विभाज्यातेच्या कसोट्या

2 ची कसोटी –

#ज्या_संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या संख्याना 2 ने नि:शेष भाग जातो .

उदाहरणार्थ – 4456 , 982302
वरील दोन्ही संख्या च्या एकक स्थानी अनुक्रमे 6 व 2 हे अंक आहेत

म्हणून 4456 व 982302 ही संख्या 2 ने विभाज्य आहे.

3 ची कसोटी –
जर दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज 3 च्या पाढ्यातील असेल तर त्या संख्येला 3 ने निःशेष भाग जातो. किंवा

उदाहरणार्थ – 4731
या संख्येच्या सर्व अंकाची बेरीज 15 येते.
पुन्हा 15 ची बेरीज 1+5 = 6 येते व 6 ला 3 ने भाग जातो .

म्हणून4731 या संख्येस 3 ने निःशेष भाग जातो .

4 ची कसोटी –
जर दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानातील अंकाने तयार होणाऱ्या संख्येस 4 ने निःशेष भाग जात असेल किंवा दशक व शतक स्थानी 0 हा अंक असेल तर त्या पूर्ण संख्येस 4 ने निःशेष भाग जातो.

उदा-578456 या संख्येतील शेवटच्या दोन म्हणजे दशक व एकक स्थानी अंक 56 आहे.
56÷4=14 हा पूर्ण भाग जातो म्हणून 578456 या संख्येस 4 ने भाग जाईल.

तसेच 5800 या संख्येच्या शेवटी दशक व एकक स्थानी शून्य हा अंक असल्याने पाच हजार आठशे या संख्येत चारने भाग जाईल.

5 ची कसोटी –
ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असतो त्या संख्येला 5 ने निःशेष भाग जातो.
उदा.
1234635 व 1236980


6 ची कसोटी –
ज्या संख्येला 2 व 3 ने निःशेष भाग जातो त्या संख्येला 6 सुद्धा ने निःशेष भाग जातो .

म्हणजेच_ज्या सम संख्येला तीन ने भाग जातो त्या संख्येला सहा ने सुद्धा भाग जातो.

उदा.431424

8 ची कसोटी –
ज्या संख्येच्या एकक , दशक व शतक स्थानच्या अंकानी तयार होणाऱ्या संख्येस 8 ने भाग जात असेल तर त्या संख्येस 8 ने निःशेष भाग जातो .
तसेच एकक दशक शतक या तीनही स्थानी शून्य असणाऱ्या संख्येसही 8ने नि:शेष भाग जातो.

उदा.78000 शेवटी तीन शून्य आहे म्हणून 8 ने भाग जाईल.

12496 या संख्येच्या शतक एकक व दशक स्थानी 496 ही संख्या आहेत व तिला 8 ने भाग जातो म्हणून 12496 ला सुद्धा 8 ने पूर्ण भाग जाईल.


9 ची कसोटी –

ज्या संख्येच्या सर्व अंकाच्या बेरजेला 9 ने भाग जातो त्या संख्येला सुद्धा 9 ने पूर्ण भाग जातो .
उदा -478953
सर्व अंकांची बेरीज 36 येते. 36 ला 9 ने भाग जातो म्हणजेच 478953 या सं संख्येला सुद्धा 9 ने पूर्ण भाग जाईल


10 ची कसोटी –
ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य अंक असतो त्या संख्येला 10 ने निःशेष भाग जातो .
उदा.875960


11 ची कसोटी –

ज्या संख्येतील अंकाची एकआड एक बेरीज केली असता आलेल्या बेरजेतील फरक 0 किंवा 11 च्या पटीत येत असेल तर त्या संख्या ला 11 ने निःशेष भाग जातो .

उदा. 578963 एकाआड एक अंकांची बेरीज
या संख्येतील 5+8+6=19
व 7+9+3=19
19-19=0 म्हणून
578963 ला 11 ने भाग जातो.
तसेच
47597 यातील एकाआड एक अंक बघा
4+5+7=16
दुसरे अंक बघा
7+9=16

16-16=0

म्हणून 47597 या संख्येला 11 ने भाग जाईल.

13 ची कसोटी –
दिलेल्या संख्येच्या एकक स्थानचा अंक घ्यावा त्या अंकाची चार पट करून संख्येच्या राहीलेल्या भागात मिळवत जावी असे करत गेल्यास शेवटी येणाऱ्या संख्येस 13 ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येस 13 ने निःशेष भाग जातो.

उदाहरणार्थ – 59527

5952+ 28= 5980

598 + 0 = 598

59+ 32 = 91

9+4=13

येथे 13 ला 13 ने पूर्ण भाग जातो म्हणून 59527 ला पण 13 ने निःशेष भाग जातो.

=========================

17 ची कसोटी –

दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंकाची 5 पट ही राहीलेल्या संख्येतून वजा करत गेल्यास शेवटी 17 ने भाग जाणारी संख्या असेल तर त्या संपूर्ण संख्येला 17 ने निःशेष भाग जातो .

उदाहरणार्थ – 3281

3281 = 328 – 5 = 323

323 = 32 – 15= 17

17 ला 17 ने भाग जातो.
म्हणून 3281 ला पण 17 ने पूर्ण भाग जातो.

Leave a comment