चक्रम गणिती
-शशिकांत सावंत
पॉल एर्दोस हा हंगेरियन गणितज्ञ होता . बेघर गणितज्ञ म्हणाला हवं याचं कारण आयुष्यभर तो भटकत राहिला आणि त्यालाच तसं घर कधीच नव्हतं. दोन बॅग्समध्ये गणिताचे पुस्तक आणि विविध पेपर भरून तो जगभर फिरत असे.
तो इतका सर्वांतर फिरायचा की कोणी म्हटलं मला एरदोसला भेटायचेय तर लोक म्हणत जरा वाट बघा इथे प्रकटेल.
पूर्ण अमेरिका इंग्लंड आणि रशिया,पूर्व जर्मनी असे ज्यांना पोलादी पडद्याआडच देश सर्वत्र तो जाऊ शकायचा .
वयाच्या सतराव्या वर्षी त्याला आपल्याच वयाच्या कुणीतरी मुलगा गणिताचा अभ्यास करतोस कळलं तर त्याच्या घरी गेला आणि दार उघडताच म्हणाला की तुला पायथागोरसच्या सिद्धांताच्या किती सिद्धता माहीत आहेत तो म्हणाला एक तर,हा म्हणाला की मला 37 माहीत आहेत आणि मग त्यांनी त्याला कुठला तरी चार आकडी संख्या द्यायला सांगितली . त्याने तो दिल्यावर लगेच त्याचा वर्ग करून दाखवला आणि तो म्हणाला आता मी वयस्कर झालो आहे त्यामुळे मला घात जमणार नाही
आलादी कृष्णास्वामी नावाच्या मद्रास मधल्या मुलाने त्याच्या गणितज्ञ वडिलांनाही एकदा एक प्रश्न विचारला तर त्यांना सोडवता आला नाही तेव्हा त्याला कोणीतरी एर्दोसला पत्र लिहा असं सांगितलं पण पत्ता नव्हता म्हणून त्यांनी ते वैज्ञानिक संस्थेला लिहिलं लगेच मिळालं. एर्दोसनी उत्तरादाखल पत्र पाठवलं,आणि लिहीलं की मी कलकत्त्याला एका सेमिनारला येणार आहे तेव्हा तू तिथे मला भेटायला ये.
मद्रास आणि कलकत्ता नंतर आपल्याला माहीतच आहे. दुर्दैवाने तेव्हा आलादीला जायला जमणार नव्हतं म्हणून त्यांनी वडिलांना पाठवलं. एर्दोस वडिलांना शांतपणे म्हणाला, मला वडील नको मुलगा हवा आणि नंतर तो सरळ आलादीला भेटायला मद्रासला गेला आणि त्याने गणिताच्या प्रश्नावर चर्चा केलीच पण अमेरिकेत ला ऍडमिशन घ्यायचं होतं तर त्याने सरळ संस्थेच्या प्रमुख यांना पत्र लिहिलं होतं आणि त्यामुळेच आलादीला स्कॉलरशिपही मिळाली. जगभर विविध गणितज्ञ बरोबर मिळून त्यांनी जवळपास दीड हजाराच्या वर पेपर लिहिले आहेत.
नेमकी संख्या कोणाला सांगता येणार नाही साडेचारशे लोकांबरोबर त्यांनी पेपर लिहिले आहेत जगभर गणिताचा अभ्यास करणार्या माणसांना मध्ये एक एर्दोस नंबर नावाची एक संकल्पना आहे. म्हणजे एखाद्याने जर एर्दोस बरोबर पेपर लिहिला असेल तर त्याचा एर्दोस नंबर 1. दुसऱ्या एखाद्याने त्याच्या त्याबरोबर पेपर लिहिला ,तर त्याचा एर्दोस नंबर 2. या दुसर्या क्रमांकाबरोबर कोणी पेपर लिहिला तर त्याचा एर्दोस नंबर तीन याप्रकारे जगभरच्या , लाखो गणितअभ्यासकाना एर्दोसी नंबर आहेत अगदी अलीकडे मला भेटला तो म्हणाला त्याचा नंबर 17 आहे. हाच अलादी पुढे फ्लोरिडा विद्यापीठात गणित विभागाचा प्रमुख बनला.
एर्दोसने कधी लग्न केलं नाही. त्याला एक विलक्षण आजार होता त्याच्यामुळे त्याला शारीरिक संबंध अशक्य होता. त्याची मैत्री अनेकांबरोबर होते आणि अनेक स्त्री गणिततज्ज्ञांबरोबर त्यांनी पेपर्स लिहिले . पण व्यक्तिगत किंवा सांपत्तिक अशी कुठलीही अटॅचमेंट त्याच्या जीवनात नव्हती. अनेकदा मिळालेले पुरस्कार किंवा व्याख्यानांचे मानधन तो वाटून टाकत असे. एकदा त्याला wolf prize हा पुरस्कार मिळाला जो ५० हजार डॉलर रकमेचा होता. तेव्हा त्याने त्यातील फक्त साडेसातशे डॉलर स्वतःसाठी ठेवले आणि गरजू अभ्यासकांना रक्कम वाटून टाकली. अनेकदा तरुण अभ्यासकांना तो एखादे गणिती कोडे किंवा प्रमेय सोडवायला सांगायचं आणि त्यासाठी बक्षीस जाहीर करायचा . अगदी २५ डॉलरपासून पुढे ही रक्कम असायची आणि ही रक्कम त्याचा मित्र ग्रॅहम पाठवायचा. भारतात जेव्हा तो येत असे तेव्हा मिळालेल्या पैशातील काही रक्कम रामानुजन यांच्या विधवा पत्नीला द्यायचा .
गणिततज्ञ त्याच्यासाठी आपली घरे किंवा संस्थेची दारं उघडी करत. काही नवीन तो कुठल्याही देशातल्या गणिती मंडळींना पत्र लिहायचा आणि लिहायचा ‘माय ब्रेन इज ओपन . ‘ another roof ,another proof ‘ हे त्याचे आवडते वाक्य होते . हजारो लोकांशी त्यांचा पत्रव्यवहार होता असल्यामुळे आलादी प्रमाणेच अनेकांना त्याने गणिताच्या अभ्यासाची प्रेरणा दिली आणि विशेषतः तरुण वयात युरोपातील अनेक गणिताचा अभ्यास करीत असलेल्या अनेक मुलांना त्यांनी झपाटून टाकलं.
उच्च गणित हे एक व्यसन आहे असे एर्दोस मानायचा. युरोपमध्ये त्याची मोठी लाट वीस आणि तीसच्या दशकात होती. हंगेरी देश स्वतः क्षेत्रातल्या कलावंतांसाठी आणि अभ्यासकांसाठी प्रसिद्ध होता त्यात मायकेल korda सारखा हॉलीवूडमध्ये नाव कमावलेला माणूस असेल किंवा जॉर्ज मिकॅशसारखा लेखक असेल किंवा अनेक शास्त्रज्ञ असतील .
अशा हंगेरीमध्ये १९१३ मध्ये एर्दोसचा जन्म झाला . याचे आई वडील दोघे गणित शिक्षक होते,ज्युईश होते . वयाच्या चौथ्या वर्षी एर्दोस कुणाही माणसाचे वय सांगितल्यास त्याच्या आयष्यातील सेकंदांची संख्या सांगत असे .त्याच्या वडिलांना शिक्षा म्हणून सायबेरियाला पाठवण्यात आले . त्याचे अनेक नातेवाईक हिटलरच्या छळछावणीत मरण पावले . आई मात्र लपून राहिल्यामुळे बचावली. काही काळ तो आपल्या आईबरोबर राहिला.वयाच्या विशीत त्याला अमेरिकेत प्रिन्स्टन विद्यापीठात स्कॉलरशिप मिळाली . जवळपास तेरा विद्यापीठांच्या ऑनररी डॉक्टरेट त्याला होत्या.१९९६ साली वयाच्या ८३ वया वर्षी त्याला गणितावरील सेमिनारमध्ये हार्ट अटॅक आला . गणितावर काम करता करता आपल्याला मरण यावे अशी त्याची इच्छा पूर्ण झाली .
त्याच्यावर दोन पुस्तकं प्रसिद्ध झाली. एकाचे नाव आहे ‘माय ब्रेन इज ओपन ,’ हजारो मंडळींची त्याचा संवाद होता कधी पत्राने तर कधी प्रत्यक्ष. गणितातील एक मोठी चालती-बोलती चळवळ असं त्याचं वर्णन करावं लागेल