गुरुजींच्या सुट्ट्या वास्तव आणि भ्रम

गुरुजींच्या सुट्ट्या वास्तव आणि भ्रम ! शाळांना उन्हाळी व दिवाळी सुट्ट्या लागल्या की समाजात, नातेवाईकांत, किंबहुना इतर सरकारी कर्मचाऱ्यांतदेखील विद्यार्थ्यांसोबतच्या गुरुजींच्याही दीर्घ सुट्ट्यांचा विषय चेष्टा-मस्करीने का होईना निघतोच! *सर्वांना असं वाटतं की, गुरुजींना उन्हाळ्यात दीड महिना व दिवाळीत पाऊण महिना घरी बसून शासन पगार देते. सर्वांचा असा समाज असतो की जणू काही गुरुजींना इतर सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा खूप काही जास्त सुट्ट्या असतात. पण खरंच असे असते का*? गुरुजींना व इतर सरकारी कर्मचाऱ्यांना किती सुट्टी असतात याचं गणितच एकदाच समजून घेऊयात!

सर्वप्रथम गुरुजींचं सुट्ट्यांच गणित पाहूया👇🏻

२०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शासनाने ठरवून दिलेले कामकाजाचे दिवस- २३८

म्हणजेच वर्षभरातील सर्व मिळून (उन्हाळी+दिवाळी+सर्व रविवार+ सर्व सार्वजनिक सुट्ट्या) एकूण सुट्ट्या- ३६५-२३८= १२७

यात शिक्षकांना वर्षभरात एकूण देय रजा –
i) किरकोळ रजा-१२
ii) अर्जित रजा-१०
एकूण – २२

म्हणजेच एखाद्या शिक्षकांनी त्याच वर्षात सर्वच्या सर्व रजा उपभोगल्या तर शिक्षकांच्या एकूण सुट्ट्यांची संख्या= १२७+२२= १४९

म्हणजेच गुरुजींना एका वर्षात जास्तीत जास्त १४९ दिवस सुट्ट्या मिळतात!

आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचे गणित समजून घेऊया!

वर्षाचे एकूण दिवस-३६५
पैकी सर्व शनिवार व रविवार सुट्ट्या-१०४
सार्वजनिक सुट्ट्या-२५ (यापैकी यावर्षी ५ सुट्ट्या शनिवारी व रविवारी आल्यामुळे ही संख्या= २०)

सुट्ट्यां व्यतिरिक्त इतर सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण देय रजा –
i) किरकोळ रजा-०८
ii) अर्जित रजा-३० (म.ना.से.,१९८१ नियम ५०)
iii) अर्धवेतनी रजा -२०(म.ना.से.,१९८१ नियम ६०) (या अर्धवेतनी रजांचे म.ना.से.,१९८१ नियम ६१ नुसार परिवर्तित रजांमध्ये एकूण १० दिवसांत परावर्तन करता येते.)
एकूण -०८+३०+१०= ४८

म्हणजेच इतर सरकारी कर्मचारी एका वर्षात जास्तीत जास्त घेऊ शकणाऱ्या सुट्ट्यांची संख्या= १०४+२०+४८= १७२

म्हणजेच इतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एका वर्षातील कमीत कमी कामकाजाचे दिवस= ३६५-१७२= १९३

अन् गुरुजींसाठी एका वर्षातील कमीत कमी कामकाजाचे दिवस= ३६५-१४९= २१६

याचाच अर्थ गुरुजींना इतर सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा वर्षभरात २३ दिवस कमी सुट्ट्या आहेत.
अर्थात आम्ही जेवढ्या आहे, तेवढ्याच सुट्ट्यांमध्ये प्रचंड समाधानी आहोत. मात्र गुरुजींना खूपच जास्त सुट्ट्या असतात, असा कुणाचाही गैरसमज नसावा, यासाठी या सुट्ट्यांच्या गणिताची मांडणी सर्वांच्या सेवेत सादर

त्यामुळे गुरुजींच्या उन्हाळी आणि दिवाळी सुट्ट्यांबाबतचा आपल्या मनातील थोर गैरसमज सर्वांनी मनातून काढून टाकावा व आमच्या गुरुजनांना मनमोकळेपणाने दीर्घ सुट्टीचा आस्वाद घेऊन द्यावा 🙏🏻☺️

Leave a comment