28 जानेवारी दिनविशेष

२८ जानेवारी १६८४ रोजी त्याने इंग्लंडला कळवले,
“संभाजीमहाराजांनी पोर्तुगिजांचा उत्तर प्रदेशातील ४० कोसांचा भाग जाळून उध्वस्त केला. कारंजा आणि एलिफंटा ही इंग्रजांची बेटेही घेतली. कंपनीकडे मुंबईमधून ते ४०० पिंप दारू, ६० मोठ्या तोफा, ४००० पौंड कथिल, ४०० यार्ड ब्रो क्लोथ (braw cloth ), १५० लहान जहाजे आणि १ मोठे जहाज मागत आहे. न दिले तर पोर्तुगीजांसारखे आपलेही पारिपत्य घडेल. चाईल्ड (Child) व वॉर्डने (Ward) याचा विचार न केल्याने शत्रू आता ३०,००० सैन्य घेऊन सरहद्दीवर उभा आहे…”

छत्रपती संभाजी महाराज

केजवीनकडे मुंबईची सत्ता येताच त्याने संभाजी महाराजां बरोबर धरसोडीचे धोरण सोडून मैत्रीचे खंबीर धोरण अवलंबले. या सर्व परिस्थितीचे मूळ होते संभाजी महाराजांचे लष्करी आणि आरमारी सामर्थ्य. यामध्ये आरमारी सामर्थ्याला विशेष महत्व आहे कारण इंग्रजांसारख्या प्रगत आरमार असणाऱ्या सत्तेला एका बेटावर राहून देखील संभाजी महाराजांचा एवढा धाक वाटत होता आणि संभाजी महाराजांच्या आरमारी शक्तीपुढे नमते धोरण स्वीकारत इंग्रजांनी तह करण्याचा निर्णय घेतला होता. संभाजी महाराजांची निडर आणि महत्वाकांक्षी वृत्ती प्रजेचे संरक्षण करण्याचे ध्येय पूर्ण करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करीत होती. पोर्तुगीजांच्या सहाय्याने सुरतकर मुंबईतील बंडखोरांविरूध्द योजना आखत होते मात्र केजवीन संभाजी महाराजांशी सख्य करण्याचा प्रयत्न करीत होता. शेवटी कप्तान गेरी (Captain Gary) आणि विलकिन्स (Wilkins) यांच्या भेटीनंतर केजविनने संभाजी महाराजांशी १५ मे १६८४ रोजी तह केला. इंग्रज आणि मराठे यांच्यात कर्नाटक प्रांतासाठी ११ कलमी आणि मुंबई प्रांतासाठी ३० कलमी तह मंजूर झाला. व्यापारी कलमांसह गुलामांच्या खरेदी विक्रीला बंदी, आरमार आणि समुद्री प्रवासासंदर्भात नियम आणि अटी तयार करून हा तह स्वीकारला गेला. सिद्दीला आसरा न देणे ही तहाची मुख्य अट होती. तहाचे पालन केल्यास इंग्रज संभाजी महाराजांविषयी आश्वस्त होते…
ऑक्टोबर १६८६ रोजी सुरतेहून गेलेल्या पत्रात इंग्रज लिहितात, “जर आपण संभाजी राजांना विनंती करून काही काळ खांदेरी आपल्याकडे घेतले तर सिद्दीचा उपद्रव रोखू शकतो.” याबाबत इंग्रज आणि संभाजी राजांमध्ये चर्चा होऊन ३० नोव्हेंबर रोजी मुंबईकर लिहितात, “संभाजी राजेशी आम्ही करार केला क त्यांनी आम्हास २० खंडी तांदूळ आणि ५०,००० रुपये रोख द्यावे आणि आम्ही त्यांचा कोरले (कोरलई, कुलाबा किल्ल्याजवळचा एक किल्ला) भाग शत्रूपासून संरक्षित करू. या कराराने पोर्तुगीज आणि सिद्दीस काळजी वाटत आहे परंतु आम्ही त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहोत..” अशा प्रकारे संभाजी राजांनी आपल्या राजकीय कौशल्याचा वापर करून इंग्रजांच्या आधाराने सिद्दी आणि पोर्तुगीज या समुद्रातल्या प्रबळ शत्रूंनाही जरब बसविली…

――――――――――――

Leave a comment