शिक्षकांची कामे

शालेय कामकाज व अध्यापना व्यतिरिक्त शिक्षकांनी करावयाची खालील अतिशय कमी कामे

१,- शाळा उघडणे
२,- वर्गखोल्या,परीसर,मुतार्या,संडास स्वच्छ करणे.
३,- घंटी वाजवणे.
४,- पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.
५,- वर्गखोल्यांची रंगरंगोटी सजावट करणे.
६,- डिजिटल वर्गखोल्या तयार करणे.

  • निवडणूका
    ७, – ग्रामपंचायतची निवडणूक पार पाडणे .
    ८, – पंचायत समितीची निवडणूक पार पाडणे
    ९, – जिल्हा परिषदची निवडणूक पार पाडणे .
    १०,- विधानसभेची निवडणूक पार पडणे.
    ११, -लोकसभेची निवडणूक पार पाडणे .
    १२, – मतदार याद्या तयार करण्याचे BLO म्हणून काम पार पाडणे.
  • बांधकामे
  • १३,- ईमारत बांधकाम
  • १४,- संडास मुतार्या बांधकाम
  • १५,- हँडवाश स्टेशन बांधकाम
  • १६,- इमारत देखभाल दुरुस्ती
    • सर्वेक्षणे
      १७,- शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करुन त्यांना शाळेत दाखल करुन शाळेच्या प्रवाहात आणने.
      १८,- संपूर्ण गावाचे वयोगटानुरुप संवर्गारुप साक्षर निरक्षर सह दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षण.
      १९,- जनगणना सर्वेक्षण.
      २०,- दारिद्रय रेषेखालील लोकांचे सर्वेक्षण.
      २१, – पशुसर्वेक्षण
      २२, – शौच्छालयाचे सर्वेक्षण
  • शालेय समित्या स्थापण करणे
    २३, – शालेय व्यवस्थापण समिती स्थापण करण्यासाठी संपूर्ण निवडप्रक्रीया पार पाडणे.
    २४,- शा.व्य.स.च्या मासिक सभा व त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटन करणे.
    २५,- पालक समिति निवड करणे,दरमहा सभा घेणे व त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटन करणे.
    २६,- मातापालक समिती निवड करणे.दरमहा सभा घेणे,त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे .
    २७,- शालेय पोषण आहार समिती निवड करणे,दरमहा सभा घेणे, इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे.
    २८, – विद्यार्थीनी सुरक्षा समिती तयार करणे,सभा घेणे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटन करणे.
    २९,- तंबाखू व्यसनमुक्त समिती तयार करणे मासिक सभा घेणे इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे.
    ३०,- तंबाखू मुक्त शाळा घोषीत करणे.
    ३१, – विद्यार्थी परिवहन समिती तयार करणे मासीक सभा घेणे इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे.
    ३२,- गावातील तंटामुक्त व इतर समित्यांवर पदसिद्ध सदस्य म्हणून मु.अ.ना भुमिका पार पाडावी लागते.
    ३३,- ग्रामसेवकाच्या अनुपस्थीतीत ग्रामसभेचा सचिव म्हणून मु.अ.ना भुमिका निभवावी लागते.
  • विविध शालेय योजनांची अंमलबजावणी करणे
    ३४,- शालेय पोषण आहार योजने अंतर्गत स्वयंपाकीची व मदतनीसाची निवड करणे.
    ३५, – स्वयंपाकीची व मदतनीसाची करारनामे,बॕकखाते,आधार,मेडिकल सर्टिफिकेट इ.दस्तावेज फाईल तयार करुन कार्यालयाला सादर करणे, माहिती अॉनलाईन करणे.
    ३६,- रोजच्या उपस्थितीनुसार शालेय पोषण आहार लाभार्थांची रोजची रोज माहिती आनलाईन करणे.
    ३७, – शालेय पोषण आहार ठेकेदाराकडून प्राप्त साठा मोजून घेणे व सुरक्षितसाठवणूक करणे.
    ३८,- प्राप्त साठ्याची नोंदवही १ मध्ये प्राप्त खर्च शिल्लक साठ्याची नोंद घेणे व ग्रॕमपासूनचा हिशोब ठेवणे.
    ३९, – शिजवलेल्या शालेय पोषण आहाराची मुलांना अर्धा तास वाटपा अगोदर चव घेवून नोंदवही क्र.२ मध्ये नोंद घेवून त्याविषयी अभिप्राय नोंदवणे.
    ४०, – दर तिन माहिण्यांनी प्रत्येक विद्यार्थांची शारीरीक उंची वजन याची नोद घेवून त्याच्या प्रगतीची नोंद वही क्र.३ मध्ये घेणे.
    ४१,- स्वयंपाकी मदतनीस मानधन अदा करुन त्याचे कॕशबुक मेंटन करणे.
    ४२, – शालेय पोषण आहाराच्या वाटपाची,स्वच्छतेची भांडी धुनी व्यवस्था करणे
    ४३,- महिण्याच्या शेवटी संपूर्ण माहितीची डाग तयार करुन पाठवणे.
    ४४,- राजु मिना मंच उपक्रम राबवणे
    ४५,- विद्यार्थ्यांची अफलातुन बँक चालवने.
  • आरोग्य खात्यासी सबंधित योजनांची अंमलबजावणी
    ४६,- प्रत्येक मुलांची आरोग्य तपासणी करुन घेणे.
    ४७,- आरोग्य तपासणी कार्डच्या नोंदी ठेवणे.
    ४८,- सर्वप्रकारच्या धनुर्वात रुबेला…. लसिकरण मोहिम राबविणे.
    ४९,- लोहयुक्त गोळ्यांचे वाटप व नोंदी ठेवणे.
    ५०,- दिव्यांग विद्यार्थांसाठी विशेष कृतिकार्यक्रम राबविने.
    ५१,- राजीव गांधी अपघात विमा योजनेची अंमलबजावणी करणे.
    ५२,- अस्मिता योजनेची अंमलबजावणी करणे.
    ५३,- शाळेचा कृतिआराखडा तयार करणे.
  • विविध शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी
    ५४,- पूर्व उच्च प्राथमिक इयता ५ वी व पूर्व माध्यमिक इयता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करुन घेणे.फार्म आनलाईन भरणे, हॉल टिकीट काढणे परिक्षार्थींना पराक्षाकेंद्रावर ने आन करण्याची व्यवस्था करणे.
    ५५,- नवोदय परिक्षेची तयारी करुन घेणे,फार्म भरणे हॉल टिकीट काढणे परिक्षार्थींना परिक्षा केंद्रावर ने आन करण्याची व्यवस्था करणे.
    ५६,- विद्यावेतन शिष्यवृत्ती परिक्षेची वरिलप्रमानेच कार्यवाही करणे.
    ५७,- आदिवासी सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीचे सर्व कागदपत्रासह प्रस्ताव तयार करुन आनलाईन करणे.
    ५८,- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करुन पाठविने.
    ५९,- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करुन सादार करणे
    ६०,- अस्वच्छ कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करुन सादर करणे.
  • शालेय दस्तावेज अद्यावत ठेवणे
    ६१,- विद्यार्थ्याना दाखल करतांना प्रतीज्ञालेख रजिस्टरमध्ये नोंद घेणे.
    ६२,- विद्यार्थांना दाखल करुन घेणे त्याविषयीची संपूर्ण माहिती दाखल खारीज रजिस्टरमध्ये नोंदविने.
    ६३,- विद्यार्थांच्या वर्गवार दैनिक उपस्थीती हजेरीची नोंद ठेवणे.
    ६४,- शिक्षक उपस्थीती नोंद रजिस्टर ठेवणे.
    ६५,- चाचण्या सत्र परिक्षा घेवून निकाल रजिस्टर अध्यावत ठेवणे.
    ६६,- प्रमोशन रजिस्टर अध्यावत ठेवणे.
    ६७,- साठापंजी रजिस्टर अद्यावत ठेवणे.
    ६८,- BPLमुलींचा उपस्थीती भत्ता प्रस्ताव रजि.अद्ययावत ठेवणे.
    ६९,- उपस्थिती भत्ता वितरण रजिस्टर आद्यावत ठेवणे.
    ७०,- सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती वितरण रजि. अद्यावत ठेवणे.
    ७१,- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती रजिस्टर अद्यावत ठेवणे.
    ७२,- अस्वच्छ कामगारांच्या पाल्यांच्या शिष्यवृत्ती नोंद तथा वितरण रजि.अद्यावत ठेवणे.
    ७३,- आवक नोंद रजिस्टर अद्यावत ठेवणे.
    ७४,- जावक नोंद रजि.अद्यावत ठेवणे.
    ७५,- टी,सी.देणे व त्याची नोंद रजिस्टर मेंटन करणे.
    ७६,- व्हिजीट रजिस्टर अद्यावत ठेवणे.
    ७७,- आरोग्य तपासणी रजिस्टर अद्यावत ठेवणे.
  • लेखादस्तके(कॕशबुक) जमाखर्च नोंद रजिस्टरे
    ७८,- सर्वशिक्षा अभियान SSA अनुदान गणवेश अनुदान,शाळा अनुदान,बांधकाम,जमा खर्च हिशोब कॕशबुक मेंटन करुन नियमित लेखापरिक्षण (आॕडिट) करुन घेणे.
    ७९,- सादिल खात्यात जमा झालेल्या शिष्यवृत्या उपस्थीती भत्ता वाटप करुन जमा खर्च कॕशबुक मेंटन करणे व नियमित लेखापरिक्षण करुन घेणे.
    ८०,- शालेय पोषण आहार खाते MDM स्वयंपाकिचे जमा मानधन आदा करुन स्वतंत्र कॕशबुक मेंटन करणे व नियमित लेखा परिक्षण करुन घेणे.
    ८१,- शाळा सुधार फंड अंतर्गत लोकवर्गणी गोळा करुन शाळेच्या आवश्यक गरजा पूर्ण करणे त्याचे स्वतंत्र कॕशबुक मेंटेन करणे.
    ८२,- प्रत्येक खात्यात जमा झालेल्या हेडवाईज जमा खर्चाच स्वतंत्र रजिस्टर ठेवणे.
    ८३,- नियमित पासबुक नोंदी घेणे.
    ८४,- शाळेचे इलेक्ट्रिक बील भरणे
    ८५,- मोफत गणवेश योजना कापड खरेदी निविदा मागवणे,कापड घेणे दर्जीकडून शिवून घेणे,वाटप करणे त्याच्या गणवेश वाटप रजिस्टरमध्ये नोंदी ठेवणे
    ८६,- मोफत पाठ्यपुस्तक योजना पटसंख्येनुसार वर्गवार पुस्तकाची मागणी करणे.तालुका केंद्रस्थळावरुन पुस्तके आणने ती प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटप करणे.पुस्तक वाटप रजिस्टर वर स्वाक्षरी सह नोंदी घेणे,
    ८७,- प्रत्येक खर्चाचे उपयोगीता प्रमाणपत्र सादर करणे.
  • आॕनलाईन कामे
    ८८,- शालेय पोषण आहार MDM स्टाॕक आनलाईन करणे,
    ८९,- दैनंदिन शालेय पोषण आहार लाभार्थांचे आॕनलाईन करणे.
    ९०,- स्कुल पोर्टलची माहिती आॕनलाईन करणे.
    ९१,- स्टुडंट पोर्टलची माहिती आॕनलाईन करणे.
    ९२,- प्रत्येक विद्यार्थांच्या चाचण्या परिक्षांचे गुण आॕनलाईन करणे
    ९३,- शाळा सिद्धी माहिती आॕनलाईन करणे.
    ९४,- सर्व दाखल विद्यार्थांची माहिती आॕनलाईन करणे.
    ९५,- आॕनलाईन विद्यार्थ्यांना डिटॕच अटॕच करणे.

Udise
इतर वेळोवेळी अकस्मात मागितली जाणारी माहिती

  • फाईल्स
    ९६,- प्रत्येक हेड वाईज कॕशबुक च्या खर्चाच्या पावत्यांचे स्वतंत्र चिकट फाईल्स.
    ९७,- आवक फाईल
    ९८,- जावक फाईल
    ९९,- प्रत्येक शिष्यवृतीचे स्वतंत्र फाईल
    १००,- पगार पत्रक फाईल
    १०१,- शालेय पोषण आहार फाईल
    १०२,- टी.सी.फाईल
    १०३,- जन्म तारिख दाखले फाईल
    १०४,- रजा फाईल
    १०५,- आर्डर फाईल
  • प्रशिक्षणे व इतर उपक्रम
    १०६,- वर्गवार प्रत्येक विषयाची केंद्र ते जिल्हा राज्य स्तरापर्यंतची प्रशिक्षणे
    १०७,- मासिक शैक्षणिक परिषदा
    १०८,- वेळोवेळी मु,अ.सभा
    १०९,- गट सम्मेलने
    ११०,- बिटस्तरीय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव
    १११,- तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव
    ११२,- जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव
    ११३,- पंच तथा इतर समित्यात कार्य
    ११४,- नवरत्न स्पर्धा केंद्रस्तर ते जिल्हास्तरपर्यंत
    ११५,तंत्रस्नेही प्रशिक्षणे
    ११६,शालेय व्यवस्थापण समित्यांना प्रशिक्षण देणे.
  • मेळाव्यांचे आयोजन करणे
    ११७,- पालक मेळाव्याचे आयोजन करणे.
    ११८,- महिला मेळाव्याचे आयोजन करणे.
    ११९,- बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करणे.
    १२०,- विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन व नियोजन करणे.
    १२१- सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे.
    १२२,-राष्ट्रीय सण,वर्षभर सर्व महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या प्रभात फेर्या काढून साजर्या करणे.
    हे सर्व करुन एका शिक्षकाला दोन दोन तीन तीन वर्गाचे अध्यापण करावे लागते.
    अध्यापण कार्य
    १२३,- वार्षिक मासिक नियोजन करणे.
    १२४,- वेळापत्रक तयार करुन त्यानुसार अध्यापण करणे.
    १२५,- नियमित दैनिक टाचन काढणे.
    १२६,- लाॕगबुक मेंटन करणे.
    १२७,- मुलांचा गृहपाठ तपासने.
    १२८,- घटक चाचण्या घेणे.
    १२९,- सत्र परिक्षा घेणे.
    १३०,- पेपर्स तपासने.
    १३१,- निकालपत्रक तयार करणे.
    १३२,- दैनंदिन नोंदी घेणे.
    १३३,- प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुणपत्रक तयार करणे.
    १३४,- निकाल जाहिर करणे.
    १३५,- शाळेत वाचनालय चालवणे
    १३६,- प्रयोगशाळा तयार करणे.
    १३७,- वेगवेगळ्या विषयाचे कोपरे तयार करणे.
    १३८,- घटकानुरुप शैक्षणिक साहित्ये तयार करणे.
    १३९,- संगणक कक्ष तयार करुन विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देणे.
    शिक्षकांवर निगराणी ठेवणारी यंत्रणा
    १४०,-प्रत्येक पालक
    १४१,-सर्व शालेय समित्या
    १४२,-ग्रामपंचायत कमेटी
    १४३,-केंद्र प्रमुख
    १४४,-शिक्षण विस्तार अधिकारी
    १४५,- गटशिक्षणाधिकारी
    १४६,-शिक्षणाधिकारी
    १४७,-मुख्य कार्यपालन अधिकारी
    १४८,-शिक्षण उपायुक्त
    १४९,-शिक्षण आयुक्त
    १५०,-शिक्षण मंत्री.
    १५१,सर्व अधिकारी पदाधिकारी.
    १५२,शेवटी वार्षिक शालेय तपासणी.

Leave a comment