1990 चा काळ होता तो…

१९९०-९१ चा काळ होता तो…

त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी सायकल घेत होतो…

बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कँरीअर नसायचे, ज्यामुळे तुम्ही कुणाला डबल सिट नेऊ नये हा उद्देश असायचा. 😀

भाडे जेमतेम ५० पैसे ते १ रू तास च्या आसपास होतं.

दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा. 📝

घराच्या जवळ असे अनेकजण सायकल दुकानदार होते…

👉🏻 भाड्याचे नियम कडक असायचे.

● जसे पंचर झाली तर त्याचे वेगळे पैसे, तुटफुट आपली जबाबदारी…

मग त्या सायकल वर आम्ही गल्लीतले युवराज सवार व्हायचो 🤠

पुर्ण ताकदीने पायडल मारत , कधी हात सोडत बँलेंस करत , कधी खाली पडुन पुन्हा उठून चालवायचो.

आपल्या गल्लीत येऊन सर्व मित्र आळीपाळीने सायकल चालवायला मागायचे.

भाड्याच्या टाईमाचा लिमिट निघुन न जावा ⏱ म्हणून

तीन चार वेळेस त्या दुकानापासुन चक्कर व्हायची… 💫

तेव्हा भाड्याने सायकल घेणं , हे आमच्या श्रीमंतीचे लक्षण होतं… 🤩

स्वतः ची लहान सायकल असणारे त्यावेळेस खुप रईसी झाडायचे… 🧐

एव्हाना आमच्या घरी तेव्हा मोठी काळी अँटलस सायकल आणली , 🚲

पण तिला स्टँडवरुन काढणं आणि लावणं

यातचं अर्धी एनर्जी वाया जायची

आणि वरुन वडिलधाऱ्याचा धाक…

खबरदार हात लाऊ नको सायकलला , गुडगे फुटुन येशील…

तरी पण न जुमानता आम्ही घरचे बाहेर गेले की , ती मोठी सायकल सुध्दा हातात घेऊन धुम ठोकायचो… 👍🏻

पायडल वर पाय ठेऊन बँलेंस करायचं…

असं करत करत आम्ही कैची ( हाफींग ) शिकलो.

नंतर नळी पार (फुल पायडल ) करुन नविन विक्रम घडवला.. 😀

यानंतर सिट पर्यंत चा प्रवास एक नवीन अध्याय होता ,

नंतर सिंगल, डबल, हात सोडुन, कँरीअर वर बसुन चालवण्याचे सर्व स्टंट आम्ही तेव्हाच करुन चुकलो… 😇

खरं तर जीवनाची सायकल अजुनही चालु आहे 😊

पण आता ते दिवस नाही…

तो आनंद नाही….

आज सहज कंपाउंड मध्ये धुळ खात पडलेल्या

मुलांच्या सायकल वर 🚲 नजर गेली तेव्हा वाटलं एक काळ गाजवलेल्या

सायकल ची किंमत अन् मजा यांची सर

आता असलेल्या बुलेट ला पण येणार नाही… 🏍

गेले ते दिवस…🍁

राहिल्या त्या आठवणी……🍂

Leave a comment