आयुष्याची पलटणारी पाने

बोधकथा : आयुष्याची पलटणारी पाने

एका गावात अमोल नावाचा मुलगा होता. त्याला पुस्तके वाचायला खूप आवडायचे. शाळेच्या वाचनालयातून तो नेहमी नवी नवी पुस्तके आणायचा आणि त्यातील गोष्टींमध्ये रमून जायचा. त्याला वाटायचे की पुस्तकात लिहिलेलेच सगळ्यात मोठे ज्ञान असते.

एके दिवशी शाळेचे शिक्षक म्हणाले, “फक्त पुस्तकं वाचून चालत नाही, आयुष्यातील अनुभवातूनही खूप काही शिकायला मिळतं.” पण अमोलला तेव्हा ते फारसं पटले नाही.

काही दिवसांनी गावात पूर आला. अनेक लोकांच्या घरांचे नुकसान झाले. अमोलच्या मित्राचे घरही पाण्यात भिजले होते. अमोलने पहिल्यांदाच पाहिले की लोक एकमेकांना मदत करत आहेत—कोणी अन्न देत होते, कोणी कपडे, तर कोणी आधार देत होते. अमोलही आपल्या मित्राला मदत करू लागला.

त्या दिवशी अमोलला जाणवले की पुस्तकांमध्ये मदतीचे, मैत्रीचे आणि माणुसकीचे धडे वाचले होते, पण प्रत्यक्ष आयुष्यात ते अनुभवताना त्याचा खरा अर्थ समजला.

घरी परतल्यावर अमोल आईला म्हणाला, “आई, आज मला समजलं की पुस्तकांच्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पाने जास्त शिकवतात.”

आई हसून म्हणाली, “हो बाळा, पुस्तकं आपल्याला मार्ग दाखवतात, पण अनुभव आपल्याला खरे शहाणपण देतात.”

बोध :
पुस्तकातून ज्ञान मिळते, पण आयुष्यातील अनुभवातून खरी शहाणपण आणि समज मिळते.

श्री. लक्ष्मण काटेकर
सोलापूर

Leave a comment