सोलापूर हे नाव 16 पूर ( गावांवरून ) कसे पडले

सिद्धेश्वर महाराज की जय !
बघा,सोलापूर बद्दल आपणास काहीच माहीत नाही.काही निमित्ताने गुरुदेवांकडे जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा एका साधकाने सोलापूर म्हणजे 16 पूर हे कोणते विचारले असता 2000 वर्षापूर्वीच्या सोलापुरची खुप गुह्य माहिती प्रगट झाली.-
1.काळजापुर
2.सन्नलगी
3.कुंभगिरी(कुंभारी) 4.बद्रिकापुरी(बद्रीमनी-बोरामणी)
5.दुर्गन्हळ्ळि(दर्गनहळ्ळि) 6.मातापूर(विंचूर-तेथे भीमेच्या पात्रात गणपती आहे)
7.होतृगी(होटगी)-म्हणजे ‘होता-अध्वर्य=सामवेदींची ब्राह्मण वस्ती होती
8.कमठपुरम-ब्राह्मणांना लागणारी मातीची भांडी करणारे लोक तेथे होते-कुमठा
9.मंद्रपुरी-मंद्र स्वरात वेदगान करणाऱ्यांची वस्ती-मद्रेवाड़ी
10-वलयश्रुंग-सर्व गावांना वेढुन देखरेख करून संरक्षण करणारे tower-वळसंग
11.शैलग्राम- घरास लागणारे दगड पुरावणारे लोक रहात-शेळगी
12.दधिस्थान-दूध दही पुरावणारे गाव(दहिटणे) 13.प्रफुल्लपुर(पोफळी)-गायत्री उपासनेचे स्थान.ब्रह्म समवेत गायत्री उपासनेत दारूहळद imp असते, येथे कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण त्याची शेती करत.
14.तद् वलयं- वळसंग च्या tower(दुर्बिण विद्या) वर उभारल्यावर हे शेवटचे टोक दिसत असे-तडवळ
15.रामपुर व लक्ष्मणपुर(आजचे लच्चाण)

16.अस्त्रद(आहेरवाडी)-अस्त्र शस्त्राचा साठा असणारे गाव. त्या आगाराचा प्रमुख लिंगायत पण हिशेब ठेवणारे ब्राह्मण म्हणून मग त्या ब्राह्मण्णांना शेती वाडी देऊन तेथे ठेवले व शेजारी वस्त्रद-वस्त्र पुरावणारे गाव.
या सर्वांचे मुख्यालय सोलापूर (सुवर्णपुर=सोन्नलगी).
असे हे ब्रह्मदेव गायत्रीचे उपासना स्थान असलेले सोलापूर होते.

Leave a comment