एकाच शब्दाचे भिन्न अर्थ.

 एकाच शब्दाचे भिन्न अर्थ.


1.    अभंग – न भंगलेला ,काव्यरचनेचा एक प्रकार

2.   अंतर – मन,भेद,लांबी

3.   अनंत – अमर्याद , परमेश्वर

4.   आस – इच्छा, गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा

5.   ऋण – कर्ज,उपकार,वाजबाकीचे चिन्ह

6.   ओढा – मनाचा कल,पाण्याचा लहान ओघ

7.   अंक – मांडी,आकडा

8.  अंग – शरीर,भाग ,बाजू

9.   अंबर – आकाश,वस्त्र

10.कळ – भांडणांचे कारण ,गुप्त किल्ली,वेदना

11. कर – हात , किरण ,सरकारी सारा

12. कर्ण – कान,महाभारतातील योद्धा ,त्रिकोणातील काटकोनासमोरील बाजू

13.काळ – वेळ , यम ,मृत्यू

14.गार – थंड ,बर्फाची गोटी

15.घाट – डोंगरातील रस्ता , नदीच्या पायऱ्या

16.चिरंजीव – मुलगा,दीर्घायुषी

17.जलद – ढग ,लवकर

18.जात – प्रकार,समाज

19.जीवन – आयुष्य,पाणी

20.जोडा – जोडपे,बूट

21.डाव – कारस्थान ,कपट ,खेळी

22.तट – किनारा ,कडा,किल्ल्याची भिंत

23.तळी – तळाला,तलाव,ताम्हण

24.तीर – काठ ,बाण

25.दंड – शिक्षा , काठी ,बाहू

26.द्वविज – पक्षी ,ब्राह्मण

27.धड – मानेखालचा शरीराचा भाग , अखंड,स्पष्टपणे

28.धडा – पाठ , रिवाज

29.ध्यान – चिंतन ,समाधी ,भोळसट व्यक्ती

30.धनी – मालक,श्रीमंत मनुष्य

31.नाद – छंद ,आवाज

32.नाव – होडी ,काशाचेही नाव

33.पय – पाणी , दूध

34.पर – परका , पीस

35.पक्ष – वादातील बाजू , पंख ,पंधरवडा,राजकीय संघटना

36.पत्र – पान ,चिठ्ठी

37.पार – पलीकडे ,वडाच्या भोवतालचा पार

38.पास – उत्तीर्ण ,परवाना

39.पात्र – भांडे , नदीचे पात्र ,नाटकातील पात्र ,कारणीभूत ,योग्य

40.पूर – नगर ,पाण्याचा पूर

41.भाव – भक्ती , किंमत ,दर , भावना

42.भेट – नजराणा ,भेटणे

43.माया – ममता ,धन,कपडा शिवताना कडेने सोडलेली जागा

44.मान – मोठेपणा , शरीराचा एक भाग

45.माळ – फुलांची माळ,ओसाड जागा

46.वर – आशीर्वाद ,वरची दिशा ,ज्याचे लग्न ठरले आहे असा पुरुष

47.वल्ली – वेल , स्वच्छंद माणूस

48.वाणी – उद्गार ,व्यापारी ,एक सरपटणारा किडा

49.वार – दिवस ,घाव

50.वात – वारा , विकार ,दिव्याची वात

51.वारी – पाणी ,यात्रा ,नियमित फेरी

52.वाली – रक्षण कर्ता ,एका वानराचे नाव

53.विभूती – पुण्यपुरुष ,भस्म ,अंगारा , रक्षा

54.सुमन – फूल ,पवित्र मन

55.सूत – धागा , सारथी

56.हार – पराभव ,फुलांचा हार

Leave a comment