एकच राजा इथे जन्मला

एकच राजा इथे जन्मला
डोंगर कपारी आणि दरी
जनता सारी या राजाला
सदैव वाकूनी मुजरा करी

जनसेवेसाठी जीव  झिजविला
कधीच स्वतःची पर्वा न करी
यवनास या सदैव नडला
या सर्वांचा राजे नाश करी

कोणासही न कधी त्रासला
रयतेचे असे स्वराज्य उभारी
कधी न कोणास राजा घाबरला
सर्वांना समान न्याय करी

राजे पुन्हा यावे आपण जन्माला
त्यासाठी सर्व देवतांना साकडं करी
आधी जिजाऊंनी यावे जन्माला
ह्यावर आम्ही रचू गोड शब्दनगरी

शिवश्री लक्ष्मण काटेकर,
शिवनिती, 16पूर.

Leave a comment