अहो आमदार साहेब
आपण लोकशाहीच्या मंदिरात
शिक्षकांच्या विषयावर बोललात
म्हणून तुम्ही लै भारी बोललात राव, लै भारी
कारण आमदार साहेब,
आपण देखील एका शाळेत शिकून
फाटक्या विचारातून जगताना
ह्याच गुरुजींनी लोकशाही शिकवली
अन तुम्ही आज आमदार झाले,
म्हणून म्हणतो लै भारी बोललात.
अहो बसायला शेणाच सारवण,
आणि छताला गळका पत्रा असताना,
मायेची मांडी बनवून बसवलं,
गळक पाणी बादलीत भरलं,
ते ह्याच गुरुजींनी
म्हणून तुम्ही लै भारी बोललात.
जगाच्या नकाशावर ,
कधीच कोणाच्या अपेक्षेवर न थांबता
माझा विद्यार्थी म्हणून शिकवलं
आणि अधिकारी बनवले
ते ह्याच गुरुजींनी,
म्हणून तुम्ही लै भारी बोललात.
आमदार साहेब
संडास मुतारी नसल्यावर
ह्याच गुरुजींनी तुमची संडास झाडली हो,
लाज त्यांना वाटली पण,
तुम्हाला वाटती का एकदा बघा.
पुढारीपणाच्या गप्पा मारताना
संडाशीचा निधी गडप करायला
कोणताच गुरुजी येत नाही हो,
म्हणून तुम्ही लै भारी बोललात
अहो आमदार साहेब
तुम्ही पाचच वर्ष असता हो
पण आमचे गुरुजी 1834 पासून
अजून आहेत, राहतील ही,
पण त्यांनी कधीच विसरणार नाहीत की
यात्रेची वर्गणी गुरुजींनी द्यायची
देवाची पूजा पुढाऱ्यानी करायची,
म्हणून तुम्ही लै भारी बोललात,
अहो आमदार साहेब
गुरुजींनी समाजकारण शिकवलं
तुम्ही स काढून टाकला आणि
माजकारण केलं की हो
आणि जगणारी गरीब जनता,
मरणारी गरीब जनता झाली,
म्हणून तुम्ही लै भारी बोललात,
अहो आमदार साहेब,
गुरुजींनी शाळेत जाताच
पोर आदराने बघतात हो,
तसे तुम्ही आदराने वागावं
असं गुरुजींनी शिकवलं
पण तुम्ही गुरुजींची लाज काढून
काय मिळवलं आणि कमवल हे तुम्हाला माहित,
म्हणून तुम्ही लै भारी बोललात
अहो आमदार साहेब
तुम्ही तुमचा स्वार्थ बघता,
गुरुजींनी देशातील सर्वांचा विचार केला,
म्हणून आज गरिबांच्या घरात सुखाचा घास खातोय
तुम्ही इतका पैसा कमवून समाधान नाही
हाच फरक तुमच्यातील
म्हणून तुम्ही लै भारी बोललात
अहो आमदार साहेब
आजपर्यंत भ्रष्टाचार करणारांची यादी
राजकारण करत असलेल्या लोकांची
पण तरीही गुरुजींनी तुम्हाला कधी
बदनाम नाही केलं, अपमान नाही केला
तुम्ही गुरुजींची सगळी लाज काढली की ओ
म्हणून तुम्ही लै भारी बोललात
तुम्ही देवळात बोकड कापून देणगी दिली
पण शाळेत येऊन कधी
वही पेन नाही ओ दिला
गुरुजी सारखं देतात
कारण त्यांनी माणुसकी जगवतात
तुम्हाला नेमकं काय करायचं
ते फक्त तुम्हालाच माहीत.
म्हणून तुम्ही लैच भारी बोललात
तुम्ही घरात खायला नसताना
स्टार्च चे कपडे घालून फिरता
तुमच्या लेकराला कपडे नसतानाही
शाळेत येऊन गुरुजींला दम देता
पण तेच गुरुजी स्वतःच्या पैशातून
तुमच्या पोराला गणवेश तुमच्याच हातून देतात,
तेंव्हा तुम्ही गुरुजीला सोडून
तुमच्या बातम्यांचा बाजार करता
म्हणून तुम्ही लैच भारी बोललात,
अहो आमदार साहेब
शिकवण सोडून तुमची 150 कामे
आमचे गुरुजी बिनबोभाट करतात हो
त्यांचे अभिनंदन करायचे सोडून
तुम्ही त्यांचीच लाज काढता
किती आसुरी आनंद वाटतोय ना तुम्हाला
म्हणून तर तुम्ही लै भारी बोललात
अहो आमदार साहेब
इंग्रजी माध्यमाच्या शाळा
आमच्या गुरुजींनी कुठंही नाही काढली
त्या तुमच्या सारख्या व्यवसायिकने काढल्या
आणि तुम्ही गुरुजींना दोष देताय
कोणी दिली परवानगी बघा बर,
म्हणून तुम्ही लै भारी बोललात
अहो आमदार साहेब
एकदा तुमच्याच लेकराला बोला
तुला कोणती शाळा आवडती विचारा,
त्यांनी जर आमच्या गुरुजींची
नाही सांगितली तर नाव बदलून ठेवा
एवढा विश्वास आमचा गुरुजींच्या वर
आणि तुम्ही त्यांना बदनाम करताय
म्हणून तुम्ही लै भारी बोललात
शिवश्री लक्ष्मण काटेकर
📞 7588020886
⛳🚩⛳🚩⛳🚩⛳⛳