – गंगा नदी,
विनी:सर – वहात असलेले.

मराठी अनुवाद:-
पर्वतेश्वर हिमालयाची कन्या श्री पार्वतीच्या अर्ध्याशरीराने जे विभूषित झालेले आहेत. अनेक पुष्कळ बंदिवान वीरांच्या कडून ही ही असुरा कडून ज्याची सुयोग्य स्तुती केली गेली आहे. ज्यांच्या जटाजूट देवनदी गंगेच्या वाहत्या व अत्यंत शुद्ध अशा शितल जलाने शोभायमान झाला आहे व पुरण पावला आहे, त्या चंद्रचुडामणि श्रीशंकराचे मी वंदन करतो. (श्री शिवशक्ती समन्वय व रिपुंजयी शिवाची ही गूढ नमस्कृती आहे.)

🚩 श्लोक क्रमांक :- ००४
अज्ञान कृष्णसरपेण दंशिता भूवि मानवा: | तेषा जीवन हेत्वर्थ नौमी जांड-गुलिकं गुरूम ||४||

🚩 शब्दार्थ :- 🚩
जांगुड-लिक – विषवैद्यक गारुडीया

मराठी अनुवाद :-
या पृथ्वीवरील माणसे अज्ञानाच्या कृष्णसर्पाने डसली गेली आहेत. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी गुरुनावाच्या विषवैद्यकाची म्हणजे सर्पाच विष उतरविणाऱ्या हेतुपुरस्सर निवड केलेली आहे त्याच मी नमन करतो.

🚩 श्लोक क्रमांक :- ००५
या भवेक्षणचका (को)र चंद्रिका, शांभवी निजजनस्य पालिका | या तुषार गिरिराजकन्यका, साममास्तु शुभकालमालिका ||५||

🚩 शब्दार्थ :- 🚩
शुभकाल- ईक्षण, दृष्टी
भवक्षण – श्रीशंकराच्या दृष्टीची
चकोर – चांदणे भक्षण करणारा पक्षी
शांभवी – शंभू देवाची पत्नी
निजजन – आत्मीय जी शिवाच्या चक्षुरुपी चकोरांना चांदणेच आहे.

मराठी अनुवाद :-
साक्षात शांभवी देवी स्वकीयांची रक्षक आहे, जी गिरीराज हिमालयाची सुकन्या आहे. ती माझ्यासाठी, शुभकालमाला असणारी श्री पार्वतीदेवी माझ्यासाठीही शुभकालदायी असो. श्री शिवांची साक्षात शक्ति असणारी पार्वतीदेवी जसे शंकराच्या नेत्रांना आनंद व स्वभक्तांना सदैव शुभकाळ ठरणारी आहे, तशी ती मलाही शुभमुहूर्तदायी होवो.

🚩 श्लोक क्रमांक :- ००६
सर्व देवमयीमीशां नौमी भूषासमान्विताम | यस्या: कटाक्षमात्रेण जायंते विबुधा नरा: ||६||

मराठी अनुवाद :-
सर्व देवदेवतांचे स्वरूप असलेल्या ईशारुपी अनेक अलंकारांनी युक्त असलेल्या पार्वतीस मी प्रणाम करतो. तिच्या एखाद्या कटाक्षाने माणसे सुजाण होतात, त्या कटाक्ष सूत्री मातेस नमन!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩_दररोजच्या काव्य वाचण्यासाठी लेख मिळण्यासाठी खालील लिंकवर जॉईन व्हा._

https://bit.ly/38oqS4g

वरील साहित्य मूळ लेखनासह इतरांना शेअर करावे, त्यात कोणत्याही स्वरूपात बदल करण्यात येऊ नये, समाजात आपणच आपल्या राजाची महती जाणून घेत वाचन व्हावे हीच आई तुळजाभवानी, श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्या चरणी प्रार्थना करत आहोत.

संदर्भ :- जिजाई प्रकाशन.

7588020886

Leave a comment