मराठी शब्द कोशातील घोडा संबंधित शब्द

मराठी शब्दकोशाची एक ओळख. घोडा- अश्व,घोटक, टार, तुरग, तुरंग, तुरंगम, तेजी, नर, वाजी, वारुव, सैंधव, हरी, हय.
घोडा ( अनेक रंगाचा) – अबलक
घोडा आणि गाढवीपासून झालेले- खेचर
घोडा खाजविण्याचे साधन- खरारा
घोडा सांभाळणारा- मोतदार
घोडी- अश्विनी, तुरंगा
घोडी किंवा गाढवीचा माज- हातेणे, हात्याण
घोडी ( मोठी व चांगली) – मादवान
घोडीचा बच्चा- शिंगरु
घोडे – वारिक, वारिके, वारिसे
घोडे खाजविताना हातात घालण्याची काथ्याची पिशवी- हातणी, हातनी
घोडे जोडलेला- संजोडा
घोडेस्वार- असिवार, तुरुक, बारगीर, राऊत, सादी.
घोडेस्वारांचा रात्रीचा पहारा – छबिना.
घोडेस्वारांची टोळी- पागा, मांड.
घोडेस्वारांची पलटण- रिसीला.
घोडेस्वारांची बिदागी- नालबंदी.
घोडेस्वारांनी केलेली लुटमार- रावताण,रावताणी.
घोड्याचा एक अलंकार- दुलदुले.
घोड्याचा गळा- गडखोल.
घोड्याचा तबेला- घोडशाळा.
घोड्याचा तळपाय- टाप .
घोड्याचा रोग- पिळा.
घोड्याचा लगाम- मोहाळी.
घोड्याचा वैद्द- शाळोत्री, साळोत्तरी.
घोड्याची अत्यंत जलदिची चाल- भरचौक
घोड्याची एक चाल – सात्रक.
घोड्याची एक जात- तट्टू.
घोड्याची कलगी- कंगण.
घोड्याची किंवा हत्तीची झूल- पाखर.
घोड्याची गाडी – तांगा.
घोड्याची चालण्याची एक गती – खुदकी.
घोड्याची चौकी चाल – छात्रक.
घोड्याची झूल – भुरकी.
घोड्याची मागच्या पायाची लाथ – दुमणी.
घोड्याची लाथ – टापर.
घोड्याची लीद खाणारे – लिदवळ.
घोड्याचे उधळणे – तुफान.
घोड्याचे ओरडणे – खिंकाळणे.
घोड्याचे खिंकाळणे – हेंसणे, हेषा.
घोड्याचे जीन – खोगीर.
घोड्याचे मागील पाय बांधावयाची दोरी – पायबंद.
घोड्याचे मूत्र साठविण्यासाठी पागेत केलेला खड्डा – मुताट.
घोड्याच्या अंगावरचे एक दुर्लक्षण – गोम.
घोड्याच्या ओठाला बांधलेली दोरी – होटाळी.
घोड्याच्या टाचेला बसविलेला लोखंडाचा तुकडा – नाल.
घोड्याच्या खोगीरावर घालण्याची गादी – गाशा.
घोड्याच्या गळ्याच्या खळगीवर असलेले शुभ चिन्हात्मक केसांचे वेटोळे – देवमणी.
घोड्याच्या गळ्यास बांधावयाची दोरी- दवासन.
घोड्याच्या चालीचा एक प्रकार – चवडचाल.
घोड्याच्या जीनाखाली घालावयाचा लोकरीचा कपडा – छाप.
घोड्याच्या जिनाची सोंड – हणा.
घोड्याच्या तोंडात घालण्याची साखळी- लगाम.
घोड्याच्या दोन्ही पायांना बांधलेली दोरी- कळवा.
घोड्याच्या नाकाचा शेंडा – मुंगा.
घोड्याच्या पागेला दाणा पुरविणारा अधिकारी – दाणेकरी.
घोड्याच्या पाठीवरील जाळीदार झालर – राघावली.
घोड्याच्या पाठीस पडलेले क्षत – नाळ.
घोड्याच्या पायाच्या घोट्याची खीळ – नेवर.
घोड्याच्या पायाच्या घोट्यावरील आच्छादन – दाभोटा.
घोड्याच्या लिदीची रास – लिदाड.
घोड्याच्या शेपटीतुन घ्यावयाची दोरी – दुमची.
घोड्याला चाल शिकविणारा माणूस – चाबूकस्वार.
घोड्याला चाल शिकविण्यासाठी बांधलेले दोर – रागवागा.
घोड्याला आवरण्यासाठी दिलेले हिसके – कावा.
घोड्याला द्दावयाचा तितका भरपुर दाणा – भरचंदी.
घोड्याला रात्री बाहेर काढणे – रातवा.
घोड्याला लागणार्या आवश्यक जिनसा – तंगतोबरा.
घोड्याला वर तोंड करता येवू नये म्हणून बांधलेला बंद – जेरबंद.
घोड्यावर चढण्यासाठी व पाय ठेवण्यासाठीच्या दोन कड्या – रिकब, रिकाबी.
घोड्यावरची गोणी – बदरा.
घोड्यावरली नौबत – तुडूंब.
घोड्यावरुन न उतरता – चढे घोड्यानिशी.
घोड्यावरील बंदुकवाला शिपाई – करोळ.
घोड्यास चाल शिकविण्याचा खुळखुळा – खांकरा.
शब्द समुहाबद्दल एक शब्द व एका शब्दाबद्दल अनेक पर्यायी शब्द सांगणारा असा हा अभिनव मराठी शब्दकोश.

मूळ लेखक सुधाकर काळे

Leave a comment